चीड्याघ ईगाअं

Submitted by मामी on 12 July, 2013 - 03:11

(चाल : सुतार उत्तमसा. मात्र वाद्यवृंद : 'उठा राष्ट्रवीर' चा)

कित्येक युगे घडा पालथा पडला
आतील ऐवजही सडला

चहूबाजूला जग बदलते रोज
किड्यांची घड्यात बुजबूज

मोकळी हवा, स्वच्छ ऊन अन पाणी
रुंदावली क्षितिजे, बदलली जुनी ती गाणी

नव समिकरणे, विचार नव, नव वारे
या घड्यास उपरे सारे

आपुल्याच नादी रमला
कवटाळुनि जुनेच बसला
नाकारी सर्वही बदलां

उठण्याचे घेईल कधी कष्ट हा घडा?
कधी होईल का हा सुपडा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यमकं जुळवलीस ना, लब्बाडे! >>> Lol

एकदाचा होईल का हा उपडा? >>> इथे 'उताणा' असा शब्द हवा होता असे वाटते.
>>>> च्च च्च च्च ... आता यम्कं जुळवली तर तुम्ही जुळवू नका म्हणताय!

उपड्याच्या जागी सुपडा लिहिते. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद, उल्हास भिडे. Happy

मीमा नफॅ बक्ल ची तास्यदस ठीसाण्याळमि र्जअ नरूभ लावठपा हेआ. रवळाठाना पाकृ वीव्हा.

झटकपाले इटकडुले पंपंपाडियाती
डिंगलानी इंडपुन्नम किटकिटाती

__/\__

बोलावल्याशिवाय कविता वाचायला जाऊ नकोस असं एका महानुभावांना एका शहाण्या माणसाने सागितलं होतं. पण त्याने ऐकलं नाही. "आमंत्रण" नसताना गेलाच ( पाघ..पाघ !!!) आणि हाय

ये क्या हुआ, कैसे हुआ
कब हुआ, जब हुआ, तब हुआ
छोडो... ये ना सोचो.

Wink

नमस्ते मामीताई

खूप मस्त भन्नाट आहे ही कविता

पण सुरुवातीस शीर्शक वाचून "च्युइंग -गम" वर असावी असे वाटले होते कारण आता आहे त्या शीर्शकातून तसाच "च्युइंग -गम -च्युइंग -गम "...असा नाद ऐकू येत होता मग कविता वाचल्यावर समजली आवडली

कविता अंतर्मुख करणारी आहे आयुष्यावर भाष्य करणारी आहे आधुनिक पद्धतीची आहे म्हणजे मुक्तछंदात एकाच कवितेत वेगवेग़ळे कडवे वेगवेगळ्या आकृतीबंधात लिहिले गेले आहे व एकंदर परिणामकारकता वाढवली आहे

यात ओवी ,हायकू, द्विपदी असे प्रकार एकत्रच हाताळले गेले आहेत एकंदर काव्याचा डौल फटका या काव्यप्रकाराचा आहे

पण एक शंका अंगाई म्हणताना कधी उठणार हा असे का म्हटले गेले आहे हे समजले नाही एव्हढ्याशा बाबीने रसभंग होणार होता पण मी तो होवू दिला नाही ..........

असो
आपल्या ह्या रचनेकडून हास्यकविता हा प्रकारात बरेच काही शिकता आले

लोभ असावा
अपला नम्र
~नवाच एक कुणीतरी Happy

टीप : आपले सदस्यनाम मामी असे असल्यामुळे ; व सर्व अंतरजालीय भगिनीना ताई असे संबोधण्याची सवय असल्याने सुरुवातीस मामीताई असे म्हटले आहे त्यामुळे वाईट वाटून घेवू नये ही विनंती Happy

पालथा घडा, पालथा घडा असं म्हणून हिणवायचे दिवस गेले. पालथ्या घड्याचेही काही उपयोग असतात म्हटलं..

instructions-part-2.jpg

Pages