निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.
आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
गौरी,अतिशय सुर्रेख शुभ्र रंग
गौरी,अतिशय सुर्रेख शुभ्र रंग आहे फुलाचा
खोटी ब्रह्मकमळंही मस्त दिसत
खोटी ब्रह्मकमळंही मस्त दिसत आहेत. एकदम पांढरी शुभ्र!
खर्या ब्रह्मकमळाचा फोटो कोणी टाकेल काय? नेटवर आहे का उपलब्ध? बघायची भारीच उत्सुकता लागली आहे.
खर्या ब्रह्मकमळाचा फोटो कोणी
खर्या ब्रह्मकमळाचा फोटो कोणी टाकेल काय?...खरय! निवडुंगकमळं इतकी सुरेख दिसतात तर ब्रह्मकमळं कशी दिसत असतील याची उत्सुकता वाटते आहे.
मामी, खरं ब्रह्मकमळ हिमालयात
मामी, खरं ब्रह्मकमळ हिमालयात व्हॅली ऑफ फ्लॉवर्सजवळ हेमकुंडला बघितलंय. (सद्ध्या पावसाने - पूराने थैमान घातलेलं हेच हेमकुंड.)
http://www.agrowon.com/Agrowon/20100822/4718615094676357940.htm
इथे आहे त्याची माहिती. पण माझ्या मते आपलं खोटं ब्रह्मकमळच जास्त सुंदर आहे!
तत्परतेनं लिंक दिल्याबद्दल
तत्परतेनं लिंक दिल्याबद्दल धन्यवाद गौरी. तो लेख छान आहे. खरंय खोटं अधिक छान दिसतंय.
माझ्याकडे पण एक एपिफायलम च
माझ्याकडे पण एक एपिफायलम च फुल फुलल..
पण माझ चुकलच्..सासुबाईंना पुजा करायची होती म्हणुन त्याला अलगद आत घेतल..झाडाला..उगीचच वाटत राहिल की पुर्ण नाही फुलल म्हणुन्..किती गैरसमज आणि वेड असत ना लोकाना..माझ्या एका ओळखिच्या काकुंनी आरती वगैरे पण केली..
मी सासुबाईंना खरा फोटो पण दाखवला...पण तरिही पुजा केलीच
https://plus.google.com/photo
https://plus.google.com/photos/113133478661717869793/albums/583733270172...
खरं ब्रह्मकम्ळ मला हळदीच्या
खरं ब्रह्मकम्ळ मला हळदीच्या फुलासारखं थोडंफार वाटतं.. अर्थत फरक आहेच पण तरीही.... कदाचित प्रत्यक्ष जेव्हा पाहिन तेव्हा ते जास्त सुंदर दिसेल.
मीही एकदा पुजा केलीय, आरती ओवाळलीय या फुलाला.. एका ओळखीच्यांकडे फुलणार होते, तर त्यांनी संध्याकाळपासुनच आम्हाला घरी बोलावले, मग १२ वाजता पुजा, आरती, प्रसाद इ.इ. हे निवडूंग आहे हे सांगायचा मी क्षीण प्रयत्न केला पण माझ्या हातात आरतीचे ताट दिले गेले.. मग काय करणार....
(गंमत म्हणजे ह्याच बाईंनी माझ्या घरातले चायनीज गुलाब पाहुन हे घरात ठेवलेले चांगले नसते हे सांगितलेले आणि घरच्यानी लगेच माझ्या चा.गु. ला बाहेरचा रस्ता दाखवलेला.. नंतर त्यांच्या घरात निवडूंगाची पुजा बघुन माझे डोकेच फिरलेले.. पण काय करणार. घरी आल्यावर निवडूंगही घरात ठेवू नये असे काही श्रद्धाळू मानतात असे सांगुन घरच्यांचे बौद्धिक घेतले, अजुन काय....)
अर्रे! काल माझ्याकडे पण
अर्रे! काल माझ्याकडे पण (खोटं!) ब्रम्हकमळ फुललं. दोन कळ्यापण लागल्या आहेत.
राम राम मंडळी.
राम राम मंडळी.
मी वर टाकलेली लिंक दिसतेय की
मी वर टाकलेली लिंक दिसतेय की फोटो?
मीही एकदा पुजा केलीय, आरती
मीही एकदा पुजा केलीय, आरती ओवाळलीय या फुलाला.. एका ओळखीच्यांकडे फुलणार होते, तर त्यांनी संध्याकाळपासुनच आम्हाला घरी बोलावले, मग १२ वाजता पुजा, आरती, प्रसाद इ.इ. हे निवडूंग आहे हे सांगायचा मी क्षीण प्रयत्न केला पण माझ्या हातात आरतीचे ताट दिले गेले.. मग काय करणार.... >>>>> सह्हीये... भाग्य एकेका फुलाचे, वनस्पतीचे ....
अरे ह्या पफुलाच भाग्य खरच थोर
अरे ह्या पफुलाच भाग्य खरच थोर आहे..आणि हल्ली कशाल न कशाला घाबरणार्या माणसांना सगळ्यात देव दिसतो
मला सांगा न फोटो की लिंक
मला सांगा न फोटो की लिंक दिसतेय?
