जगह मिलनेपर साईड दि जाएगी !
भरपुर माल भरलेला भलामोठ्ठा ट्रक, रस्ता चढणीचा आणि अरुंद. मागुन येणार किरकोळ वहान पॅ पॅ हॉर्न वाजवत हा ट्रक कधी बाजुला होतो आणि याला ओलांडुन कधी पुढे जातो याच्या प्रतिक्शेत असत. ट्रक वाल्याला त्याच देण घेण नसत. ट्रक जरी पंजाब्याचा असला तरी मागे लिहलेली वाक्य पुणेरी असतात. " जगह मिलने पर साईड दि जाएगी". या वाक्यात असहायता तर असतेच. कारण अरुंद रस्त्यावर भरलेला ट्रक बाजुला घेऊन मागच्याला वाट देण्यात शहाणपण असतेच असे नाही. अनेक ठिकाणी गाडी साईडला घ्यायला दिलेला कच्चा रस्ता जर खचला तर भरलेला ट्रक कलंडायला वेळ लागत नाही. म्हणुन " जगह मिलने पर साईड दि जाएगी " हे वाक्य मला उद्दाम न वाटता असहायता दर्शक वाटत. ट्रक वाल्याच्या पेशाला आणि वृत्तीला साजेस अस वाक्य आहे. ट्रक वाला कुणाची हाजी हाजी करताना दिसत नाही. कायद्याचा रक्शक असलेला पोलीस त्याने बाहेर काढलेल्या नोटेला पकडायला मागे पळताना मी पाहिलाय.
रस्त्यावर कॅडी आईस्क्रीम विकणार्या गाडीवर जेव्हा अश्या आशयाचा बोर्ड जेव्हा मी पहातो तेव्हा मात्र कमालीच आश्चर्य वाटत. ट्रकच्या धंद्यात फ़ारसे लोक जात नाहीत. त्यामुळे त्यांना गिर्हाईक शोधत फ़िराव लागत नाही. पण रस्त्यावर आईस्क्रीम विकणार्या विक्रेत्याने जेव्हा " शादी या पार्टीयोंकी ऑर्डर ली जाएगी" असा बोर्ड लावलेला दिसतो तेव्हा मात्र ही मग्रूरी असल्याचा भास मला होतो. " शादी या पार्टी का ऑर्डर पाने मे हमे खुषी होगी" किंवा तत्सम आईसक्रिम मधल्या क्रिम शब्दाला साजेस मधाळ वाक्य तिथे असाव जेणे करुन ऑर्डर देणार्याला रविवारी रात्री १०० आईसक्रीम देणार का ? हे विचारायचे धाडस व्हावे.
हा सगळा घोळ त्या लेटरपेंटरचा असावा असे वाटते. जाहिराती तयार करताना कोणते शब्द ग्राहकाच्या मनाला पटतील याचा विचार करणार्या शब्दप्रभुंची इथे वानवा असते. ट्रकच्या मागे शायरी लिहणारा तोच आणि शर्मा कुल्फ़ी किंवा मेवाड कुल्फ़ी इतके शब्द लिहुन झाल्यावर आणखी काही शब्द लिहुन आपल बील वाढवण्याची ट्रीक असणार्या लेटर पेंटरचे हे शब्द कौशल्य.
