आज सकाळी फेसबुक वर चाळे करत असताना एक मालिकेचे पेज सापडले..त्या पेज चे नाव होते " GIANT ROBOT "
माझ्या लहानपणीचा पहिला सुपर हिरो.. जायंट रोबो..
त्यावेळेला ८८ -८९ च्या सुमारास ही मालिका लहान मुलांमधे प्रचंड गाजली. दर रविवारी सकाळी ९ / १० वाजता लागायची. फक्त त्याच्यासाठी मी सकाळी इतक्या लवकर उठायचो ते पण रविवारी..
सुरुवातीला दुरदर्शन सा सुप्रसिध्द लोगो त्याच्या साईंनिंग ट्युन सहित टिव्हीवर दिसायचा.
पॅ अॅअॅअॅआआ पेआ आ आआआआआअ
ट्न टनन टन्न टन्न ट न न
नंतर ५ मिनिट जाहिराती त्यात "गोल्ड स्पॉट" , "लिम्का", लिज्जत पापड वाला ससा आणि लिरिल....(लिरिल च्या वेळी डोळे झाकले जायचे, घरच्यांचा दमच तसा होता...;)
हे सगळ झाल्यावर पडद्यावर अवतार घ्यायचा ..........जायंट रोबोट.. आणि त्याचा लहान मालक "जॉनी सोको"
जो घड्याळात बघुन रोबोट शी संवाद साधायचा..मला फार अप्रुप होते त्याचे घडाळ्यात कसे बोलले जाते. मग आजोबा ऑफिस मधुन घरी आले की त्यांचे "घड्याळ" घेउन घरभर "कॉलिंग जायंट रोबोट" करत फिरत असायचो.. जायंट रोबोट चे कवायती बघुन काहीही घरच्यांनी काम सांगितले की आधी दोन्ही हात कवायत करत उठायचो.. हात इकडे तिकडे करुन झाल्यावर मग कामाला लागायचो..घरचे सुध्दा "रोबोट उठला ना आता सगळी काम कर.रोबोट थकत नाही काही. न सांगता सगळे काम करतो" इत्यादी बोलुन मला हरभर्याच्या झाडावर चढवुन सगळी काम करुन घेत ..:)
जायंट रॉबोट च्या चालु झाल्यावर अजुन एक मालिका काही महिन्यांनी चालु झाली " Fireball XL5 "
ही मालिका मुख्यतः अंतराळवीरांवर होती.. लहान बाहुल्यांप्रमाणे दिसणारी माणसे.. त्यांची मान सारखी "कठपुतली" च्या बाहुलीप्रमाणे सतत हलणारी होती. जायंट रॉबोट पेक्षा ही मालिका जरा जास्त सुटसुटीत होती..
यात देखील एक लांब बल्ब प्रमाणे दिसणारा लहानसा रोबोट होता... "वांय्य्य्यव , व्वाय्य्यांव" सारखा सतत आवाज करायचा..... बोलक्या बाहुल्यांसारखा प्रकार होता..पण तेव्हा हे पहायला मज्जा यायची
.
अजुन एक - दोन मालिका होत्या .. एक होती बाईक रेसर वर.. ती बहुदा अमेरिकन होती...नाव आता आठवत देखील नाही.. दुसरी मालिका होती.. चालत्याबोलत्या लहान गोळ्या ज्या परग्रहावरुन आलेल्या.. त्या गोळ्या वेफर्स आईस्क्रिम खायच्या..एकमेकांवर मनोरा रचुन काहीही करायच्या...
.
लहानपणी धम्माल मालिका होत्या....आजच्या मुलांना काय अप्रुप त्याचे....
.
आपल्याला सुध्दा काही आठवल्या तर नक्कीच लिहा.....:)
@मुग्धा.रानडे >>>> सिगमा
@मुग्धा.रानडे >>>> सिगमा का??? मलापन लैच आवडायची ती
सिग्मा नाही आबासाहेब कॅप्टन
सिग्मा नाही आबासाहेब कॅप्टन व्योम...... आणि एक अभिमान नावाची तो कोणितरी रॉय होता त्यात. रोनित की रोहित.....
जायंट रोबोटचे सगळे एपिसोड
जायंट रोबोटचे सगळे एपिसोड आहेत माझ्याकडे
सारे...........मला दे
सारे...........मला दे
उदय टुक टुक यवतमाळला ये.
