''डान्स बार बंदी उठली''??

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 16 July, 2013 - 03:20

सुप्रीम कोर्टाने डान्सबार बंदी उठवली. डान्स बार पुन्हा चालू होणार ??????

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/supreme-cou...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बारबाला आणि गिर्‍हाइकं....
शेवटी आमच्याच दवाखान्यात येतात. ( एच आय व्ही क्लिनिक) ..

बरं आहे की. रोजगार मिळणे हा प्रत्येकाचा अधिकारच आहे.

लिमये,
उग्गं हा तुमचं. कुठली भुई धोपटली ब्वा मी? बेफिंच्या प्रतिसादास उत्तम म्हणून त्यांना काही स्पष्टीकरणे विचारली इतकेच तर केले?
आता बेफिंना साप म्हणायचे असेल, तर तो तुमचा प्राब्लेम. त्यासाठी मला भुइ धोपट्या का म्हनून र्‍हायले वो?

वरदा, तुम्ही हा विषय एका वेगळ्याच पातळीवर नेलात. न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावरील चर्चा इतकाच ह्या धाग्याचा आवाका आहे असं मला सुरुवातीला वाटत होतं. पण एका वेगळ्या पातळीवर हा विषय नेण्यात काहीच गैर नाही. किंबहूना तुम्ही सुरू केलेला विषय हा मूळ विषयाचं नॅचरल प्रोग्रेशन च आहे. तुमच्या लेखाला 'छान' असं म्हणवत नाहीये. पण तुमच्या अभ्यासाला, विषय मांडण्याला, त्यातल्या बॅलेन्स ला मनापासून दाद देतो. सुन्न झालोय वाचून.

बेफी - धन्यवाद तुमच्या माहितीबद्दल. (गा. पै. चे आभार दुवा कसा द्यावा हे सांगण्यासाठी)!

एक (अशास्त्रीय) निरीक्षण-मत (सांगण्यातही आलेले) नोंदवू इछ्छितो आणि त्याविषयी तुमची मते/निरीक्षणे वाचू इछ्छितो. - "नाचगाणीगृहांमुळे प्रत्येक समाजघटकाचा समप्रमाणात तोटा होत नाही".

माझे प्रश्न
- नाचगाणीगृहांची ठिकाणे याविषयी निकष कोणते? ते कोण ठरवणार? त्यांचे लोकसंख्येशी प्रमाण काय हे कसे ठरवावे? त्यातून उद्भवणा-या सुरक्षेच्या प्रश्नांसाठी त्यावर अधिक कर असावा का? त्यामधील बेहिशोबी पैसा कसा थांबवावा का? आणि असेच आणखी अधिक...

हा हरी नरके यांचा ही लेख माहितीदायक आहे.

अवांतर -
इब्लिस - "नाचगाणीगृह (पर्यायी शब्द नाचगाणीघर वा नाचगुत्ता)" हे अती होतय असे वाटेल व वाटतेही पण जर नेहमी वापरला तर सवय होइल .

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत अजून अप्राप्त असल्याने त्यावर भाष्य करता येत नाही. पण बारबाला आणि त्यांचे आयुष्य यावर फेबुवर तात्या अभ्यंकरांनी लिहिलेला एक विस्तृत लेख निदर्शनास आला. इथे शेअर करत आहे.

-डॉ.कैलास गायकवाड

========================================================

काजल. वय वर्ष वीसच्या आसपास. रोजची कमाई रुपये पाच ते दहा हजार...

मोनिका. वय वर्ष वीसच्या आसपास. रोजची कमाई रुपये पंचवीस ते तीस हजार..

सोनी. वय वर्ष वीसच्या आसपास. रोजची कमाई रुपये पंचवीस ते तीस हजार किंवा त्याहून जास्त..!

ही नांवं आहेत काही बारबालांची.

