लहानपणीचे खेळ

Submitted by योडी on 3 June, 2009 - 01:41

खेळाशिवाय लहानपण?? कल्पनाच करवत नाही ना!! तर आपण लहानपणी जे खेळ खेळायचो ते इथे लिहा. शक्य असल्यास कसे खेळायचे ते लिहीलत तर उत्तमच.. Happy

आणखी एक नॉस्टॅल्जिया
http://www.maayboli.com/node/8242

गुलमोहर: 

सतिश आता त्या नोटा जरा जाड च येतात , मि गेल्या महिन्यातच आणला नवा व्यापार लेकि साठि! खरच मजा यायचि खेळताना, वेळ कसा जायचा कळायच नाहि!

************************

नको ओढ लावुन घेउ उन्हाची ,जसे पारधि हे तसे तीर टोची
पिसामागुनि ग पिसे दग्ध होति, भररि परि मृत्तिकेशीच अंती

हो आता काही काही खेळात प्लास्टीकच्या नोटा येतात. पण त्यात ती मजा नाही जी पुठ्ठा चिकटवलेल्या नोटेत होती..
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235

आय बिना, सिबा बिना, बिग बॉय, लेडिज गर्ल, स्टॅच्यू - याला तरी कुठे काय अर्थ होता? Proud

जिजाजि...
कभी उपर,
कभी निचे,
कभी उलटा,
कभी सुलटा,
कभी उ,
कभी ऊ,
कभी आ,

असे खेळायचो.. याला तरी कुठे काही अर्थ आहे?
०------------------------------------------०
आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका!!!

नवा व्यापारी ... खेळात ... मरिन ड्राइव चर्चगेट असे बरेच नावे होती ..लहान्पण नासिक ला गेले असल्याने सुरवातीला ह्या नावांच इतक कुतुहल होत मला .. जणु परदेशातले नावे ऐकत आहोत :d

यो मस्त बाफ!
त्या आय बिना सारखं आणखी एक गाणं,
वन डे एके दिवशी
फॉक्स आणि कोल्हा
गार्ड्न बागेत फिरायला गेले
रिव्हर नदिचे वॉटराचे पाणी
ड्रिंकाची पिणी
अ‍ॅट होम घरामधे
परतची आला आला आला

इथे लिहिलेले बहुतेक सगळे खेळ मी खेळलेय. काय मज्जा होती नां त्या खेळांत!
_______________________________
"शापादपि शरादपि"

दहाची गल, सत्तरची गल, ऐंशीचा ठोका, नव्वदची गल, शंभरचा ठोका >>> ऊपास अगदी अगदी. आम्ही पण गोट्या खेळायचो. हा सगळ्यात बेसिक आहे मला वाटतं. मला येवढा एकच खेळ यायचा.

ठिक्करला काही मैत्रिणी बित्तु म्हणायच्या. आम्ही आपापली लकी ठिक्कर जीवाच्या करारानी जपत असू. Happy
_______________________________
"शापादपि शरादपि"

हा बी बी नुसता वाचतेय. परत लहान झाल्यासारखं वाटतय. मी कालचे कंप्युटरवरून मोनोपॉली डाओनलोड केला. पण लहानपणीचे मित्र मैत्रिणी कुठून आणणार?

या सर्व खेळाबरोबरच उन्हळ्याच्या सुट्टीत सायकल घेऊन करवंदं शोधायला जाणे. झरी विनायकाच्या समुद्रावर खेळायला जाणे. दिवाळीच्या सुट्टीत किल्ला करताना स्वतः धारातीर्थी झाल्यासारखे मातीत माखून घेणे... रात्री लाईट गेल्यावर खेळायची अंताक्षरी. त्या बंदूकीने उडवायच्या टिकल्या. घर घर खेळताना आई झोपलेली असताना हळूच किचनमधून पळवलेला खाऊ.

छ्य्या... असलं बरंच काय काय आठवायला लागलं की स्क्रीन धूसर का होतो कळत नाही.

