Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 16 July, 2013 - 03:20
सुप्रीम कोर्टाने डान्सबार बंदी उठवली. डान्स बार पुन्हा चालू होणार ??????
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/supreme-cou...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चला हे एक बर झाल,
चला हे एक बर झाल, महाराष्ट्रात राहणार्या जनतेसाठी.
निदान सध्यांकाळी रीकाम्या वेळात काय करावे या विचारात असणार्या, लोकांना हाय कोर्टाने दिलासा दिला म्हणायचा एकदाचा.
धन्यवाद डॉक्टर......इतकी महत्वाची बातमी इथे दिल्याबद्दल.
आणि गुंडागर्दी
आणि गुंडागर्दी वाढणार....
आयटम साँगवाल्यांना आनंद झाला असणार
चला बर्याच माबो करांची सोय
चला बर्याच माबो करांची सोय झाली. !!!
गटगचा प्रश्न सुटला.
गटगचा प्रश्न सुटला.
जोक्स अपार्ट मागेही
जोक्स अपार्ट
मागेही हायकोर्टाच्या निर्णयानंतर या मुलींच्या पोटापाण्याच्या चिंतेबद्दल वाहिन्यांवर बरीच चर्चा झाली होती. एका सामाजिक कार्यकर्त्यांची तळमळ ऐकूनही का कोण जाणे जे अपील होत नव्हतं. आपल्या कायद्यातही ज्याला बंदी आहे, नैतिक दृष्ट्याही जे चुकीचं आहे तोच पोटापाण्याचा उद्योग का असावा हे काही केल्या समजत नव्हतं आणि अजूनही समजलेलं नाही. व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा मान्य केला तरी खूप अशिक्षित आणि एकट्या पडलेल्या बायकाही मोलमजुरी करतात. घरोघरी धुणीभांडी करणा-या बायकांना मग सा. दंडवत घालायला हवा. चुकतही असेन. पण झेपल्या नाहीत त्या चर्चा !
आणि गुंडागर्दी
आणि गुंडागर्दी वाढणार....
<<
<<
ती कशी बरे?
ते काहीका असेना पण
ते काहीका असेना पण वेश्याव्यवसाय करणार्या व्यक्तीना समाजात ह्या न त्या मार्गाने हळू हळू प्रसिद्धी व त्यानुषंगे जरा प्रतिष्ठा मिळणे चुकीचेच म्हणजे चुकीचेच
हल्ली दारू पीणे हा ही प्रतिष्ठेचा (स्टेटस ) भाग मानला जातो हे ही फार वाईट आहे
ज्याना करायचे त्याना करूद्यात पण अश्या प्रकाराना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समाजमान्यता देणे चुकीचे .......
डान्सबारवरील बंदी उठली म्हणजे
डान्सबारवरील बंदी उठली म्हणजे कोर्टाने अशा गोष्टींना मान्यता दिली असे नाही. कुठलाही कायदा घटनेने दिलेल्या मुलभुत अधिकारांची मायमल्ली करत नाही ना हे सुप्रिमकोर्ट पहाते. महाराष्ट्र शासनाने जेव्हा कायदा केला तेव्हा विधेयकात ज्या तृटी होत्या त्यांचा फायदा घेत त्याविरोधात याचिका दाखल झाली. हायकोर्टाने बंदी उठवल्यावर सरकार सुप्रीमकोर्टात गेले. खटल्याचा निकाल लागेपर्यंत स्टे मिळाला होता. या खटल्याचा निकाल सरकार विरुद्ध लागेल हे गृहित होते. यात चुक कोर्टाची नाही तर तृटी असलेले विधेयक लिहिणार्या सरकारची आहे.
मला वाटतं डान्सबार मध्ये
मला वाटतं डान्सबार मध्ये डान्स करणे याबद्दलच कोर्टाने विचार केला असावा. कुठल्याही व्यवसायाला शासनाकडून मान्यता घ्यावी लागते. डान्सबार हा मान्यताप्राप्त व्यवसाय नाही असं वाटत होतं. तिथं दिलं जाणारं मद्यही बेकायदेशीर आहे.
मान्यता शासनाकडून घ्यावी लागत
मान्यता शासनाकडून घ्यावी लागत असली तरी त्याबाबतचा कायदा करताना सरकारने भोंगळपणा केला. डान्सबार हे योग्य नाहीतच. पण त्याला कायद्याने बंदी आणण्यासाठी जेव्हा कायदा केला गेला तेव्हा सर्व गोष्टींचा विचार करुन विधेयक यायला हवे होते. आरोपपत्र करताना चुकीची कलमे लावली की गुन्हेगार सुटतो तसेच हे ही.