मुंबैच्या फोरासरोडवरील एका देशीदारुच्या बारमध्ये मी कामाला असल्यामुळे, शिवायं शेअर/विम्याचा व्यवसाय असल्यामुळे आणि मुख्य म्हणजे त्या भागात रोजची उठबस असल्यामुळे वेश्या, त्यांचे दलाल, काँग्रेसहाऊस आणि बनारसी चाळीतल्या कोठेवाल्या मावश्या आणि तिकडच्या तवायफ, दारुवाले, मटकेवाले,डान्सबारचे मालक, बातबाला, त्यांचे पुन्हा दलाल, शेट्टी लोकांनी पाळलेले गुंड इत्यादी सगळी दुनिया मी खूप जवळून पाहिली आहे.. बारबाला हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे म्हणून हा लेखप्रपंच..

अनेक शेट्टी बारमालक माझे अशील आहेत. त्यामुळे त्यांच्याशी भेटी व्हायच्या, त्यांच्या बारमध्येही जाणंयेणं होतं. या बारभेटींचाच एक भाग म्हणून मला डान्सबार, त्यातील पैशांची उलाढाल, त्यात थिरकणार्‍या बारबाला या सर्व गोष्टी खूप जवळून पाहायला मिळाल्या. अगदी दादरच्या बेवॉच बारमध्ये तेलगीला जान्हवी नावाच्या एका मुलीवर अक्षरश: करोडो रुपये उडवताना मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. त्या बारच्या भल्यामोठ्या फ्लोअरभर टाईल किंवा फरशी कुठे इंचभरही दिसत नव्हती इतका नोटांचा खच जमिनीवर पडला होता..!

तेलगीचा काय, घरच्या घरीच स्टँपपेपर छापण्याचा व्यवसाय होता, त्यामुळे त्याच्याकडे पैसे भरपूर.. Wink

आपण पैशाला लक्ष्मीचं रूप मानतो आणि तिची पूजा करतो. पण या डान्सबारमध्ये लक्ष्मीला अक्षरशः बटीक होताना मी पाहिले आहे..!

हे डान्सबार दिवसभर बंद असतात. साधारणपणे संध्याकाळी सात नंतर ते सुरू होतात. रिक्षा करून, गाड्या करून त्यात नाचणार्‍या बारबाला तिथे जमू लागतात. प्रत्येक बारमध्ये त्यांची वेगळी मेकप रूम असते. मेकप करून, तंग आकर्षक पेहेराव करून हळूहळू बारच्या मुख्य बैठकीत या नटव्या दाखल होऊ लागतात. बहुतेक बारबालांची वयं पंचविशी तिशीच्या आतच! त्यातल्या बर्‍याचश्या दिसायला 'बर्‍या' म्हणता येतील अश्या. त्यातल्या काही खरोखरच 'सुरेख' या प्रकारात मोडणार्‍या. एका बारमध्ये साधारण तीस ते साठ एवढ्या बारबाला असतात. बर्‍याच डान्सबारमधून लाईव्ह ऑर्केस्ट्रे असतात. एखाददोन गाणारे, एखाददोन गाणार्‍या आणि साथीदार यांना या बारमध्ये एक वेगळी रंगमंचवजा जागा असते.

हळूहळू गिर्‍हाइकांची वर्दळ वाढू लागते. ही गिर्‍हाईकं म्हणजे सरकारदरबारी मोक्याच्या जागी असणारी माणसं, आणि मुख्य म्हणजे बिल्डर.. शिवाय, रस्ता चुकलेली काही मध्यमवर्गीय मंडळी.

व्हिस्की, बियर सर्व्ह केली जाऊ लागते. संध्याकाळची वेळ. समोर दारुचा गिल्लास, खिशात काळ्या पैशांची मस्ती आणि समोर दिसायला बर्‍या, तंग आकर्षक कपडे घातलेल्या थिरकणार्‍या मुली...!

