Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 4 July, 2013 - 15:30
आज 4 जुलै
अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
''वसुधैव कुटुंबकम ,हे विश्वाची माझे घर ''इत्यादि उक्ती नुसार मी स्वता:ला देश,धर्म या बंधनात बांधून घेवू इच्छित नाही .
आध्यात्ममिक दृष्ट्या विचार करता मी हिंदू, मी भारतीय , मी अमेरिकन या अस्मितेच्या विविध पायर्या आहेत
मात्र अस्मितेला अभिनिवेशाची बाधा झाली की chaos निर्माण होतो असे पातंजल योगशास्त्र सांगते.
मंडळी Liberty हे अमेरिकन समाज-जीवनाचे उच्चतम मूल्य आहे
खरेच अमेरिकन संस्कृती ही जगातील सर्वाधिक urbanised / civilised society आहे असे आपणास वाटते ?
आपल्या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत .....
(8000 वर्षेच नव्हे तर 51,000 वर्षांच्या युगब्दा पासून लाखो करोडो वर्षांच्या -नव्हे अठ्ठावीस महायुगांच्या अतीपुरातन भारतीय हिंदू संस्कृतीचा सार्थ अभिमान असलेला ...)..... स्वामी विश्वरूपानंद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
8000 वर्षेच नव्हे तर 51,000
8000 वर्षेच नव्हे तर 51,000 वर्षांच्या युगब्दा पासून लाखो करोडो वर्षांच्या -नव्हे अठ्ठावीस महायुगांच्या अतीपुरातन भारतीय हिंदू संस्कृतीचा सार्थ अभिमान असलेला ...)..... स्वामी विश्वरूपानंद
<<<<< स्वामी तुम्ही निव्वळ "अक्कल पाजळ"ताय याला "माहीती" असेही म्हणतात ....तळमळ असेल तर "ज्ञान" "शेअर" करा (मिळवले असेल तर)
असो !!
१५ ऑगस्ट न विसरता अस्स्साच धागा काढा (लेख लिहा) मायबोलीवर !!
विसरलात तर बघा ..
अमेरिका म्हणजे दुटप्पी देश.
अमेरिका म्हणजे दुटप्पी देश. इथले लोकं स्वातंत्र, बंधुता, समता वगैरेच्या गप्पा मारतात आणि अमेरिकन सरकार त्याच्या अगदि बरोबर उलट वागतं. ताजं उदाहरण आहेच - इंटरनेटवर ठेवलेली पाळत, आणि कहर म्हणजे त्याबद्दल प्रिझमच्या (का सीआयएच्या?) प्रमुखांनी सिनेटला दिलेली खोटी माहिती....
लोकशाही वगैरे असं काही नसतं हो... ती फार फार पुर्वी होती म्हणावं का, जिथे राजाच्या विरोधातही तक्रार करता येत होती ? असो... बुरखा पांघरलेली लोकशाही म्हणेन मी फार फार तर .... भारतही काही वेगळा नाही, फक्त दिखाऊपणा कमी असावा, कदाचित पैसा खाण्यापासुन वेळच उरत नाही....
अमेरिकेने जगात नाक खुपसणे बंद केले तर सगळं जग सुखी होईल, आणि त्यांना प्रिझम किंवा तत्सम गोष्टी करायची गरज पडणार नाही.
आणि हे वाचायलाच हवे :- http://www.maayboli.com/node/43351
<<<<< स्वामी तुम्ही निव्वळ
<<<<< स्वामी तुम्ही निव्वळ "अक्कल पाजळ"ताय याला "माहीती" असेही म्हणतात ....तळमळ असेल तर "ज्ञान" "शेअर" करा (मिळवले असेल तर)
आंतरजालीय सभ्यतेच्या संकेतांचे पालन करीत मी सदरहू विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करणे उचित समजत नाही
धन्यवाद
मात्र अस्मितेला अभिनिवेशाची
मात्र अस्मितेला अभिनिवेशाची बाधा झाली की chaos निर्माण होतो असे पातंजल योगशास्त्र सांगते. +1
स्वामिजी नमस्कार, आपल्या,
स्वामिजी नमस्कार,
आपल्या, वरील लेखनातील सर्वच विचारांशी सहमत . . . .
खरेच अमेरिकन संस्कृती ही जगातील सर्वाधिक urbanised / civilised society आहे असे आपणास वाटते ? > > > >
. . . . जोपर्यंत ह्यांचे Liberty धोरण सर्वांसाठी एकसमान ( स्वदेशीयां बरोबरच बाह्य देशीयांसाठी ही ), लागु असेल तोपर्यंत.
कारण तसे सगळेच एका समान पातळीवरुन पाहिले जातील.
राहाता राहिली प्रगती, ती तर थोड्या बहुत प्रमाणात कमी-जास्त कुठेही आढळतेच.
तसे माझ्या मते ज्या देशात बहुतेक सुख सुविधा, आजच्या भौतिक जगाच्या दृष्टीने पाहाता materialistic जीवन शैलीची प्रगती आणी पातळी आणी पुन्हा त्याच दृष्टीने पाहाता अर्थशास्त्रीय पातळी थोडीशी उच्च असली तरी Liberty चे धोरण त्यांना आणखीनच खर्या अर्थाने उच्च पातळी वर पोहोचण्यास मदत करते.