राज्यात पहील्यांदा गुटखा
राज्यात पहील्यांदा गुटखा बंदीबाबत झाले, तसेच काहीतरी याबाबतीत झाले असावे.
अशिक्षीत स्त्रियांना भांडी
अशिक्षीत स्त्रियांना भांडी घासायला ठेवतात घरात. १२ वी पास, दिसायला बरी अशी वाई १०,०००रु महिना पगारावर कोणी घरकामाला ठेवत नाही. आणि ठेवलं तरी घरात "शायनी अहुजा" असले की हे काम पण सेफ रहात नाही.
ऑफिस, डे केअर, पार्लर अशा ठिकाणी ४,००० रु मिळाले तरी बास. घरकामाच्या नि
अशा परिस्थितीत सोपा अर्थार्जनाचा मार्ग कोण पत्करणार नाही? नशिबवान असाल तर केवळ नाचकामावर १००००रु रोज मिळू शकतील. इथेही शोषणाची शक्यता आहे पण रिटर्न्स पहाता रिस्क आहेच!
मी समर्थन करत नाहीये, पण दुसरा अर्थार्जनाचा मार्ग ठेवलाय का अश्या स्त्रियांसाठी? देहविक्रयापेक्षा नाचकाम बरं!
आणि असे बार आपोआप बंद करता येतील.. तिथे जाणं थांबवा, बास!
मी समर्थन करत नाहीये, पण
मी समर्थन करत नाहीये, पण दुसरा अर्थार्जनाचा मार्ग ठेवलाय का अश्या स्त्रियांसाठी? देहविक्रयापेक्षा नाचकाम बरं!
आणि असे बार आपोआप बंद करता येतील.. तिथे जाणं थांबवा, बास! >>>>>+१००००
मी समर्थन करत नाहीये, पण
मी समर्थन करत नाहीये, पण दुसरा अर्थार्जनाचा मार्ग ठेवलाय का अश्या स्त्रियांसाठी? देहविक्रयापेक्षा नाचकाम बरं!
<<
<<
@जाईजुई
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाव 'डान्सबार' असले तरी तिथे फक्त "नाचकाम" चालत नाही.
------
सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतर डान्सबार असोसिएशनचा अध्यक्ष मनजितसिंह याची ही प्रतिक्रीया.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय माणुसकीच्या बाजूने असून, त्यामुळे आम्हाला किती आनंद झाला आहे, याचे शब्दांत वर्णन करता येणार नाही, डान्सबारमध्ये कोणतेही गैरप्रकार चालत नसल्याचे सांगत या निकालामुळे अनेक लोकांची घरे पुन्हा बसतील.
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाव 'डान्सबार' असले तरी तिथे फक्त "नाचकाम" होत नाही.<<< अनुमोदन!
खरे तर याही धाग्यावर मला कोण कोणाला उद्देशून काय म्हणत आहे हेच कळत नव्हते. विजय आंग्रेंच्या वरील विधानामुळे मी ट्रॅकवर आलो.
काही वेळाने अधिक प्रतिसाद लिहायचा यथाशक्ती प्रयत्न करायची इच्छा आहे.
स्वाती२: तुमची प्रतिक्रिया
स्वाती२: तुमची प्रतिक्रिया अचूक आहे. बरेच वेळा सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय घेतला, की उलट-सुलट प्रवाद होतात आणि दर वेळी तुम्ही वर दिलेलं स्पष्टीकरण डोक्यात येतं. सर्वोच्च न्यायालय फॅक्ट फाईंडिंग करत नाही. ते फक्त प्रक्रिया, कायद्यांची / घटनात्मक अधिकारांची अंमलबजावणी तपासतात (प्रामुक्ख्याने)
बरं ,मग कायद्याचा कीस पाडणे
बरं ,मग कायद्याचा कीस पाडणे हे सोडून एखादी गोष्टं योग्य की अयोग्य हे ठरविण्याचे अधिकार भारतात नेमक्या कुठल्या संस्थेला आहेत? पोलिस्,संसद्,मंत्रीमंडळ?
चित्रपटात आणी IPL cheer girls
चित्रपटात आणी IPL cheer girls तसेच पन्च्ताराकित होटॅल मद्ये मुलीना नाचायला परवन्गी असताना dance bar मद्ये ़?मुलीना नाचयला परवनगी का नाही ?
