समांतर विश्व आणि विश्व १ - हूम्बाला

Submitted by यःकश्चित on 20 June, 2013 - 08:28

समांतर विश्व आणि विश्व १ - हूम्बाला

================================================================

समांतर विश्व आणि सात विश्वे - परिचय

समांतर विश्व आणि विश्व १ : ताटातूट

...आणि एवढ्यात आमच्या दोघांच्या मध्ये आगीचा गोटीएवढा गोळा येऊन पडला.

स्स्स...आवाज झाला आणि त्या दगडातून वाफ निघाली. हा गोळा कुठून पडला ते पाहण्यासाठी मी मान वर केली आणि झटकन बाजूला होत आणखी एक गोळा चुकवला. झटदिशी मी सुझानचा हात धरला आणि तिला उठवत म्हणालो,

" उठ सुझान, ह्या डोंगरात ज्वालामुखी आहे ज्याच्या उद्रेकाला सुरुवात झालीये. ते पहा त्या शिखरावरून आगीचे गोळे बाहेर पडताहेत. "

आम्ही दोघेही त्या डोंगरापासून दूर पळू लागलो.

" भराभर पळ सुझान. या लाव्हांनी जर आपल्याला गाठलं तर आपली हाडे देखील सापडायची नाहीत. "

एवढे बोलून आम्ही डोंगरापासून थोडे दूर येतो तोवर एका मोठ्या 'धडाम' अश्या आवाजासोबत ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि भराभर त्या डोंगरातून ज्वालारस वाहू लागला. आम्ही जीवाच्या आकांताने पळत होतो. लाव्हाही पळत पळत आमचा पाठलाग करत होता.

आम्ही जवळपास अर्धातास धावत होतो. लाव्हाचा वेग आता कमी झाला होता. तो हळूहळू थंडही होत होता. पण डोंगरातून अजूनही आगीचे छोटे गोळे उडत होते. काही गोळे आमच्यापर्यंत पोहोचत होते. ते चुकवत चुकवत आम्ही पळत होतो. तरीही एक गोळा सुझानच्या बॅगला चाटून गेला. त्यामुळे तिच्या बॅगचा बंद तुटला. तो हातात धरून पाळणे आता अवघड चालले होते.

आता लाव्हा पसरायचा थांबला होता. आम्हीही पार थकलो होतो. सलग अर्धा तास पळणे म्हणजे काही चेष्टा नाही. इथे बसायलाही काही नव्हते. आम्ही एका निर्जन मैदानात होतो. खरंतर आम्हाला आता या आपल्या विश्वात परतावे वाटत होते. पण इच्छेविरुद्ध इथे थांबावे लागणार होते. कारण एक म्हणजे बाकीच्या तिघांना घेऊन परत जायचे होते. दुसरे म्हणजे त्या विश्वात काही अनोखे बघायला मिळेल म्हणून थोडे भटकायचे पण होते.

आम्ही बाटलीतले पाणी पिऊन थोडावेळ तिथेच खाली बसलो.

" मंदार, या एवढ्या मोठ्या जगात कुठे शोधायचे ते त्यांना ? "

" काळजी करू नकोस. सापडतील ते. थोडा वेळ विश्रांती घेऊन आपण समोरच्या दिशेने निघुयात. विसाव्यासाठी कुठे एखादी जागा मिळते का ते पाहूयात. "

एव्हाना सूर्यही डोक्यावर आला होता. आम्ही घड्याळ आणले नव्हते सोबत. त्यामुळे वेळेचा अंदाज हा सूर्याच्या जागेवरूनच ठरवावा लागायचा. सध्याच्या सूर्याच्या स्थितीवरून अंदाजे बारा-एक वाजलेले असावेत असं अंदाज मांडला.

थोड्यावेळच्या विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा मार्गक्रमण करू लागलो. बराच वेळ चालल्यानंतर आम्हाला एक टेकडी दिसली. आम्ही त्या टेकडीच्या पलीकडे गेलो.

आणि बघतो तो काय ?

चक्क तिथे एक छोटंसं खेड होतं. हिरवा निसर्ग, मातीची घरे, इकडे तिकडे फिरणारे पाळीव प्राणी आणि अक्षत पक्ष्यांची मंजुळ किलबिल. सारेच आल्हाददायक होते.

