निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.
आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
दुर्गाबाईनी घाणेरीचं ' चुनडी'
दुर्गाबाईनी घाणेरीचं ' चुनडी' असं गुजराती नाव ऋतुचक्रात सांगितलं आहे..
दिनेशदा, १४ तारखेला
दिनेशदा,
१४ तारखेला भटक्यांचा सह्यमेळावा आहे.
http://www.maayboli.com/node/43811
थांकु थांकु... वाई ला
थांकु थांकु... वाई ला मैत्रीणी च्या बागेत फुलली होती ही शेवंती..
शोभे..काश मेरी होती ये शेती!!!
जिप्स्या.. तू फक्त दिनेश दा
जिप्स्या.. तू फक्त दिनेश दा शी बोलतोयेस?? बाकीच्यांशी कट्टी????
अगं, दिनेशशी तो गटग संदर्भात
अगं, दिनेशशी तो गटग संदर्भात बोलतोय..
आणि इतरांशी कुठल्याही संदर्भात बोलला तरी शेवटी त्याचा संदर्भ 'ती' थेच जोडला जातो
बिझी आहेत का सगळे ? मग मी
बिझी आहेत का सगळे ? मग मी फक्त पुण्याचाच कार्यक्रम ठरवतो. तिथून रात्री कोल्हापूरला आणि मग माझ्या आजोळी जाईन. ( १२ जुलै, शुक्रवारी संध्याकाळी.. बाकी डीटेल्स ठरवा, आणि कळवा )
अहो मी एका कंफर्मेशनसाठी
अहो मी एका कंफर्मेशनसाठी थांबलेले. आताच मेसेज मिळाला मला.
मला १४ ला मुंबईत राहणे भाग आहे, त्यामुळे मला येता येणार नाही पण आधीच म्हटल्याप्रमाणे तुम्ही मंडळी जर आंबोलीला जात असाल तर मी तिथे व्यवस्था करु शकते. मला कळवा कसे आहे ते.
साधना.. अब अपन जल्दी
साधना..
अब अपन जल्दी मिलनेवाले हैं...
वर्षू.. जाताना मी एअरपोर्ट वर
वर्षू.. जाताना मी एअरपोर्ट वर थांबू का ?
मुंबईत मी असेन पण नात / भाचेसून नव्याने आल्यात त्यांचासाठी वेळ द्यावा लागेल.
फोन नंबर तोच असेल. फोनवर बोलूच.
नमस्कार मित्रांनो दिनेशजी मेल
नमस्कार मित्रांनो
दिनेशजी मेल चेक करा , पुण्यात कधी येणार आहात
१४ तारखेला भटक्यांचा
१४ तारखेला भटक्यांचा सह्यमेळावा आहे.
(दिनेशदांनी दिलेलच आहे तरी पण...)
माझ्याकडून देखील सर्वांना आग्रहाच देण्यासाठी आमच्या गावी भेट देण्यासाठी !
काल आमच्या शेजार्यांच्या
काल आमच्या शेजार्यांच्या बाल्कनीत रात्री फुललेला हा कॄष्णकमळ..पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिला..
...
...
अरे वा, छान फुलली आहेत. सुगंध
अरे वा, छान फुलली आहेत. सुगंध पण दरवळला असणार !
हे कृष्णकमळ आहे?
हे कृष्णकमळ आहे?
हे कृष्णकमळ नाही आणि
हे कृष्णकमळ नाही आणि ब्रह्मकमळही नाही. हे आहे निवडुंगाचं फूल.........:स्मित:
आणि अनिल यांचा टायपो झाला आहे. त्यांनी चुकुन कृष्णकमळ लिहिलंय.
बाय द वे, अनिल, फोटो सुंदर आलेत. दा म्हणतात तसं परिसर सुगंधाने भरून गेला असेल.
तुम्ही दिलेल्या हळदीच्या कंदांना छान कोंब फुटलेत. ४-५ दिवसांत पानं बाहेर डोकावतील, मी इथे फोटो देईनच त्यांचा.
पानफुटी सारखं दिसतंय ते मला
पानफुटी सारखं दिसतंय ते मला तरी. बरोबर आहे का?
अनील मस्त फोटो. कालच सगळीकडची
अनील मस्त फोटो. कालच सगळीकडची फुलं फुलली की काय. अजून २,३ ठिकाणी पाहीली काल.
