निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा१२४, सांबार काकडीसाठी दुसरा शब्द माझ्या माहितीप्रमाणे दोसकाया आहे. मी ह्याचे लोणचे घालते, मस्त होते. आमटीत थोड्या फोडी टाकल्या तर लिम्बुरसाची गरज भागते.

अमी

जागू, कसली फ़ुलं आहेत. मस्त दिसतायत. Happy
स्निग्धा, आर्या खूपच छान दिसतेय. किती मोठी झाली ग? तुलशी वृंदावनात, तुळशीच्या ऐवजी प्राजक्त/अबोली/गुलबक्षी लावलेय? Happy

अगं माती सकट तुळस डोक्यावर घ्यायला झेपली नसती आणि त्या वृंदावनात भरलेल्या पेपर मध्ये तुळस खोचुन मला तुळस वाया घालवायची नव्हती म्हणुन त्यात कुंदाच्या काड्या खोचल्यात Lol

गोड आहे लेक.. आणि चेहर्‍यावरचे भाव तर असे आहेत कि मला वृंदावनात काय आहे त्याकडे बघायची गरजही वाटली नाही.

स्निग्धा आर्या खुप क्युट आहे. तुळशी वृंदावन पण छान बनवलय.
त्या फुलाचे नाव मला माहीत नाही. गुगलायला लागेल.

अगं कस्ली गोडुली दिसतेय आर्या......... आणि आपण भेटलो होतो तेव्हा लहान होती. परकर पोलक्यात आणि बो घातल्यामुळे थोडी मोठी वाटतेय का गं? (ही मुलं छोटीच राहावीत असं वाटतं नाही?)

विशेष काही नाही वृंदाच्या ऐवजी कुंदा आहे >>>>>>>> व्वा! लेक गोडच आहे गं तुझी स्निग्धा.
बाप रे धागा धावतोय..........सगळं वाचतेय हळूहळू.
(ही मुलं छोटीच राहावीत असं वाटतं नाही?)>>>>>>>> हो गं शांकली!
हे फूल/झाड कशाचं? गच्चीतल्या रिकाम्या कुंडीत आपोआप आलं. अगदी स्ट्रेट उभा स्टेम आणि बरोब्बर चारी दिशांना आमोरासमोर येणारी सिमेट्रिकल पानं.

आणि हे ओळखा पाहू.........

मानुषी, ते रानतीळाचे झाड आहे. बिया धरण्यापुर्वीच काढून टाकले पाहिजे नाहीतर सगळीकडे रान माजेल.

ते पिवळे पिकलेले कारले आहे Happy

ओह ...रानतीळ का? म्हणजे काळे तीळ का? हममम......बरोबर आहे. एकदा आम्ही घरी होमहवन केलं होतं त्याला काळे तीळ वापरले. तर त्या होमकुंडातलं नंतर या कुंडीत टाकलं होतं. सगळे तीळ जळलेच असणार. एखाद दुसरा न जळलेला.......त्याचं रोप आलं. धन्यवाद दिनेशदा. काढून टाकते.
हो कारलं सगळेच ओळखणार माहिती होतं.

दिनेश दा ला १००% मार्कं ना नेहमीप्रमाणे??????????
मला तर दुसर्‍यावेळी वेगळ्याच अँगल ने सेम तीळ ,कार्ली चे काढलेले फोटो दाखवून हे काय आहे वगैरे विचारून त्रास देऊ नये( हुकुमावरून!! )
Proud

आयेम हॅप्पी... काउंट डाऊन शुरु!!!!!!!!!

Mala pan donhi uttare yet hoti maushi. Tyach karlyachya biya aata punha rujsv.

सुप्रभात Happy

IMG_0477.JPG

सगळे प्रचि मस्त!

कार्ल्याचा असा फोटो पाहिला नव्हता कधी....

@ दिनेशदा,

पुण्याच्या गटग चे काय ठरले ते कळवा मला पण.

शांकली ट्राय करीनच गटगला यायचा.
वर्षू .......:फिदी:..........
गेट सेट गो.................वर्षू!
सुप्र लाजोजी.....ट्युलिप्स मस्त. हं...........सध्या असलं काही नवीन नवीन मलाही पहायला मिळतंय,
कुत्र्याच्या छत्र्या...........
आणि म्यां पामर काय दिनेशदांना मार्क देणार? :स्मितः
या कुत्र्याच्या छत्र्या(म्हणजे लुईच्या नव्हेत(:फिदी:) भूछत्र. सेलफोनातले फोटो(:अओ:)

(ही मुलं छोटीच राहावीत असं वाटतं नाही?)>>>> खरचं वाटत, मला तर वर्षाच्या आत होती तेवढीच रहावी अस वाटत होत.

Pages