मनाला पटत नसला तरी कायद्याने योग्य निर्णय आहे.
साती, खूप open ended प्रश्न
साती, खूप open ended प्रश्न विचारलाय तुम्ही.
नुसतं ethically योग्य / अयोग्य हा तर वैयक्तिक पातळीवरचा प्रश्न झाला ना? पण सामजिक स्थैर्य, प्रगती, शांतता वगैरे बाबींचा विचार करून त्याप्रमाणे नियम बनवणं हा तर कायदे तयार करणार्यांचा (संसद) प्रांत आहे, न्यायालयं फक्त त्या कायद्यासंसद) अंमलबजावणीतल्या साखळीतला एक भाग आहे. जर सामाजिक दृष्ट्या घातक एखादी गोष्ट थांबवायची असेल, तर तो कायदा तितका फूलप्रूफ असायला हवा.
सर्वोच्च न्यायालयाने, डान्सबार योग्य आहेत असा निर्णय नाही दिला, फक्त ज्या कायद्याने ते बंद झाले आहेत, त्या कायद्यात त्रुटी असल्याने तो निर्णय रद्द ठरवलाय. आर. आर. पाटलांनी देखिल त्या कायद्याला अधिक सशक्त बनवू अशीच प्रतिक्रिय दिली आहे.
एथिकली पटत नसलेला, पण कायद्याने योग्य असा हा निर्णय आहे. मी ह्याचं समर्थन करत नाहीये (ते मी कधिच करू शकणार नाही), फक्त ह्यात सर्वोच्च न्यायालयाची चूक दिसत नाहीये असं म्हणतोय. आणि तो कायदा अधिक फूलप्रूफ करावा अशी अपेक्षा व्यक्त करतोय.
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाव 'डान्सबार' असले तरी तिथे फक्त "नाचकाम" होत नाही.<<<< + १००००
चित्रपटात आणी IPL cheer girls तसेच पन्च्ताराकित होटॅल मद्ये मुलीना नाचायला परवन्गी असताना dance bar मद्ये ़?मुलीना नाचयला परवनगी का नाही ?<<<<<< बरोबर !!!!
कायद्याने बरोबर निर्णय <<<<<< प्रश्न नैतिकता व सामाजिक गरज त्यामुळे सभ्य म्हणवणार्या समाजावर होणारा परिणाम या भोवती फिरायला हवा असे वाटते
कायदा काय फक्त निर्णय देतो बाकीचे काम समाजाला करायचे असते ...विचार समाजाने करायला हवा प्रत्येक व्यक्तीने करायला हवा कायदा व सरकार काही का करेनात
साती <<बरं ,मग कायद्याचा कीस
साती <<बरं ,मग कायद्याचा कीस पाडणे हे सोडून एखादी गोष्टं योग्य की अयोग्य हे ठरविण्याचे अधिकार भारतात नेमक्या कुठल्या संस्थेला आहेत? पोलिस्,संसद्,मंत्रीमंडळ?>>
सगळ्यात योग्य उत्तर म्हणजे "समाज" जे काही(खूप) जणांना पटणार नाही. पण कोणासही असे संपूर्ण अधिकार नाहीत. पोलिसांना नाहीत, संसदेला नाहीत आणी मंत्रिमंडळाला तर नाहीच नाही.
माझे मत - असे त्रिकालाबाधीत अधिकार कोणासही असू नयेत.
नाचगाणीगृहे (डान्स-बार) चालू करू द्यायचे नसल्यास सरकार-कडे आणखी कितीतरी पर्याय आहेत. नियम जाचक करता येतात, परवानगी नाकारता येते, कायद्यामधे अडकवता येते, वेळेची बंधने घालता येतात. इछ्छा असेल तर मार्ग निघेल. नगरपालिका ही असे नियम करू शकते.
नाचगाणीगृहे चालू झाली तर प्रत्येक समाजघटकाचा समप्रमाणात तोटा होत नाही असे माझे (अशास्त्रीय) निरीक्षण-मत आहे. इतरांची मते व अनुभव वाचायला आवडेल.
ह्या क्षेत्रात ३०% महिला
ह्या क्षेत्रात ३०% महिला आरक्षण हवे. बाकी ७०% पुरुष डान्सर असावेत. "सुभ होणे न दे" करीत काय मुले वाईट नाचतात का??!!
