एक असतो बनारसी पंडित. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो. त्या मुलाच्या कहाणीवर एक होतकरू दिग्दर्शक चित्रपट काढायचं ठरवतो. त्या चित्रपटातून एक तमिळ सुपरस्टार हिंदीत आगमन करणार असतो. त्याच्या हिंदी उच्चारांवर मेहनत घेऊन त्याचा आणि स्वत:चा अजून एखाद्या चित्रपटासाठीचा वेळ वाया घालविण्यापेक्षा रोलच जरासा 'अॅडजस्ट' करू या की, असं ठरवलं जातं आणि कहाणी अशी बनते की - 'एक असतो 'तमिळ' पंडित. तो बनारसला 'प्रॅक्टिस' करत असतो. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो आणि वगैरे वगैरे'
'बऱ्याच दिवसात मार्केटमध्ये नवा देव आला नाहीये', असा काहीसा संवाद 'OMG' मध्ये आहे. तो ऐकून दिग्दर्शकाची ट्युब पेटली असावी आणि जाणवलं असावं की बऱ्याच दिवसात मार्केटमध्ये नवा 'मजनू' आला नाहीये ! दोन-तीन चांगल्या दर्जाची ठिगळं जोडून एक कहाणी विणली गेली असावी. ही कहाणी ठिगळ बाय ठिगळ उलगडत जाते. सुरुवात होते बनारसमध्ये. तमिळनाडूतून येऊन बनारसमध्ये स्थिरस्थावर झालेल्या एका पंडिताचा द्वाड मुलगा 'कुंदन' (धनुष), बालपणापासूनच 'झोया' (सोनम कपूर)च्या प्रेमात असतो. बालवयातल्या ह्या प्रेमाला स्वत: कुंदन आणि झोयाच्या घरचे फारच सिरिअसली घेतात आणि शोप्याची रवानगी बनारसहून अलिगढ आणि नंतर पुढिल शिक्षणासाठी तिथून दिल्लीला होते.
८-९ वर्षांनी परतलेली झोया बदललेली असते. ती 'अक्रम' (अभय देओल) ची दीवानी झालेली असते. पण कुंदन बदललेला नसतो. तो अजूनही तिच्याच प्रेमात असतोच. मस्त प्रेमत्रिकोण बनतो. पण इतकी कहाणी उलगडते तरी अजून मध्यंतरसुद्धा झालेलं नसतं. आजपर्यंत किती प्रेमत्रिकोण आपण पाहिलेत, ह्याची गणतीसुद्धा अशक्य आहे. पण ही कहाणी केवळ प्रेमत्रिकोण नाहीये. पुढचं एक ठिगळ ह्या कहाणीला एक अनपेक्षित वळण देतं आणि चित्रपटाच्या शेवटापर्यंत ती 'कुठच्या कुठे' जाऊन पोहोचते !
पुढची दोन ठिगळं काय आहेत, हे चित्रपट बघूनच समजून घ्यावं. त्यासाठी फक्त सोनम कपूरला आणि मध्यंतरानंतरच्या धीम्या गतीने भरकटण्याला सहन करावं लागतं. बाकी तसं ह्या चित्रपटात काहीच 'असह्य' नक्कीच नाही.
कुंदनचा मित्र 'मुरारी' (अभिनेत्याचं नाव माहित नाही) जबरदस्त आहे. त्याचे वन लायनर्स हुकमी टाळ्या घेतात, हशा पिकवतात. त्याव्यतिरिक्तही संवाद बऱ्यापैकी खुसखुशीत आहेत. सगळ्याच सपोर्ट कास्टचं काम चोख झालं आहे. अभय देओलला तसं कमी काम असलं तरी त्याचा पडद्यावरचा वावर छाप सोडतोच आणि मुळात मुख्य भूमिकेतील 'धनुष' अगदीच पाप्याचं पितर असल्याने अभय लक्षात राहतो.
धनुषला पाहिल्यावर सुपरस्टार बनण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात, हे समजतं -
१. एखाद्या लार्जर दॅन लाईफ सुपरस्टारला मुलगी असली पाहिजे.
२. तिच्याशी तुमचं लग्न झालं पाहिजे.
