उत्तराखंड दुर्घटना : आवाहन

Submitted by जीएस on 20 June, 2013 - 14:02

जसे जसे मदतकार्य वेग घेत आहे तसे तसे उत्तराखण्डातील दुर्घटनेचे अतिशय भयावह स्वरूप समोर येत आहे. पाचशे रस्ते, पावणेदोनशे पूल, नव्वद धर्मशाळा, चाळीस हॉटेल्स, शेकडो घरे वाहून गेली आहेत. हजारो मृत्युमुखी पडले आहेत तर लाखाहून अधिक रहिवासी, यात्रेकरू व पर्यटकांना सुटकेची आणि मदतीची गरज आहे.

सैन्यदले व प्रशासन यांबरोबरच रा.स्व. संघाची आपत्कालीन यंत्रणाही लगेच कार्यरत झाली असून आपल्याला या कामासाठी काही मदत करण्याची इच्छा असेल तर खालील पत्रकातील माहितीप्रमाणे आपला धनादेश पाठवू शकता अथवा त्यांच्या स्टेट बँक ऑफ ईंडियातील अकाऊंटला पैसे ट्रान्सफर करू शकता. तसेच शक्य झाल्यास आपल्या मित्रपरिवारालाही याबद्दल माहिती देऊ शकता.

(८० जी आयकर सवलत उपलब्ध आहे. निधी पाठवताना आपली आवश्यक ती माहिती देउन त्याप्रमाणे पावती मागवता येईल.)

Online Trasnfer: Bank Account Details:

A/c Name: Uttaranchal Daivi Aapda Peedit Sahayata Samiti
Bank Name & Branch: State Bank of India, Main Branch
Convent Road, Dehradun, Uttarakhand, India
A/c No: 31156574681
NEFT Code: SBIN0000630

चेक पाठवायचा असेल तर पत्ता

Uttaranchal Daivi Aapda Peedit Sahayata Samiti
भाउराव देवरस कुंज, १५ तिलक मार्ग, देहरादून, उत्तरांचल, पिन २४८००५

अमेरिकेतील अकाऊंटमधून डॉलर्स पाठवायचे असतील तर सेवा इंटरनॅशनलच्या माध्यमातून पाठवता येतील.
http://www.sewausa.org/UttarkhandFloodReliefAppeal

पुण्यात मदत करयची असेल तर पत्ता

R S S Office In Pune,
309,Moti Baug,Shaniwar Peth,
Opp Ahilyadevi High School, Pune-411030.
Phone 24458080

OR

RSS JANKALYAN SAMITI (MAHARASHTRA PRANT)
Bhageshwar Niwas', 1609, Sadashive Peth,
Tilak Road, Pune - 411 030,
Phone 24324071

Patrak
http://samvada.org/files/2013/06/RSS-appeal.jpg

1008723_389607974478011_619641178_o.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेलेल्यांना आदरांजली.

बाकी, वारी-कुंभमेळा किंवा उरुस असल्या ठिकाणी कोणताही राष्ट्रविरोधी दहशतवादी ब्वांबस्फोट करणार नाही. कारण सुज्ञास सांगणे न लगे. Wink

मला आलेल्या एका फॉर्वर्डेड मेल मधून......

Read, here in under, what a person who is 100% anti - RSS
thinks about " YOG-DAN " of RSS. !!
Subject: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देतो १०५% मदत !
पण वृत्त वाहिन्यांना व वर्तमान पत्रांच्या संपादकांना हे दिसत नाही .

एम. डी. रामटेके.
॥मी कट्टर आबेंडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥
गुरुवार २७ जून २०१३
आर. एस. एस. देते १०५ % मदत.

