उत्तराखंड दुर्घटना : आवाहन

Submitted by जीएस on 20 June, 2013 - 14:02

जसे जसे मदतकार्य वेग घेत आहे तसे तसे उत्तराखण्डातील दुर्घटनेचे अतिशय भयावह स्वरूप समोर येत आहे. पाचशे रस्ते, पावणेदोनशे पूल, नव्वद धर्मशाळा, चाळीस हॉटेल्स, शेकडो घरे वाहून गेली आहेत. हजारो मृत्युमुखी पडले आहेत तर लाखाहून अधिक रहिवासी, यात्रेकरू व पर्यटकांना सुटकेची आणि मदतीची गरज आहे.

सैन्यदले व प्रशासन यांबरोबरच रा.स्व. संघाची आपत्कालीन यंत्रणाही लगेच कार्यरत झाली असून आपल्याला या कामासाठी काही मदत करण्याची इच्छा असेल तर खालील पत्रकातील माहितीप्रमाणे आपला धनादेश पाठवू शकता अथवा त्यांच्या स्टेट बँक ऑफ ईंडियातील अकाऊंटला पैसे ट्रान्सफर करू शकता. तसेच शक्य झाल्यास आपल्या मित्रपरिवारालाही याबद्दल माहिती देऊ शकता.

(८० जी आयकर सवलत उपलब्ध आहे. निधी पाठवताना आपली आवश्यक ती माहिती देउन त्याप्रमाणे पावती मागवता येईल.)

Online Trasnfer: Bank Account Details:

A/c Name: Uttaranchal Daivi Aapda Peedit Sahayata Samiti
Bank Name & Branch: State Bank of India, Main Branch
Convent Road, Dehradun, Uttarakhand, India
A/c No: 31156574681
NEFT Code: SBIN0000630

चेक पाठवायचा असेल तर पत्ता

Uttaranchal Daivi Aapda Peedit Sahayata Samiti
भाउराव देवरस कुंज, १५ तिलक मार्ग, देहरादून, उत्तरांचल, पिन २४८००५

अमेरिकेतील अकाऊंटमधून डॉलर्स पाठवायचे असतील तर सेवा इंटरनॅशनलच्या माध्यमातून पाठवता येतील.
http://www.sewausa.org/UttarkhandFloodReliefAppeal

पुण्यात मदत करयची असेल तर पत्ता

R S S Office In Pune,
309,Moti Baug,Shaniwar Peth,
Opp Ahilyadevi High School, Pune-411030.
Phone 24458080

OR

RSS JANKALYAN SAMITI (MAHARASHTRA PRANT)
Bhageshwar Niwas', 1609, Sadashive Peth,
Tilak Road, Pune - 411 030,
Phone 24324071

Patrak
http://samvada.org/files/2013/06/RSS-appeal.jpg

1008723_389607974478011_619641178_o.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योग्य माहिती तत्परतेने कळवल्याबद्दल धन्यवाद जीएस. इतका हाहा:कार बघून खुप हतबल वाटत होतं, ती भावना आता थोडी तरी कमी करता येईल. माझ्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांनाही कळवते.

माझे बाबा गेल्याच आठवड्यात त्या तीर्थयात्रा करून परतल्यामुळे भयानकता आणखीच तीव्रतेने जाणवतेय.

धन्यवाद,

ऑनलाइन आर्थिक मदत करता कशी करता येइल इथे कोणाला लोकल रा.स्व. संघाच्या शाखेत विचारून सांगता येईल का?

धन्यवाद ! दाद, सई, शैलजा.

त्या भागात फिरलो आहे त्यामुळे एवढ्या सुंदर प्रदेशाची अशी वाताहत झाल्याचे फोटो बघून फार वाईट वाटले. पण निसर्गापेक्षाही माणसेच जास्त जबाबदार आहेत या विद्ध्वंसाला.

अर्पणा,

Bank Account Details:

A/c Name: Uttaranchal Daivi Aapda Peedit Sahayata Samiti
Bank Name & Branch: State Bank of India, Main Branch
Convent Road, Dehradun, Uttarakhand, India
A/c No: 31156574681
NEFT Code: SBIN0000630

चेक पाठवायचा असेल तर पत्ता

भाउराव देवरस कुंज, १५ तिलक मार्ग, देहरादून, उत्तरांचल, पिन २४८००५

(८० जी आयकर सवलत उपलब्ध आहे. निधी पाठवताना आपली आवश्यक ती माहिती देउन त्याप्रमाणे पावती मागवता येईल.)

