लेकीचा नविन उद्योग. बाबाच्या मोबाईलमधे फोटोमुव्ही मेकर आहे याचा शोध तिला लागल्या बरोबर तिने केलेला त्याचा वापर
https://www.facebook.com/photo.php?v=605514456146412&set=vb.100000635908...
(
व्हिडियो कसा अपलोड करायचा ते माहित नाही म्हणून ही लिंक देतेय )
हा प्रकार भयानक आवडल्याने आम्ही सरळ मुव्ही बनवायची फायनल केल. आता आम्ही पडलो क्रियेटिव्ह न टॅलेन्टेड डायरेक्टर सो सगळी कॅरेक्टर्स आम्हीच बनवली... आपल निवडली
तर स्टोरी साधारण अशी..... एक असते मुलगी हं
आता हिरविन म्हटल्यावर हेयरस्टाईलची काळजीपण घ्यायला लागते भाऊ....
साईझ झिरोचा जमाना हय
भरपूर फूटेज खावून हिरविनीचा फस्ट लूक झाल्यावर पुढची ईस्टोरी ... तिची आई तिला सांगते की आज्जी कडे जाऊन ही फ्रुट बास्केट देऊन ये..
ही आई
आणि आज्जीच्या भुमिकेत आहेत....
फ्रेन्डला बाय बाय केल्याबिगर आम्ही कुठ बी जात न्हाय म्हणून ही फ्रेन्ड
अरे हो .... सांगायचच राहून गेल की ही एकदम वरिजन इस्टोरी असल्यामुळे आज्जीच घर जंगलाच्या पलिकडे आहे.. तर आपली हिरविन निघाली रमत गमत जंगलातून
नाऊ अॅक्शन टाईम.... अचानक तिच्या समोर येतो जायंट डॉगी न म्हणतो ," आता मी तुला .. ( खावून टाकणार... वाटल ना पण असं नाही आहे कारण वर म्हटल्या प्रमाणे आम्ही व्हेरी क्रियेटिव्ह न टॅलेन्टेड डायरेक्टर आहोत म्हटल ) जायला नाही देणार ..... हा हा हा आपल भ्वॉ भ्वॉ भ्वॉ "
मंग हिरविन आपली अक्कल हुशारी वापरुन बरं का .... त्याच्या समोर सुपर कलरफूल चेंडू टाकते... न तो बसतो खेळत नी ही जाते पळत
पुढे तिच्या समोर येतो जायंट बनी. तो तिला म्हणतो ," मी तुला खावून टाकणार.... हा हा हा " ( इथे खावून टाकणारच आहे बर का.... कारण वर लिहीलेलच आहे की आता परत सांगू म्हणताय...)
मग ही बया भूकेल्या बनी पुढे गाजर टाकते न घेते आपली सुटका करुन
(इथे नेमकी, आहे तितक्याच चिकन मातीत काम चालवावे लागेल अशी धमकी प्रोड्युसर कडून मिळाल्या कारणाने आमचा बनी मल्टी कलरमधे आहे... आपल्या टॅलेन्टवर संशय घ्यायच काम न्हाय )
हिरविन पोचते आज्जीकडे न सगळीकडे आनंदी आनंद गडे
तर असा हा आमचा पिक्चर आधी घरांच्या प्रश्नात अडकला (हिरविनीच आणि आज्जीच हो) ... लेगो ब्लॉक्सने प्रश्न सोडवल्यावर बॅग्राऊंडला काय बर पेंट कराव ? ह्यात सापडलाय गेला दिड महिना.... हा प्रश्न सुटायची काही चिन्ह दिसत नाही आहेत म्हणून निदान माबोवर फोटो तरी टाकावेत म्हणून हा प्रपंच
बाकी जर कधी प्रश्न सुटलाच तर पिक्चरच फस्ट स्क्रिनिंग माबोवरच.... हे पक्क प्रॉमीस
तस आमच दि एंड साठी "रोज" पण तय्यार आहे
कॅरेक्टर्स आणि इस्टोरी एकदम
कॅरेक्टर्स आणि इस्टोरी एकदम मस्त
शाबास मस्त मस्त मला आईचा
शाबास
मस्त मस्त
मला आईचा फ़्रोक आणि गुलाबाचे फुल आवडले
सहीये..