अनिल७६ | 1 July, 2013 - 20:23
अनिल७६ | 1 July, 2013 - 20:23 नवीन
दिनेशदा,
(काहीही करा पण) तुम्ही पुण्याहुन मिरजला उतरुन आपल्याला गावी जाता येईल, २-४ तासात तुम्ही पुन्हा कोल्हापुरला जाऊ शकाल (घाई असेल तर)
<<<
हा प्रतिसाद चुकीच्या धाग्यावर (कोलेस्टेरॉल वाल्या) टाईप झालाय. इथे हवा होता बहुतेक
आभार इब्लिस, अनिल, आणखी कुणी
आभार इब्लिस,
अनिल,
आणखी कुणी येतय का ते बघू या. माझी हरकत नाही.
पानफुटी सारखं दिसतंय ते मला
पानफुटी सारखं दिसतंय ते मला तरी. बरोबर आहे का?
>>
इब्लिस,
या ब्रम्हकमळाचे रोप पानापासुनच तयार होते, पानफुटीसारखे!!
दिनेश दा...............
दिनेश दा............... हो>>>>>>>>> जरूर थांबा... किती तारखेला??????????
वर्षू नील ,सहेली मस्त!
वर्षू नील ,सहेली
मस्त!
वर्षू नील ,सहेली मस्त!
वर्षू नील ,सहेली
मस्त!
हे कृष्णकमळ नाही आणि
हे कृष्णकमळ नाही आणि ब्रह्मकमळही नाही. हे आहे निवडुंगाचं फूल......
हे ब्रह्मकमळच आहे.सारस पक्षाच्या मानेसारखा देठ आणि फुलातील आसनवजा भाग ही तर ब्रह्मकमळाची
खासियत!
हे कृष्णकमळ नाही आणि
हे कृष्णकमळ नाही आणि ब्रह्मकमळही नाही. हे आहे निवडुंगाचं फूल...... >>>>>
येळेकर, याला सर्वसाधारणपणे ब्रह्मकमळ म्हणत असले तरी हे खरोखरचे ब्रह्मकमळ नाहीये, हा कॅक्टसचाच (निवडुंग) प्रकार आहे - ही त्याची बाकीची माहिती -
Common name: Orchid cactus, Jungle cactus, Night blooming cereus, Dutchman's Pipe • Marathi: ब्रह्मकमल Brahma kamal
Botanical name: Epiphyllum oxypetalum Family: Cactaceae (cactus family)
खरे ब्रह्मकमळ हिमालयात सापडते व त्याची माहिती अशी आहे -
Common name: Brahma Kamal ब्रह्म कमल (Hindi)
Botanical name: Saussurea obvallata Family: Asteraceae (Sunflower family)
कुणाला 'जगमं' ह्या फळाबद्दल
कुणाला 'जगमं' ह्या फळाबद्दल माहिती आहे का? साधारण जाम्भळाच्या आकाराचे पण गोल व ग्रे कलरचे असते.
ते हातावर गोल फिरवून मळले की गोड लागते. खू...........प वर्षांपूर्वी सावंतवाडीवाल्याने दिले होते.नंतर कधीही
ते फळ पाहिले ना ऐकले.
येळेकर, तुम्ही म्हणता तसं फळ
येळेकर, तुम्ही म्हणता तसं फळ 'हाशाळं' म्हणून पण आहे. मी कधी खाल्लं नाहीये, पण डॉ. डहाणूकरांच्या वृक्षगान मधे हाशाळ्यांचा उल्लेख केलाय, तो उल्लेख आणि तुम्ही केलेलं वर्णन - गोल व ग्रे कलरचे असते.
ते हातावर गोल फिरवून मळले की गोड लागते.>>>>>>>>>>याच्याशी खूप मिळतं जुळतं आहे. नि ग च्याच पहिल्या भागात या फळांचा (हाशाळ्यांचा) फोटो टाकलाय कुणीतरी. कदाचित दिनेशदांनी पण टाकला असेल. तो बघा वाटलं तर म्हणजे ते तेच फळ आहे का हे बघता येईल.
काय मस्त फुलली आहे
काय मस्त फुलली आहे शेवंती!
काल माझ्याकडे पण (खोटं) ब्रह्मकमळ फुललं होतं ... चार फुलं आली या वर्षी.
पुरंदरे शशांक ....धन्यवाद!
पुरंदरे शशांक ....धन्यवाद! नि ग च्याच पहिल्या भागात या फळांचा (हाशाळ्यांचा) फोटो टाकलाय कुणीतरी. कदाचित दिनेशदांनी पण टाकला असेल.......... पहिला भाग वाचला.त्यातदिनेशदाच्या पोस्टमधील हाशाळ्यांचा फोटो पाहिला.जवळ्जवळ तसेच फळ बहुदा.पण पोस्टच्या .शेवटी
तर दोस्तानो, हा रानमेवा. तरी यात जगमं, अळू, काजूची बोंडे नाहीतच..>..असे
आल्यावर निराश झाले.
Pages