--------------
नंदिनी
--------------

आमि की नै, ल्हानपणि ना? खेळायचो
खुप खेळायचो
तर काय करायच? पानपट्टीच्या बाजुला, यस्टीस्टॅण्डवर अन रस्त्याने जाता येता, सिगारेटीन्ची रिकामी पाकिटे जमा करायची, जास्त करुन चारमिनार, बर्कले, हनिड्यू अशी मिळत! Happy
त्या प्रत्येक पाकीटाला ठराविक किम्मत असे, म्हणजे चारमिनारची दहा, तर बर्कलेची वीस, हनिड्यूची पन्नास, अजुन वेगळेच मिळाले तर अजुन जास्त
मग काय, रन्गित जाड पट्या घेऊन आम्ही एक चौरस चकती विणायचो, तिची एक बाजू रन्गीत तर दुसरी सफेद, अन मग ती हातात झाकून धरायची, समोरच्याने चीत की पट ते सान्गायचे, अन किती रक्कम लावतो ते सान्गायचे, चीत म्हणजे रन्गित, पट म्हणजे पान्ढरी बाजू, अन ती चकती अशी भिरकावुन टाकायची, सान्गितल्याप्रमाणे आले तर भिरकावणार्‍याला तेवढी पाकिटे द्यावी लागायची, नाही आले तर भिरकावणारा घ्यायचा!
असे तासचे तास खेळायचो
एकदा आईला हे कळले
यालाच जुगार म्हणतात असे तिने सान्गितले, अर्थात कान उपटत!
तेव्हापासून ते बन्द झालेच, शिवाय माझा जिन्कलेल्या पाकिटान्चा स्टॉक देखिल फेकुन देण्यात आला

हिंगाच्या डब्याच्या झाकणांचे तराजु बनवायचो ...

>> मी सुद्धा आगपेट्यांचे वरची चित्र जमा करण्याच्या छंदाच्या नादात कुठे कुठे
मी पण्..मी पण Happy रेल्वेस्टेशन वर पण भटकलोय यासाठी...
आणि हे सगळे एका खराब वहीत चिटकवून ठेवायचे Happy

अजून काही लहानपणीचे खेळ
१. गोट्या
२. चिंचोके
३. चिन्नी-दांडू [विटी-दांडू]
४. सूरपारंब्या
५. ताकतुंबा - घरातल्याच ४ कोपर्‍यात उभे राहयचे नी ज्याच्यावर डाव्/राज्य असेल त्याने हाताने नागोबा करत यायचे नी म्हणायचे ताकतुंबा. यावर कोपर्‍यातल्याने "त्या घरी जा" म्हणून लांब पाठवायचे नी मग २ कोपर्‍यातल्यांनी तेवढ्यातल्या तेवढ्यात जागा बदलायची... बदलताना पकडले तर आऊट
६. बिट्ट्या [ते वर टाकून काही काही म्हणून झेलायचा खेळ]
७. जिबली [ते खापराचा तुकडा टाकून लंगडी घालून जाणे]
८. राज्-वश्टर [दगडी वश्टर चा खेळ]
याचे गाणे पण मस्त होते..असे काहीतरी
एकलम खाजे, दुबीक राजे,
तिरान गोजे, चौकी चौकडा
पंचक पांडव, सय्या दांडव,
...
नव्व्यान्नव किल्ले, दश्शी गोंडा...

