Submitted by योडी on 3 June, 2009 - 01:41
खेळाशिवाय लहानपण?? कल्पनाच करवत नाही ना!! तर आपण लहानपणी जे खेळ खेळायचो ते इथे लिहा. शक्य असल्यास कसे खेळायचे ते लिहीलत तर उत्तमच..
आणखी एक नॉस्टॅल्जिया
http://www.maayboli.com/node/8242
गुलमोहर:
शेअर करा
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/8242
अरे इथे ही जा ना जरा..
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235
आणि
आणि रुमालपाणी राहिलंच की!
======================================
पाचूच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
वा वा
वा वा सगळेच खेळ आले की... ठिक्करबिल्ला म्हणायचो आम्ही त्याला..

अन ते पाय जुळवून पाणी भरायचा खेळ? सटासट मारायला संधी..
योगिता_डीअ
योगिता_डीअर,
मस्त बीबी काढलास गं. छान वाटलं वरची सगळी पोस्टं वाचून.
मी आधी लिहिलेलं हे ब्लॉगपोस्ट आठवलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.
घरी जाऊन
घरी जाऊन लिहावे आता या बाफवर, मस्त बाफ
सहीच बीबी
सहीच बीबी उघडलाय.. एकदम म्हणजे एकदम नॉस्टेलजिक..
तासन तास बसून नेमची प्रॅक्टीस करायचो.. बोट दुखेस्तोवर आणि मग घरच्यांची बोलणी.. गुपचूप घरातल्या फरश्या घासून फोडल्या होत्या गल बनवण्यासाठी.. 
इतर खेळ होतेच पण गोट्यां म्हणजे खास.. आमचे टीपीकल खेळ गोट्यांमधले -- घड्याऴ, गोटीनेम, अल्लख, पोपो, राजा-राणी, दहा-वीस..
दहाची गल, सत्तरची गल, ऐंशीचा ठोका, नव्वदची गल, शंभरचा ठोका.. आणि मग तीन पायी पिदा
अहाहा रम्य ते बालपण.. हात शिवशिवायला लागले. .अजूनही गेलो सुट्टीत आणि चुकून कोणी खेळत असलं (अगदीच दुरापास्त झालय हे ह्या टीव्ही/ काँप्युटरच्या युगात) की पांढरा गठ्ठा हातात घेऊन खेळतोच.. अगदी गल्लीतल्या रस्त्यावर बसून..
मस्त मजा
मस्त मजा वाटली सगळ्या जुन्या खेळांची उजळणी बघून.
आम्ही 'इलॅस्टीक' नावाचा वेडबंबु खेळ पण खेळायचो. ४-५ फूट दूर उभ्या असलेल्या दोन मुलींच्या पायातून ते घालायचं आणि दणादणा उड्या मारायच्या त्या लूपमधून! जेमतेम साडेचार फुटी जीव पण जमिनीपासून ३-४ फूट उंचीवर असलेल्या इलॅस्टिक बँडवरून जीव खाऊन उड्या मारायचा प्रयत्न करायचो. मस्त मज्जा!
शाळा शाळा, घर घर ह्या खेळांमधे कधीकधी मुलांना खेळु द्यायचो. पण घर घर खेळताना झाडाची पानं आणि विटेच्या चुर्याऐवजी शेंगदाणे, गूळ, खोबरं असं काही मिळालं की मग त्यांना हाकलून लावायचो. (थोडक्यात लै हलकट!)
यो, नादखुळा
यो,
नादखुळा बीबी...लय लय भारी....
निवांत लिहितो....
नयने, तुला कोल्हापुर्/सांगली कडचे बरेच खेळ कसे काय माहीत आहेत?
तुम्ही
तुम्ही कोणी काठी-पाणी खेळायचा नाहीत का? खूप म्हणजे खूप धमाल यायची. एखाद्याला ठरवून पिदवायचो
मुलांसोबत क्रिकेट खेळतानाचा कट्-रन्स हा प्रकार पण खूप फेमस होता. तो पण, दिवाळीच्या सुट्टीत भर दुपारी आया बाहेर खेळू द्यायच्या नाहीत म्हणून सोसायटीच्या ग्राउंड फ्लोअरच्या पॅसेज मधे (इलेक्ट्रिक बोर्डाजवळ) खेळायचा
जितकी कमी जागा तितका हा खेळ रंगायचा!
