एका पेक्षा एक (अप्सरा आली)- पर्व ७ वे.

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 07:01

एका पेक्षा एक (अप्सरा आली)-पर्व ७ वे...

सचिन-महागुरु
पुष्कर श्रोत्री-सूत्रसंचालक
आणि सहभागी- श्रुती मराठे, मानसी नाईक....इत्यादी.

चर्चा करायची????

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्या हो का?
मग सगळे त्याला तुमच्या मुळे याव झालं तुमच्या मुळे त्याव झालं का म्हणत रहातात ? Uhoh

ठिकेय मग दुसरे जज असतील तर बघायला हवी...

शि-याच्या बहीणीचं खरं नाव काय आहे >> बहुतेक रेश्मा नाईक , सिरिअल चालु असतानाच बहुदा लग्न जाह्ले आणि परदेशी गेली.>>>
हो आता आली परत. माझ्या कॉलनीतच आहे तिचे सासर माहेर. Happy

सुरूवातीचे दोन्ही भाग बघीतले. (रिमोट माझ्याकडे नव्हता हे आधीच सांगतो.)

अतिशय चुकीच्या पद्धतीने नाच केलेत सगळ्यांनी. लावणी म्हणजे केवळ नवूवारी नेसली म्हणजे झाले असे नसते. अन त्या नवूवारीसाड्याही शिवलेल्या असतात. छे.

या सगळ्या टीव्हीवरच्या आहेत की इंडीयन आयडल्ससारख्या निवडून घेतलेल्या आहेत?
आणि त्या दोघींमध्लं भांडण तर अतिशय बकवास...

>>>>> डि आय डि मधले मिथुनदादा परवडले सचिनपेक्षा!

हाहाहा, अगदी खरं आहे. कालच्या कार्यक्रमात एक सहभागी असलेली स्पर्धक मिथुनदादा कडे पाहुन म्हणाली 'आपको दादा, वादा बोलते हे ये पता नही था' माझी हहपुवा झाली. लैच बावळट वाटतो मिथून तिथे....जीवावर येते त्याच्याकडे क्यामेरा गेल्यावर की आता काय काय सहन करावे लागेल म्हणून. Happy

-दिलीप बिरुटे

फेबु वरचा एक विनोद.
एकदा रजनीकांत आणि मायकेल जॅक्सनची नाचाची स्पर्धा लागलेली असते. आणि अहो आश्चर्यम्...फर्स्ट टाईम....रजनीला हरवून चक्क मायकेल जिंकतो... का माहितीये?

त्याने महागुरुंच्या टीप्स प्रमाणे नाच बसवलेला असतो Happy

फुलवा डीआयडी मॉम्समधे स्पर्धक म्हणून आहे ना...

सचिनमुळे तो कार्य्क्रम बघावासा वाटत नाहीच. पण नृत्यामधे पण काही विशेष प्रकार केलेले दिसले नाहीत आजवर. स्टेजभर धावणे, मधेच एखादी बॉलीवूड स्टेप, अधून्मधून बीटला सोडून जाणारे हातवारे, चेहर्‍यावर भाव म्हणून टिपिकल तेच तेच. गाणं काहीही असो चेहर्‍यावरचं प्लास्टिक हासू, शिवाय डोळे दुखतील असे झगझगीत कॉस्च्युम्स आणी मेकप. शाळेच्या गॅदरिंगमधे बसवलेले डान्स यापेक्षा चांगले असतात. लावणी म्हटलं की शिवलेली नव्वारी तीपण फ्युजन स्टाईल म्हणत काहीतरी चित्रविचित्र.

नाच झाल्यावर नाच कसा झाला हे सोडून इतर वायगळ चायफळ गप्पा त्यात परत रडारड. किंचाळ्या आणि ओरडा. एकतर त्या महागुरूला ऐकणं बघणं अशक्य आहेच.

महागुरू नच बलियेचा विनर झाला तेव्हापासूनच डोक्यात गेला माझ्या. खरे विनर राजेश्वरी आणि वरूण व्हायला हवे होते. त्यांच्या परफॉर्मन्समधल्या एका टेक्निकल चुकीमुळे सचिन सुप्रिया विनर झाले होते.

महागुरू नच बलियेचा विनर झाला तेव्हापासूनच डोक्यात गेला माझ्या. खरे विनर राजेश्वरी आणि वरूण व्हायला हवे होते. त्यांच्या परफॉर्मन्समधल्या एका टेक्निकल चुकीमुळे सचिन सुप्रिया विनर झाले होते.
>>> अगदी अगदी. तो नच बलिये मी पहिल्यापासून पाहिला होता. राजेश्वरी आणि वरूण बडोलाच जिंकायला हवे होते असं सतत वाटायचं. त्यांनी स्त्री-पुरुष वेश बदलून जो नाच केला होता तो एकदम सहीच होता.

