नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे " जुलै " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
जुलै महिना म्हणजे हमखास पावसाळी वातावरण..धुवांधार पाउस..ओले रस्ते..सर्वत्र हिरवळ..भिजण्याचा आनंद आणि गरमागरम कोळाश्याच्या शेगडीवर खमंग भाजलेले कणिस आणि त्यावर लिंबु चा रस... एकच छत्री आणि भिजणारे दोघे जण..बाहेर तुफान पाउस आणि त्यात तोडकी छत्रीचा आधार..
आपली शाळा ..पाठीवर दफ्तर.. हाफ पँट ...एक जोरदार उडी बाजुला साठलेल्या डबक्यात..पाय चिखलात बरबटलेका..तोंडावर मनसोक्त समाधान..वर भिजण्याचे निमित्त...शिक्षकांचा ओरडा..भिजलेल्या अवस्थेत वर्गाबाहेर उभे राहणे...
लोकल ट्रेन.. .पावसाची साथ...तुषार झेलण्यासाठी उघडलेली खिडकी.. हमखास दरवाज्याजवळ असंख्य सुयांसारखे टोचणारे तुषार घेत उभे राहणे...
१) प्रथम क्रमांक :- रंगासेठ
सुंदर फोटो. भक्ति, प्रेम, निष्ठा.सर्व काही ह्या फोटोत सामावले आहे. आयुष्याची संध्याकाळ झाली, गात्रे थकली, तरी विठूची ओढ काही कमी झालेली नाही..भक्ति व प्रेमात कुठेही खंड पडलेला नाही. थंडी, वारा, पावसाची तमा न बाळगता हा वारकरी आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटायला निघाला आहे. चेहर्यावरचे भाव फारच सुंदर टिपले आहेत.
२) द्वितीय क्रमांक :- इंद्रधनुष्यः पावसात चाललेला माणुस
हा फोटो एखाद्या छान अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग चा भास करुन देतोय. रस्त्यावर कोणीच नाहीये व हा एकटाच चाललाय. हाच फोटो जर का "Rule of thirds" वापरुन काढला असता तर आणखिन आवडला असता.
३) तृतीय क्रमांक :- R M D पावसाने टवटवीत हिरवंगार झालेलं भिजकं मन
मागच्या गडद पार्श्वभुमीवर हे हिरवंगार टवटवीत पान छान उठुन दिसते आहे... त्याच्या भोवतालची ती वेलींची साखळी व त्यावरचे थेंब त्याला आणखिनच ऊठाव आणता आहेत. त्याच्यावर पडलेला सुर्यप्रकाश व त्याची गडद पार्श्वभुमी ह्यामुळे त्याला थोडासा glow पण आला आहे.
उत्तेजनार्थ क्रमांक -
१) अतुलनिय :- नेकलेस पॉईंट
ह्या प्रचित आकाश व जमिन almost "Rule of thirds" वर छेदली गेलीय. त्या नदीच्या वळणावर नजर सारखी फिरती रहाते आहे. जर नदीचे वळण crop न करता पुर्ण आले आते तर आणखिन मजा आली असती
२) प्रसन्न : पाऊस हा ट्रेकर्स लोकांचा खास सोबती..
त्याच्या शिवाय ट्रेक ला मजाच नसते. सज्ज्ञ गडावरुन घेतलेल्या या प्रचित पावसाळी वातवरण आणि त्यामुळे वातावरणात आलेला कुंद पण जो आपण आयुष्यात कधिना कधि अनुभवतो तो छान कॅप्चर झाला आहे.
जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
चला तर करुया सुरुवात
मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :
१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी"
२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"
३) फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा"
४) फोटोग्राफी स्पर्धा.. एप्रिल.."चाहुल उन्हाळ्याची"
चला. आता पावसाचे फोटो शोधते.
चला. आता पावसाचे फोटो शोधते.
हे अवघड दिस्तय प्रकरण. भर
हे अवघड दिस्तय प्रकरण. भर पावसात क्यामेरा बाहेर काढण्याचे धाडस होत नै, त्यामुळेच तर् मागल्या महिन्यात इतकेवेळा विषय समोर दिसूनही फोटो काढता आला नव्हता पण असो.
प्रयत्न नक्कीच करणार.
हव तर प्लॅस्टिकच्या पिशवीत क्यामेरा ठेवुन फोटो काढीन पण काढिनच
हव तर प्लॅस्टिकच्या पिशवीत
हव तर प्लॅस्टिकच्या पिशवीत क्यामेरा ठेवुन फोटो काढीन पण काढिनच >>>>
लिंबुभाउ तुमच्या साठी पण एक
लिंबुभाउ तुमच्या साठी पण एक मोठ्ठी प्लॅस्टीक ची पिशवी घ्या........... नाहीतर कॅमेरा राहिल सुका तुम्ही मात्र भिजाल
मी टाकते पहिला फोटो.
मी टाकते पहिला फोटो.
