वालाची पालेभाजी
दोन मोठे कांदे चिरुन
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
५-६ लसुण पाकळ्या ठेचुन
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
चवीनुसार मिठ आणि साखर
पाव वाटी तेल
मुठभर ओल खोबर
१) ही पालेभाजी सहसा बाजारात मिळत नाही. उन्हाळ्यात जेंव्हा आपण टिकवण्यासाठी वाल घेतो तेंव्हा त्यातील किडके वाल बाजूला काढतो. हेच किडके वाल न टाकता बाजूला ठेऊन आपल्याला हवे तेंव्हा कुंडीत किंवा जमिनीवर पेरायचे. त्याला मोड येऊन दोन पाने मोठी आली की ही भाजी काढायची. भाजी हवी असल्यास चांगले वालही पेरू शकता. साधारण ८-१० दिवसांत भाजी काढण्यासाठी तयार होते. पण शक्यतो तिसरे पान यायच्या आत काढायची नाहीतर पाने जून होतात.
२) हया भाजीची पाने चिरुन घ्या. थोडासा देठाचा कोवळा भाग घेतला तरी चालतो.
३) भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यावर लसुण पाकळ्यांची फोडणी द्या. लसुण जरा लालसर होऊ द्या म्हणजे चांगला वास येतो.
४) त्यावर मिरची व कांदा घालून परता.
५) वरून हिंग व हळद घालून कांदा परता.
६)कांदा शिजवायची गरज नसते पालेभाजीला. लगेच चिरलेली भाजी घालून परता.
७) आता भाजीवर झाकण द्या आणि ५ मिनिटे मिडीयम गॅसवर शिजू द्या.
८) भाजी शिजली की त्यावर मिठ, साखर घाला आणि ढवळून वरून खोबरे घाला व परता.
९) पुन्हा एकदा झाकण ठेऊन २-३ मिनीटे ठेवा वाफ येण्यापुरती व गॅस बंद करा.
वरील टोपलीतली सगळी भाजी लागली नाही. त्यातील अर्धीच घेतली मी.
भाजीत हवे असल्यास टोमॅटो घालू शकता.
कधी केली नाही करुन पहावी
कधी केली नाही करुन पहावी म्हणतो.
खूपच टेस्टी दिसतेय भाजी.
खूपच टेस्टी दिसतेय भाजी. आमच्याकडे गावाला पूर्वी शेतात वाल पेरायचो पण पालेभाजी करायची पद्धत नव्हती. हीच पाने जून झाली की गायींना घालायचो. पण आता ही रेसेपी वाचून घरातले वाल पेरून भाजी करावीशी वाटतेय.
वालाला थोडे मोड आणि लहान पाने
वालाला थोडे मोड आणि लहान पाने आले की, भाजी बनवतात ते माहित आहे .वालाची पालेभाजी माहित नाही पण मस्त पाककृती
मस्त. नवीनच भाजी माझ्याकरता.
मस्त. नवीनच भाजी माझ्याकरता. कधी ऐकलेली, पाहिलेली नव्हती. वाल पेरुन मिळवणंही सहज सोप्पं दिसतंय.
पालेभाजीत खोबरंही पहिल्यांदाच ऐकलं.
जागु, तुसि ग्रेट हो. कधी करता
जागु, तुसि ग्रेट हो.
कधी करता तुम्ही हे सगळ.
पेरण्या , खुडण्या पासून ते रेसिपी इथे टाकण्या पर्यंत.
मला तर हे सगळे करणे तर काही होणार नाही. त्यामुळे तुम्हीच सांगा की चव कशी असते ह्या भाजीची?
eka navin palebhajichi mahiti
eka navin palebhajichi mahiti zali .bhaji pahun khanyachi ichchha zali .
मस्त भाजी. मुंबईत नाहीच
मस्त भाजी.
मुंबईत नाहीच मिळणार ही. गावाला असते. वर्षभर वाल निवडताना जे वाल फेकलेले असतात ते उगवून येतात.
पहिल्या पावसानंतर ते रुजतात. आमच्याकडे त्याला कूचर म्हणतात. मस्तच लागते ती भाजी.
कोकणात तर अशी भाजी काजूची पण करतात. पण ते लगेच खुडावे लागतात. पाने यायच्या आधीच.
जागू, तुझ्यामुळेच नविन नविन
जागू, तुझ्यामुळेच नविन नविन भाज्याची माहिती मिळते. फोटो टाकल्याने तर ती भाजी कशी आहे ते पण माहीत होते. आम्ही मेथीची अशीच खोबरे टाकुन भाजी करतो.
सही दिसते आहे. वाल पेरून करून
सही दिसते आहे. वाल पेरून करून बघावी अशी!!