राज,

चांगला प्रश्न आहे. कारण सरकारी मदतीतले फक्त ५% पोहोचतात, तर स्वयंसेवी संस्थांचेही प्रशासकीय खर्चाचे प्रमाण जसे असेल त्याप्रमाणे ते वगळून उरलेले पैसे प्रत्यक्ष पीडितांपर्यंत पोहोचतात. संघप्रणित सेवाकार्यंमध्ये माझ्या माहितीनुसार १००% हून जास्त मिळतात. १००% हून जास्त कसे काय याबद्दल रविवारी लिहितो.

जीएस, माहितीबद्दल धन्यवाद. रविवारचा भागही वाचायला आवडेल.

रेव्यु, विधान लोकप्रिय आहे पण मलाही अगदी मनापासुन जाणुन घ्यायचेय की आपण कळवळ्याने जी मदत देतो त्यातला थोडा भाग तरी योग्य ठिकाणी पोचतो की नाही ते.

शासकिय मदतीचे आकडे वाचल्यावर यातले किती प्रत्यक्ष पोचतील हाच प्रश्न मनात आला होता.... Sad त्यातले सगळेच जर पोचले तर संपुर्ण उत्तराखंडाचाच कायापालट होईल....

जीएस, माझ्या एका प्रोजेक्ट डायरेक्टरला या कामाशी संबंधीत पुण्यातल्या एखाद्या कार्यकर्त्याला भेटायचे आहे. कृपया नाव आणि संपर्क देशील का? विपुत पाठवलेस तरी चालेल.

मी कट्टर संघविरोधी आहे, पण संघाला खूप जवळून पाहिलंय. इतर काहीही पटणारं असो नसो, मदतकार्याला आलेल्या पैशाचा अपहार झाल्याचं कधीच पाहिलं नाहीये, ऐकिवात नाहीये. कायमच व्यवस्थित मदत पोचते.
तसंच भारत सेवाश्रम संघ म्हणूनही एक संघटन आहे. त्यांचंही मदतकार्य कुठलीही अफरातफर न होता चालतं असं खूप जणांकडून ऐकलंय....

जीएस, शोधाशोध करून त्यांनी डेहराडूनच्या प्रांतचालकांशी बोलणं केलेलं आहे. त्यांनी यथाशक्ती मदत पाठवली आहे, शिवाय ते पंधरा दिवस प्रत्यक्ष मदतीसाठी तिथे जाणार आहेत. त्यासाठीच तुझ्याकडून माहिती हवी होती. त्यांचे नाव श्री. प्रज्ञानंद सातारकर असे आहे.

खुप खुप धन्यवाद, कारण तुझ्या या आवाहनामुळे हे झाले. तसे त्यांनी मला मुद्दाम सांगितलेही, म्हणून तुला ही पोचपावती.

वरदा धन्यवाद.
मी चार वेळा टायपलेले खोडले की कोणी कधी संघाला मदत केली आहे का? करावी का.
आता निश्चिंतपणे पैसे पाठवेन.

धन्यवाद जीएस.

रैना, पुण्यात घरातले सगळे जुने चांगले कपडे अगदी नियमितपणे वनवासी कल्याण आश्रमात पाठवायचो आम्ही. तसंच आमच्या लहानपणची सगळी पुस्तकं पण त्यांनाच देऊन टाकली होती.

इतर काहीही पटणारं असो नसो, मदतकार्याला आलेल्या पैशाचा अपहार झाल्याचं कधीच पाहिलं नाहीये, ऐकिवात नाहीये. कायमच व्यवस्थित मदत पोचते.
>> +१

>> इतर काहीही पटणारं असो नसो, मदतकार्याला आलेल्या पैशाचा अपहार झाल्याचं कधीच पाहिलं नाहीये, ऐकिवात नाहीये.
वरदा +१

सई, तुलाही धन्यवाद, योग्य ठिकाणी माहिती पोहोचवल्याबद्दल.

धन्यवाद मीनल,
तुम्ही दिली आहे ती सेवा इंटरनॅशनलची लिंक मी आता मूळ पोस्टमध्ये दिली आहे.