सहीये..
लई भारी वाट्तेय ष्टोरी..
लई भारी वाट्तेय ष्टोरी.. हिरवीण बी झ्याक हाय..
हापिसात लिंक बघता येणार नाही.. सांच्यापारी बाकी बगु
काय अप्रतिम पात्र केली आहेत!
काय अप्रतिम पात्र केली आहेत! लेक सुपर टॅलेन्टेड आहे तुमची!! लिहिलेय मस्त एकदम
सांच्यापारी - संध्याकाळी चहा
सांच्यापारी - संध्याकाळी चहा आणि सांजा घेत घेत असं म्हणायचंय का ?
सही
सही
सहीये. लिहिलंय पण एकदम
सहीये. लिहिलंय पण एकदम मस्त....
लेकीची कल्पनाशक्ती सॉलीड आहे. असाच अजून वाव देत रहा तिला.
वॉव, सगळी कॅरेक्टर्स मस्तच
वॉव, सगळी कॅरेक्टर्स मस्तच केली आहेत. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं दिसतंय. बनी, भुभू आणि त्याचा चेंडूही क्युट आहेत. अनन्याला मोठ्ठी शाब्बासकी!
साईज झिरो .....
भारीये सगळे कॅरेक्टर्स !!!
भारीये सगळे कॅरेक्टर्स !!! खुप मोठी शाबासकी !!! बाकी साईज झिरो पटली फार
वॉव ऑसम सुपर्ब भन्नाट जबरदस्त
वॉव ऑसम सुपर्ब भन्नाट जबरदस्त सहिच असं खुप काही म्हणावेसे वाटत आहे
क्यूट
क्यूट
किती छान! खुपच आवडले. पूर्ण
किती छान!
खुपच आवडले.
पूर्ण झाल्यावर नक्की टाका.
सुपर्ब. अनन्याला शाब्बासकी.
सुपर्ब. अनन्याला शाब्बासकी.
सहीये
सहीये
फारच मस्त बनवलेत सगळी
फारच मस्त बनवलेत सगळी पात्रे.लिहीलंय पण छान!
व्वॉव!!!
खूप खूप धन्यवाद लिखानाच
खूप खूप धन्यवाद
लिखानाच कौतुक केल्यामुळे मुठभर मास माझ्यावर पण चढल ( आधीच एक्सेस आहे )
व्वॉव! मस्त्च. अनन्याला
व्वॉव! मस्त्च.
अनन्याला शाब्बासकी.
वॉव सहीच. एक झलकही मस्त होती.
वॉव सहीच. एक झलकही मस्त होती. पुर्ण पिक्चर तर भारीच असणारे. लवकर बघायचाय. शाब्बास अनन्या
विनार्च, तू लिहिलयसही मस्त.
विनार्च, तू लिहिलयसही मस्त. एकदम खुसखुशीत
झकास..
झकास..
मस्त!
मस्त!
भारीच्चे ! मस्त लिहिलय.
भारीच्चे ! मस्त लिहिलय. लेकीला खुप मोठी शाबासकी
खुप क्रीएटीव्ह आहे लेक. खुप
खुप क्रीएटीव्ह आहे लेक. खुप ओरिजिनल स्क्रीप्ट आहे आणि बाहुल्या तर मस्तच आहेत.
शाब्बास अनन्या!
शाब्बास अनन्या!
खूप खूप आभार.... इथल कौतुक
खूप खूप आभार....
इथल कौतुक पाहून मुव्ही पूर्ण करायची मनावर घेतलय, बघूया कधी होते रिलीज ते
झाली का मुव्ही पूर्ण?
झाली का मुव्ही पूर्ण?
खुपच सही,...
खुपच सही,...