###### १२ वी पास, दिसायला बरी
###### १२ वी पास, दिसायला बरी अशी वाई १०,०००रु महिना
पगारावर कोणी घरकामाला ठेवत नाही ####
काय पण. १२ वी पास, दिसायला बरी अशा सगळ्या बाया
काय डान्सबार मधे जातात ? सर्विस सेन्टर, कॉल सेन्टर
मधे नाय काम करत ? रिस्पेशनला काम करनारी १२ पास,
दिसायला बरी बाइ नाही पाहिली कधी ? डान्सबार मधे काम
करनारे मुली काय सगळ्या १२ वी पास असतात हे कुनी
सान्गितलं ? लिहिता वाचता येत नाहि पन करोडपती होती
एक. तिचा इन्टरव्यु टीव्हीवर आला होता.
मुलान्मधे पन बारावी पास सगळे गॅन्गमधे जातात ? इक्शा
नाही चालवत का ? मानाने खायचं त्याना सान्गावं नाही लागत
कसं खायचं. हाव सुटली कि मग शिकला काय अन अडानी काय
कुठल्या मार्गाला लागतील हे कसं सांगायचं ?
डान्स बार या प्रकाराचे स्वरूप
डान्स बार या प्रकाराचे स्वरूप अनेकांना वाटते त्यापेक्षा बरेच भिन्न असते. तसेच ते क्लिष्ट असते.
--- बरेचदा तेथे गेलेलो असल्याने अनेक प्रकारचे डान्स बार्स, त्यातील लफडी कुलंगडी, क्लिष्टता हे थोडेफार समजत गेले ---
१. अब्रूवर घाला न घातला जाताही तारुण्य आणि सौंदर्य याच्या जोरावर व शिक्षणाशी सुतराम संबंध नसतानाही भरपूर पैसा कमवण्याचे साधन, या दृष्टिकोनातून असंख्य गरीब मुलींनी निवडलेला हा मार्ग असतो.
२. वेश्याव्यवसायात जसे खूप मोठ्या प्रमाणावर मुलींना फसवून देहविक्रय करण्याच्या ठिकाणी नेण्यात येते, तितक्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक होऊन डान्स बारमध्ये मुली येत नाहीत. फसवून येथे आणण्यात आलेल्या मुलींची संख्या तुलनेने फारच कमी असते.
३. पैशाचा पाऊस पडत असल्याने मुलींना संरक्षण देणारे बाऊन्सर्स व घरपोच सोडणारे कॅबचालक पुरवण्याइतका मनाचा मोठेपणा (?) अनेक ठिकाणी दाखवला जातो.
४. एवढे होऊनही ग्राहकांच्या आग्रहाखातर, पैशाची आत्यंतिक गरज म्हणून, पैशांना भुलून किंवा स्वतःचीच गरज म्हणून डान्सबारच्याही पुढची पातळी, म्हणजे देहविक्रय केला जाण्याचे प्रकार अनेकदा सर्रास घडतात. त्यासाठी आवश्यक त्या जागेची सोय बारचालक, मुली अथवा ग्राहक यांच्यापैकी कोणीही करू शकतात.
५. (पुन्हा एकदा) पैशाचा पाऊस पडत असल्यामुळे तेथे नृत्य करणार्या मुलींना उत्तम दर्जाचे / रंगसंगतींचे कॉश्च्युम्स (शब्द नीट लिहिला आहे याची दखल घेतली जावी) व सौंदर्य प्रसाधने वापरता येतात. यामुळे साधारणपणे कोणतीही मुलगी ही उठून दिसणारी वाटू शकते व देहविक्रय करणार्या स्त्रियांपेक्षा नक्कीच अधिक सुंदर व आकर्षक दिसते. (यात पुन्हा महागडे बार व स्वस्त बार यात फरक पडतोच).
६. या मुलींना निव्वळ आयटेम साँगसारख्या गीतांवर नाचायचे असल्यामुळे व कोणी खास टीप देणारा असल्यास खास त्याच्यासाठी, त्याच्याकडे पाहात, त्याला मोहवत व त्याच्या किंचित जवळ जात नाचायचे असल्यामुळे, तसेच, हे सर्व अनेकांसमोर होत असल्यामुळे मुळातच घाबरायचे कारण नसते.
७. मद्याचे मूल्य इतर बारपेक्षा अतिशयच जास्त असते व मुलींना मिळणारी टीप ही 'अमोज' असते. त्यात एखादी खरंच सुंदर, उत्तम नर्तिका किंवा एखाद्याची 'जीव की प्राण' मुलगी असली तर तिच्यावर पैशांची बरसात होते. त्या नोटा उचलायलाही दोन कमी वयाची मुले धावपळ करत राहतात इतकी बरसात!