त्यांनी स्त्री-पुरुष वेश बदलून जो नाच केला होता तो एकदम सहीच होता.<<< ओ गुजरीया ओसावरीया वाला ना? त्यावेळेला सरोज खानने उत्स्फूर्तपणे उठून राजेश्वरीला शंभर रूपये दिले होते, नंतर ते दर वेळेला द्यायला लागली तेव्हा ते इतकं उत्स्फूर्त वाटलं नव्हतं.

पुर्वीच्या कुठल्यातरी पर्वात एकदा महागुरूला ऐकले तेव्हापासून परत बघण्याची हिम्मत झाली नाही.

खरतरं पुर्वी मला सचिन खूप आवडायचा. आता डोक्यात जातो. (मृणालचेही अवंतीका नंतर असेच झाले. आधी आवडायची मग डोक्यात जायला लागली)

पुष्कर बावळट
महागुरु महाबावळट
अप्सरा मंद, बावळट, अर्धवट

पुष्कर ला एकतर नीट बोलायला शिकवले पाहिजे कोणीतरी......तो बोलताना जीभ दातांच्या मधे आणुन बोल्ल्यासारखा बोलतो....एका पेक्जा एक अप्जरा आली..........आणि महागुरुंनी पहिल्याच दिवशी स्वताची लाल करायला चालु केली ती १० मिन चालुच होती....... सगळा मुर्खांचा बाजार...आणि बघणार्या आपल्या सारख्या खुळ्यांचा शेजार....

हेमांगी कवी खरे तर गुणी अभिनेत्री आहे, ती फु बाई फु, एकापेक्षा एक असल्या भानगडींत कशी काय पडलीये देव जाणे!

जगण्यासाठी पैसाही हवा असतो म्हणा!

नृत्य आणि सचिन यांचे परिक्षण खुपच बोअरींग आहे.
ह्या कार्यक्रमातील 'महागुरु' चे रुप पाहुन मला माझा मायबोली आयडी बदलावा असे वाटत आहे

कुणीतरी त्या अप्सरांना (!) नऊवारी साड्या नेसा म्हणून सांगा रे.
नेसा
म्हणजे पँट घालतात तशा घालू नका.
निधप तुम्ही जा हो तेथे.

<< डि आय डि मधले मिथुनदादा परवडले सचिनपेक्षा! >> <<खरतरं पुर्वी मला सचिन खूप आवडायचा. आता डोक्यात जातो.>> १००% सहमत. कुठे थांबावं हें न कळल्याने एक अत्यंत गुणी, मेहनती व जाणकार कलाकार स्वतःच्याच कारकिर्दीवर बोळा फिरवतोय याचं वाईट वाटतं !

aho-upayog.JPG

काल सचिन मेघा घाडगेंची स्तुती करताना...

"तुम्ही छान दिसताच, पण तुम्ही जी नव्वारी नेसली आहे, नव्वारीमधे असे रंग मी पहिल्यांदा बघितले. म्हणजे लेमन येलो, मग मस्टर्ड मग राणी कलर त्यावर जांभळ्या ब्रोकेडचा ब्लाऊज. आता तुम्ही म्हणाला की मला शृन्गारातलं इतकं कसं काय माहिती. जनरली महिलाना शृंगारातलं जास्त समजतं. पण मला असं वाटतं की पुरूषांना पण शृंगारातलं तितकंच समजतं.. पण पुरूष ते बोलून दाखवत नाहीत../.. कारण पुरूषासाठी बाई हाच मोठा शृंगार आहे....."

यानंतरचं पुढचं लक्षात नाही. पण जे काय होतं ते भयाण विनोदी चालू होतं.

कोरीओग्राफरला काम सांगताना सचिनजी म्हणे
"अत्यंत काळजीपूर्वक आणि दिमाखदार परफॉर्मन्सेस आम्हाला आपल्याकडून अपेक्षित आहेत" काळजीपूर्वक परफॉर्मन्सेस हे विशेषण मला अद्याप समजलेले नाही.

