Submitted by क्षिती on 8 September, 2011 - 12:29
नमस्कार,
माझे केस खुप लांब (कंबरे पर्यंत) व दाट आहेत. पण आता लग्नानंतर व नोकरी मुळे अजिबात लक्ष द्य़ायला वेळ होत नाही. लक्ष देता येत नाही म्हणुन कधी कधी थोडी चिडचिड पण होते.
मी कधीच केस छोटे ठेवले नाहित. अगदी शाळे पासुन लांब सड़क केस आहेत. आता केस कापुन छोटे करण्याच्या विचारात आहे. नवरा पण मागे लागला आहे लुक चेंज कर म्हणुन. मी माझे केस कापवुन एकदम बॊय कट किंवा बॉब कट करण्याचा विचार करते आहे (तेच सध्या मॆनेज करु शकेन अस वाटत आहे).
मी दोनदा पार्लर मधे जाऊन केस न कापवताच परत आले. हिम्मतच होत नाही, केस कापवायची. मला तुमचे पहिल्यांदा केस कापवतानाचे किंवा पहिल्यांदा लांब केस कापवतानाचे अनुभव सांगाल का सखी. थोडा धीर हवा आहे. निर्णय घ्यायला मदत करा प्लिज.
पुण्यात एखाद चांगल पार्लर पण सुचवा ना.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सायो
सायो
सायो खरच मनापासुन हसायला आले
सायो
खरच मनापासुन हसायला आले
नवर्याचे दोन आणे.... सायो चे
नवर्याचे दोन आणे....
सायो चे पोष्ट सांगीतले, त्यावर शांत पणे तो म्ह्णे, अग पण त्या सासर्यांच्या डोक्यावर केस असतील तर हा उपाय लागु होईल, नाही तर काय उपयोग.
'त्या' सासर्यांचा अर्धचंद्र
'त्या' सासर्यांचा अर्धचंद्र आहे
(No subject)
माझे पार बरेच लांब केस होते
माझे पार बरेच लांब केस होते आधी म्हणजे लग्न झाल्यावर ६ महिन्यांपर्यंत
(१० वर्षापूर्वीची ही गोष्ट)
बरेच म्हणजे अशक्य लाम्ब होते त्यात मेकॅनिकल इंजिनियरींगला असल्याने वर्क्शॉप मध्ये फार त्रास व्हायचा पण घरचे म्हणायचे लग्न झालं की खुशाल कापा केस. म्हणून लग्नाला ६ महिने होताच केसाला कात्री लावायला गेले एका पार्लर मध्ये (सुदैवाने माझ्या सासरची मंडळी काही बोलली नाहित.अर्थात मी केस कापण्याविषयी त्यांना पूर्वकल्पना दिली होती पण विचारले बिचारले नव्हते) ! पण पार्लर वाल्या बाईने तब्बल २ तास मला बसवून ठेवले होते परत विचार कर म्हणून. तिने मला एक ऑप्शनही दिला होता की एव्हढे मोठे नको अस्तील केस तर हिप्स पर्यंतच ठेव पण माझा फंडा क्लियर होता ठेवले तर लांब नाहितर इतके छॉटे की त्याची वेणीही घालता येऊ नये. शेवटी तिने कंटाळून कापले माझे केस. त्याचे गंगावणही बनवून दिले. ते माझ्या सा. बांनी जपून ठेवले आहे. पण मला कधीच परत लाम्ब केस कापल्याचा पश्चात्ताप वगैरे होत नाही. त्यात माझ्या केसांना अवाढव्य वाढ असल्याने सारखे जाऊन कापावे लागतात केस पण it's OK.
तिने मला एक ऑप्शनही दिला होता
तिने मला एक ऑप्शनही दिला होता की एव्हढे मोठे नको अस्तील केस तर हिप्स पर्यंतच ठेव ----अग किति लाम्ब होते तुझे केस ???
अगं खूपच लांब होते अनमॅनेजेबल
अगं खूपच लांब होते अनमॅनेजेबल होते म्हणूनच तर कापले.
लांबसडक केसांना एक छान शब्दं
लांबसडक केसांना एक छान शब्दं आहे.. कुणी ऐकलाय? ... "कस्ले सम्माटाच्या सम्माटा केस आहेत तिचे"
माझे " सम्माटा केस" कोणी
माझे " सम्माटा केस" कोणी कापुन आणलेले डॉलीकडून?
अय्यो... जाजु... हो गं
अय्यो... जाजु... हो गं हो...

लुगडं (नऊवारी) धुतल्यासारखं धुवायला लागायचे ना?