पहीला पाऊस पडला की सोसायटीतल्या कंपाऊंडमधे फूट्बॉल प्रेमाला उधाण यायचं
गोल झाला की पोरं टी शर्ट वगैरे वर करून नाचायची 
बाकी इपी टीपी टीप टॉप, शिवाजी सांगतो, आबाधुबी, लगोरी, सोनसाखळी, खांबखांब खांबोळी, विषामृत, डब्बाऐसपैस हे पण होतेच
आयला !
आयला ! एक्दम धम्माल बाफ..

घर घर खेळायला लांब दांडिच्या छत्र्या उघडुन त्याच्यावर बेडशिटा ,चादरि अशा गोश्टि टाकुन घर बनवायची किंवा कॉटवर लोंबणार्या चादरी,साड्या टाकुन कॉटखाली खेळायचे.
काचा,टिक्कर-टिक्कर, लगोरि, उभा खो-खो...
भातुकली तर एक्दम भारी दाणे फोडुन गुळ घालुन परत जोडायचे कि झाले लाडु, चिंचेचा कोवळा पाला ही भाजि, चुरमुरे लाटुन त्याच्या पोळ्या.:)
प्राजक्ता,
प्राजक्ता, घर घर चं वर्णन एकदम पर्फेक्ट!
तसच उश्या उभ्या लावून सुध्दा घर करायचो.
व्वा मज्जा
व्वा मज्जा आली वाचुन.
"
पावसाळ्यात आम्ही (लोखंडी)गजपानी खेळायचो. एक छोटा (फुट्-दीड फुट) लोखंडी तुकडा घ्यायचा आणि एक वर्तुळाकार घरात (मारून)घुसवायचा. ज्याचा गज न घुसता खाली पडायचा त्याच्यावर राज (राज्य??). मग बाकिच्यानी तो गज घुसवत-घुसवत अगदी गावाच्या बाहेर न्यायचा, आणि जेथे सर्वांचा गज खाली पडेल, तेथुन त्याने लंगडी घालत घरापर्यंत यायचे. लंगडी घालत असतांना बाकीची पोर ओरडायची "लंगडी लंगडी लक लक, अंडे देती पकपक
आणखी एक खेळ- चांदण्यापानी,
दोन गट पाडायचे आणि त्यांना घराचे दोना भाग वाटुन द्यायचे, मग प्रत्येक गट आपापल्या भागात लेखनी/खडु ने चांदण्या काढायच्या, मग त्या कशावरही काढा डब्यावर, दारावर्,खिडक्यान्च्या झापड्यावर वा मडक्यावर. मग ठराविक वेळेनंतर, प्रत्येक गटाने विरोधी गटाच्या भागात जाउन चांदण्या
सापडायच्या आणि फुली मारायची. ज्या गटाकडे जास्त चांदण्या शिल्लक राहतील तो गट जिंकला
कितीतरी
कितीतरी खेळ आठवले लहानपणी खेळत असू ते.
विषामृत, लंडन लंडन, पकडापकडी, दगड का माती, लगोरी, टिपरी, लपाछपी, दोरीवरच्या उड्या.. कितीतरी खेळ. आमच्या शेजार्यांकडे जुने टायर्स होते त्यांच्या गाडीचे. मग ते पळवत न्यायचे. त्याची शर्यत लावायची!
खूप धमाल यायची टायर्स पळवायला!
दादा, काका लोक क्रिकेट खेळायचे, त्यांना मस्का लावून आम्ही पण त्यांच्यामधे लुडबूड करायचो. त्यावेळी ते आम्हांला बॉल कुठे गेला तो आणण्याच्या कामगिरीवर पाठवत, तेह्वा अगदी धन्य वाटायचे! आता कळते, आळशी लोक आमच्याकडून काम करुन घेत असत बॉल आणायचे ते! पण काहीच न समजता खेळामध्ये आरडाओरडा करायला मजा यायची.