आम्ही त्या खेड्याच्या जवळ गेलो. कोणी माणूस आहे का ते पाहण्यासाठी आम्ही हळूच एका मातीच्या झोपडीजवळ गेलो. आत वाकून पाहिलं. आत एक बाई आपल्या बाळाला मांडीवर ठेऊन थोपटीत होती. ती आदिवासी दिसत होती. अंगावर तरटाचे तुकडे कपड्यासारखे परिधान केले होते. गळ्यात कुठल्यातरी काळ्या पिवळ्या रंगाच्या दगडाच्या माळा होत्या. आतून अंधार असल्याने जास्त काही दिसले नाही. अचानक त्या बाईची नजर आमच्यावर पडली आणि ती घरून जोरात ओरडू लागली.

आम्ही झोपडीतून बाहेर आलो. बाहेर येऊन पाहतो तर, थोड्या वेळापूर्वी जिथे सामसूम होती तिथे आता सात-आठ आदिवासी आमच्यावर भाला रोखून उभे होते. उंचीने ते चार ते पाच फुट असावेत. उन्हाने काळवंडलेले होते. त्या बाईसारख्याच यांनीही दगडाच्या माळा घातल्या होत्या. मात्र इथले दगड पांढरे, तपकिरी आणि करडे होते. बहुधा यांच्यात पुरुष ह्या माळा आणि स्त्रिया काळ्या-पिवळ्या माळा घालत असावेत. त्यांची शरीरे मात्र धिप्पाड आणि कमावलेली होती. चांगले पिळदार स्नायू असलेल्या हातानी त्यांनी आमच्यावर भला रोखून धरलेला होता.

ते भाले देखील दणकट होते. विशेष म्हणजे त्या भाल्यांचे पाते सोन्याचे होते. ज्वालामुखीच्या त्या डोंगरावरूनच हे आदिवासी ते सोने आणत असावेत.

त्या सर्वात वेगळी एक गोष्ट म्हणजे त्यांची नाके फारच लांबुडकी होती. अंदाजे त्यांची लांबी २-३ इंच तरी असावी. त्यांचे लांब कान आणि मोठ्या डोळ्यामुळे ते राक्षसच वाटत होते.

ते सारे जण आमच्याकडे एक टक पाहत होते. आता त्यांची भीती वाटू लागली होती. मला त्यांच्याशी बोलायचे होते जेणेकरून त्यांच्या तावडीतून आपण वाचू शकू. कारण त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता वाचण्याचा. मी त्यांच्या बोलायला म्हणून घसा खाखरला. पण त्या आवाजाने ते एकदम दचकले आणि भाले आणखी जवळ केले.

" मित्रांनो ", त्यांच्यापैकी एकाकडे पाहून मी बोललो. ते लोक आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. मला वाटलं की यांना आपण काय बोलतोय ते कळतंय. म्हणून मी पुढे बोलू लागलो,

" मित्रांनो, तुम्ही कोण आहात ? "

पण माझा हा प्रयत्न निकामी ठरला. त्यांना आमची भाषा कळली नाही. आणि एकाने माझ्या तोंडावर कुठल्याश्या वनस्पतीचं लांब पान बांधलं.

सुझान तर शांत बसली होती. भालेवाल्यातले काहीजण तिच्याकडे पहात होते. तिने कसलाही प्रयत्न केला नाही. मी तिच्याकडे पाहिलं तेंव्हा तिने डोळ्याने मला शांत राहायची सूचना दिली.

त्या लोकांमधला एक आदिवासी कसले तरी आवाज काढू लागला.

" ओ लो बो..ला ला...ओ...आ...ला..."

त्याबरोबर दुसऱ्या एका आदिवासीने आमचे हात बांधले आणि आम्हाला घेऊन तो कुठे तरी जाऊ लागला. आमच्या भोवतीने बाकीचे आदिवासी येतच होते. जाता जाता ते काही तरी आवाज काढत होते किंवा त्यांच्या भाषेतून कसल्यातरी घोषणाही देत असतील ! पण त्याचा अर्थ काही काळात नव्हता. ते फक्त " हुम्बाला हुम्बाला" असं ऐकू येत होतं.

मग आम्ही ती मातीची घरं पार करून एका जंगलासारख्या ठिकाणी आलो. तिथे दुतर्फा झाडे होती. एका ठिकाणी आम्ही थांबलो. ती जागा बागेसारखी वाटत होती. जमिनीवर हिरवेगार गावात होते. बाजून झाडे वाऱ्याबरोबर डोलत होती. मध्ये गोलाकार जागा होती. काही ठिकाणी दगडाचे उंच सुळके जमिनीतून वर आले होते. आणि समोरच्या बाजूस दगडी चौकोनी चौथरा होता.