वर कुठेतरी बिल्ल्याचा उल्लेख झाला हे
आम्ही काय करायचो की सॉफ्टड्रिन्कच्या बाटलीची झाकणे आणायचो मिळवुन! हातोड्याने ठोकून त्यान्ची पसरट चकती करायचो
मग खिळ्याने मध्यभागी जवळ जवळ शेजारी दोन भोके पाडायचो
दोन्ही भोकातून पुड्याचा दोरा लाम्ब ओवुन टोकान्ना गाठ मारायचो, म्हणजे दोन हातानी दोर्‍याची टोके धरलि ताणून, की दोन्ही दोरे ओवले गेल्याने मध्यभागी चकती लटकत असायची उभी
मग एके दिशेला दोन्ही हातानी झोक देवुन फिरवून पीळ द्यायचो, पुरेसा पीळ बसल्यावर दोन्ही दोरे हातात धरून ताणले की ती चकती वेगाने फिरु लागे, एक बाजुने फिरता फिरता पीळ सम्पला तरी वेगामुळे दुसर्‍या दिशेने पीळ बसे, पुन्हा फिरे, पुन्हा पीळ बसे, असे बरेच वेळा होत असे! Happy
नन्तर कोणी तरी त्यातला धोका सान्गितल्यावर ते खेळणे बन्द केले (धोका म्हनजे दोरा तुटला, तर धारदार बनलेली चकती उडून कशातही खुपसली जाऊ शकते)

आमच्याकडे अश्या गोळ्या मिळायच्या २५ पैशाने एक अशी. खेळुन झालं की खाऊन टाकायची.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.

http://www.maayboli.com/node/8242 इथे जा आणि आपले अनुभव शेअर करा.

१. लगोरी
२. शेकटा-शेकटी [प्लास्टीक्/रबरी चेंडूने एकमेकाना मारणे]
३. पाणी घालणे म्हणून एक होता - एकाने दुसर्‍यासमोर हात एकमेकांवर चोळायचे नी दुसर्‍याने त्या हातावर मारायचे, हुकला तर दुसर्‍याने पहिल्यासमोर करायचे
४. काचाकवड्या
५. व्यापार खेळताना मुंबईतली नावे पाहून मज्जा यायची... [मुंबादेवी आणि जेल पण असायचे :)]
६. अजून एकाचे नाव मला आठवत नाहिये - असा होता तो खेळ - आधी एकाने ज्याच्यावर राज्य असेल त्याने बसायचे मग बाकिच्यानी उड्या मारून जायचे मग त्याने हळूहळू १-१ वितीने उंच होत जायचे नी बाकिच्यानी उड्या मारायच्या... हे करताना एकदा एका मित्राचा हात मोडला होता

कांदाफोडी रे कवड्या..
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.

http://www.maayboli.com/node/8242 इथे जा आणि आपले अनुभव शेअर करा.

नंदिनी खरच ग धुसर होत पुढच वाचताना. मी काय वेगळ लिहीणार मी पण हेच सगळ खेळायचे.
माझी लेक पण ह्यातल्या बर्‍याच गोष्टी खेळते. तिचीही अशी खास गाणी आहेत निरर्थक वाटणारी. पण ती निरर्थक कशी ती गाणी तिच बालपण आहेत ना Happy

पूर्वी लहान मुली भोन्डल्याची गाणी म्हणत त्यांचा एक बी बी होता का ? ती गाणी मजेशिर असायची.

पण लहानपणीचे मित्र मैत्रिणी कुठून आणणार? >>>>
अगं नंदे, आत्ता इथे या बाफ वर जमलोत ना आपण लहानच होवून. शक्य झालं तर बघ आमच्यात तसं कुणी दिसतंय का Happy

मी तर कट्टा बाफवर छोटी पोर होवूनच जाते आणि तो निरागस निरर्थकपणा शोधत रहाते. कुणी मोठं होवून तिथे येतंय वाटलं तर फुगून बसते Proud