उदय टुक टुक
यवतमाळला ये.
छान धागा आहे. मला आवडलेल्या
छान धागा आहे. मला आवडलेल्या काही मालिकांची ही गाणी अजूनही पाठ आहे.
जंगल बुक (मोगली)
जंगल जंगल बात चली है पता चला है..
अरे चड्डी पहन के फूल खिला है ..फूल खिला है
जंगल जंगल पता चला है चड्डी पहन के फूल खिला है
एक परिंदा है शमिंर्दा.. था वो नंगा
भाई इससे तो अंडे के अंदर था वो चंगा
सोच रहा है बाहर आखिर क्यों निकला है तुरुरु रु
अरे चड्डी पहन के फुल खिला है फुल खिला है
जंगल जंगल पता चला है चड्डी पहन के फूल खिला है
टेल स्पिन
हा हा हा हा हा
घुमाओ...
बू बू बू बू बू
आओ शुरू करे
बू बू बू बू बू
ओह-ई-याह टेल स्पिन
दोस्ती हमारी है जान से प्यारी, चलो बुने कहानी,
ओह-ई-याह टेल स्पिन
ओह-ई-याह टेल स्पिन
जो भी कहानी है , अपने साथ मुसीबत नयी लाती
घुमाओ
घुमाओ यारों
खतरों से लड़ जाये, चढ़ जाये बाधायों पे
चक्करों पे चक्कर नए नए बुने...
घुमाओ
टेल स्पिन
डक टेल्स
जिन्दगी तूफानी है...
जहाँ है, डक बर्ग
गाडिया लेजेर्स, हवाई जहाज
ये है, डक ब्लर
रहस्य सुलझाओ
इतिहास बनाओ
डक टेल्स
हर दिन हर पल बनते है नए डक टेल्स
खेले खतरों से हर पल यह है डक टेल्स
ख... ख... ख... खतरा, बचना दीवानों
जब अजनबी लगे पीछे तुम्हारे
ऐसे में बस देखो झट पट डक टेल्स
हर दिन हर पल बनते है नए डक टेल्स
खेले खतरों से हर पल यह डक टेल्स
नॉट फोनी टेल्स एंड होली टेल्स
बस डक टेल्स
रविवारी सकाळी UFOs वर एक
रविवारी सकाळी UFOs वर एक मालिका लागायची ती आठवते का कोणाला?
मी तर रविवार सकाळ टीव्ही समोर असायची केवळ. रजनी, खेल-खेलमें, ऐसा भी होता है?, इधर-उधर, भारत एक खोज वगैरे पाहत.
तेव्हाच्या सिरीअल्स पण बर्या असायच्या. चुनौती, नींव, सुबह... आठवतायत का कोणाला?
चुनौंती ड्रग अब्युज वर होतं
चुनौंती ड्रग अब्युज वर होतं ना?
डेंजर बे ही
डेंजर बे
ही मॅन
इंद्र्धनुष
फास्टर फेणे
फेरफटका मस्तच कलेक्शन. मला
फेरफटका मस्तच कलेक्शन.
मला डकटेल्स जरा जास्तच आवडायचं.
सगळे कॅरेक्टर नमुने होते.
मी सगळ्यात पहिली पाहिलेली
मी सगळ्यात पहिली पाहिलेली मालिका "चिमणराव गुंड्याभाऊ". मलावाटतं ७७,७८च्या आसपास होती. एका रविवारी प्रायोगीक म्हणून एक भाग लावला, पण प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने पुढे मालिका बनवली.
अजून एक "चार्लीचॅपलीन" च्या शॉर्टफिल्मची मालिका लागायची. धमाल यायची पहाताना. मग त्यातलं कारुंण्य आणि मानवी मनाची वैशिष्ठ्य लक्षात येऊ लागली. चार्ली ग्रेटच.
फायरबॉल मस्त होती. त्यात एक माकडपण असायचं मलावाटतं
टेलीमॅचची एक मालिका असायची. मजेशीर होती.
@मुग्धा रानडे >>> येस, कॅप्टन
@मुग्धा रानडे >>> येस, कॅप्टन व्योमच
रोनीत रॉयच बहुधा. "अभिमान" मला वाटत पहिली फॅमीली ड्रामा सिरिअल असावी. दुपारी लागायची ना!आशुतोष राणा होता त्यात. स्वेतलाना आठवतेय त्यातील. बिवासं ला इथुनच सुरूवात झाली बहुधा...
