निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संध्याकाळी भाचेसुनबाईंनी जेवायला बोलावले आहे, ( सी.एस. + भरतनाट्यम नर्तिका + रांगोळी कलाकार असलं भन्नाट रसायन आहे ते. ) >>>>> कोणत्या सुनबाई आहेत या - सांगा बरं जरा .... Happy

माझ्या भाच्याची पत्नी. तीन महिन्यापुर्वीच झाले लग्न.

शशांक एक खास बातमी,

bloomsbury.com या प्रकाशन संस्थेने आठ भागात The Birds of Africa हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.
त्यातली काही चित्रे मी केनया एअरवेजच्या इनफ्लाइट मॅगझिन मधे बघितली.
आपल्याला कल्पना येणार नाही इतकी सुंदर चित्रे आहेत त्यात. साईट बघितल्यास काही चित्रे बघायला मिळतील.
आणि हे पक्षी आपल्या बघण्यातले नाहीतच.

माझ्याकडे एक असाच वेल दर पावसाळ्यात येतो आणि नंतर नाहीसा होतो. >> जो, बहुदा ती गणेशवेल असेल. त्यावर चांदणीच्या आकाराची लाल फुले पण येतात का?

लोकहो, माझ्या प्रश्नाला पण उत्तर द्या ना! कृष्णकांचन म्हणजे कुठले झाड्/झुडुप?

माधव, २४ तारखेला संध्याकाळी वेळ आहे का ? मी भारतात नसेन पण जिप्स्या डीटेल्स देऊ शकेल.
कृष्णकांचन नाव वाचल्यासारखे वाटतेय, पण नीट आठवत नाही.. तोपर्यंत ब्लॅक गोल्ड म्हणायचे का ? Happy

दिनेशदा तुम्हाला हॅप्पी जर्नी!! Happy

माधव, कृष्ण वड माहिती आहे पण कृष्ण कांचन प्रथमच ऐकतेय. तरीही कुणा माहितगाराला विचारून सांगू शकेन २-३ दिवसांत.

माधव, फ्लॉवर्स ऑफ इंडियावर पुढील माहिती मिळाली. पण हा अगदी डार्क जांभळ्या रंगाचा कांचन आहे. मराठीत याला कांचनराज म्हणतात. पुण्यात आघारकर संस्थेच्या दारात आहे हा. याच्या फक्त बोटॅनिकल नावातच ब्लॅक हा शब्द आहे - बॉहिनिया ब्लॅकियाना. पण तुम्हाला जो म्हणायचा आहे तो हाच आहे का ते कन्फर्म कराल का? फ्लॉवर्स ऑफ इंडियावरची माहिती अशी -

Bauhinia x blakeana Family: Caesalpiniaceae (Gulmohar family)
This tree is the official floral emblem of Hong Kong and it is widely cultivated in tropical regions. It is thought to be an accidental hybrid between B. purpurea and B. variegata. It was first discovered on the seashore in Hong Kong in 1908 and named after Sir Henry Blake, Governor of Hong Kong from 1898 to 1903. After the handing back of the colony to China, a special award was created to replace the British Imperial honours. The award is called the Grand Bauhinia Medal, or GBM for short. A small evergreen tree to around 7m tall. The bilobed leaves are dark green and shiny, with raised yellowish-green veins. Compared to other Bauhinias, the leaves of this one are huge, six to eight inches. The large, orchid-like flowers are rich magenta purple with paler veins, and the uppermost petal is darker towards the base. Flowers appear from February to November, with the peak flowering time in September to October. This bauhinia is sterile and rarely produces the large flat seed pods seen on other species.

दिनेश, जिप्स्याला फोनून बघतो उद्या.

शांकली, मला नाही माहित की ते कसले झाड असावे. संदर्भाकरता इंदिरा बाईंच्या त्या ओळीच देतो इथे...

डोंगराच्या तळाशी ब्रह्माचे देऊळ. तेथून खाली दगडी बांधीव पायर्‍यांवरून गेले की मग खूप मोठे वृक्ष आणि एक फळ्यांचा लहानसा पूल, वहाळावर बांधलेला. डोंगरातून वाहून येणार्‍या पाण्यावर ती बाग उभी केलेली. बागेत आतील बाजूला एक मोडकी झोपडी. शेजारी घमघमणारा हिरवा चाफा आणि पुढे ओल्या गार वाफ्यातील फुलझाडांचे हिरवेगार गंधच गंध. लहान पाटातून बाहणारे पाणी, काठाने कर्दळीची झाडे, कुठे सुपारीची, कुठे केळीची रांग. मध्ये वाफेच वाफे... निशिगंधाचे, कृष्ण कांचनाचे, चटक चांदणीचे, मोगर्‍याचे, हळदीचेही. तुळशीचा तर एवढा मोठा चौक..................