मी आर. एस. एस. चा कट्टर विरोधक. किती कट्टर? तर आजवर मी त्या खाकी पॅंटला कधीच पॅंट म्हटलं नाही तर चड्डीच म्हणतो. ईतका...
उत्तराखंडला दुर्घटना घडली आणि काती तासांच्च्या आत खाकी चड्डी सेवेसाठी हजर झाली. या आर.एस.एस. चं बाकी काही असो पण यांची सेवा आघाडी व मॅनेजमेंट अजोड आहे. कुठेही दुर्घटना घडली की खाकी चड्डी सगळ्यात आधी मदतीचा हात द्यायला हाजर असते. अगदी लातूरचा भुकंप असो, गुजरातचा भुकंप असो वा त्सुनामीचा तडाखा असो. प्रत्येक ठिकाणी खाकी चड्डी हजर दिसली. अगदी भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून मदत करताना ही खाकी चड्डी वरील सगळ्याच घटनांत मी पाहिली आहे. हे सगळं कसं जमतं? उत्तर सोपं आहे. संघाचे जाळे देशभर पसरले आहे. असा तालूका नसेल जिथे संघाचं कार्यालय नसावं. पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे हे संघवाले मदतीला धावाण्यासाठी सदा सज्ज असतात हे प्रत्येकवेळी अधोरेखीत झालं. यांच्यातील हिंदुत्ववादाबद्दल कितीही राग असला तरी या निस्वार्थ सेवा गुणाचं मात्र कौतूकच आहे.
आता उत्तराखंडच्याच घटनेचं पहा. भारतातील अत्यंत दुर्गम अशा या पहाडी भागात सैन्याच्या जोडीने काम करणारे स्वयंसेवक दिसतात. खरं तर देशातील ईतरही अनेक संघटनांचे स्वयंसेवक तिथे मदत कार्यासाठी पोहचले. पण संघ मात्र सगळ्यात आधी हजर झालं असे एकंदरीत वृत्तपत्रील बातम्या चाळल्यास कळते. कारण संघाच्या स्थानिक स्वयंसेवकानी लगेच आघाडी उघडून मदतकार्य सुरु केले. बाहेरुन येणारे स्वयंसेवक मागून पोहचले पण तोवर काम सुरु होणे राहिले नव्हते. मदतकार्य त्वरीत सुरु झाले. ईतर संघटनांच्या बाबतीत हा फरक असतो. त्यांची सेवा पोहचे पर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. तौलनिक दृष्ट्या संघाची सेवा लवकर उपलब्ध होते हे सत्य नाकारता येणार नाही. त्यासाठी संघाचं कौतूकच.
आर्थिक मदत १००% पेक्षा जास्त केली जाते:
साधारणपणे कुठेही एखादी मोठी दुर्घटना घडली की समाजातील दानशूर लोकं सरकारला, स्वयंसेवी संस्थाना पैशाची मदत करत असतात. पण मदत म्हणून दिलेल्या पैशातील किती टक्के पैसा पिडीतांपर्यंत पोहचला या बद्दल नेहमीच दान करणारे साशंक असतात. सरकारी अनूभव असा आहे की त्यातले निम्मे पैसे हे राजकारणीच हडप करतात. तसेच ईतर स्वयंसेवी संस्थाही मदत म्हणून मिळालेल्या पैशावर डल्ला मारतात. पण आर. एस. एस. या संघटनेत मात्र चित्र अगदी उलटं आहे. जर तुम्ही १०० रुपयाची मदत केलात तर त्या पैशातून १००+ ५ अशी १०५ रुपये किंवा त्यापेक्शा जास्त किंमतीची मदत गरजू पर्यंत पोहचते. हा अनुभव मी स्वत: घेतला आहे.
१९८८ किंवा ८९ ची घटना आहे. मी समूहनिवासी वसतीगृह, एटापल्ली येथे शिकत होतो. हे वसतीगृह फक्त ७ वी पर्यंतच होते. मग पुढचं शिक्षण घ्यायचं म्हणजे जायचं कुठे? हा प्रश्न होताच. अगदी याच वेळी एटापल्लीत (माझ्या मते १९८८ साली) आर. एस. एस. चे वनवासी आश्रम सुरु झाले. या आश्रमात अशी ७ वैगेरे अट नव्हती. तुम्हाला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिका असं त्यांच म्हणनं होतं. मग काय. समुहनिवासीची माझ्या बरोबरची कित्येक मुलं तिकडे पळाली. मग मी अधे मध्ये त्याना भेटायला वनवासी आश्रमात जायचो. तिथेल्या कार्यकर्त्यांशी माझी ओळख झाली. त्यातील एक नाव बंडू बोर्डे. एटापल्लीच्या या वनवासी आश्रमाचे अधिक्षक बंडू बोर्डे हे मूळ अकोल्याचे. ते घरदार सोडून आमच्या दंडकारण्यात संघाचा प्रचार करायला आले होते. बंडू बोर्डे नेहमी माझ्या घरी(कुडकेल्लीत) मला भेटायला येत. मी संघात यावा असा त्यांचा प्रयत्न होता. मी संघात गेलो नाही पण बंडू बोर्डे या माणसाच्या व्यक्तिमत्वानी मात्र भारावून गेलो होतो. मग एटापल्लीला गेलो की त्या आश्रमात थांबायचो. नंतर जेंव्हा अहेरीत शिकायला गेलो तेंव्हा बंडू बोर्डेनी मी अहेरीतील संघाच्या आश्रमात प्रवेश घ्यावा यासाठी प्रचंड धडपड केली पण मी ती मदत नाकारुन भगवंतराव मध्ये दाखल झालो. असो.