स्वप्ना_तुषार, तुझे ते केस
स्वप्ना_तुषार, तुझे ते केस आठवतायेत अजून. दोन लांबसडक वेण्या.
दाद, सम्माटावरुन नक्श फरियाद
दाद, सम्माटावरुन नक्श फरियाद आठवली. ती घेऊन ये इथे.
इथे बहुतेक सर्वांनाच लांब केस
इथे बहुतेक सर्वांनाच लांब केस कापताना वाईट वाटलेले दिसत आहे. माझ्या बाबतीत उलट आहे. मला लांब केसांची क्रेज लहानपणापासुन नव्हती. तरी आईबाबांच्या हट्टाखातर मी केस लांब ठेवले होते. मुल होईपर्यंत ते लांबच होते. पण नंतर मात्र मला हवा तसा छान बॉबकट, स्टेप कट करुन घेतला आणि तो खुप एनजॉय देखील केला. मॉड आउटफिट मध्ये तो छानच दिसतो. आता कदाचित पुन्हा शोल्डर लेन्ग्थं किंवा त्यापेक्षा थोडे मोठे केस ठेवीन. पण अतिलांब केस अजुनही मोठा नो.....
सम्माटाच्या सम्माटा दाद मला
सम्माटाच्या सम्माटा

दाद मला तू खूप आवडतेस
यशस्विनी सेम पिंच. माझेही
यशस्विनी सेम पिंच. माझेही बारावीपर्यंत पार लांब केस. सगळे माझ्या आईची आणि बाकी दोन आज्जी, दोन काकू अशा घरच्या पाच बायकांची हौस असायची. सगळे केशरचनेचे प्रयोग व्हायचे प्रत्येकीकडून. ( बाकी घरतील कुणाचेच केस इतके लांब तोवर राहीलेले नव्हते त्यामुळे भुली बिसरी यादे सारखं माझ्या केसांची वेणी घालताना प्रत्येकीचे माझे केस जेव्हा लांब होते ना.... टाइप किंवा या आत्याचे नी त्या आत्याचे अशा गोष्टी ऐकतच बसावे लागायचे.) केस कापणे म्हणजे आजोबा, बाबा या लोकांच्या मते मोठ्ठा गुन्हाच. त्या केसांचे लाडही खूप व्हायचे त्यामुळे. रोज ते आयुर्वेद रसशाळेचे "माधवी तेल". रवीवारी शिकाकाइनेच धुवायचे. (शांपू ने केस खराब होतात यावर सगळ्यांचे एकमत.)
आणि या सगळ्यात मला वेड ते छोट्या केसांचे. त्या टीनेज मधे जिन्स घातल्यानंतर असा काही बावळट लूक यायचा ना की ज्याचे नाव ते. शेवटी होस्टेल ला गेल्यानंतर थोडे छोटे केले. अर्थात घरी बोलणी पडलीच. पण रोज समोरा समोर नसल्यामुळे तीव्रता कमी होती. मग लग्नानंतर आणखी छोटे केले, मग आता तर पार शोल्डर कट्च. पण हे करायला मला १० वर्षे लागलीत. पीअर प्रेशर हो दुसरं काय.:D आणि आता आई म्हण्ते असेही केस तुला छान दिसतात.
पोस्ट जरा जास्तच लांबली आहे. पण हा विषयच अती जिव्हाळ्याचा ना.
स्वतःचे केस छाटायचे की
स्वतःचे केस छाटायचे की ठेवायचे ह्यासाठी कोणा दुसर्याची का मतं? ('दुसरे' म्हणजे सगळे 'दुसरे')
त्यात लग्नाचा वा लांब केसाचा काय सबंध? आजच्या काळात सुद्धा लांब केस असलेली मुलगी हवी आहे का टकल्या मुलांना?(अशी उदाहरणं पाहिलीत मी... स्वतः टकले असताना लांब केस असलेली मुलगी हवी अशी जाहिरात देत लोकं पण ते पुर्वी..)
(खरेच प्रश्ण पडला.... उपहासाने नाही म्हणतेय)
अवान्तरः तीन वर्षे झाली धागा
अवान्तरः
(अर्थात त्यानी ते कापले असतील तर...तसेही हा धागा त्यान्च्या केसान्पेक्षा जास्त वेगाने वाढ्ताना दिसतोय) 
तीन वर्षे झाली धागा सुरु होवून... एवढ्या काळात क्षिति यान्चे केस कापुन पुन्हा पहिल्यासारखे वाढले असते...
समाप्त
पुढे तुमचे चालु राहू द्या....