बारमध्ये दारू प्यायला बसल्यावर समोर उभ्या असलेल्या/नाचत असलेल्या अनेक मुलींपैकी एखादी मुलगी गिर्‍हाईकास पसंत पडते. वेटर लोकांकडून पाचशे हजाराच्या नोटांच्या बदल्यात दहा दहा चे सुट्टे मागवले जातात आणि त्या मुलीवर उधळले जाऊ लागतात. हजार, दोन हजार, तीन हजार...अशी रक्कम वाढतच जाते! एकीकडे भयानक मोठ्या आवाजात डिस्कोटाईप फिल्मी गाणी वाजत असतात..

आपल्याकडे पाहून एखादा मनुष्य पैसे उडवू लागला की ती बारबाला त्याच्यासमोरच नाचू राहते. मध्येच सूचक हासणे, लाडिक हासणे, थोडक्यात समोरच्या माणसाला जितकं पाघळवता येईल तितकं पाघळवणे हेच तिचं काम! हे वेटर लोक मोठ्या स्टायलीत त्या पोरीवर हजार रुपायांची बंडलं उडवत असतात. मग बाकीचे वेटर लोक त्या खाली पडलेल्या नोटा गोळा करून नोटांची ती गड्डी त्या मुलीच्या हातात देतात. जशी दारुची आणि समोर उभ्या असलेल्या मुलीची धुंदी डोक्यात चढू लागते तश्या अजून नोटा उधळल्या जाऊ लागतात. मुलीच्या हातातली नोटांची गड्डी वाढतच जाते! एकेका मुलीची रोजची सरासरी कमाई दहा हजारापासून तीस हजारापर्यंत आहे अश्या दादरच्या 'बेवॉच' मधल्या किंवा ठाण्याच्या 'सीक्वीनस्', किंवा मुलुंडच्या उमापॅलेस मधल्या किंवा ग्रँटरोडच्या टोपाझ मधल्या काही बारबाला मला माहीत आहेत. या माझ्या अशील आहेत. एकेकीला आयुर्विम्याचा वर्षाचा ५-७ लाख रुपये हप्ता असगी सहज परवडतो!

या मुलींच्या अत्यंत पॉश अश्या शोफरड्रिव्हन गाड्या आहेत.. अबदुल करीम तेलगी ज्या जान्हवी नावाच्या मुलीवर पैसे उडवायचा तिचा वरळीला प्रशस्त फ्लॅट आहे आणि दिल्लीला स्वत:चं दुमजली घर आहे.. का कोण जाणे, एक दिवस या जान्हवीला माझी दया आली आणि तिने ताजच्या मुघलरुममध्ये मला शाही खाना खिलवला होता. अब्दूल तिला 'जानू' म्हणायचा. आता ही जानू दुबईत असते..बहुतेक दाऊदची सेवाशुश्रुषा करत असेल..काय सांगावं?!

साधारणपणे २०-२५ वर्षाची कुठलिही मुलगी ही आकर्षकच दिसते. त्यातून मग ती रंगरुपाने खरोखरंच सुरेख आणि देहबांध्याने आकर्षक असेल तर मग बघायलाच नको! तिच्यावर मरणारा तिचा यार रोज संध्याकाळी केवळ तिच्याकरता हज्जारो रुपये घेऊन बारमध्ये येणार! तिच्यावर वाट्टेल तसे पैसे उधळणार. काही वेळेला बारमध्ये येणार्‍या दुसर्‍या एखाद्या माणसाला तिच मुलगी आवडते. मग दोघात पैसे उडवण्याची स्पर्धा आणि जिद्द! यात त्या मुलीची दोन्हीकडून चांदी! खरं पाहता ती कुणाचीच नसते. ती असते फक्त पैशांची! पण स्त्रीदेहाच्या आणि दारुच्या धुंदीमुळे या गिर्‍हाइकांची सत्सदविवेकबुद्धी हरवते. एकेका मुलीवर एकाच वेळेला दोघाजणांकडून अक्षरशः दोन दोन लाख रुपये तासाभरात उडवले गेलेले मी पाहिले आहेत! एकाने नोटा उधळल्या की दुसरा जिद्दीस पेटणार आणि दुसर्‍याने उधळल्या की पुन्हा पहिला जिद्दीस पेटणार. कसली भयानक जिद्द ही? की पैशांची, दारुची आणि स्त्रीदेहाच्या लालसेची मस्ती?