मस्तच फोटो सगळे... महाबळेश्वर
मस्तच फोटो सगळे...
महाबळेश्वर ला हॉटेल च्याच मागच्या रस्त्यावर ही फुललेली फुले दिसली. ही फुले म्हणजे लॅम्पच वाटत होते, सगळी फुले जमिनिच्या दिशेने झुकलेली होती.
वैशाली, फोटो दिसत नाहीयेत गं.
वैशाली, फोटो दिसत नाहीयेत गं.
महाबळेश्वर ला हॉटेल च्याच
महाबळेश्वर ला हॉटेल च्याच मागच्या रस्त्यावर ही फुललेली फुले दिसली. ही फुले म्हणजे लॅम्पच वाटत होते, सगळी फुले जमिनिच्या दिशेने झुकलेली होती. >>>>>
ती फुले ही असावीत बहुतेक -
Common name: Tree Datura, angel's trumpet, Peruvian trumpets • Marathi: तुतारी tutari
Botanical name: Brugmansia arborea Family: Solanaceae (Potato family)
सामी मस्त आहेत फ़ुले. वैशाली
सामी मस्त आहेत फ़ुले.
वैशाली लिंक ही ओपन होत नाही. आणि त्यामुळे फ़ोटो दिसत नाहीत.
मी मागे इथे एका फ़ळाचा फोटो
मी मागे इथे एका फ़ळाचा फोटो दिला होता. तो हा.
आणि दिनेशदांच्या सांगण्यावरून मी काल ते कापले. (कित्ती लवकर ना? ) ते असे दिसतेय. आतून साधारण टरबूजासारखे. चव किंचीत आंबट आणि वेगळीच आहे. आता सांगा हे फ़ळ कसले आणि उपयोग काय?
याचं सरबत होऊ शकेल असं
याचं सरबत होऊ शकेल असं वाटतंय. गुळासोबत ट्राय केलं का खाऊन? कदाचित चांगलं लागेल...
गुळासोबत ट्राय केलं का खाऊन?
गुळासोबत ट्राय केलं का खाऊन? कदाचित चांगलं लागेल..>>>>>>>>>>>काल नुसत खाऊन बघीतल. पण चव काही खास नाही.
हे कृष्णकमळ नाही आणि
हे कृष्णकमळ नाही आणि ब्रह्मकमळही नाही. हे आहे निवडुंगाचं फूल....>>>
शांकलीजी,
धन्यवाद !
कानांवर आलं ब्रह्मकमळ आणि मी टाईपल कृष्णकमळ..आता चुक लक्षात आली.
हा प्रतिसाद चुकीच्या धाग्यावर (कोलेस्टेरॉल वाल्या) टाईप झालाय. इथे हवा होता बहुतेक>>
इब्लिस,
दिनेशदांच्या मेलला मराठीतुन उत्तर देण्यासाठी..मराठी टाईपण्यासाठी म्हणुन त्या पानावर गेलो आणि ते टाईपलेलं चुकुन तिकडे सेव झालं असेल..(चुकुन सेव्ह झालेलं काढून टाकलं आहे)
निवडुंगाची फुले.... फारच
निवडुंगाची फुले.... फारच सुंदर!!!
गुळासोबत ट्राय केलं का खाऊन? कदाचित चांगलं लागेल... >>>> खरचं, टरबूज / चिबूड सुद्धा गूळ-मीठ घालून छान लागतात.
तरी मी म्हणत होतो त्या
तरी मी म्हणत होतो त्या 'निवडुंगाच्या' फुलांचा सुगंध थोडादेखील कसा आला नाही....
खरचं, टरबूज / चिबूड सुद्धा
खरचं, टरबूज / चिबूड सुद्धा गूळ-मीठ घालून छान लागतात.>>>>>>>>>>>>मला पण काल ते फ़ळ कापल्यावर चिबुडासारखच वाटल. (कारण हल्ली मला चिबुडाची खूपच आठवण येतेय.:अओ:) पण चव तशी नाहीच.
आज संध्याकाळी साखर किंवा गुळ घालून बघते कसं लागतय ते.
शोभा, खोदा पहाड और निकला
शोभा, खोदा पहाड और निकला चूहा असे झालेय. ती बहुतेक सांबार काकडी आहे !
ती बहुतेक सांबार काकडी आहे
ती बहुतेक सांबार काकडी आहे !>>>>>>>>>>म्हणजे? मी प्रथमच ऐकतेय. ती कशात घालतात का?
शोभा, खोदा पहाड और निकला चूहा
शोभा, खोदा पहाड और निकला चूहा असे झालेय. ती बहुतेक सांबार काकडी आहे !
काकडी मधलाच दुसरा एक प्रकार कि वेगळा असतो ? ते खुप मोठे आणि लांब देखील, आकाराने दुधी सारखे असतात, कापल्यावर असेच दिसतात, खायला गोडसर,छान लागतात.
आभारी आहे शशांक.
आभारी आहे शशांक.
नाही सांबार काकडी नाहीय, ती
नाही सांबार काकडी नाहीय, ती गोल नसते. हे फळ बाजारात मीही पाहिलंय, खरबुजाच्या जातीतलेच आहे. मी त्याला चायनीज समजते आणि तिकडे ढुंकुनही पाहात नाही.
Pages