एखाद्या कुशल चित्रकाराच्या सफाईनेच त्यांनी हे चित्र रंगवलय फक्त तो कृष्ण कांचन काही डोळ्यासमोर येत नाहीये.

बाप्रे काय काय माहिती मिळत आहे,,, सीप थ्रू व्ह्यायला वेळ लागेल..
दिनेश चं अराउंड द वर्ल्ड इन ८ डेज चाल्लेलं दिस्तंय... दिनेश ,मेरा नंबर कब आयेगा...
परवापासून मी भारतवासी होणार... अनिवासी ही सही !!!!!

बाप्रे काय काय माहिती मिळत आहे,,, सीप थ्रू व्ह्यायला वेळ लागेल.. >>> अनुमोदन्..हा धागा म्हणजे माहितीचा खजिना आहे.

हे करांद्याचे पान आहे.>>>>>>>>>>>>.आम्ही लहानपणी पोकळ मुठ उभी धरून त्यावर हे पान, पालथ ठेवून, जोरात दुसर्‍या हाताचा पंजा मारायचो. मस्त 'ठो' असा आवाज येतो. Happy

पिंगळ्याचा फोटो मस्त आलाय. Happy

करांद्याच्या काचर्‍या मस्त होतात...अगदी तोंपासु.>>>>>>>>>>.आम्ही कोकणात असताना भाजून खायचो. हे आधी का नाही सांगितलं? Uhoh Happy

हे करांद्याचे पान आहे.>>>>>>>>>>>>.आम्ही लहानपणी पोकळ मुठ उभी धरून त्यावर हे पान, पालथ ठेवून, जोरात दुसर्‍या हाताचा पंजा मारायचो. मस्त 'ठो' असा आवाज येतो.>>>> शोभा, हे पान बघितल्यापासून मी हिच पोस्ट टाकायचि असे म्हणत होते, तोवर तू टाकलीसुद्धा ? :प्रचंड रागः
दिनेशदा, प्रवास मनसोक्त झाला ना ? Happy

अंबोली आणि मिरजही राहिले.
दिनेशदा,
मलाही तुमची मिरज भेट न झाल्याची चुटपुट लागुन राहिली,मी रविवारी गावी जाऊन आलो, घरी,वाडीवर अनेकांनी तुमच्या येण्याबद्दल विचारलं, तसा पाऊस चालुच होता,त्यामुळे त्यात शेतात काळी माती असल्यामुळे जास्त फिरताही आलं नसतं.
जानेवारीत पाऊस नसेल आणि द्राक्षाच्या भरलेल्या बागा बघायला नक्की या.

व्वा दिनेशदा... अगदी धावता दौरा केलात.

<<करांदे नुसते मीठात उकडून पण मस्त लागतात. तोंपासु..<<
करांदे कसे दिसतात? त्याचे फोटु टाका बरं.

शशांकनी दिलेल्या फोटोप्रमाणे तो गणेशवेल नाहीये
जो_एस,
हिच वेल गणेशवेल असल्याच मी खुप लोकांच्याकडुन ऐकलयं ,आमच्या शेजारी देवधरांची नदी काठी मोठी मळी-शेती (७-८ एकर) होती,तिथे बहुतेक वेळा ऊस असायचा,पावसाळ्यात त्या ऊसावर दरवर्षी सगळीकडे ही गणेशवेल इतकी वाढायची कि अक्षरशः ऊस या वेलींनी-लाल फुलांनी भरुन जायचा. तिथुन जवळच एक भव्य दगडी बांधकाम असलेलं स्वयंभू गणेश मंदीर होतं.
हि वेल लाल-गाळाच्या मातीत जास्त येत असावी अस वाटतं.

जागू धन्यवाद.
अनील बरोबर आहे, ती लाल फुलंवाली गणेशवेल असेल. माझ्याकडच्या वेलीला लाल फुलं पाहीली नाहीत.
आता त्या वेलावर लक्ष ठेवतो.

कारंदे उकडून त्यात खोबरं, मीठ, साखर इ. कुस्करुन छान कोशिंबीर होते. पण ते बघून घ्यावे लागतात नाहीतर कडूजार कारंदे यायचे हातात.. Happy

खतखते या पदार्थात कारंदे मस्ट..

सुप्रभात !
अनिल जानेवारीत जरा मुलांना सुट्टी असेल अशा काळात गटग ठरवा म्हणजे आम्हालाही येता येईल.
जागु,
नक्कीच ठरवु !

Pages