आता हे शेट्टी बारमालक कधी कधी काय गेम खेळतात हे सांगतो..

बारमध्ये एखादा मनुष्य त्याच्या आवडत्या बारबालेवर पैसे उधळत असतो. हा मासा जर गब्बर असेल तर बार मॅनेजमेन्टचाच दुसरा कुणीतरी मनुष्य डमी गिर्‍हाईक बनून त्याच्या बाजूला जाऊन बसतो. या डमीकडे अर्थातच ४-५ लाख रुपये (मालकाचेच!) तयार असतात. मग हा डमी गिर्‍हाईक त्याच बारबालेवर पैसे उधळू लागतो. (हे पैसे अर्थातच नंतर मालकाला परत मिळतात!) हे पाहून पहिला जिद्दीला पेटतो आणि आणखी पैसे उधळू लागतो. वेटर लोकांची खाली पडलेले हजारो लाखो रुपये गोळा करतांना अक्षरशः धावपळ सुरू होते. डमीकडचे पैसे अर्थातच कधीच न संपणारे असतात! Wink कारण त्याला चुपचाप मागच्या दाराने पैसे मिळतच असतात! असं करता करता खरा गिर्‍हाईक मात्र जिद्दीमध्ये येऊन त्याचा संपूर्ण खिसा रिकामा होतो.

'तात्यासेठ, अपनी जगह पर बैठे रहो..आपको अंदरसे पैसा आएगा, वो लुठाते रहो..'

मी स्वतः एकदोनदा डंमी गिर्‍हाईक झालो आहे..!

या बारबालांमध्ये काँग्रेसच्या कृपेने घुसखोर तरूण बांग्लादेशी मुली तर चिक्कार आहेतच. फोरासरोडला, चेंबूरला कँपभागात, ठाण्याच्या लोकमान्यनगर, रामचंद्रनगर, किसननगर या भागात ह्या बारबालांची बरीच वस्ती आहे. अनेक बारबाला या उत्तरप्रदेश मधून मुंबईत येतात/आणल्या जातात. काही राजस्थानातूनही येतात. यांच्या सख्ख्या आयाच यांना इकडे पाठवायला उत्सुक असतात!

'बेटी, जल्दी बडी हो जा. पैसा कमानेके लिये तुझे बंबई जाना है...'

असं सांगून आईच मुलीला तयार करते! एक खूप मोठा अशिक्षित परंतु पैसे कमवायची बरोब्बर अक्कल असलेला हा उत्तरप्रदेशीय भय्या समाज आहे! तिवारी, मिश्रा, सिंग, अशी बहुतेकांची आडनांव. बार्समध्ये या बारबाला बॉलिवुडच्या नट्यांची (काजल, रवीना, रानी ) नावं घेऊन वावरतात! या मुलींना मुंबईच्या डान्सबारमध्ये आणणारी दलाल मंडळी ही बरीचशी शेट्टी आणि बंगाली आहेत. बसंतसेठ, मॉन्टोसेठ, गणेशसेठ असे काही दलाल मला माहिती आहेत. ही दलाल मंडळी उत्तरप्रदेश, राजस्थनातल्या १८ ते २० वर्षांच्या मुलींना हेरतात आणि पैशांचं अमिष दाखवून इकडे आणतात.

'पैसा कमानेका है, तो मुझको पेहेले खुश करना पडेगा. फिर मै सेठसे बात करके तुझे डान्सबारमे कामपे लगाऊंगा...!'

या न्यायाने ही चाळीशी पन्नाशीतली दलाल मंडळीच सर्वप्रथम या अठरा अठरा वीस वीस वर्षांच्या मुलींना भोगतात! मग ज्या बारमध्ये तिला कामाला आणली जाते त्या बारच्या शेट्टी मालकाची मर्जी संपादन करायला हवी! मग ती मुलगी क्वालिफाईड बारबाला बनून लोकांसमोर उभी राहू लागते..!