वरदा, रैना, नताशा.. धन्यवाद. १००% सचोटी हा मुद्दा तर आहेच पण प्रत्येक रुपयाचा अतिशय काटेकोरपणे प्रभावी वापर यामुळे संघाशी काही संबंध नसलेले नागरीक आणि कट्टर वैचारिक/राजकीय विरोधकही स्वतःहून स्वयंसेवकांना गाठून/कार्यालयात येऊन फार मोठ्या प्रमाणावर मदत देतात.

---------------------

मी वर उल्लेख केलेल्या संस्थांचा वा संघाचा अधिकृत प्रतिनिधी नाही. पण संघाची कार्यपद्धती आणि आपत्कालीन सहाय्याचे व्यवस्थापन याबद्दल मला स्वतःला व्यवस्थापनशास्त्राचा विद्यार्थी/व्यवस्थापक म्हणून नेहेमीच आश्चर्ययुक्त आदर वाटत आला आहे.

गेली साठ वर्षे भारतासारख्या विशाल देशाच्या कुठल्याही भागात मोठी वा छोटी आपत्ती आली तरी सर्वप्रथम धावून जाण्यात आणि परिस्थिती सांभाळण्यात सेना आणि प्रशासनाच्या जोडीला संघ असतोच. हे काम सोपे नाही. हे कसे जमते याबद्दलची माझी काही निरीक्षणे.

(अ) Reach: भारतात सुमारे पन्नास हजार गावात्/शहरात संघाचे प्रत्यक्ष काम चालते. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी गरज लागली तर जवळपास संघ स्वयंसेवक आहेत असे गाव असते.

(ब) Structure/Coverage: प्रशासनासारखीच संघाची देश-विभाग-प्रांत-जिल्हा-तालुका-मंडल्-गाव्/नगर-शाखा अशी यंत्रणा आहे. त्यावर नियुक्त कार्यकर्ते आहेत, कार्यालये आहेत. प्रत्येकाला आपले कार्यक्षेत्र माहित असते.

(क) Initiative: कुठे आपत्ती ओढवली आहे त्याप्रमाणे कुठुन मदतीचे सूत्रसंचालन होईल हे स्वयंसेवकांना माहित असते, वृत्त कळले की जवळपासचे अनेक स्वयंसेवक शक्य तेवढे पैसे घेउन, खाकी हाफपँट घालून तिकडे धाव घेतात. दोन चार वर्षे शाखेत पाय न ठेवलेले स्वयंसेवकही स्वतःहून येतात. कोणी कोणाला बोलावून आणत नाही. काही जण आवश्यक त्या सर्व सामानासह घटनास्थळाकडे तातडीची मदत करायला, आणि नक्की काय काय मदत लागेल याचा आढावा घ्यायला जातात. काही जण समन्वयासाठी थांबतात. थेट घटनास्थळीसुद्धा अनेक स्वयंसेवक संघाचा कापडी फलक / इतर हाफपँटवाल्यांना शोधत दाखल होतात.

(ड) Organization/Discipline: दुर्घटनेच्या व्यातीनुसार एखाद्या शाखेपासून ते प्रांतापर्यंत अशा कुठल्यातरी पातळीला समन्वयाचे काम सुरू होते. चेन ऑफ कमांड स्पष्ट असते. त्यानुसार एखाद्या उद्योगसमूहातील अतिशय वरिष्ठ अधिकारी देखील एकदा हाफपँट चढवली की त्याला एखाद्या कॉलेज युवकाने नेमून दिलेले कामसुद्धा मनापासून करतांना आढळतो. तात्विक चर्चा नव्हे तर सांघिक कृतीवर सगळा जोर असतो.

(इ) Confidence about Support: कामाला लागेल तेवढा सगळा पैसा तात्पुरत्या स्वरूपात स्वयंसेवक, हितचिंतकांकडून लगेच उभा केला जातो. समाजातून मदतीचे हात उभे रहाणार आहेतच त्यासाठी काम थांबायची गरज नाही या आत्मविश्वासाने मोठ्या कामाला हात घातला जातो.

(फ) Infrastructure: रिलीफ कँप उभारायचे असतील तर जागा पाहिजे. संघाचे देशभर सुरू असलेले शाळा, रुग्णालय, हॉस्टेल सारखे प्रकल्प उपयोगी पडतात. उदाहरणार्थ संघमाध्यमातून चालणार्‍या वीस हजार पूर्ण शाळा आणि सत्तर हजार एक शिक्षकी शाळा आहेत. आत्ता उत्तराखंड मध्ये याच शाळा ताबडतोब उपयोगी पडल्या.

