डान्स बार आणि बारबाला

Submitted by Omkar Deshmukh on 17 July, 2013 - 13:27

साधारण बारा पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. इतर एकही टवाळ वेळेवर न आल्यामुळे मी आणि माझा मित्र असे आम्ही दोघेच संध्याकाळी कट्ट्यावर गप्पा मारीत आणि ‘सृष्टीसौंदर्य’ न्याहाळीत बसलो होतो. इतक्यात एका रिक्षातून साडी नेसलेली एक अत्यंत सुंदर मुलगी उतरली आणि कानाला लावलेल्या मोबाईलवर अस्खलित इंग्लिश मध्ये बोलत शेजारच्या हॉटेलात गेली. कुठेही उणीव काढायला जागा नसलेल्या पारंपारिक सौंदर्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ती युवती असे तिचे यथोचित वर्णन करता येईल. खरे सांगतो, ती मुलगी जर माझ्याबरोबर चार दिवस पार्ल्यात हनुमान रोड वरून फिरली असती ना तर तमाम पार्लेकरांच्या तोंडून ‘जोशांच्या मुलाने नशीब काढले हो’ असे उद्गार निघाले असते (मागच्या खर्‍या भावना काहीही असोत). काही वेळाने ती हॉटेलातून बाहेर आली व रिक्षात बसून निघून गेली. आमच्यासारख्या दोन काळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवर काही क्षणांसाठी एखादी वीज चमकून जावी तसा भास झाला.

ती गेल्यावर मी सहज मित्राला विचारले ‘कोण रे ही? त्यावर माझ्या मित्राने अतिशय थंडपणे दिलेले उत्तर ऐकून मला माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का बसला. तो म्हणाला ‘ही गोल्डन बीन या लेडीज सर्व्हिस बार मध्ये वेटरचे काम करते’. माझा विश्वास बसणेच शक्य नव्हते. जिच्यापुढे शंभर एअर होस्टेस झक मारतील अशी मुलगी एका बारमध्ये वेटरचे काम करते यावर कसा विश्वास बसेल? मित्र म्हणाला ‘शंभर रुपयांची पैज लागली. मी तयार झालो आणि त्याच्याबरोबर त्या रात्रीच ‘गोल्डन बीन’ मध्ये गेलो. खरोखरच त्याने सांगितल्याप्रमाणे ती तिथे होती. आम्ही काहीतरी कारण सांगून पाच मिनिटात तिथून बाहेर पडलो. मी निमूटपणे खिशातून शंभर रुपये काढून माझ्या मित्राच्या हातात ठेवले.

मी जर महाभारतातला यक्ष असतो तर धर्मराजाला पुढील तीन प्रश्न विचारले असते आणि मला खात्री आहे त्यांची योग्य उत्तरे धर्म तर सोडाच पण पंडू सुद्धा देऊ शकला नसता. ते तीन प्रश्न असे....

1) वर उल्लेखलेल्या देखण्या मुलीला बारबाला सोडून अन्य कोणताही व्यवसाय करता आला नसता का?
2) न्यायालयाच्या एखाद्या समाजविघातक निर्णयावर टीका केली तर तो न्यायालयाचा अवमान कसा काय होतो?
3) नाचणार्‍या मुलींवर पैसे उडवून बरबाद होण्यात कोणती नशा आहे?

साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> 3) नाचणार्‍या मुलींवर पैसे उडवून बरबाद होण्यात कोणती नशा आहे?
कट्ट्यावर बसून फुकट्यात सृष्टीसौंदर्य न्याहाळण्यात आहे तीच.

तुम्ही का हो तिला त्या नरकातून बाहेर नाही काढलंत मग? हनुमान रोडवर लोकांनी बघावं म्हणूनतरी?

ही चर्चा इथे झाली आहे ऑलरेडी. सगळी चर्चा नाही वाचलीत तरी शेवटच्या पोस्टमधे वरदाने दिलेल्या लिंकवरचा लेख नक्की वाचा.

कट्ट्यावर बसून फुकट्यात सृष्टीसौंदर्य न्याहाळण्यात आहे तीच. >>> Lol आता तिथे कोणाला पैसे देणार ?

श्री, म्हणजे त्यांना बायकांकडे मिटक्या मारत बघण्यात काही गैर वाटत नाहीये, फक्त त्यावर पैसे खर्च होऊ नयेत आणि फिनान्शिअली बरबाद व्हावं लागू नये असा त्यांच्या लिहिण्याचा अर्थ होतो आहे म्हणून म्हटलं.