टेल स्पिन>>> हे नावच आठवत नव्हतं. त्यातील सगळे कॅरॅक्टर आठवताहेत
टेल स्पिन आणि डक टेल्स पाठोपाठ यायच्या रविवारी.
गुच्छे कुणाला आठवतीय का? मस्त होती ती पण....
गायबाय गायबाय गायबाय
गायबाय गायबाय गायबाय गायबाय...
किसीको हसाने आय किसीको स्तानेआय..
वा.. वा.. वा.. वा....
स्टोन boy पण छान होती. ती
स्टोन boy पण छान होती. ती बघुन मला कित्येक दिवस सगळ्या दगडांना संशयाने बघण्याची सवय लागली होती.
हल्ली लहान मुलांचे म्हणुन जे प्रोग्रम्स लागतात ते मोठ्या माणसांचेच विषय जास्त दाखवतात. (डोरेमोन मध्ये त्या मुलाला ति मुलगी आवड्त असते अस दाखवलय. ते लहान मुलांना कस समजवायच? लहान = वय वर्षे ३ ते ४)
चिमणराव गुंड्याभाऊ,गोट्या,
चिमणराव गुंड्याभाऊ,गोट्या, चाळ नावाची वाचाळ वस्ती, नुक्कड, मालगुडीडेज, असे पाहुणे येती, नसती आफत, झोपी गेलेला जागा झाला, स्पायडरम्यान; चंद्रकांता, महाभारत, श्रीमान श्रीमती, शक्तीमान, रामायण, व्योमकेश बक्षी, वागळे की दुनिया ,मालगुडी डेज, हम पाच, चुनौती, मुंगेरीलाल के हसीन सपने, बुनियाद. आणखी बर्याच होत्या. सध्या इतक्याच आठवल्या.
त्यावेळच्या मालिका खूप छान असायच्या. विनोदी, संस्कारपूर्ण, आणि त्यातून काही चांगलं घेण्यासारखं असायच.
आता फक्त खून, मारामार्या, छळ, आणि अश्लिल प्रकार. काय शिकणार नवीन पिढी?
आता दूरदर्शनवर परत, बुनियाद, आणि व्योमकेश बक्षी सुरु झालेय.
सुपरमॅन ही ९४साली लागायची,
सुपरमॅन ही ९४साली लागायची, फ्लाइंग होम,अरेबियन नाईट्स एकदम मस्त..
एक काहीतरी बबलसारखे गालावर
एक काहीतरी बबलसारखे गालावर येऊन बसायचे हे त्या सिग्मा मधेच दाखवायचे का?
एक काहीतरी बबलसारखे गालावर
एक काहीतरी बबलसारखे गालावर येऊन बसायचे हे त्या सिग्मा मधेच दाखवायचे का?
>>>> येस्स... त्या बबलमध्ये इंजेक्शनमधुन काहीतरी सोडायच असत, पण ते करण्याअगोदर त्या टिममधील एक जण मरण पावतो. मग सिगमा ते करतो अस काहीस आठवतयं.
त्यातपण सिगमाचा डुप्लिकेट होता ना! लंगडत चालणारा... नीट आठवत नाहीये
अभिमान नाही, स्वाभिमान! आणि
अभिमान नाही, स्वाभिमान! आणि मला वाटतं पहिली तशी मालिका शांती होती.
पंकज कपुरची फटीचर.
पंकज कपुरची फटीचर.
मला चुनौतीचं टायटल सॉन्ग
मला चुनौतीचं टायटल सॉन्ग आठवतंय इतक्या वर्षांनीसुध्दा....
मन एक सीपी है आशा मोती है हर पल जीवनका एक चुनौती है
सोने ना दे आग सिनेकी कर ले लगनसे तू प्यार
आवाज दे के बुला ले तू तेरे लिये है बहार
जो बन जाता है धूल राहोकी
उसकी दिवानी मंजिल होती है
हर पल जीवनका एक चुनौती है
ही सिरियल पाहून कॉलेज लाईफ म्हणजे काय मज्जा असं वाटलं होतं.
आणखी एक सुबह म्हणून मालिका
आणखी एक सुबह म्हणून मालिका लागायची. तीही ड्रग्जबद्दल होती.
