सचिनच्या तुलनेत लारा संघासाठी मॅचविनर-पाँटिंग

Submitted by धडाकेबाज on 17 July, 2013 - 10:26

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4926114149750878912&Se...

संपादीतः
इतर संकेतस्थळांवरचा मजकूर इथे कॉपी पेस्ट करू नका. फक्त दुवा द्यायचा असेल तर kanokani.maayboli.com चा वापर करा.
-अ‍ॅडमीन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटत लाराचा माइंड सेट नेहमी पॉझीटीव्ह असायचा. सचिन (सुरवातीची काही वर्ष सोडली तर)बर्याच्दा दबावाखाली यायचा/ येतो. नव्वदीत पोचलेला सचिन त्यामुळेच बर्याच्दा स्लो होउन सगळ्या संघालाच फटका बसलेला आहे.

मला रात्रभर झोप लागत नव्हती. >>>> बरोबर आहे.. सचिन च्या वेळेला त्याचे बॉलर्सना झोप येत नव्हती... Biggrin पाँटींगला थोडी सचिन ला गोलंदाजी करायची आहे..

<< त्याच्या खेळीमुळे संघाने किती सामने आणि मालिका जिंकल्या आहेत, हे महत्त्वाचे आहे >> श्रेष्ठत्वासाठी हा सर्वस्वीं एकच निकष आहे असं मानलं तरीही तो निकष लावताना दोन खेळाडूंची फक्त याबाबतींतली आंकडेवारीच लक्षांत घेणं योग्य नसावं; खेळाडूवर संघातील असणारी तौलनिक जबाबदारी, सामन्याची/मालिकेची त्या त्या वेळची परिस्थिती, इतर संघ सहकार्‍यांच्या कामगिरीचा पाठींबा/ विश्वास असे अनेक घटक अशा तुलनेत महत्वाचे ठरतात. यावर विश्लेषणात्मक खूप चर्चा पूर्वी झाली आहे व होतही राहील. पण, असा मुद्दा उपस्थित करून त्यावर आपला कौल देणार्‍या पाँटींगसारख्यांना क्रिकेटर म्हणून सलाम ठोकतानाच त्यांचा असा प्रत्येक कौल नि:पक्षपाती व वैयक्तीक पूर्वग्रहरहीत व म्हणूनच अंतिमच आहे असं मानण्याचीही गरज नसावी. लारा, सचिन व स्वत: पाँटींग, हे सर्वच 'ग्रेट' या सदरातच येतात. पण प्रत्येकाने आपले निकष लावून [ त्यांत << आपला सचिनकडे ओढा असतो >> हेंही येऊं द्या कीं ] आपल्यासाठी या तिघांत सर्वांत ग्रेट कोण हें ठरवणं उत्तम; किंवा असं ठरवण्याच्या भानगडीतच न पडणं हें तर त्याहूनही उत्तम !!

श्रेष्ठत्वासाठी हा सर्वस्वीं एकच निकष आहे असं मानलं तरीही तो निकष लावताना दोन खेळाडूंची फक्त याबाबतींतली आंकडेवारीच लक्षांत घेणं योग्य नसावं
>>> +१०००००
मला पण लारा सर्वश्रेष्ठ टेस्ट बॅटस्मन होता असे वाटते पण एकदिवसीय सामन्यात सचिन फार पुढे होता हे नक्कीच.

ह्या प्रश्नाला वैयक्तिक preference ह्यापलीकडे उत्तर नाही. निर्विवादपणे फक्त एकच गोष्ट सांगता येईल कि ब्रॅडमन हा टेस्ट क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ बॅटस्मन होता.

<<त्याच्या खेळीमुळे संघाने किती सामने आणि मालिका जिंकल्या आहेत, हे महत्त्वाचे आहे >> अरे बाळा पाँटींगा, मग त्या बिचार्‍या लारवूडला कां रे बदनाम केलात ? त्याने तर इंग्लंडला मालिका जिंकून द्यायलाच 'बॉडीलाईन बोलींग' केली ना !!! Wink

भाउ , अहो हत्ती चाले ..कुत्रे भुंकतात ..अशा मधली गत आहे पाँटींगची ..

१००% चरीत्र लिहित असणार बघा .. खपावे म्हणून वाद उकरायचे ! सचिनचे नाव घेतल्याशिवाय यांच्या बातम्या छापतोय कोण