Submitted by देवकी on 24 July, 2013 - 10:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१०० ग्रॅम जाड्या पोपटी मिरच्या,कोथिंबीर,ओले खोबरे, अर्ध्या लिंबाचा रस,मीठ,हिंग,मोहरी,मेथीदाणे २ लहान चमचे.तेल
क्रमवार पाककृती:
१)मिर्च्यांचे मोठे तुकडे करून मधे चीर द्यायची.ओले खोबरे,कोथिंबीर, मीठ लिंबूरस एकत्र करून त्यात भरायचे. तव्यावर २ चमचे(लहान) तेल घालून झाकण लावून फ्राय करायचे.
२)हिंग ,मोहरी,३-४ मेथीदाणे १ यांची फोडणी करून मिर्च्यांचे मोठे तुकडे त्यात टाकायचे.वर आधण ठेवावे.५ मिनिटांनी त्यात मीठ,ओले खोबरे,कोथिंबीर क्रमाक्रमाने घालावे.गॅस बंद करून लिंबू पिळावे.
वाढणी/प्रमाण:
२-३जण
माहितीचा स्रोत:
माझी आई
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त मिरच्या.. नुसती पाकृ
मस्त मिरच्या..
नुसती पाकृ वाचून तोंपासु.
फोटो टाकाल का जमलं तर?
दक्षिणा मी याआधी फोटो
दक्षिणा
मी याआधी फोटो टाकण्याचे अयशस्वी प्रयत्न केले हो! पण जमत नसल्याने आता सोडून दिले.
वॉव! खरचं वाचून तोंडला पाणी
वॉव! खरचं वाचून तोंडला पाणी सुटले
दक्षिणा,माधवी.....धन्यवाद
दक्षिणा,माधवी.....धन्यवाद
मस्त. ह्या मिरच्या वर
मस्त. ह्या मिरच्या वर दिलेल्या दोन प्रकारांनी करता येतात असं आहे ना ते?
छान पाकृ!
छान पाकृ!
हो सायो!
हो सायो!
तुम्हाला सांगितलं की कसे
तुम्हाला सांगितलं की कसे टाकायचे ते रेसिपी सार्वजनिक करायचं पण सांगितलं.
मस्तं!
मस्तं!
मस्त माझी आईपण ह्याच पद्धतीने
मस्त
माझी आईपण ह्याच पद्धतीने करते
साती,स्वाती२,जाई. धन्यवाद!
साती,स्वाती२,जाई.
धन्यवाद!