ऐ जमाने तेरे सामने आ गये
आजके दौरके नौजवा आ गये
बनके तेरे दरपे सूरज लेके सुबह आ गये
इस सुबहको कर सलाम
मौत और जिन्दगी दोनो हैरान है
वक्त को मोड दे हम वो तुफान है
ऐ जमाने तेरे.....
स्वप्ना... मस्त गं! सुबहचा
स्वप्ना... मस्त गं! सुबहचा टायटल ट्रॅक आरडी चा होता.
हो की काय? मला नव्हतं माहित.
हो की काय? मला नव्हतं माहित. धन्स
प्रिया तेंडुलकरची एक स्वयंसिध्दा म्हणून मालिका लागायची. त्याचं टायटल सॉन्ग लतादिदींनी गायलं होतं.
एक दफा तो अपना जीवन मुझको खुद ही जिने (बोने?) दो
लिख लेने दो किस्मत अपनी होना है जो होने दो
सुखके दाने दुखके मोती सब है मेरी आखोंमे
अबकी बार तो मुझको अपना आंचल भरके रोने दो
इतक्या वर्षांनी लिरिक्स आठवताहेत ह्यातच सगळं आलं.
नंतर पडघवलीवर आधारित एक
नंतर पडघवलीवर आधारित एक मालिका लागायची. बहुतेक 'कुछ खोया कुछ पाया' असं काहीतरी. टायटल सॉन्ग आठ्वतंय थोडं थोडं.
यादोंके धुंदले दर्पनमे बिते हर पलकी छाया है
हर मोडपे मैने जीवनके कुछ खोया है कुछ पाया है
क्यो अंतर्मनकी पीडाको अपने ही लोग न समझे है
कितने सुलझाये प्रश्न यहा -- -- उलझे है
क्यो मन कहनेको अपना है सब इसमे दर्द पराया है
मी हे आधीही कुठल्या तरी बीबीवर लिहिलं होतं.
कोणी फायरबॉल एक्सएल ५ पहायचं
कोणी फायरबॉल एक्सएल ५ पहायचं का? त्याच्या टायटल सॉन्गचा व्हिडिओ पहा
http://www.youtube.com/watch?v=6ifS2nP53Zs
आणि ही त्याच्या लिरिक्सची लिंक http://www.stlyrics.com/lyrics/televisiontvthemelyrics-kidsshows/fireballxl-5.htm
Alice in Wonderland.. त्याचं
Alice in Wonderland.. त्याचं गाणं खूप गोड होतं.
टप टप टोपी टोपी टोप मे जो डूबे
पल पल फर्माईशी देखे है अजूबे
उलट पलट अलट सलट साईं
डूबली झीनक झाईं..
कूत्ते बील्ली बील्लीयोंकी मूछोंकी फलासी
ताजा तजा दूधो प्यासा टीम टीम बासी..
टुपूर टुपूर नाचे नुपूर बाईं..
डूबली झीनक झाईं..
गुलझार नी लिहीलेलं...
या सगळ्या मालिका आता कश्या
या सगळ्या मालिका आता कश्या बघायला मिळतील ?
टप टप टोपी... मस्त होतं! मला
टप टप टोपी... मस्त होतं! मला ती सिग्मा पण खूप आवडायची. त्यात एक सातसोला नावाचा रोबो होता
त्याच्या काही वर्षं आधी फेअरीटेल्स वर मालिका लागायची दर रविवारी. ती विशेष आवडती होती.
त्याच्याही आधी तर साप्ताहिकीसुद्धा स्पेशल कार्यक्रमासारखी पाहीली जायची तेव्हा रविवारी सकाळी मिकी-डॉनल्ड वगैरे येत असत दूरदर्शन वर. ते सगळे कुठे गेले?
वागले की दुनिया आठवतिय का
वागले की दुनिया आठवतिय का कुणाला? आणि रेणुका शहाणेची पण एक सिरियल लागायची.... आईविना बाबांनी सांभाळलेल्या दोघी बहिणी...... रेणुका मोठी असते.... तिचा होणारा नवरा बहुतेक सचिन खेडेकर होता..... खूप टक्के टोणपे खात ती स्वत:चा व्यवसाय सुरु करते असा काहितरी प्लॉट होता सिरियलचा..... नाव आणि बाकीच्या लोकांची नाव आठवत आहेत का कुणाला?
Pages