८. कर्कश्श रेकॉर्ड्स, प्रचंड झगमगाट, सर्वत्र मद्य आणि सिगारेटचा दर्प आणि नाचणार्या मदनिका असे बेहोष वातावरण असते.
मात्रे हे सगळे झाले दर्शनी स्वरूप! खरे स्वरूप क्लिष्ट व वेगळेच असते.
१. या बारच्या मार्फत काळ्या पैशाला वाट मिळते.
२. काळ्या पैशाचे अनेक व्यवहार येथे होतात.
३. अंडरवर्ल्डशी संबंधीत अनेक बोली व्यवहार येथे होतात.
४. वरपर्यंत हप्ते पोचवण्यासाठी डान्स बारवरील रेडसारखा दुसरा उपाय नाही.
५. खबरी नेटवर्क येथून अनेक खबरी पुरवते.
६. एक्साईज, टॅक्सेशन, कस्टम्स अश्या ठिकाणच्या अधिकार्यांना खुष करण्यासाठी अश्या बारमधील एखादी भरघोस पार्टी महत्वाची ठरते. यात, मुलीला दिली जाणारी टीप ही त्या अधिकार्याला त्याचा सप्लायर कॅशमध्ये आधीच देतो. मग तो अधिकारी त्या नोटा त्याला हव्या त्या मुलीवर उधळत राहतो. थोडक्यात, अनेक कंत्राटे मिळवण्यासाठी येथील पार्टी महत्वाची ठरते.
७. या बारच्या माध्यमातून गरीब तरुण मुली, परित्यक्ता, विधवा, देहविक्रय करू न इच्छिणार्या पण इतर नेमके काहीच करू न शकणार्या अश्या सर्वांना मोठेच उत्पन्न मिळू लागते. विशेषतः, अशिक्षित तरुणी येथे सहज पैसा कमावू शकतात. या तरुणींचे राहण्याचे ठिकाण व कामाचे ठिकाण (घर व बार) ही वेगवेगळी असल्याने त्यांना डांबून ठेवणे, जबरदस्ती केली जाणे हे होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनाही हे तुलनेने सुरक्षित वाटते.
८. हप्ते व कर या दोन्ही आघाड्यांवर डान्स बार महत्वाचे ठरतात.
९. हे बार बंद केले तरीही अनेक ठिकाणी जे चालायचे ते चालतच राहते.
१०. या बारमुळे अनेक पुरुष, अनेक स्त्रिया आणि अनेक संसार देशोधडीला लागतात. पण त्याचा नेमका दोष 'डान्स बार' या घटकाला (अचूकपणे) देता येत नाही.
११. यातूनच सर्व्हिस बार नावाचा प्रकार निर्माण होतो जेथे डान्स नसतो, प्रचंड अंधार असतो आणि मद्याच्या सोबतच मदिराक्षीही शेजारी बसते. हे सर्व्हिस बार मात्र कधी बंद झालेच नाही असे ऐकलेले आहे.
१२. हे बार सुरू होण्यापूर्वी कदाचित त्या मुलींना खूपच असुरक्षित जीवन जगावे लागत असेल किंवा देहविक्रय करावा लागत असेल. मात्र हे बार सुरू झाल्यानंतर निदान सर्वांसमक्ष तरी त्यांचा यातून बचाव होतो. आणि हे बार सुरू होऊन बंद झाल्यामुळे त्यांच्यावर नक्कीच वाईट वेळ येते, हे दुर्दैवी आणि चमत्कारीक वाटणारे असले तरी सत्य आहे.
१३. या सर्वाचा परिणाम - डान्स बार बंद होणे हे चमत्कारीकरीत्या सामाजिक स्वास्थ्यासाठी तितकेच वाईट ठरते, जितके ते चालू असणे वाईट असते. यामुळेच, हे सगळे क्लिष्ट आहे.
चु भु द्या घ्या व कोणाकडे यापेक्षा योग्य किंवा अधिक माहिती असल्यास माझ्या प्रतिसादातील अयोग्य बाबी अवश्य नमूद कराव्यात.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
अवांतरः नाचगाणीगृहे
अवांतरः
नाचगाणीगृहे (डान्स-बार)
<<
सुसुकु,
हे असलं मराठीकरण जरा अती होतंय असं नाही वाटत का?
