अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की,
--संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष'
--ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि
--शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष'
अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय
--आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष'
अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि
'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते ।
रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।
ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥'
अशी प्रार्थना करुन भोजन करावे.
सूर्यास्ताचे वेळी स्नान करून लाल जास्वंद, लाल गंध आणि धूपदीप आदी उपचारांनी पूजा करून प्रदोषकाळी एकवेळ जेवावे. जर या दिवशी 'शनिवार' असेल तर अधिक चांगले.
प्रदोषकाळी म्हणजे संधिकाली भ. शंकरांच्या जवळ यक्ष, गंधर्व, उरग, सिद्ध, साध्य, विद्याधर, देव, अप्सरा आणि भूतगण जमलेले असतात, म्हणून यावेळची पूजा सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे.
संदर्भ : कालनिर्णय , खापरे , दाते पंचांग, लाटकर पंचांग , शर्मा सारिणी
प्रदोषव्रत :
Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 19 July, 2013 - 23:57
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नक्की करणार. आज नेमका शनिवार
नक्की करणार. आज नेमका शनिवार आणि भोजनाचे आमंत्रण असल्याने सहक शक्य होईल.
--संततिप्राप्तीसाठी
--संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष'>>>
तरीच भारताची लोकसंख्या एव्हढी वाढली आहे.
बरं झालं लिहीलंत. नाहीतर दर
बरं झालं लिहीलंत. नाहीतर दर पंधरवड्याला एकादशी आणि पौर्णिमा/अमावस्या यांच्यामधले तीन चार दिवस उपवासाशिवाय फुकट जात होते.
सर्व प्रतिसादकांनो, सदर धागा
सर्व प्रतिसादकांनो, सदर धागा धार्मिक विभागात वर्ग झालेला आहे. आपल्याला खरोखरच धार्मिक विषयांत रस असेल तरच इथे प्रतिसाद द्यावेत ही विनंती. कृगैन!
आ.न.,
-गा.पै.
नम्र गा पै, आपल्याकडे धार्मिक
नम्र गा पै,
आपल्याकडे धार्मिक विभागाचे संचालकपद चालत आल्याबद्दल अभिनंदन.
आपण या विभागाची उत्तरोत्तर प्रगती घडवून आणाल अशी आशा वाटते.
आपल्या कार्यास शुभेच्छा!
शुभेच्छोत्सुक
साती काळे - कमलशेट्टी.
गा पै , १०००००००० +
गा पै ,
१०००००००० + अनुमोदन ,..........
साती, १. >> आपल्याकडे धार्मिक
साती,
१.
>> आपल्याकडे धार्मिक विभागाचे संचालकपद चालत आल्याबद्दल अभिनंदन
अघोषित संचालकपद मला बहाल केल्याबद्दल आपलंही अभिनंदन!
२.
>> आपण या विभागाची उत्तरोत्तर प्रगती घडवून आणाल अशी आशा वाटते.
मलाही वाटते!
३.
>> आपल्या कार्यास शुभेच्छा!
तुमच्यासारखे लोक पाठीशी असल्यावर काहीच भीती नाही मला! असेच पाठीशी राहा.
आ.न.,
-गा.पै.
धन्यवाद, विवेक नाईक!
धन्यवाद, विवेक नाईक!
आ.न.,
-गा.पै.
गा.पै. >>>> पहिला प्रतिसाद
गा.पै. >>>> पहिला प्रतिसाद भारि आहे...
<<<< सर्व प्रतिसादकांनो, सदर धागा धार्मिक विभागात वर्ग झालेला आहे. आपल्याला खरोखरच धार्मिक विषयांत रस असेल तरच इथे प्रतिसाद द्यावेत ही विनंती. >>>>
प्रदोश व्रताचा उल्लेख श्री
प्रदोश व्रताचा उल्लेख श्री गुरुचारित्रात पण केला आहे....
संततिप्राप्तीसाठी
संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष'
--ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि
--शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष'
--आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष'
यांचे मंत्रही वेगळे आहेत का ?