आम्ही त्या जागेच्या मध्यभागी बसलो होतो. ते सारे आदिवासी एकदम ओरडायचे थांबले. ते का थांबले म्हणून आम्ही इकडेतिकडे पाहू लागलो. तिथे एक थोडा उंच आणि धिप्पाड आदिवासी आला नि त्या दगडी चौथर्यावर बसला.

बहुतेक तो यांचा म्होरक्या असावा. त्याने तांबड्या दगडांची माळा आणि खुपसे सोन्याचे दागिने परिधान केले होते. त्याने आपल्या हातातील भाला जमिनीवर ठोकला. त्याबरोबर सारे आदिवासी एकदम ओरडले,

" हुम्बाला "

मग त्या म्होरक्याने आमच्याकडे पहिले. यावेळी मी काही बोलायचा प्रयत्न केला नाही. आम्ही दोघेही प्रचंड घाबरलेले होतो. त्या म्होरक्याने मगाशी ओरडलेल्या आदिवासीसोबत काही संवाद केला. बहुतेक आमचं काय करायचं याबद्दलच तो संवाद असावा. कारण बोलता बोलता, बोलणे कसले ते चित्र विचित्र आवाज काढते होते. पण त्यांच्या भाषेतील ती स्वर आणि व्यंजने असावीत.

त्यांच्या संवादानंतर त्या म्होरक्याने आमच्याकडे बोट दाखवीत " बो..खर्र.ओ..ओ.. " असा काहीसा आवाज काढला.

आणि दोन आदिवासी मोठ्या तलवारी घेऊन आमच्याजवळ आले. पुन्हा एकदा म्होरक्याने " खो..ओ.." असं आवाज काढला.

त्या आदिवासींनी तलवारी हवेत उगारल्या आणि आमच्यावर वार करणार इतक्यात सुझान ओरडली.

" हुम्बाला "

त्यासरशी त्या आदिवाश्याने तलवारी म्यान केल्या.

मी अतिशय आश्चर्यचकित झालो होतो.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy प्रणव.....छान चाललय....चालुदे.....

पण छ्या आता क्रमशः ला टिचकी मारलीये.....काही होत नाहीये..... Proud

अमित

बोअर झालं... किती बालिश कथाविस्तार केलाय. (पुरुष असूनसुद्धा !?! :डोळा मारा: Lol ) >>> सानी, जियो!!!
यःकश्चित, Light 1

<<बोअर झालं... किती बालिश कथाविस्तार केलाय. (पुरुष असूनसुद्धा !?! >>
.
.
.
.
.
.

म्हणूनच नवीन लेखक येथे लेख लिहायला घाबरत असावेत !
.
.
.
.
.
.
सुधारा लेकांनो ............
तुमच्यामुळे मराठी संस्थळे बंद पडत आहे !!!!!!!!!

इन्टरफेल, तुम्ही पूर्ण कादंबरी न वाचता फक्त इथल्या प्रतिक्रियाच तेवढ्या वाचलेल्या दिसतात.. ही क्रमशः कादंबरी आहे आणि आधीचे भाग आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचल्याशिवाय तुम्हाला हे का लिहिलेय, ते समजणार नाही.

त्या लोकांमधला एक आदिवासी कसले तरी आवाज काढू लागला.

" ओ लो बो..ला ला...ओ...आ...ला...">>>>>>>> तुषार कपुर होता तो.

बाकी छान. येउदेत अजुन.

सानी मस्त टोला लगावलास ग Happy

भानूप्रिया, आधीचे संदर्भ माहिती नसतील, तर गैरसमज होऊ शकतो, म्हणून लिहिले गं.. बाकी काही नाही. Happy

सस्मित, Happy

लेखक महाशय, उरलेली सहा विश्वे आणि सुझान कशी अ-बालीशपणे वागून सर्वांना यातून सोडवते, ते वाचायला कधी मिळणार? की ती चिप हुम्बालातच डिअ‍ॅक्टिवेट झालीये? Proud Light 1

सानी : सुझानला प्रगल्भ बनवतोय Lol

जोक्स अपार्ट, टाकेन लवकरच...

नुकताच बी.ई. झालोय...पोटापाण्याची व्यवस्था पाहतोय...

पण तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायला नाही लावणार...

तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या...

सानी : सुझानला प्रगल्भ बनवतोय >>>>>> गुड गुड.. लेखक आणि पात्रांचा हा सहप्रवास पहायला आवडेल! Wink Lol

पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी खूप खूप शुभेच्छा!!! Happy

या कथेवर इंटरस्टेलर नावाचा चित्रपट आल्याने बहुदा लेखक म्हणतोय की तुम्ही चित्रपटच बघा.
वर्ष झाले तरी पुढचा कथानक सापडले नाही