आणि खोखो पण खेळ होता. आणि साखळीचा पण. दोन गट करुन ओढाओढी करायची, कोणाच्या बाजूला जास्त लोक ओढून आणलेत, ते जिंकले.
माझ्या आईचं पत्र हरवलं, सापशिडी वगैरे बैठे खेळ, आणि घर, घर वगैरे असले भातुकलीचे खेळही खेळताना खूप मज्जा येत असे. माझी आत्त्या अगदी साड्या वगैरे नेसवून द्यायची, आणि जुन्या साड्या, गोधड्या असे खिडक्यांना बांधून वगैरे घरपण बनवून द्यायची. चुरमुरे, गूळ, शेंगदाणे मिळत स्वयंपाक करायला. :))
किती छान वाटले लिहायला हे! धन्यवाद गं योगिता! मस्त आयडिया आहे तुझी हा बाफ उघडायची. अजून आठवले, लक्षात आले की लिहीन.
कवड्या!!!
कवड्या!!! माझे बालपण आणी शालेय शिक्षण सर्व राहुरी कृषी विद्यापिठात गेले...त्यामुळे जन्मगाव वेगळे असले तरी मी नगर, पुणे, सांगली, सातारा इथल्याच लोकांबरोबर वाढले... म्हणुन असावे कदाचीत!
घर घर खेळताना...आम्ही हळदीकुंकु करायचो.... अगदी आईची साडी, अन कोपरापर्यंत रुळणारे सैल ब्लाउझ घालुन.. मग आमच्या कॉलनीतील शिंदे काकी / राजगुरु काकी किनै मुमताज/ शर्मिला सारख्या आकडे ( म्हंजे समजलं का...कपाळावर किंवा कानावर रुळणा-या केसांच्या बटा) मग तशाच आमच्या बॉबकटच्या ( तेव्हा तो एकच कट माहीत होता आम्हाला) बटा पाडायचो, आणि मग त्या काकवांसारख्याच बेंबीच्या खाली साड्या नेसुन ( तेव्हाची फॅसन होती ती) विटेच्या बारीक पावडरच कुंकू अन मातीची हळद अस लावणार.. नंतर अत्तर म्हणुन अत्तरदाणीमधे पाणी + तोंडाला लावायची पावडर टाकुन ते लावायचं अन मग पदराखाली झाकुन झाडाची पान/ फुल वाण म्हणुन द्यायच...!
खि: खि: खि:
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
नयने, >> घर
नयने, >> घर घर खेळताना...आम्ही हळदीकुंकु ... >> लै भारी.
शेंगदाणा उघडुन त्यात गुळ घालुन मग तो परत होता तसा चिटकवायचा. असे लाडु बनवायचो. पोह्याच्या पोळ्या.
बाहुलीचं लग्नं पण एक धमाल होती. पण लग्नानंतर बाहुली आपल्या माहेरीच जाणार काय! असं आधीच ठरलेलं असायचं.
नॉट अॅट होम ला तेव्हा नाट्या काट्या ठोम्म म्हणायचो.
फुटलेल्या बांगड्यांचे तुकडे गोळा करायला कुठल्या कुठल्या गल्ल्यात फिरायचो. आता आठवलं तरी अंगावर काटा येतो. ईईईई..... तेव्हा सगळं छान वाटायचं.
पल्ले , मी
पल्ले , मी सुद्धा आगपेट्यांचे वरची चित्र जमा करण्याच्या छंदाच्या नादात कुठे कुठे ... पानटपरीवर वगैरे फिरलेय्..... श्शी..! आता आठवले तरी कसेतरी होते..!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
नयने हा
नयने हा किस्सा http://www.maayboli.com/node/8242 इथे टाक ना..
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235
ओके डियर..!
ओके डियर..! एडिटला बघ मी!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
गांवी
गांवी आम्ही तळ्यात/नदीत एका ठराविक कोनातून कौलांच्या खापर्या फेकून त्याना पाण्यावरुन उडया मारत जायला लावायचो. माझ्या भावाने एका खापरीला बुडण्यापूर्वी तब्बल तेरा वेळा उड्या मारायला लावल होत !. आजही मला तो विश्वविक्रम वाटतो.