या डान्सबारमधले दारुचे आणि इतर पदार्थांचे दरही आवाच्या सवा असतात. दुकानात १०० रुपायाला मिळणारी बियर ही डान्सबारमध्ये ४०० रुपायाला मिळते! १२ रुपायाला मिळणारं शीतपेयं २५० रुपायाला मिलतं. म्हणजे ही शेट्टी बारमालक मंडळी किती प्रचंड नफेखोर आहेत ते पाहा! अर्थात, सर्वांचे हप्तेही बांधलेले असतात त्यामुळे त्यांना इतके उच्च दर ठेवावेच लागतात..

जोपर्यंत ते दर देणारी गिर्‍हाईकं आहेत तोपर्यंत बारमालकांना दोष देण्यात तरी काय अर्थ आहे असा विचार कधी कधी मनात येतो. शिवाय प्रत्येक बारबालेकडून त्यांच्या बारमध्ये उभं राहण्याचा १०० ते १५० रुपये रोजचा हप्ता बारबालांना बारमालकांना द्यावा लागतो. बारबालांची बारमधली सरासरी संख्या ४० जरी धरली तरी बारमालकाला रोजचे चार ते सहा हजार रुपये हे हप्त्यापोटी मिळतात! यातूनच पोलिस, गुमास्ताकायदावाले, यांचे हप्ते भरले जातात!

शिवाय जे पैसे या बारबालांवर उडतात, त्यातले ३० ते ४० टक्के शेट्टी मालकाला मिळतात..!

बारमध्ये येणारी नेहमीची गिर्‍हाइकं आणि त्यांच्या आवडत्या बारबाला यांच्यात मोबाईल फोनस् च्या नंबरचीही बर्‍याचदा देवाणघेवाण होते. तिला बाहेर घेऊन जाण्याकरता तो अर्थातच उत्सुक असतो! ते पैसे वेगळे. त्याच्याशी बारचा काहीच संबंध नाही. बाहेरच्या खाजगी लॉजिंग हॉटेलातून बर्‍याचश्या बारबाला आपापल्या गिर्‍हाईकासोबत जातात! हे दर अगदी दोन हजारापासून ते २०-२५ हजारापर्यंत असतात. ती या बारबालांची दिवसाची कमाई...!

सर्वसाधारण दिसणार्‍या बारबाला असले प्रकार करतात! मी वर उल्लेख केल्याप्रमाणे दिसायला खरोखरंच सुरेख अश्या काही बारबाला असतात, ज्या दिवसाला पंचवीस ते तीस हजार रुपये कमावतात त्या दहा बारा हजार रुपयात खाजगी लॉजमध्ये कुठल्याही गिर्‍हाइकासोबत जात नाहीत! त्या फक्त झुलवत ठेवायचं काम करतात. त्यातच त्यांना लाख्खो रुपये मिळतात मग त्या कशाला कुणाबरोबर जाऊन आपला फॉर्म बिघडवून घेतील?!

त्यांना 'त्या' कामाकरता न्यायचंच असेल तर त्यांचे दर अक्षरशः लाखात आहेत आणि ते देणारीही मंडळी आहेत!

असो.. अजून काय लिहू? लिहिण्यासारखं खूप आहे...!

(मुंबईकर) तात्या.

==========================================================

या एका निर्णयाकरता आबान्चे अभिनन्दन तेव्हाही केले होते अन अजुनही त्यान्चे पाठिशी आहे.
पुपु वर विषय निघाला तर तिथला थोडा मजकुर इथे देतो.
>>>>>
या नोकरीच काही खरं नाहीये, अन काही प्रॉब्लेम झालाच तर मात्र मीच "पोळी-भाजीचा" स्टॉल उघडणार आहे. पोटापाण्याकरता काही करायलाच हव, नै का?
बर, आता माझ काही वय नाही अन तसे जेन्डरही नाही की कुठे बारमधे वगैरे जाऊन नाचकाम वगैरे करुन माझ्यावर नोटान्चा वर्षाव होईल
[मन कित्ती वैरी अस्त ना? लग्गेच माझ्या नजरेसमोर दृष्य तरळले की लिम्ब्या कुठे तरी जाऊन नाचतोय वगैरे............ ] <<<<<<<<<

अधिक काही भाष्य हवेच आहे का?