बास्स ! झालात तुम्ही सुपरस्टार आणि त्यात हे प्रकरण दाक्षिणात्य असेल तर तुमचं येत्या काही दिवसांत सासऱ्याच्या बाजूला, रामासोबत हनुमानाचं असावं तसं मंदिरही बनू शकेल.
कारण, बाकी कुठलंही, सुपरस्टारच काय पडद्यावर झळकायच्या लायकीचंही लक्षण 'धनुष'मध्ये नाही. त्याची अंगकाठी इतकी बारकी आहे की राजपाल यादवची पर्सनालिटी भारी वाटावी. पंधरा थपडा मारणारी सोनम कपूरच होती म्हणून ठीक, बिपाशासारख्या भक्कम हिरविणीची एक थप्पडही ह्याचा डावा गाल उजवीकडे नेऊ शकेल, असं त्याला पाहून वाटतं. अभिनय म्हणावा, तर 'कुंदन'च्या व्यक्तीरेखेतच दम आहे. त्यात त्याने काही विशेष जीव ओतलाय, अश्यातला भागच नाही. त्याच्याकडे स्टाईल नाही, चेहरा नाही, अंगकाठी नाही, नृत्यकौशल्य नाही; तरी तो हीरो बनला आहे, ही गोष्ट अनेक सडकछाप रोमिओंचं मनोबल निश्चितच उंचावू शकेल.
शोसाठी घरून निघताना, जरासा वेळ होता म्हणून सहज टीव्ही लावला होता तर एका वाहिनीवर दिग्दर्शक आनंद रायची छोटीशी मुलाखत चालू होती. तो सतत 'धनुष सर, धनुष सर' म्हणत होता. दया आली.
'जब तक हैं जान' नंतर नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या रहमानच्या चाहत्यांना रहमान जरासा(च) दिलासा 'रांझणा'तून देतो. 'तुम तक' ही कव्वाली तर मस्तच बनली आहे.
एकंदरीत एकदा(च) पाहण्यास हरकत नसावी, असा हा चित्रपट मी आजपर्यंत पाहिलेल्या सगळ्यात मरतुकड्या सुपरस्टारला हिंदीत आणतो आहे. इथल्या बलदंड बैलांच्या गर्दीत, हे कुपोषित कोकरू टिकेल का हे काळच सांगेल !!
रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/raanjhnaa-movie-review.html
अरे बाप रे! लोक मला फारच
अरे बाप रे! लोक मला फारच सिरिअसली घ्यायला लागले आहेत !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धनुष इतर हिरोंसारखा नाही, त्याला चेहरा नाही, अंगकाठी नाही; ह्यासाठी मला आवडला नाही असे नाही. हे नसलेले अनेक अभिनेते झालेत की ! मला रघुवीर यादव, नवाझुद्दीन, सुद्धा आवडतात. पण त्यांच्याकडे असलेलं कसब मला धनुषमध्ये नाही दिसलं! कदाचित माझ्याकडे हीरा पारखणार्या जवाहिर्याची नजर नसेल. कदाचित काय, नाहीच आहे !
असो....!!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्या तर जाम डोक्यात गेला.. अजिबातच नाही पटला.
चित्रपट नाही पाहिला, पण सगळीच
चित्रपट नाही पाहिला, पण सगळीच गाणी जाम आवडलीत. गीत आणि संगीत आवडेश.
धनुअषला अभिनयासाठीचं
धनुअषला अभिनयासाठीचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे.>>>
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
आणि सैफला पद्मश्री
'देव-डी' ला संगीताचं राष्ट्रीय पारितोषिक मिळू शकतं, तर धनुषला अभिनयाचं न मिळायला काय!>>
नाय तर काय!!!!!
देव-डी च्या संगीताला काही
देव-डी च्या संगीताला काही बोलायचं काम नाही! अमित त्रिवेदी म हा न आहे.
चित्रपट नाही पाहिला, पण सगळीच
चित्रपट नाही पाहिला, पण सगळीच गाणी जाम आवडलीत. गीत आणि संगीत आवडेश.>>>>>+१००००![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नताशा +११
नताशा +११
अमित त्रिवेदी ची एम टीव्ही
अमित त्रिवेदी ची एम टीव्ही कोक स्टुडिओतली गाणी ऐका. तूनळी वरही आहेत. विंग्लिश इंग्लिश मधलं नवराई... त्याचंच आहे. मास्टर ऑफ फ्युजन....