ज्यांचा व्यवसाय वस्तुची विक्री नसुन सेवा आहे अश्या बॅंका जेव्हा कस्टमर केअर ची वेळ ठरवुन ग्राहकांनी सकाळी ९ ते सायंकाळी ६ याच वेळात प्रश्न विचारावेत. त्यातही शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी सुट्टी या पध्दतीच्या वेळा ठरवुन काम करतात तेव्हा हे उद्दामपण पेक्शाही आणखी काही आहे हे जाणवल्या शिवाय रहात नाही. झाल अस की मी पुण्यातल्या लक्ष्मीरोडला गेलॊ. एक वस्तु घ्यायची आहे अस ठरवुन गेलेलॊ नव्हतो पण खिशात डेबीट कार्ड होत. वस्तु किंमती होती पण विक्रेता हा डेबीट कार्ड स्विकारणारा नव्हता. मग पर्याय एकच होता की डेबीट कार्ड वापरुन रोख रक्कम काढायची आणि या विक्रेत्याला द्यायची. जवळच असलेल्या तीन वेगळ्या बॅंकांच्या एटीएम मध्ये या बॅंकेचे डेबीट कार्ड चालवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी त्या ठिकाणी आपल्या कार्डवाल्या बॅंकेचे व या बॅंकेचे व्यावसाईक देणे घेणे नसल्याचा निरोप मिळाला. नाईलाजाने जेव्हा कस्टमर केअरला फ़ोन केला तेव्हा त्यांनीही शनिवारचा अर्धा दिवस संपल्याने तुमची ( केअर ) नसल्याचा निरोप दिला. विचारायच इतकच होत की लक्ष्मी रोडच्या आजुबाजुला आपले एटीएम आहे का ? पण इतकी सेवा सुध्दा मिळण्याचे भाग्य या भारतातल्या मोठ्या, भारतात सर्वप्रथम एटीएम सुरु करणार्या बॅंकेने ग्राहकांना देऊ नये ?
एका नोकरीत असताना आमच्या मॅनेजींग डायरेक्टर ने दोन पत्रे दाखवली. एक पत्र एका भारतीय कंपनीने लिहलेले होते ज्यात एका वस्तुच्या चौकशीबाबत आभार मानुन विचारलेल्या किंमतीचे विवरण दिलेले होते. पत्रातली भाषा इतकी सौजन्यपुर्ण होती की याच कंपनीला ऑर्डर देण्याचा मोह पडावा. दुसरे पत्र त्याच वस्तुच्या कोरीयन विक्रेत्या - उत्पादक कंपनीचे होते. पत्राची भाषा केवळ विचारलेल्या प्रश्नाची मोजक्या शब्दात उत्तर द्यावे अशी होती पण वस्तुचा भाव मात्र भारतात घरपोच असुन भारतीय वस्तुच्या अर्ध्याहुन कमी होता. त्या कोरीयन कंपनीने फ़ारसा भाव शब्दात दिला नव्हता तरी वस्तुचा भाव कमी असल्यामुळे आम्हाला त्यांनाच ऑर्डर देणे भाग पडले.
ग्राहकाचा संतोष हाच आमचा सौदा. ग्राहक देवो भव इ पाट्या जश्या वस्तुचे किंवा सेवेचे भाव जर योग्य नसतील तर कुचकामी आहेत वस्तुची किंमत किंवा सेवा योग्य असुनही जर सौजन्य नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे हे समजण्याची योग्यता जर नसेल तर ते व्यवसाय व्यर्थ आहेत.
तुमचं म्हणनं पटतं. पण, कसंय
तुमचं म्हणनं पटतं. पण, कसंय बघा... व्यवहार, पाट्या, आणि सौजन्य यांचा काही परस्पर संबंध आहे, असे काही वाटत नाही. पण, तसा तो शोधायचा तुम्ही प्रयत्न केला, ते आवडले.
-दिलीप बिरुटे
(No subject)
आइस्क्रीमवाल्याच्या पाटीबद्दल
आइस्क्रीमवाल्याच्या पाटीबद्दल नाही पटले. घाउक ऑर्डर्स ही घेतो असा साधा अर्थ आहे.
एटीएमची गोष्ट कधीची आहे? आता कोणत्याही एटीएममध्ये कोणत्याही बँकेचे कार्ड चालते.
२४ X 7 कॉल सेंटरची संकल्पना कधी आली?
भरतजी, आजही एच.डी.एफ.सी.