लायनीत शाळेत निघालेली जपानी मुलं.
उदय, सुरुवात मी करतेय. १.
उदय, सुरुवात मी करतेय.
१.
खालच्या दोन फोटोंपैकी जो आवडेल तो घ्या.
२.
३
शोभाजी, पहिला प्रचि मस्त आहे.
शोभाजी,
पहिला प्रचि मस्त आहे.
गमभन, धन्यवाद!
गमभन, धन्यवाद!
शोभा १२४, पहिला फोटो खुपच
शोभा १२४, पहिला फोटो खुपच छान!
पाऊस पडताना खिडकीच्या जाळीवर
पाऊस पडताना खिडकीच्या जाळीवर जमलेले पावसाचे बिंदू.
अचानक जोरात पाऊस पडला. आणि पाहता पाहता त्या धबधब्याचे पांढरे पाणी चिखलमिश्रीत होऊन गेले. एका ठिकाणाहून पांढरे तर दुसरीकडून चिखलयुक्त पाणी वाहत होते.
अरे च्यायला आधी सांगायचे
अरे च्यायला आधी सांगायचे ना...माझ्या पोराचा होडी खेळतानाचा फोटो इथे टाकला असता....
एकच फोटो पुन्हा चालेल का?
पावसाळा म्हणजे...
पावसाळा म्हणजे...
पावसाळा म्हणजे... १. इरलं
पावसाळा म्हणजे...
१. इरलं घेऊन भर पावसात घरी परतणारे खेड्यातले काहीजण
२. पावसाने टवटवीत हिरवंगार झालेलं भिजकं मन
वा! विषय आवडला
वा! विषय आवडला
(No subject)
>>> माझ्या पोराचा होडी
>>> माझ्या पोराचा होडी खेळतानाचा फोटो इथे टाकला असता.... <<< अरे हां यार. पण अजुन बिघडत नाही. नविन होडी करुन दे पोराला, पाऊस तर काय आहेच की!
(अस सान्गु नकोस की आता पोर होडी होडी खेळण्याच्या वयाचे नाही, तस तर तू देखिल अजुनही होडी होडी खेळू शकतोस हा.का.ना.का. )
बाहेर मस्त पाऊस कोसळतोय..
बाहेर मस्त पाऊस कोसळतोय.. गाडी समोरील रस्ता धुक्यात कुढतरी गुडुप झालाय.. हातात कॅमेरा असला तरी बाहेर जाऊन क्लिक करणं अशक्य आहे.. आणि तो बघा.. आपल्याच नादात एकतारी चालला आहे.. मस्त पाऊस अनुभवत.
rmd / इंद्रा, फोटो मस्त आहेत
rmd / इंद्रा, फोटो मस्त आहेत आणि विषय पण एकदम मस्त. भरपूर सुंदर फोटो येतील इथे.
उदयन यांच्या परवानगीने ३ फोटो
उदयन यांच्या परवानगीने ३ फोटो टाकत आहे.
१. मुळशी जवळ पावसात बैल जोडी नांगरत आहे.
२. भर पावसात शेतीची मशागत चालु आहे
३. भोरच्या रस्त्यावर असणारा सुंदर "नेकलेस पॉईंट"
व्वा! मस्त!
व्वा! मस्त!
अतुल, छान फ़ोटो. माझ्याही
अतुल, छान फ़ोटो.
माझ्याही पहिले दोन मनात होते. पण माझ्याकडे नव्हते.
नभ उतरु आलं ........
नभ उतरु आलं ........
तुमचे फोटो पाहुन इतरांच्या
तुमचे फोटो पाहुन इतरांच्या आठवणींना उजाळा मिळेल असे फोटो अपेक्षित आहेत.
१. २.
१.
२.
व्वा! मस्त आहेत प्रचि
व्वा! मस्त आहेत प्रचि
पावसाला झाली सुरुवात
पावसाला झाली सुरुवात ......चला द्या फोटो लवकर
भरून आलेलं आभाळ नेहमीच तुझी
भरून आलेलं आभाळ नेहमीच तुझी आठवण करून देतं
कारण , तुझी आठवण आली की मलाही असचं भरून येतं **
** ही चारोळी फार वर्शापूर्वी माबो वरचं वाचली होती . कोणत्या माबोकराची आहे आठवत नाही
पण तेन्व्हापासून कायम मनात घर करून आहे.
कधीही आभाळ बघितल की खरचं भरून येतं.
पहिल्यांदा टाकतेय फोटो बघु
पहिल्यांदा टाकतेय फोटो बघु जमतय का...???
मस्त आहे हा धागा.
मस्त आहे हा धागा.
माझ्याकडूनही हा एक खारीचा
माझ्याकडूनही हा एक खारीचा वाटा
अन मायबोलीकर कार्यकर्त्यान्ची कामाप्रती असलेली निष्ठा भर पावसातही कशी दृगोच्चर होते ते देखिल पहा.
Pages