अमित त्रिवेदी इज अ क्लास
अमित त्रिवेदी इज अ क्लास अॅक्ट..
आमिर, वेक अप सिडमधलं एकतारा, कोकचं 'क्रेझी हूँ..' जिंगल, एक '९९' म्हणून चित्रपट होता त्यातली १-२ गाणी असं बरंच चांगलं काम त्याने केलं आहे.
काल चित्रपट पाहिला.. धनुष ने
काल चित्रपट पाहिला..
धनुष ने जबरदस्त अॅक्टींग केली आहे ..
त्या भुमिके मधे फिट्ट बसला आहे .. स्वदेस चा शाहरुख , लगानचा आमिर जसे हीरो न वाटता ती व्यक्तीरेखा जगत आहेत असे वाटते ..तसाच अभिनय धनुषने केला आहे ..सहज आणि नैसर्गिक वावर आणि कॅमेराची उत्तम जाण या गोष्टी त्याच्या प्लस पाँईट आहेत..
हीरो (नायक) म्हणून माहित नाही ..पण त्याच्यात एका उत्तम अभिनेता होण्याचा पोटेंशियल आहे .
ही बॉलीवुड मधल्या
ही बॉलीवुड मधल्या अॅक्सेंट्ची न्युज
http://www.hindustantimes.com/Entertainment/Bollywood/Bollywood-has-a-ba...
रांझना सिनेमा बघितल्यावर एक
रांझना सिनेमा बघितल्यावर एक गोष्ट लक्षात आली की
.
.
.
.
.
.
.
.
.
" झोया " नावाच्या मुलीवर ज्याने प्रेम केले
त्याच्या चांगल्या आयुष्याची पार वाट लागली....
.
.
.
example
जन्नत...
इशकजादे...
एक था टायगर..
आणि आता रांझना...
उदय
उदय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
उदय ... What a research !!!
उदय ... What a research !!!
'देव-डी' ला संगीताचं
'देव-डी' ला संगीताचं राष्ट्रीय पारितोषिक मिळू शकतं, तर धनुषला अभिनयाचं न मिळायला काय!>>
आणि
अमित त्रिवेदी इज अ क्लास अॅक्ट..>>
हे कॉन्ट्राडिक्शन नाही का?
बाकी चित्रपटाचं परिक्षणही पटलं नाही. वाचूनच कळतंय फार सुपरफिशियल लिहिलंय ते.
>>बास्स ! झालात तुम्ही
>>बास्स ! झालात तुम्ही सुपरस्टार आणि त्यात हे प्रकरण दाक्षिणात्य असेल तर तुमचं येत्या काही दिवसांत सासऱ्याच्या बाजूला, रामासोबत हनुमानाचं असावं तसं मंदिरही बनू शकेल.
कारण, बाकी कुठलंही, सुपरस्टारच काय पडद्यावर झळकायच्या लायकीचंही लक्षण 'धनुष'मध्ये नाही. त्याची अंगकाठी इतकी बारकी आहे की राजपाल यादवची पर्सनालिटी भारी वाटावी. पंधरा थपडा मारणारी सोनम कपूरच होती म्हणून ठीक, बिपाशासारख्या भक्कम हिरविणीची एक थप्पडही ह्याचा डावा गाल उजवीकडे नेऊ शकेल, असं त्याला पाहून वाटतं. अभिनय म्हणावा, तर 'कुंदन'च्या व्यक्तीरेखेतच दम आहे. त्यात त्याने काही विशेष जीव ओतलाय, अश्यातला भागच नाही. त्याच्याकडे स्टाईल नाही, चेहरा नाही, अंगकाठी नाही, नृत्यकौशल्य नाही; तरी तो हीरो बनला आहे, ही गोष्ट अनेक सडकछाप रोमिओंचं मनोबल निश्चितच उंचावू शकेल. <<
पुर्ण थेटरात ह्यावरून सर्वांची चर्चा.....
धनुष हिरोच्या रोजच्या व्यख्या(तगडा जवान, देखणा वगैरे) तरे बरी अँक्टींग करतो.