(ग) Scale : आपत्ती मोठी असेल तर ती त्याच scale वर हाताळायला लागते. अशा वेळेला शेकडो शहरातल्या संघ कार्यालयात स्वयंसेवक जमू लागतात. दुर्घटनाग्रस्त भागातल्या कार्यालयातून एव्हाना नक्की काय मदत हवी आहे, कशी हवी आहे, काय नको आहे, स्वयंसेवक हवे आहेत का अशी सर्व माहिती आली असते. गुजरात भूकंपाच्या वेळी १२ तासाच्या आत पुण्यातून स्वयंसेवक मदतीसह रवाना झाले होते.

(ह) Goodwill : समाजातले गुडविल कमी पैशातही जास्तीत जास्त मदत लवकरात लवकर पोहोचवण्यास कामी येते. बरीच व्यापारी मंडळी संघाचे काम आहे म्हटल्यावर हवा तो माल वाजवी दरात रोखीची मागणी न करता द्यायला तयार असतात, वर लिहिले तसे नागरिक्/विरोधकही स्वतःहून पैसे/मदत साहित्य आणून देतात, रेल्वेमधून ताबडतोब तिकिटे मिळतात, टेंपोवाले फक्त डिझेलपुरते पैसे घेतात, संघ स्वयंसेवक आहे म्हटल्यावर कुठल्याही अनोळखी घरात रहायला/जेवायला ठेवून घेतात.

(ज) देणगीच्या १००% हून जास्त मदत.

निरपेक्षपणे झटणारे स्वयंसेवक, अतिशय काटेकोर खर्च, संघकार्यालये, प्रकल्प यांचा वापर, समाजातील गुडविलमुळे स्वस्त्/मोफत वस्तू/सेवा, नियोजन आणि कडक शिस्त यामुळे जेंव्हा एक रुपयाची देणगी कोणीतरी आपद्ग्रस्तांसाठी दिलेली असते तेंव्हा त्या रुपयातून त्याहून कितीतरी अधिक किमतीची मदत त्या आपदग्रतांपर्यंत पोहोचलेली असते.

------------------------------------------

उत्तराखंडातली परिस्थिती अजूनही बिकट आहे. अडकून पडलेल्यांना दोनशे रुपयाला पाणी, पाचशे रुपयाला डाळभात, सात हजार रुपयाला एक रात्र खोली अशा प्रकारच्या काही जणांच्या लालचीपणालाही सामोरे जावे लागत आहे.

सुटका, निवारा, अन्न्-पाणी यावर संघाच्या वीस एक टीम्स ठिकठिकाणी काम करत आहेत. रस्ते बंद आहेत तर एक हेलिकॉप्टर वापरूनही मदत पोहोचवली आहे.

uttar3.jpg

जी एस, तुमच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन. तुम्ही खूप चांगलं काम करत आहात.
तसंच, वरदाच्या पोस्टला पण.
संघाकडे, संघकार्यालाच वाहून घेतलेले कार्यकर्ते पण आहेत. ते अशा वेळेला, नोकरी, रजा वगैरे भानगड नसल्याने ताबडतोब उपलब्ध होतात.

जीएस, पुण्यात कुठे कलेक्शन करत आहेत माहित होईल का?

सई, शुगोल,

Donations can be given at the following places in Pune.

R S S Office In Pune,
309,Moti Baug,Shaniwar Peth,
Opp Ahilyadevi High School, Pune-411030.
Phone 24458080

OR

RSS JANKALYAN SAMITI (MAHARASHTRA PRANT)
Bhageshwar Niwas', 1609, Sadashive Peth,
Tilak Road, Pune - 411 030, 
Phone 24324071

अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहेस तू. मला कायमच उत्सुकता होती की इतक्या ताबडतोब आणि परिणामकारकतेने हे सगळे कार्यकर्ते देवदूतासारखे तिथे कसे पोचतात आणि न बोलता आपापले काम करत रहातात. पुन्हा त्याचा कसलाही गवगवा / उदो उदो नाही हे आणखी विशेष.
आम्हाला एनईएफटी द्वारे पैसे पाठवणे सोयीचे पडले. अशा वेळी टेक्नॉलॉजीचेही आभार मानावेसे वाटतात.

संकटग्रस्तांना जमेल तशी मदत करणारच आहे.
त्याव्यतिरीक्त संघाच्या मदतकार्याची जी माहीती दिलेय तीही महत्वाची आहे.

Pages