तर घटना एटापल्लीची...
...या आश्रमाना सरकारी ग्रांट नसायचा(आजचं माहित नाही). लोकांच्याकडून वर्गणी स्वरुपात मिळालेल्या मदतीतून आमच्या रानात हे दोन वसतीगृह त्या काळात उभे होते. आम्हा रानातल्या पोराना शिक्षणाची सोय पुरवत होते. ईथे मला कळले की १०० रुपयाच्या मदतीत १०५ रुपयाची मदत उभी होते. ते संघाच्या स्वतंत्र तंत्रातून. तर ते तंत्र असं होतं...
...सघाला जर तुम्ही १०० रु. मदत/वर्गणी दिलात तर संघ त्या पैशातून आवश्यक वस्तू घेताना संघाचे सदस्य असलेल्या दुकानांतून/पुरवठादाराकडून घेतात. आमच्या एटापल्लीत गादेवार व मद्दीवार नावाचे दोन संघ सदस्य व्यापारी होते/आहेत. मग यांच्याकडून वसतीगृहासाठीची खरेदी केली जाई. मधल्या काळात स्कॉलरशीपच्या परिक्षेसाठी मला एटापल्लीत काही महिने राहायचे होते. मग बंडू बोर्डेनी मला वनवासी वसतीगृहात राहण्याच्या आग्रह केला. मी स्वत: अनेक वेळा बंडू बोर्डें सोबत गादेवारकडे खरेदीसाठी जायचो. मग हे संघाचे सदस्य असलेले दुकानदार न-नफा न-तोटा या बेसीसवर आश्रमासाठी वस्तू देत(सगळीकडे देतात की नाही माहीत नाही, पण ब-यापैकी हे तंत्र वापरले जाते). म्हणजे समजा १० किलो. तांदूळ १० रुपये किलो प्रमाणे असेल व त्यात दोन रुपये प्रति किलो नफा असेल. अशा वेळी नफा न कमवता हा तांदूळ ८ रु. किलोनी दिला जाई. म्हणजे मदत करणा-यानी दिलेल्या शंभर रुपयात बाजार भावाप्रमाणे १० किलो तांदूल आले असते. तेंव्हा त्या मदतीला १००% मदत असे म्हणता आले असते. पण ईथे मात्र १२+ किलो तांदूळ मिळायचे. या मिळालेल्या १२ किलो तांदळाचे बाजारभावानुसार मुल्यांकन केल्यास प्रत्यक्ष मदत ही १२० रुपयाची ठरते. म्हणजे कोणीतरी दानशूर देतो १००रु. पण प्रत्यक्ष मदत पोहचते १२० रुपयाची. हा चमत्कार फक्त आणि फक्त आर. एस. एस. मध्येच घडतो. अगदी भाजीपाला घेताना सुद्धा हेच तंत्र वापरले जायचे. अन हा माझा स्वत:चा अनूभव आहे. मी वर दुकानदारांची नावं मुद्दामच दिली. कारण त्या दुकानदरांच्या हातून येणारी मदत रानातला विद्यार्थी घडवत होती. माझे अनेक मित्र व आमच्या रानातील कित्येक पोरं आजही अहेरी व एटापल्लितील या संघातिल वसतीगृहातून शिकत आहेत.
आमच्या अहेरीत तर सगळा कोमटी समाज, म्हणजेच पद्मशाली समाज. चंद्रपुरातही सगळे धनाढ्य लोकं हे पद्मशालीच आहेत. या कोमटी समाजावर संघाचा प्रचंड प्रभाव. गावाकडचे माझे अर्धे मित्र याच समाजातील आहेत. अहेरी व चंद्रपुरच्या मित्राना फोन करुन जेंव्हा चौकशी केली तेंव्हा कळले की कित्येक संघवाले मित्र उतराखंडला धावलेत म्हणे. संघातील अनेक व्यापारी याच(ना-नफा-तोटा) तंत्रानी मदत करतात हे आज परत एकदा कळले. वरुन संघाची शीस्त वाखाण्यान्या सारखी असतेच. मग १०० च १०५ % व्हायला अडचण असतेच कुठे?
असो! संघाची भरपूर स्तूती झाली दिसते. पण काय करु झोडपायचे तिथे झोडपतोच पण जे चांगलं आहे ते चांगलच.
थोडक्यात सांगायचे म्हणजे ईतत्र मदत दिलात तर किती टक्के पोहचेल माहित नाही. पण संघाकडे दिलात तर १०५% नक्कीच पोहचेल याची खात्री बाळगा.
सध्या त्या उत्तरेच्या देवाच्या तावडीत सापडलेल्या लोकांसाठी अनेक जण मदत करताना दिसत आहेत. पण दिलेल्या मदतितील नक्की किती % पोहचणार या बद्दल साशंक आहेत. त्याना एकच सांगणे. मदत द्यायची असेल तर संघाकडे द्या. त्यातून पोहचणारी मदत १००+ असेल याची खात्री बाळगा.

संघाच्या पॅंटला मी नेहमी खाकी चड्डी म्हणून हिनवतो... पण आज मात्र चड्डी नाही तर चक्क पॅंट म्हणावसं वाटतय.

तरी मी कट्टर संघ विरोधीच.
टीप:- भक्त मरत आहेत ही गोष्ट हृदयद्रावकच. पण त्यांच्याबद्दल मला सहानुभूती नाही हे ही तेवढेच खरे.
जयभीम.
***
एम. डी. रामटेके.

नरेंद्र्जी, उत्तम माहिती.
संघाच काम खरच वाखाणण्याजोगं आहे.

अवांतरः रामटेके यांचा फक्त एक तपशिल चुकिचा आहे, "सगळा कोमटी समाज, म्हणजेच पद्मशाली समाज" हा गैरसमज असावा त्यांचा. हे दोन्ही वेगवेगळे.

Pages