पिक्चर एकदम बकवास...
सोनम कपूरने बूटीक काढावे.
आयेशा च्या अनुभवाने सोनम बरोबर परत काम नाही करणार म्हणालेला अभय देवोल परत का काम करतो कळले नाही.
एकूणच झुरळासारखा दिसणारा धनुष सोनम समोर कसातरी दिसतो. किंबहुना सोनम नकोच होती ह्या चित्रपटात. जराही अभिनय नाही आलाय.
अख्ख्या बनारस मध्ये तामिळ पंडित इतक्या सहजासहजी शोधून सापडणार नाही असे माझा बनारसी मित्र म्हणतो.
रां़झणा एकदा बघणेबल आहे ,
रां़झणा एकदा बघणेबल आहे , धनुष आणि सोनम दोघांनी चांगलं अॅक्टींग केलय !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धनुष चा वावर अगदी सहज आहे , इतर काही साउथ च्या सुपरस्टार्स सारखं भडक-ओव्हर अॅक्टींग नाही करत हा सुखद धक्का !
सोनम कपुर ऐवजी कोणी दीपिका-कत्रिना-करीना -प्रियां़का नाही घेतल्या ते एक फार बरं ,फार कंटाळा आलाय तेच ते चेहरे बघून !
सोनम कपुर कथेतलं कॅरॅक्टर वाटते , या आधी दिल्ली ६ आणि आयेशा मधेही चांगली वाटली होती!
अभय देओल कमी वेळ दिसणारं मृगजळ आहे , जितका वेळ आहे तितका वेळ डोळे तृप्त होतात
पण स्क्रिन वर न दिसणारा ' ए आर रहमान' असली हिरो आहे सिनेमाचा , त्याच्या म्युझिक विषयी इथे चर्चा कमीच पडेल , ते ' रहमॅनिया' बीबी वर लिहिलय :).
सिनेमाची वातावरण निर्मिती बघताना तनु वेड्स मनु, कायपोछे ची आठवण येत होती!
तनु वेड्स मनु मधे कंगनाच्या मैत्रीणीचं काम केलेली मुलगी यातही आहे, तिचा आणि धनुष चा मित्रं मुरारी यांचाही अभिनय चांगला आहे!
पूर्वी दूरदर्शन वर स्वाभिमान नावाची सिरिअल होती , त्यातल्या कामगारांचा कम्युनिस्ट पुढारी ' एकनाथ' इथे सोनम च्या वडिलांच्या रोल मधे आहे, त्यानेही चांअल काम केलय , कसला गुटगुटीत झालाय अता
स्पॉयकर अॅलर्ट !!!!(ज्यांना सिनेमा अजुन पहायचा आहे त्यांनी वाचु नये
कथानक थोडं 'तेरे नाम' टाइप वाटलं !
मुळात मला अशा ' इष्क मे पागल मजनु' टाईप्स कॅरॅक्टर्स च्या प्रेमकथा नाहीच अपिल होत फारशा .. त्यात ते हिरॉइन साठी एकदा नाही दोनदा हाताची नस कापणे , आयुष्याचं एकमेव ध्येय एखाद्या मुलीच्या प्रेमात काहीही करायची तयारी हे अशा कथा कॅरॅक्टर्स नाही आवडत मला बघायला .
पण जी काही विस्कळीत ताणलेली कथा आहे ती सगळ्यां पात्रांच्या चांगल्या अभिनयामुळे आणि मुख्य म्हणजे रहमान च्या म्युझिक मुळे सुसह्य होते!
इंटर्व्हल नंतर नेतागिरी वगैरे फारच ताणलं कथेला आणी धनुष ला :).
धनुष ची किरकोळ पर्सनॅलिटी, अति सामान्य चेहरा हीच कथेची डिमांड होती , ज्याला मुलगी पटवणे हे अशक्य गोष्ट आहे हीच कॅरॅक्टरची मागणी होती म्हंटल्यावर तिथे कोणी बरा चेहरा चाललाच नसता !
किरकोळ अंगकाठिमुळे तो सुरवातीला हायस्कुल चा पोरगा म्हणून पण सुट होतो !