"तुम्ही छान दिसताच, पण तुम्ही जी नव्वारी नेसली आहे, नव्वारीमधे असे रंग मी पहिल्यांदा बघितले. म्हणजे लेमन येलो, मग मस्टर्ड मग राणी कलर त्यावर जांभळ्या ब्रोकेडचा ब्लाऊज. आता तुम्ही म्हणाला की मला शृन्गारातलं इतकं कसं काय माहिती. जनरली महिलाना शृंगारातलं जास्त समजतं. पण मला असं वाटतं की पुरूषांना पण शृंगारातलं तितकंच समजतं.. पण पुरूष ते बोलून दाखवत नाहीत../.. कारण पुरूषासाठी बाई हाच मोठा शृंगार आहे....." >>>> Lol

हे अजून बंद कसं नाही पडलं????
सचिन अति म्हणजे अति बोर मारतो. डीआयडी मध्ये इतका बोलत नाही मिथुन. पुष्कर तर केवळ कीव येण्यास पात्र!
ते सारखं ५० वर्षाची कारकीर्द तर अतिशय डोक्यात जातं.

सचीनच्या नृत्याबद्दल नंदिनीशी प्रचंड सहमत !
एक दोन ठरावीक साच्यातल्या पेशल बॉलीवुडी स्टेप्स सोडल्या तर वेगळं काही करताना तो कधीच दिसला नाही. नच बलियेच्या त्या पर्वात त्याने जे काही केलं त्याचं श्रेय मी त्याच्या कोरियोग्राफरला देइन.

<<कुठे थांबावं हें न कळल्याने एक अत्यंत गुणी, मेहनती व जाणकार कलाकार स्वतःच्याच कारकिर्दीवर बोळा फिरवतोय याचं वाईट वाटतं !>>>अगदी, अगदी मनातले बोललात. "सबकुछ मीच" या हट्टाग्रहापायी वाया जातोय हा माणुस Sad

भिक नको पण कुत्रा आवर असा आहे हा महागुरु. लायकि पेक्शा जास्त बोलतो. आणि काय ते भिकार डांस. नावाप्रमाने पिळतो हा पिळगावकर. एखाद्याला टॉर्चर करायचे असेल तर त्याला हया महागुरुचा कार्यक्रम दाखवा.

"तुम्ही छान दिसताच, पण तुम्ही जी नव्वारी नेसली आहे, नव्वारीमधे असे रंग मी पहिल्यांदा बघितले. म्हणजे लेमन येलो, मग मस्टर्ड मग राणी कलर त्यावर जांभळ्या ब्रोकेडचा ब्लाऊज. आता तुम्ही म्हणाला की मला शृन्गारातलं इतकं कसं काय माहिती. जनरली महिलाना शृंगारातलं जास्त समजतं. पण मला असं वाटतं की पुरूषांना पण शृंगारातलं तितकंच समजतं.. पण पुरूष ते बोलून दाखवत नाहीत../.. कारण पुरूषासाठी बाई हाच मोठा शृंगार आहे....."

यानंतरचं पुढचं लक्षात नाही. पण जे काय होतं ते भयाण विनोदी चालू होतं.

>> +१००

हे साडीचं वर्णन जरा अतिच होतं आणि वरतुन म्हणे "प्रत्येक गलीचा एक दादा असतो आणि या गलीचा दादा मी".. मग पुष्करचा काहीतरी पाचकळपणा मग... म्हणे "मी गलीचा म्हटलेलो कलीचा नाही... "

या गलीचा दादापण होण्यासारखे नृत्यात काय दिवे लावलेत देवच जाणे.

मुर्खपणाचा कळसच आहे.

महागुरूंना साडी नेसण्याचा अनुभव आणि दांडगी हौस असल्याने बारकाव्यांकडे त्यांचं लक्ष गेलं असेल.
http://www.youtube.com/watch?v=K1pLL7DrK74 (२.५६पासून पहा. अ‍ॅड स्किप करा)

काल पहिल्याच डान्सला त्या बाईने नव्वरीचे जे काय केलं होतं ते दिव्य होतं. खरंतर मला गोल्डन लेगिंगवर नेसलेली साडीचा तो प्रकार आवडला. पण वन शोल्डर ब्लाऊज आणि डोक्यात घातलेला खराटा याने ते चक्क ध्यान दिसत होतं...

आज प्रोमोमधे सासू हवीमधली बाई (यांना अप्सरा म्हटलं तर मेनका रंभा अब्रूनुकसानीचा दावा ठोकतील) सवार लू या गाण्यावर बिहू डान्स करताना दिसली. बिहू स्टेप काही केल्या जमलेली वाटली नाहीच. बिहू स्टेप म्हणजे नुसतं हात कमरेवर ठेवून धक्धक करणे नसतं हे त्या बाईला कोण सा/न्गणार?

मला त्या कोरीओग्राफरची जाम दया येते. बिचारे कसं काय नाचवून घेत असतील या बायांकडून कुणास ठाऊक!!!

Pages

Back to top