अर्चना :--
मला माहीत आहे सुहास.माझ्यामुळे तुझ्यावर अन्याय झाला आहे.माझ्या सारखं सन्शय घेण्यामुळे तुला तुझी space च मिळाली नाही.तुझ्या आजुबाजुला कुठलीही चांगलीशी मुलगी / बाई दिसली की मला माहीत नाही काय व्हायचं ते!तु माझ्यापासुन दुर जाऊन,त्या मुलीकडे जाशील ही भावना मन बळकाउन टाकायची.मला खुप insecure वाटायचं.मला कळायचं नाही माझं असं विचीत्र वागणं असं वाटतं का तुला? सगळं जाणवायच रे मला.समजायचं.पण मी स्वता: च्या ताब्यात नसायचे. कुठलीतरी विचित्र भावना मला घेरुन टाकायची.खुप खोल खोल--मनाच्या आत आतमला ही जाणिव स्पष्टपणे असायची की मीतुझ्यावर अन्याय करतेय.तुला त्रास होतो आहे माझ्या वागण्याचा. पण--पुन्हा पण.
खुप त्रास व्हायचा मला--माझ्यामुळे तुला त्रास होत आहे याचा.
तुझ्या निखळ, स्वच्छ आयुष्य माझ्या अशा वागण्यामुळे झाकोळुन गेलं होतं. खुपदा वाटे,मीच कुठेतरी लांब निघुन जावं,कोणआलही न सांगता, न कळवता.जिथे तुझा मागमुसही असणार नाही--आणि तुझ्या आयुष्यात माझा!! पण माझ्यासाठी असा निर्णय घेणं अवघड होतं. खुप आवडायचास तु मला.तु माझ्याशिवाय राहु शकतोस हे माहीत होतं मला.पण मी तुझ्या शिवाय राहु शकत नव्हते.दोन्ही बाजुंनी माझ मन मला ओढायचं. कुतरओढ व्हायची माझी खुप.
प्राजु आणि सई होत्या, पण तुझी जागा ते कशी घेणार?
पण हे सगळ मी मुद्दाम करत नव्हते रे.माझा आजार होता तो.
हळुहळु सगळं वाढतच गेलं. माझं मलाच असह्य झालं.खुप कंटाळा आला त्या सगळ्याचा.शेवटी खुप विचार केला आणि तुझ्यापासुन वेगळं व्हायचं ठरवलं. त्याचाही त्रास अर्थातच खुप झाला.पण मला आता काहीतरी निर्णय घ्यायचा होता.तुला तुझं निखळ,स्वच्छ आयुष्य परत द्यायचं होतं मला तुला अजुन अडकवायचं नव्हतं मला.तुझी फरफट माझ्यामुळे होतेय ही भावना मला जाळत होती. मोकळं करायचं ठरवलं--तुला आणि स्वतः ला ही.
पण तुझा चांगुलपणा की,माझा त्रास होतो आहे हे मान्य करुनही माझ्या बद्दल इतर कुठल्याही बाबतीत तु किल्मिष ठेवल नाहीस मनात.माझ्याशी एका मित्रासारखं संबंध ठेवलास. नेहाला पण सांगताना तुझ्या मनात तुठलाही तिरस्कार नसायचा. तुझा रागही "To The Point" व्यक्त व्हायचा. त्यात उगाच नको ती भेसळ नसायची. एकत्र असताना आणि आता वेगळं झाल्यावरही.
तुझ्यासारखा हीरा मी गमावला.. पण जाणुनबुजुन!! अजुन काय बोलणार!! काही माणसांच्या बाबतीत विचित्र गोष्टी घडतात खर्या. माझा तो "संशय घेण्याचा आजारं"--कधी विचारही केला नव्हता मी.
आज मी तुझी माफी मागते आहे--अंहं नेहा थांब जाऊ नकोस. Auocword feel करु नकोस.
सुहास, तुझ्या आयुष्यातला महत्वाचा काळ, महत्वाचे क्षण माझ्यामुळे वाया गेले.तुझ्या आयुष्यातला आनंद माझ्यामुळे हिरावला गेला होता. कारण काहीही असो,कारणीभुत मी ठरले.
माझ्या मनावर खुप ओझं होतं या गोष्टीचं. पण आज मला तुझी क्षमा मागायची आहे.तुझ्या आयुष्यातला गेलेला वेळ मी परत देऊ शकत नाही. पण पुढचं आयुष्य,पुढे येणारा काळ हा तुझ्या आनंदाचा असो,भरभराटीचा असो. मनापासुन वाटतं मला असं.
तु आणि नेहा एकमेकांना एकदम अनुरुप आहात.तुमचा संसार सुखाचा होवो.
मला असं बोलताना बघुन आश्चर्य वाटलं? मला तुझी माफी मागायचीच होती केव्हा न केव्हा.
पण मी हे शहरही सोडायचं ठरवलं आहे. मला त्या अगळ्या आठवणींचा खुप त्रास होतोय. आयुष्य नव्याने सुरु करावसं वाटतंय. माझं काम पुन्हा सुरु करेन. खुप लाम्ब नाही जात आहे मी-- इथेच या शहराबाहेर च्या उपनगरात.
प्राजु आणि सई बद्दल विचार करतो आहेस ना? त्या तुझ्याकडे नेहमीप्रमाणेच दर महीन्याला येतीलच. तु म्हणशील तर रहायलाही पाठवेन.
नेहा, सुहास फक्त तुझाच आहे. All The Best.
अप्रतिम,
अप्रतिम, खुपच सुंदर...!!! प्रत्येकजण वेगवेगळा विचार करतो, प्रत्येकाची बाजू खुप छान मांडलेली आहेस..
-- अश्विनि
रमणी,विशाल,
रमणी,विशाल,राजकुमारी,अश्विनी,
मनापासुन धन्यवाद.
अनघा
खूप सुंदर
खूप सुंदर कथा आहे..मी सगळी एकदम वाचली..खरोखर प्रत्येकजण किती वेगळा विचार करत असतो ना...मस्त..
खुप छान!!
खुप छान!! एका नेहमिच्या वाट्णार्या विषयाला वेगळा फील दिलाय!
फुलराणी
अनघा, सगळे
अनघा, सगळे भाग वाचले. फार छान लिहिले आहे. काही प्रसंग सांगून व्यक्तिमत्वे फुलवली असती तर सोनपे सुहागा!
संशयाचा
संशयाचा आजार. फारच संक्षिप्त लिहीली आहे कथा, परंतु छान विषय.
खरे तर हेच
खरे तर हेच आपल्याला जमले पाहिजे.. प्रत्येक प्रसंगात दुसर्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहणं... मस्त कथा!!
सगळ्यांना
सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद.
अनघा
संशयाने
संशयाने संपुर्ण आयुष्य उदध्वस्त होतात..... संशयी स्वभावाला ऑषधच नसते..... असते ते संशयी माणसाला स्वतःला आत्म-साक्षात्कार होण्याचे...... छान कथा..... कल्पना....
अनु, सो
अनु,
सो सॉरी, खूप उशिरा देतेय अभिप्राय. कथा मला खूप आवडली. एका दमात वाचून काढली. रिसेन्टली मी एक कादंबरी वाचली व्हिकी बाम ची 'मेन नेव्हर नो' म्हणून. त्याचीच आठवण आली तुझी कथा वाचताना.
If there is a way, I will
If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.
अनघा छान
अनघा छान कथा..
अनघा.. ही
अनघा.. ही कथा ही खुप छान मांडली आहेस ....आणि विषय ही.