************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |

>>नवा व्यापारी ... खेळात ... मरिन ड्राइव चर्चगेट असे बरेच नावे होती ..लहान्पण नासिक ला गेले असल्याने सुरवातीला ह्या नावांच इतक कुतुहल होत मला .. जणु परदेशातले नावे ऐकत आहोत हाहा
अगदी अगदी. सगळी नावे अजुनही आठवतात. क्रॉफर्ड मार्केट, फ्लोरा फाऊंटन, फोर्ट, जुहू.... भायखळा म्हन्जे एका वाघाचे गजाआड चित्र होते :).
मुंबई माहिती नव्हते तेंव्हा, पण सगळ्या भागांची नावे मात्र पाठ. Happy
योगिता, तू एक महान कार्य केले आहेस बाई हा धागा उघडून. त्रिवार धन्स.
बाकी ह्यातले बहुदा सगळ्यांनी सगळे खेळ खेळले आहेत वेगवेगळ्या नावांनी. सगळ्या जगाच्या पाठीवर पसरलेल्या मायबोलीकरांना नोस्टॅल्जिक करणारा टॉपिक.
टँप्लिज, नॉटॅठोम सगळे सगळे मी ही करायचे :). माझा चुलतभाऊ कुठेतरी नवीन शब्द 'जस्ट अ मिनीट' आईकून आला (टाइम प्लिज ला) आम्ही सगळे त्याचे अनुकरण करत 'जस्टमिनी' हा शब्द पुढे खूप दिवस वापरायचो. Happy
कोपरा पाणी कोणी खेळायचे का? त्याचा उल्लेख माझा मिस झाला.

ए हा बीबी अफलातून आहे! सगळं सगळं आठवलं!
एका वविला-जीटीजीला असे खेळ खेळू ना? आय होप मी असेन त्याला... Happy

www.bhagyashree.co.cc

लहाणपणीचे खेळ !
मी जास्त करुन गोट्या खेळायचो अन जमवायचो , दर वेळेला एका नविन जोडीदाराबरोबर पाती असायची Happy एकदा असेच एकावर राज्य आले , तीन ढांगा टाकून त्याने गोटी ठेवायची अन मग नेम धरुन ती गोटी मारायची असाच काहीतरी खेळ होता तो .. त्याला जवळपास दीड किमी फिरवला आम्ही , तो वैतागून गेला अन आम्हाला मुद्दामून जिथे कंस्ट्रक्शन चे काम चालू आहे तिथे घेउन गेला, बरेच खिळे ,काचा पडलेले होते पण तो वैतागलेला होता त्याला वाटत होतं की अडचणीत नेलं तर आपण सुटू म्हणून , अशीच तिसरी ढांग टाकली अन त्याचा तळपाय अर्धा चिरला ... त्यानंतर ज्या काय शिव्या खाल्ल्या होत्या मी .. बाप रे !!
मामा सिव्हील काँट्रॅक्टर होता त्यामूळे बरेच मटेरियल घरी पडून असायचे , एकदा चौकटी अशाच रचून ठेवल्या होत्या एकावर एक , त्यांना बिजागरी वगैरे लावलेल्या होत्या , त्यावरुन चौकोनी फिरायचा एक खेळ काढला होता शोधून , अन नेमका त्या बिजागरी जवळ आलो की पाय घसरला , अन पाय चिरला , रक्त गेलं खूप पण ते मी घरात तीन - चार दिवस कोणालाच सांगितलं नाही. मग सणकून ताप आला , जखम चिघळली , मग एक महिना आरामच ! Proud
गोट्या जमवून , ते एका फुटक्या फुटबॉल मधे साठवून ठेवल्या होत्या मामे भावाला सापडू नये म्हणून लपवून. पलंगाखाली . एकदा लहान मामा आला होता अन तो फुटबॉल चुकून मी समोरच ठेवला होता त्याला वाटले फुटबॉलच आहे असे समजून त्याने जोरात लाथ मारली त्यावर ... Lol त्याने रागाने मी साठवलेल्या सगळ्या गोट्या नालीत फेकून दिल्या .

अजून असेच उन्हाळ्यातला फेवरेट गेम म्हणजे कोया खेळणे . उन्हाळ्यात एकही दिवस असा नसायचा की आमरस नाही .. मग आमरस केल्यानंतर ज्या कोया निघतात त्या खेळायला घ्यायच्या अन त्या जमवायच्या . आणि उन्हाळा सरत आला की त्या फोडून मधलं बी विकायचं किलो नी ., त्याचे २-३ रु. किलो नी पैसे मिळायचे . जास्तीत जास्त १० रु. व्हायचे Proud पण तेच मला माझे कमवलेले पैसे आहेत असं वाटायचं मग मी त्याचं बहीणी साठी काहीतरी घेउन यायचो . नकली कानातलं किंवा असच काही.

