Submitted by सत्यजित on 8 February, 2008 - 08:20
नजर जाईल तोवर
पसरलेल जंगल
विटा दगडांच्या समाधीत
विसरलेल जंगल
हिंस्र श्वापदांना मुक्याने
झेलणार जंगल
काळाजावर आघात
पेलाणार जंगल
भजेल त्याला नित्य
पावणार जंगल
धगधगत्या रुळांवर
धावणार जंगल
जुन्याच प्रश्णांच्या थारोळ्यात
लोळणार जंगल
आपल्याच धुनीत सदैव
पोळणार जंगल
विवीध रंगाच्या दिव्यानी
सजलेल जंगल
धुरांची शाल पांघरुन
निजलेल जंगल
सचेतन शरिरात अचेतन मनं
गाढलेल जंगल
शेत खाणार्या कुंपणानी
वेढलेल जंगल
भिषण स्फोटाने बिचारं
बावरलेल जंगल
आपल्याच हाकेने आपणच
सावरलेल जंगल
तुमच्या आमच्या दु:खाने
कुढलेल जंगल
तुमच्या आमच्या संगे
रडलेल जंगल
तुम्हा आम्हा सगळ्यांनी
वाढलेल जंगल
तुम्हा आम्हा सगळ्यांनी
तोडलेल जंगल...
सगळ्यांच असुनही माझं माझं जंगल...
-सत्यजित
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख
एकदम सुरेख....
आपल्या तुपल्या मनात
खोल रुतलेल जंगल.......
जंगल
अंतर्मुख करणारं जंगल...
माझं शहर
मुंबईरुपी जंगल. व्वा व्वा!!! यथार्थ वर्णन.
धगधगत्या
धगधगत्या रुळांवर
धावणार जंगल
जुन्याच प्रश्णांच्या थारोळ्यात
लोळणार जंगल
................मस्तच आणि अजूनही बरंच मस्त !!