सुरवातीला दाखवलेली सोनम कपुर शाळेतली नववीची विद्यार्थीनी नाही वाटत पण क्युट दिसते स्कुल युनिफॉर्म मधे , बारावी मधली वगैरे दिसते फार तर!
इन जनरल सगळे कपडे -फॅशन कॅरी करणं चांगलं जमतं तिला , स्कुल युनिफॉर्म , पथनाट्याचा जीन्स- लॉग कुर्ता , पॉलिटीशिअन चा लुक चांगल दिसलय सगळं तिला !
धनुष " अब साला मुड नही है' म्हणतो तो शेवट आवडला मला :).
देव-डी च्या संगीताला काही
देव-डी च्या संगीताला काही बोलायचं काम नाही! अमित त्रिवेदी म हा न आहे. >> +१११. नेहमीचे ठोकळेबाज संगीत नव्हते देव-डी चे, ह्याउलट सिनेमाला पूरक ठरलेय. फार क्वचित वेगळ्य वेगळ्या genres चा मस्त कलायडोस्कोप जमला आहे.
रसप यांचा हा लेख - हा त्यांचा
रसप यांचा हा लेख - हा त्यांचा पेर्सनल मत आहे… कोणाला काय आवडते ( आणि नावडते ) हे कोणीही ठरवू शकत नाही !
सौंदर्याचे प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी आहे… चीन मध्ये सरळ नाकाची व्यक्ती सुंदर थोडीच म्हन्णार …
तसाच अभिनयाचे आहे… कोणाला कोणाचा अभिनय आवडतो ते तुम्ही ठरवू शकत नाही …
नताशा ++ टोटली अग्री !!!!
नताशा ++
टोटली अग्री !!!! परीक्षण अगदीच बकवास आणि सुपेर्फ़ेशिअल !!!
मी तमीळ "थ्री" (तोच तो
मी तमीळ "थ्री" (तोच तो कोलावरी डी वाला) पाहीला होता... त्यातले दोघं आणी यातले दोघं (दिसण्याच्या बाबतीत) मला काहीच फरक जाणवला नाही![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
आधी खुप दिवस मी याला त्याचाच रिमेक समजत होते.
त्यातले दोघं आणी यातले दोघं
त्यातले दोघं आणी यातले दोघं (दिसण्याच्या बाबतीत) मला काहीच फरक जाणवला नाही>>>> त्यातला तो म्हणजे धनुष. तो दोन्ही चित्रपटामध्ये आहेच. थ्री मध्ये श्रुती हासन होती. (daughter of kamal haasan) रांझणा मध्ये सोनम कपूर आहे. (Daughter of Anil Kapoor).
सिनेमाची वातावरण निर्मिती
सिनेमाची वातावरण निर्मिती बघताना तनु वेड्स मनु, कायपोछे ची आठवण येत होती!>>> तनु वेडस् मनु आणि रांझणा एकाच दिग्दर्शकाचे सिनेमे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नंदिनी, ते माहीत आहे ग
नंदिनी, ते माहीत आहे ग मला...
मी म्हणतेय पेहराव सारखाच आहे त्यामुळे मला वाटलेलं की त्याचा हा रिमेक आहे..
इथे ही श्रुती चालली असतीच!
श्रुती हसन ही वाणी गणपतीची
श्रुती हसन ही वाणी गणपतीची की सारिकाची?
चुकीची माहीती असल्याने पोस्ट
चुकीची माहीती असल्याने पोस्ट संपादित![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सारिकाचीच मुलगी आहे ती. चाची
सारिकाचीच मुलगी आहे ती.
चाची ४२०मध्ये तिनेच काम केलं होतं लहान मुलीचं.
प्राची, सारिकाची मुलगी आहे
प्राची, सारिकाची मुलगी आहे ती.
पण चाच४२० मधे ती नव्हती.
हो नंदिनी. ती नव्हती चाची
हो नंदिनी. ती नव्हती चाची ४२०मध्ये.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओह! मग असं का करतात
ओह! मग असं का करतात (हिंदीवाले) लोक्स्स!
त्यांना सारिकाचं नाव नाही का घेता येत ![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
सारीका सारखीच दिसते कि ती(
सारीका सारखीच दिसते कि ती( म्हणूनच चांगली दिसते, कमल हसन लुक्स कमी आहेत ते बरय :). )
Pages