नाचणार्‍या मुलींवर पैसे उडवून बरबाद होण्यात कोणती नशा आहे?<<<

बरबाद होण्यात नशा नाहीच आहे. मात्र बरबाद झालेले समजते तेव्हा नशा संपलेली असते, संपत आलेली असते. नशा पैसे उडवण्यापर्यंत असते.

1) वर उल्लेखलेल्या देखण्या मुलीला बारबाला सोडून अन्य कोणताही व्यवसाय करता आला नसता का?

नाही. कारण इतर व्यवसायात तितका पैसा नाही जो व्यवसायात आहे. आणि ती सुंदर आहे म्हणुन तीला तितक्याच पैशात इतर कोणता व्यवसाय तुम्ही (किंवा इतर कोणी) दिला असता/ देऊ शकला असता तर तीनेतरी हा व्यवसाय का केला असता?

2) न्यायालयाच्या एखाद्या समाजविघातक निर्णयावर टीका केली तर तो न्यायालयाचा अवमान कसा काय होतो?

न्यायालयाचा निर्णय बारबाला असाव्या की नसाव्या या प्रश्नावर नव्हता. घातलेली बंदी ही अयोग्य कारणांसाठी असल्याने न्यायालयाने बंदी रद्द केली. यात महाराष्ट्र सरकारने अधिक काळजी घेउन अपिल करायला हवे होते. (मी जाणकार नाही त्यामुळे यापेक्षा अधिक माहिती नाही).

3) नाचणार्‍या मुलींवर पैसे उडवून बरबाद होण्यात कोणती नशा आहे?

कट्ट्यावर बघुन येणार्‍या जाणार्‍या मुलींकडे पाहण्यातही एक नशा असते (हे तुमच्याच लेखात दिसतय). त्यामुळे नाचणार्‍या मुलींवर पैसे उडवणे काही लोकांना मजा वाटते. अजुन काय ?

बाय द वे, मी धर्म नाही किंवा यक्षही नाही Happy

नशा पैसे उडवण्यापर्यंत असते.>>> बेफी खरे तर तेव्हाच दिसु लागतात , पैसे संपलेले असते पण तल्लफ संपलेली नसते मग चोरी , दरोडा , बलात्कार असा प्रवास सुरु होतो. डांसबार मध्ये उडवायला पैसे नाहीत म्हणुन चोरी केलीली कितीतरी उदाहरण उघडकीला आलेली होती.
आता परत हे सगळं सुरु होणार / वाढणार.

फेरफटका | 18 July, 2013 - 01:10
ओंकार देशमुखांबरोबर फिरून जर ती मुलगी जोश्यांच्या मुलाचं नशिब उजळवणार असेल तर अवघड आहे बुवा

हहपुवा Wink

1) वर उल्लेखलेल्या देखण्या मुलीला बारबाला सोडून अन्य कोणताही व्यवसाय करता आला नसता का?
हे उत्तर ती मुलगी सोडून इतर कुणाला देता येईल असे वाटत नाही Wink

आणि तसेही बारबालांचे प्रोफेशनल आयुष्य फार नसते. एकदा चेहेर्‍यावर वय दिसू लागले की कमाई झपाट्याने कमी होऊ लागते. असो.

2) न्यायालयाच्या एखाद्या समाजविघातक निर्णयावर टीका केली तर तो न्यायालयाचा अवमान कसा काय होतो?
न्यायलयाच्या निर्णयावर टीका हा न्यायालयाचा अवमान होत नाही. परंतु निर्णयाच्या हेतूंवर टीका हा कदाचित अवमान होऊ शकेल. (चुभुदेघे)

सदर केसमध्ये न्यायलयाने केवळ विसंगतीवर बोट ठेऊन बंदी उठवली आहे - काही ठिकाणी (पंच तारांकीत हॉटेले) डान्सला परवानगी तर काही ठिकाणी (डान्सबार) नाही - ही ती विसंगती.

3) नाचणार्‍या मुलींवर पैसे उडवून बरबाद होण्यात कोणती नशा आहे?
हे उत्तर ते पैसे उडवणारेच चांगल्या प्रकारे देऊ शकतील Wink

बाकी अशीच एक जुनी आठवण

तार बंद...
बार चालु....
भारताची प्रगती योग्य दिशेने होते आहे.... Sad

पंडु हा धर्माराजाचा बायॉलॉजिकल बाप नव्हता<<<

असता तरी त्याने ओंकार देशमुख या यक्षाचे प्रश्न ऐकून घेतलेच असते अशी काही खात्री देता येणार नाही.

केमिकल लोच्या, बायॉलॉजिकल बाप आणि फिजिकल बारबाला हे सर्व प्रश्न एकाच धाग्यान्वये ऐरणीवर येण्याचा प्रकार प्रथमच घडलेला पाहात आहे.