आम्ही सगळे मित्र कंपनी उन्हाळ्यात वार्षिक परिक्षेत आमच्या मामाच्या गच्चीवर आभ्यास करत असू. दोन मजली घर होते मामाचे , आम्हाला गच्चीवर सोडून , मधून दार लावून घ्यायचे , मग पंचाइत याय्ची ती आमच्या ईंटरवलची . पण आमच्या एका हुशार मित्राने ती सोय पण केली . त्याने काचेच्या बाटल्या आणून ठेवल्या होत्या , ज्याला सुसु आली त्याने त्या बाटलीत कराय्ची. Proud अन मग सकाळी खाली नेऊन ती बाटलीच फेकून द्यायची . असं . पण एके दिवशी आम्ही विसरलो ती बाटली टाकून द्यायची . अन एका मित्राचा भाऊ आम्ही नेमकं कसा आभ्यास करतो ते बघायला आला होता , तेंव्हा आम्ही गच्चीवरच क्रिकेट(!) खेळत होतो , म्हणजे छोटे छोटे खडे बॉल झाले होते आणि आम्ही रजिस्टर ची बॅट केली होती .
आम्ही ४-५ जण होतो पैकी दोघेच हे खेळत होतो . तो मित्राचा भाऊ म्हणाला मी बॅटींग करतो तू खडे फेक . अन स्टंप म्हनून त्या भरलेल्या बाटल्या Lol उन्हाळ्यात दिवसभर उन्हाने तडकलेल्या त्या बाटल्या Proud त्याचा नेम हुकला अन एक खडा टचकन त्या बाटलीला लागला , ती बाटली तडकली अन फव्वारा सगळा त्याच्या अंगावर Lol आम्ही इतके हसलो होतो की बास्स . नंतर कधीच तो आम्ही कसा आभ्यास करतो हे पाहाय्ला आला नाही . अजूनही भेटला कधी तर रस्ता वळवून जातो . Proud

क्रिकेट आई उन्हात खेळू द्यायची नाही . मग कॅरम,पत्ते, संध्याकाळी बॅडमिंटन खेळ्णे , खोखो ची टीम झाली होती वर्गात छान. मग जो हरेल त्याच्याकडून उसाचा रस किंवा आइसक्रीम . आणि संध्याकाळी नेमाने शाखा Happy तिथे ' आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना ' म्हणताना फार जोर लावून म्हणायचो आम्ही , प्रा.खिरे हे तिथे शिक्षक होते आमचे , बरेच खेळ खेळायचो तिथेही .

आता सगळं आठवलं की वाटतं परत त्याच काळात जाता आलं तर .... काहीच विचार , चिंता नव्हती तेंव्हा . बॉस काय म्हणेल ? अप्रेजल व्यवस्थित होइल की नाही ? आजचं प्रेजेंटेशन कसं होइल ? ही प्रोजेक्ट ची एवढी जबाबदारी टाकली आहे , ती मी व्यवस्थित पार पाडू शकेल की नाही ? घर आणि नौकरी ह्या दोन्ही फ्रंट वर लढता लढता सगळं विसरुन जायला होतं आणि आपण धावतच राह्तो पुढे पुढे , कधी आठवण कुणी काढलीच तर तेवढच नॉस्टेलजिक होत मन . धन्यवाद योगिता हा काढल्याबद्दल Happy

-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

>>मी तर कट्टा बाफवर छोटी पोर होवूनच जाते आणि तो निरागस निरर्थकपणा
मी पण... Lol

>>पूर्वी लहान मुली भोन्डल्याची गाणी म्हणत
हो, ती गाणी पण मस्त होती... आम्ही लहान असताना, त्या मुलींच्या मध्ये, जिथे तो पाटावर्/कागदावर हत्ती काढला असतो तिथे जाऊन उभे रहायचो...
मला अजूनही त्यातली बरीच गाणी आठवतात...