हल्लीच वाल लावलेत...करुन
हल्लीच वाल लावलेत...करुन बघते.
अशीच कारल्याच्या पानांची करता येते का? कशी करायची?
छान रेसपी जागू.
छान रेसपी जागू.
सायो +१
सायो +१
वालाच्या पानाची भाजी करतात हे
वालाच्या पानाची भाजी करतात हे माहीत नव्हते.
सही पाककृती, जागू! या
सही पाककृती, जागू!
या भाजीसाठीतरी पावटे पेरायला हवे.
वालाच्या पानांचीही भाजी होते
वालाच्या पानांचीही भाजी होते माहिती नव्हतं! मस्त.
पालेभाजीत खोबरंही पहिल्यांदाच
पालेभाजीत खोबरंही पहिल्यांदाच ऐकलं.>>>>>>>आम्ही तर सर्व भाज्यांमधे खोबरे टाकतो...
बंडोपंत, वावे, अविगा, सायो,
बंडोपंत, वावे, अविगा, सायो, ज्यो, दिनेशदा, स्वाती, शिल्पा, विद्या, सुमंगल, शुंपी, गजानन, मृण्मयी, मानुषी धन्यवाद.
मृणाल भाजीची चव खुप छान असते.
अनिष्का आम्ही पण सगळ्या भाजीत खोबर घालतो.
भारी ! कधीच ऐकलं नव्हतं ह्या
भारी ! कधीच ऐकलं नव्हतं ह्या भाजीबद्दल. जागू तू ग्रेट आहेस
छान रेसपी... पालेभाजीत
छान रेसपी...
पालेभाजीत खोबरंही पहिल्यांदाच ऐकलं.>>>>>>>आम्ही तर सर्व भाज्यांमधे खोबरे टाकतो...>>++१११११
सहीच पण आमच्या घरी वाल लावू
सहीच पण आमच्या घरी वाल लावू देत नाहीत.
प्रथमच ही भाजी बघतोय. आता घरी
प्रथमच ही भाजी बघतोय. आता घरी वाल आहेतच, तेव्हा साग्रसंगीत वाल पेरुन, भाजी उगवून बनवेन..
- पिंगू
वालाच्या पानांचीही भाजी होते
वालाच्या पानांचीही भाजी होते माहिती नव्हतं! मस्त.> +१ जागू खल्लास आयड्या आहे.
मस्तच जागु.
मस्तच जागु.
खोबरं आमच्याकडेही सगळ्या
खोबरं आमच्याकडेही सगळ्या भाज्यांमध्ये असतं पण पालेभाजीत पहिल्यांदाच बघितलं. असो.
नुसत्या भाजीसाठी वाल पेरलेत
नुसत्या भाजीसाठी वाल पेरलेत तर भाजीकरता ते मुळापासून न उपटता फक्त पाने खुडली तर उरलेले रोप वाढून त्यापासून शेंगाही मिळतील ना?
मस्त!
मस्त!
छान रेसिपी!
छान रेसिपी!
खोबरं आमच्याकडेही सगळ्या
खोबरं आमच्याकडेही सगळ्या भाज्यांमध्ये असतं पण पालेभाजीत पहिल्यांदाच बघितलं. असो.>>>> कान्द्यावर परतवलेली पालेभाजी without खोबर मी विचारच करु शकत नाही.
कालच वाल भिजत घातलेत, त्यातले जे चहाडे (हाच शब्द आहे ना?) निघतील त्यान्च्यावर हा प्रयोग करीन.
रेसीपी छाने.
वालाला पानं असतात हे आजच
वालाला पानं असतात हे आजच रिअलाईझ झाले (असणारच. पण तरी, अशी पालेभाजी असेल असं कधी डोक्यात आलं नाही!)
मस्तच आहे रेसीपी. पण करून बघणं जमणार नाही.
पालेभाजी खोबरं खरंच इंटरेस्टींग काँबो आहे. कसं लागत असेल?
>>निवडून किडके वाल टाकून न
>>निवडून किडके वाल टाकून न देता पेरावेत<< छान जागू . आम्ही असे वाल ,चवळी आणि मूग मटकी पेरतो आणि दोन पाने आल्यावर दुसऱ्या आणलेल्या पालेभाजीत(पालक ,मुळा सोडून) टाकतो .खूप नसल्याने त्याची स्वतंत्र भाजी होत नाही . जे वाल भिजत नाहित ते चहाडे अथवा गणंग . फणस सोलल्यावर चरे आणि साल जमीनीत पुरावे आणि त्यावर माती ढकलून तीन कारल्याच्या बिया लावाव्यात या वेलांना पुढे भरपूर कारली लागतात .
Pages