कैलाश, लेख इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
(वाळूत मुन्ड्या खुपसुन डोळे मिटुन बसलेल्या उन्टाप्रमाणे डोळे मिटलेल्यान्चे डोळे उघडतील याची सूतराम शक्यता नाही, पण आम्ही उघड्यावर उघड्यानागड्या जगातच वावरतोय हो! आम्हाला निदान जाणिव तरी होऊदे! )

>>बारबालांवर हजारोंनी पैसे उडवणार्‍यांची रोजची कमाई किती असेल? कोणत्या मार्गांनी येत असेल?

तुम्हाला 'अजूनही' असे प्रश्ण कसे पडतात..?
बाकी बिहार मध्ये २२ पोरे मेली त्याची कुणाला चिंता दिसत नाही.. बारभारतीने सगळाच टीआरपि खाल्ला आहे.

limbutimbu | 18 July, 2013 - 11:23<<<

लिंबू भाऊ, तुमचे काही काही प्रतिसाद समजतच नाहीत. काय म्हणायचे आहे, कोणाला उद्देशून आहे, त्याच्या मनाला ते किती बोचावे असे तुम्हाला वाटत असेल, वगैरे काही लक्षातच येत नाही काही वेळा.

तुम्हाला 'अजूनही' असे प्रश्ण कसे पडतात..?<<<

मयेकर हेतूपुरस्पर या विषयाबाबत काळाच्या २५ वर्षे मागे राहात असावेत.

बेफिकीर, अहो सोप्पय, कंसातील आहे ते स्वगत आहे! Proud स्वतःलाच उद्देशून स्वतःच बोल्लेल. Wink
पण त्याचा अर्थ असा कि एकीकडे बारबालान्चा रोजगार बुडणे/व्यक्तिस्वातन्त्र्यावर घाला वगैरे अनेक बाबी सामोर्‍या येत असताना, बंदी घालण्यामागिल एक सलग कारणमिमांसा अशा लेखातुन वाचकाच्या मनात "तयार" होऊ शकते, जाणिव होऊ शकते, असे काहीसे सान्गायचा प्रयत्न त्या स्वगतातून केला आहे. मूळ मुद्दा डॉ. कैलाश यान्चे आभाराचा मोजक्या शब्दात आधीच सान्गितला.

>>> मयेकर हेतूपुरस्पर या विषयाबाबत काळाच्या २५ वर्षे मागे राहात असावेत. <<<
नै ओ, तस नैये ते. अशा फुटकळ वाटणार्‍या सोप्या सोप्या प्रश्नान्ना उत्तर दिले की लटकलात तुम्ही, लग्गेच पुरावा मागितला जातो, बाप दाखिव नैतर श्राद्ध घाल! Proud

बेफिकीर यांचे सविस्तरसे माहितीपूर्ण प्रतिसाद आवडले. डान्सबार असो कि वेश्यागृह ह्या गोष्टी उत्तम सामाजिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असतात म्हणे अर्थात ही ऐकीव गोष्ट. कसे ते इथले जाणकार, मर्मज्ञ सांगू शकतील. बाकी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा संकटास/विनाशास कारणीभूत ठरतो हे याही गोष्टीबाबत लागू होईल.
बेफिकीरजी,
उत्तम दर्जाचे / रंगसंगतींचे कॉश्च्युम्स (शब्द नीट लिहिला आहे याची दखल घेतली जावी) <><><><> लिहीण्यास एवढा कठिण शब्द वापरण्यापेक्षा आणि त्यावरुन वादंग होण्यापेक्षा वस्त्रप्रावरणे हा शब्द वापरला तर....... ? ( हे लिहून मी नविन वादंगाला आवताण तर दिले नाही ना ? Wink Proud )

terence tao,

>> तात्पर्य, हे व्यवसाय चालू आहेत म्हणून डान्सबार योग्य हा युक्तीवाद भयाण आहे.