भरतजी,
आजही एच.डी.एफ.सी. बँकेत अकाउंट उघडा आणि डेबीट कार्डचा अनुभव घ्या. ६ वर्षांपुर्वी तर बँक ऑफ महाराष्ट्र मधे मला चेक बुक अकाउंट उघडल्यानंतर सहा महिन्यांनी मिळेल असा नियम सांगण्यात आला होता.
२४ X 7 कॉल सेंटरची कल्पना आजही अस्तित्वात आहे. एच डी एफ सी किंवा अन्य बँका त्याला राजी नाहीत.
जनता सहकारी बँकेने सेवेच्या नवीन कल्पना सुरु केल्या आहेत त्या स्वागतार्ह आहेत.
१) बँकेच्या सुट्टीच्या दिवशी पास बुक प्रिंटिंग होते. ( कोणाच्याही मदती शिवाय )
२) बँकेच्या सुट्टीच्या दिवशी खात्यात पैसे जमा होतात आणि रिसीटही मिळते.
अजुनही सेवा आहेत.
आजही एच.डी.एफ.सी. बँकेत
आजही एच.डी.एफ.सी. बँकेत अकाउंट उघडा आणि डेबीट कार्डचा अनुभव घ्या >> माझ्याकडं आहे HDFC चं डेबीट कार्ड आणि मी व्हिसा, मास्टरकार्ड स्वीकारणार्या कुठल्याही एटीएम मधून पैसे काढू शकतो.
>>>पण इतकी सेवा सुध्दा
>>>पण इतकी सेवा सुध्दा मिळण्याचे भाग्य या भारतातल्या मोठ्या, भारतात सर्वप्रथम एटीएम सुरु करणार्या बॅंकेने ग्राहकांना देऊ नये ?
>>>
या अश्या सुविधा द्यायला पैसा लागतो. कुठलाहि धंदा पैसे खर्च करण्यापूर्वी त्याचा उपयोग काय व किती याचा विचार करतो. भारतात गिर्हाईक जास्त, पुरवठा कमी. काय करणार आहात तुम्ही? दुसर्या कुठे तुम्हाला आणिक काय वेगळे मिळणार आहे? कुठे असे दिसले की गिर्हाईक सुविधांना जास्त महत्व दिले नाही तर आपल्याबरोबर व्यवसाय करणार नाहीत, तर सुविधा देण्याचा विचार होईल.
ती वस्तू कोरियातून घ्यायची की भारतातून याबद्दल. पुनः धंदा - किंमतीपेक्षा वस्तूच्या दर्जाला महत्व. त्यानंतर किंमत नंतर सौजन्य वगैरे. शिवाय त्या कोरीयन कंपनीने काही उद्धट, अपमानकारक शब्द वापरले होते का? आशा आहे की तुम्ही दर्जाचा विचार प्रथम केला असेल. कारण कुठलाहि धंदा केवळ किंमत कमी करून, भाव कमी करून जास्त फायदेशीर होत नाही. कुणि १९५० सालच्या भावात चहा विकतो म्हंटले, (१ आण्याला, (६ पैशाला) कप) नि चहा ऐवजी गटारातले पाणी दिले, स्वस्त म्हणून, तर टपरी सुद्धा बंद पडेल. नाहीतर चहाच्या टपरीवाले मोठ्या हॉटेल मालकांपेक्षा जास्त श्रीमंत झाले असते.
दर्जाला पहिले महत्व, किंमतीला नंतर या कारणानेच आज अमेरिकेत भारतीय लोकांचे प्रमाण वाढले आहे, कारण त्यांचा दर्जा आहे. शिवाय किंमत कमी. (बाकी त्यांच्या इथल्या वागण्याबद्दल काय लिहावे? तो वैताग अमेरिकन झाल्याशिवाय कळणार नाही)
काही अश्या नोकर्या आहेत जिथे जास्त पैसे देऊनसुद्धा अमेरिकन लोकांनाच नोकरी मिळते, कारण केवळ किंमत कमी करून दर्जा साधणार नाही. त्यामुळेच सुदैवाने अजून आमच्या मुलांना बर्यापैकी नोकर्या आहेत.