खापरीला
खापरीला बुडण्यापूर्वी तब्बल तेरा वेळा उड्या मारायला लावल होत >>
जबरदस्त भाउ...खुप मजा यायची तो खेळ खेळण्यात...
खापरी वरुन आठवल्...आम्ही बिल्ला नावाचा खेळ खेळायचो... शाळेतुन परत येताना..रस्त्यावर फरशिचे जाड तुकडे फेकत जायचे...एक तुकडा फेकायचा..आणि दुसर्याने त्या तुकड्यावर नेम धरुन तो बिल्ला उडवायचा
असे करताना बरेच वेळेला रस्त्यावरुन जाणार्यांना ते बिल्ले लागायचे..मग पुढची कथा सांगयला नको
०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/
आणि कोणावर
आणि कोणावर राज्य द्यायचं त्यासाठी सुटायचो ती गाणी पण लिहा :
अक्कड बक्कड बंबे बो
अस्सी नब्बे पुरे सौ
सौ से निकला धागा
चोर निकलके भागा
राजा की बेटी ऐसी थी
रोज मार खाती थी
इस के लिये आलू बटाटा धूssम
काय अर्थ होता ह्या गाण्याचा???
केदार, आणखी
केदार,
आणखी थोडं बोअर करू ?
खूप नंतर एक लढाईवरचा सिनेमा पाहिला- "डॅम बस्टर्स ". शत्रूच्या हद्दीतल दरीमधलं एक धरण
विमानातून बाँब टाकून उडवण तेथील तोफांच्या भडीमारामुळे अशक्य होत. वैमानिक मग एक शक्कल लढवतो. विमानाचा वेग, पाण्यावरच्या उंचीमुळे साधलेला कोन ई.च गणित मांडतो. मग धरणापासून
लांब, तोफांपासून सुरक्षित अंतरावरून बाँब अशा तरहेने पाण्यात टाकले जातात कीं ते तिथेच न फुटता
उड्या मारत धरणापर्यंत येऊन तिथे फुटतात ! वैमानिकाच काय कवतूक होत. लेकाचा तो देखील
खापर्यांचाच खेळ खेळला असणार लहानपणीं !!
काय अर्थ
काय अर्थ होता ह्या गाण्याचा??? >> इथे येणार्या काही कवितांना काय अर्थ असतो तोच
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....
इथे
इथे येणार्या काही कवितांना काय अर्थ असतो तोच
>>> दीप्या असे म्हणुन बालपणीच्या गाण्याचा अपमान नको करु
भाउ आता बघितला पाहिजेच सिनेमा
०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/
mee tar kartii udawa udavi
mee tar kartii udawa udavi khelacho
ha khel sarwat aawadta maza aani india madhe 90% lokancha
प्रदीप soory
प्रदीप
soory cukun dusaera mail aala
अरे प्रदिप
अरे प्रदिप मराठित लिहि ना!
************************
नको ओढ लावुन घेउ उन्हाची ,जसे पारधि हे तसे तीर टोची
पिसामागुनि ग पिसे दग्ध होति, भररि परि मृत्तिकेशीच अंती
केदार, काय
केदार,
काय मी बंडल मारली वाटलं कीं काय ! जुना आहे सिनेमा- ब्लॅक अँड व्हाईट. कोसळणारी धरणं व
हाहा:कार मात्र बघवत नाही .
नवा
नवा व्यापारी - याची सुरुवात त्याच्या पातळ नोटांना नुकत्याच संपलेल्या शैक्षणीक वर्षाच्या वह्याचे पुठ्ठे चिटकवुन व्हायची. दररोज एकेकाच्या घरी दुपारचे जेवण आटोपुन बसायचो ते थेट संध्याकाळ पर्यंत. खुप मजा यायची. आता मॉलमध्ये फनस्कुलचा मोनोपॉली गेम सेट बघतो तेव्हा नवा व्यापारीची खुप आठवण येते. त्यातील चिराबाजार, गेटवे , वाळकेश्वर, चौपाटी वै. ठिकाणे ....
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
अगदी अगदी
अगदी अगदी सतिश.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235
Pages