१००% सहमत! भगवद्गीतेत आसुरी संपत्तीचा उल्लेख आहे. 'गिर्‍हाईकांच्या खिशात खुळखुळणार्‍या आसुरी पैशामुळे बारबालांचा व्यवसाय तेजीत आला आहे.

वेश्याव्यवसाय हा बारबालांहून वेगळा व्यवसाय आहे, असं दिसतंय. अर्थात तोही संपला पाहिजे. कोणी महिला स्वत:हून या व्यवसायात पडत असेल हे जवळजवळ असंभव. वरदा यांनी दिलेला दुव्यावरील लेख वाचनीय आहे.

आ.न.,
-गा.पै.

गिर्‍हाईकांच्या खिशात खुळखुळणार्‍या आसुरी पैशामुळे

पैसा आसुरी की गिर्‍हाइक आसुरी ते आधी ठरवा.

डान्सबारच्या धाग्यावर प्रतिसाद देणारे पुरूष कधी ना कधी जाऊन आलेच असतील >>>>> Uhoh नक्की ना ?
इशरत जहांच्या धाग्यावर लिहीणारे घटनास्थळी हजर असतील, दारू, सिगारेट, चरस, गांजा, ब्राऊन शुगर यांच्या दुष्परिणामाबद्दल बोलणा-या प्रत्येकाने कधी न कधी त्याची नशा केलीच असेल इ.इ. अनेक कल्पना मनात चमकून गेल्या.
( स्वतःच्या अनुभवांवरून जगाची परीक्षा कशाला ? )

निलेश रोडे १,

>> पैसा आसुरी की गिर्‍हाइक आसुरी ते आधी ठरवा.

पैसा आसुरी आहे असं वर लिहिलेलं आहे.

आ.न.,
-गा.पै.

इ.इ. अनेक कल्पना मनात चमकून गेल्या.
<<
अंडी घालता आली नाहीत तर ऑम्लेट कसे करावे याबद्दल बोलू नये अशीही एक कल्पना आहे Wink

गा. पै. - <<कोणी महिला स्वत:हून या व्यवसायात पडत असेल हे जवळजवळ असंभव.>> "freakanomics" ह्या पुस्तकात अमेरीकेमधे कसे संभव आहे ते सांगितले आहे. अर्थात भारतात आणि अमेरिकेमधे फरक आहे.

तुमचा "आसुरी" संपत्तीबाबत असलेला अर्थ "आसुरी मार्गांने मिळवलेला" असा पटत आहे. पण नशिबाने मिळालेला पैसा (उ.दा. जमीन) हाही काही प्रमाणात असाच उधळला जातो.

डान्स बार खुले आम चालु नव्हते पण बंद झाले असा कुणाचा दावा असेल तर तो मात्र चुकिचा असेल. महाराष्ट्र असले कायदे करण्यात आघाडीवर असत. मोरारजींच्या काळात असलाच एक दारुबंदीचा प्रयोग झाला. प्र.बा.जोग नावाच्या वकीलाचे उखळ पांढरे झाले ( हे शब्द दुरदर्शवरच्या मुलाखतीत स्वतः प्र.बा जोगांनी वापरले आहेत ). म्हणे ते बंगल्याला मोरारजी कृपा नाव देणार होते.

अस म्हणतात की आजकालची तरुण मुले सिगारेट कमी ओढतात. याला कारण म्हणे गेले अनेक वर्षे शाळांमधुन असा पध्दतशीर प्रचार केला जातो.

फटाके उडवणे सुध्दा कमी झाले आहे याचेही कारण लहान वयात बिंबवणे असे आहे असे म्ह्णतात.

समाजशात्री याचा विचार करत असतीलच. केवळ सवंग घोषणाबाजी आणि प्रचारासाठी जे कायदे केले जातात त्यांचे असेच होणार.

Pages