उन्हाळ्यात पाली फार होतात....! सुट्टी लागली की आमची रवानगी राहुरीहुन धुळ्याला व्हायची! धुळ्याला उन्हाळा खुप..तिकडे गेले की चुलतबहिणींनी सांगितले... भिंतीवर 'कांची नरदचा राजा' किंवा 'अगस्ती मुनी' लिहिले की त्या भिंतीवर पाल येत नाही म्हणुन! मग काय सगळ्या भिंती आम्ही भरुन ठेवल्या!

गंमत म्हणजे, इथे पुण्यात मागच्या महिन्यात, पाली होउ नये म्हणुन औषध आणायला गेले तर चक्क मेडीकल स्टोअर्स वाला म्हणाला की 'कांची नरदचा राजा' अस लिहा भिंतीवर ! Happy

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

नयने परत घोळ घातलास ना बीबीचा..
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.

http://www.maayboli.com/node/8242 इथे जा आणि आपले अनुभव शेअर करा.

ही: ही: ही: Proud

ए म्हन्जे क्वॉय..! हा पण एक खेळच होता ना आमचा! ( ही म्हन्जे उगीचच सारवासारव! )

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

माझ्या आजोळी चिपळूणला पण सगळीकडे "कांची नरद राजा" लिहिलेलं असायचं Proud
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |

लहानपणी आम्ही गारेगारच्या काड्या साठवून ठेवायचो. एक छोटा चौकोनी कापडाचा तुकडा घेऊन त्यात मध्यावर चिन्ध्या भरून त्याचा साधारण गोटीएव्हढा आकार झाला की तिथे ते बांधून टाकायचो. आणि ते त्या गारेगारच्या काडीत अडकवायचो. अशा पद्धतीने कितीतरी तशी कॅरेक्टर्स बनवून मिशा, पांढरे केस, काढायचो, एक नवरा, नवरी बनवून त्यांचं लग्न लावयचो. पालखि, वगैरे पण करायचो.

योगे ह्यातले बरचसे खेळ आम्हि खेळायचो , मि वेगळ अस काय लिहणार , नुस्ती वाचते आणि लहानपण आठवुन निदान ते लहानपणि दिवस पुन्हा जगायला परत माणसाचा जन्म मिळाव अस मनात म्हणते.
तो निरागस पणा कुठे हरवला कुणास ठाउक!

************************

नको ओढ लावुन घेउ उन्हाची ,जसे पारधि हे तसे तीर टोची
पिसामागुनि ग पिसे दग्ध होति, भररि परि मृत्तिकेशीच अंती

वा मस्त. मजा आली.
आमच्या बिल्डींगमधे लहानपणी घर घर खेळताना आई कोण होणार यावरून वादंग असायचा. प्रत्येकीला आईच व्हायचं असायचं. मग जिच्या घरात ती आई, जिचा खेळ ती आई, जिच्या हातात काचेच्या बांगड्या ती आई असे काहीही आयत्यावेळचे नियम काढले जात. आमच्यात खेळायला आमच्याबरोबर २ मित्र होते भाउ भाउच. लहान अगदीच गुंडुला दिसायचा त्यामुळे तो कायमच मुलगा आणि मोठा भाऊ कायमच बाबा असायचा. आया नी मुली बदलायच्या. हे बाबा आणि मुलगा लोक होते जाम निरूपद्रवी. ३ चुरमुर्‍यांचं जेवण झालं की झोपायचे, रिकाम्या कपातला काल्पनिक चहा प्यायचे आणि बाहेर जायचे.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

आम्ही एक भयंकर उपद्रवी खेळ खेळायचो! स्ट्रॉ घ्यायची आणि त्याच्या एक टोकाला मूग अडकवायचा. आणि एखाद्या माणसाच्या समोर जाऊन दुसर्‍या टोकाने जोरात फुंकर मारायची. इतक सणकन लागतो तो मूग! मग हे घरी कळलं की संपलंच! Happy
======================================
पाचूच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा

Pages