*
खुरपळे यांचे उत्तर रोचक आहे.
बेफी, तुमचा प्रतिसाद
बेफी,
तुमचा प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. (ही व अशी माहिती गेल्या कित्येक दिवसांपूर्वीपासूनच बहुतेकांना प्रसारमाध्यमांनी आधीच दिलेली आहे.)
पण चर्चाप्रस्तावातील प्रश्नचिन्हांनी उभे केलेल्या प्रश्नांसंबधातून काहीही टिप्पणी त्यात दिसली नाही.
बंदी उठली हे खरे की खोटे? त्याने सरकारचे नाक कापले गेले की नाही? ज्या कारणांसाठी बंदी घातली ती कारणेच चुकीची होती का? डान्सबार असणे हे आवश्यक आहे का? त्या धंद्यास अधिकृत मान्यता हवी का? सरकारी खात्यातील अत्युच्च पातळीवरील भ्रष्टाचारी अधिकार्यांच्या + करपट (शब्द मुद्दाम तसा लिहिला आहे याची नोंद घ्यावी) बिझिनेसमन्सच्या सोयीसाठी बार चालविले जावेत का? इ. प्रश्न चर्चाप्रस्तावातील "??" मधे अध्यहृत आहेत असे वाटते.
तुमच्यासारख्या डान्सबार अनुभवी* लोकांकडून या विषयी टिप्पणी अपेक्षित होती.
(* बर्याचदा तेथे गेला होतात हे आपणच आपल्या प्रतिसादातील दुसर्या ओळीत लिहिले आहे, यामुळे अनुभवी म्हटले आहे.)
अशा प्रकारच्या विषयात इतर
अशा प्रकारच्या विषयात इतर कुणाकडे जास्त माहिती असेल असं वाटत नाही . कुणाच्याही दांडग्या अभ्यासापुढे आणि उदंड अनुभवापुढे सपशेल माघार घेऊन आदर व्यक्त करणे योग्य वाटते .
१) चित्रपटात नाचणार्या किंवा
१) चित्रपटात नाचणार्या किंवा २) आय पी एल मधे नाचणार्या मुली आणि ३) बार मधे नाचणार्या मुली यातला महत्वाचा फरक हा सुरक्षिततेचा आहे
केस १) मधे त्या मुलींना दारुच्या नशेत असलेल्या लोकांच्या भुकेल्या नजरेला आणि त्यांच्या हरकतीला सामोरे जावे लागत नाही.
केस २) मधे तिथे त्या सुरक्षित वातावरणात नाचत असतात. (पोलिस असतात आजुबाजुला)
केस ३) मधे या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे. त्या अत्यंत असुरक्षित वातावरणात असतात.
या मुलींच्या किमान सुरक्षिततेचा विचार व्हायला हवा. अमेरिकेत स्ट्रीप क्लब्स मधे "बाउन्सर्स" हा प्रकार असतो. कोणी तेथील मुलींशी गैरवर्तन करायचा प्रयत्न केला तर हे बाउन्सर्स अशा माणसांची उचलबांगडी करतात. असा काही प्रकार भारतात नसतो का? सरकारने किमान मुलींच्या संरक्षणाचा तरी विचार करावा.
हे बार सुरु ठेवावे कि न ठेवावे यावर दुमत असु शकेल पण या मुलींच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर दुमत नसावे बहुतेक.
असा काही प्रकार भारतात नसतो
असा काही प्रकार भारतात नसतो का? सरकारने किमान मुलींच्या संरक्षणाचा तरी विचार करावा.
हे बार सुरु ठेवावे कि न ठेवावे यावर दुमत असु शकेल पण या मुलींच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर दुमत नसावे बहुतेक<<<
काही काळापूर्वी आपण 'आपण भारतीय पुरुषांना झाले आहे तरी काय' की असा काहीसा धागा काढला होतात. आता या मुली सुरक्षित राहात असल्या तर बार चालू ठेवायला आपली तात्विक हरकत दिसत नाही आहे. हा बदल काही फारसा स्वागतार्ह वाटत नाही. तेव्हा मी आपला विरोध करत होतो की सर्वसामान्यीकरण करू नयेत. ते आपण या धाग्यात मान्य केलेले दिसत आहेत.
mansmi18, बाऊन्सर्स असतात
mansmi18, बाऊन्सर्स असतात इथंही. त्याशिवाय हा सारा प्रकार विनाअडथळा चालणं शक्य नाही.
Pages