(No subject)
लांब केस असलेली मुलगी हवी आहे
लांब केस असलेली मुलगी हवी आहे का टकल्या मुलांना?(>>>>> + १००
स्वप्नाचे
स्वप्नाचे लांबssssssssssssssssssssssसडक केस आम्ही विसरुच शकत नाही.
क्षिती: काय केलस ते कलवल्च
क्षिती: काय केलस ते कलवल्च नाहिस.. आता मी हाच सल्ला मागनार होते तर हि पोस्ट वाचली.
माझे पण केस कंबरे पर्यन्त लांब होते. माग्च्या मे म्ध्ये २.५ फुट कमी केले गरमीला कंटालुन.
पुद्द्च्या महिन्यात माझ्या दिराच लग्न आहे. नवरा खुप दिवसा पासुन मागे लाग्ला आहे बोयकट कर..
मॉड लुक थेव.. माझा चेहरा थोडा लांब आहे. बोयकट सुट करेल का नाही कळत नाही..
पण रिस्क घेईन म्हणते आहे.. तुम्हाला काय वाटत??
सध्या बरीच जावेद ह्बीब सलोन्स पण दिसतात पुण्यात..
बरे कापतात का केस??
8 September, 2011 ला धागा
8 September, 2011 ला धागा सुरु झालेला होता. दरम्यानच्या काळात केसांचे काय झाले हे गुलदस्त्यातच आहे.
पुरूषांना (अस्मादिकांसह)
पुरूषांना (अस्मादिकांसह) कशाला हव्यात नुसत्या चौकशा ? गप्प पडा की मारामा-या करत.
.
.
जवळजवळ ९ वर्षांनंतर मी लांब
जवळजवळ ९ वर्षांनंतर मी लांब वाढलेले केस कापुन परत खांद्यापर्यंत आणले
कमरेच्याही खाली पोचलेले केस हळूहळू कापत वर आणले आणि मग गेले पार्लरमध्ये. मुलीने आधीच वॉर्न केलेले पार्लरवाली घरी पाठवेल म्हणुन., पण मी पक्का निश्चय करुनच गेलेले.
लांब केस दिसतात छान पण मला त्रास व्हायला लागला. एकतर केस पांढरे, ते पाहुन अर्धे पब्लिक केस रंगवायचा सल्ला द्यायचे. त्याचवेळी केस रंगवुन ज्यांच्या केसांचा सत्यानाश झाला अशी मंडळी अजिबात केस रंगवु नकोस म्हणुन सल्ला द्याय्ची. मी एवढ्या लांब केसांना मेंदी लाववालुन कंटाळले. आणि शेवटी मन घट्ट करुन निर्णय घेतला.
खुप छान आणि मोकळे वाटतेय. अजिबात पश्चाताप वगैरे वाटत नाहीय. फिलिन्ग हॅपी.
रच्याकने, वाशीच्या रघुलिला मधले कपिल्स हे सलुन खुप छान आहे. तिथल्या बाब्याने मला प्रोटीन ट्रिटमेंट, रंग वगैरे खुप गळ्यात घालायचा प्रयत्न केला पण मी निक्षुन मला ह्यातले काहीही करायचे नाहीय, केस कापायला आलेय तेव्हा गुपचुप केस काप म्हणुन दटावल्यावर मात्र त्याने आनंदाने, मन लावुन अतिशय छान केस कापुन दिले. मुलीने पाहिल्यावर 'लोक आता तुला माझी बहिण म्हणणार' म्हटल्यावर त्याने केस खरेच छान कापल्याची खात्री पटली.
@ रंभा : अग इत्क्या
@ रंभा : अग इत्क्या प्रतिक्रिया वाचल्या पण माझी काही हिम्मत होत नव्हती..
पण नवरा खुप मागे लागला होता.. शेवटि माझ्या पार्लर वालीला घरी बोलावल..
नवरा सपॉर्ट करता सोबत होताच.. ती माझे केस कापायला लागली तस मला रडुच यायला लागल..
नवर्याच्या हट्टा पाई बॉयकट केला.. नवरा खुश होता.. मी जरा नाराजच होते..
कंबरे पासुन एकदम बॉयकट माझ्यासाठी जरा जडच होत..
पण नंतर मलाच माझा लुक आवडायला लागला.. लोकानी पण खुप चांग्ल्या कमेन्ट्स दिल्या..
आता दर महिन्याला ट्रिम करते.. पण आय एम एन्जोईंग ईट..
माझा सल्ला विचारशील तर गो फोर ईट..
कळव काय केलस ते.
साधना, आणि तो कट तुला फारच
साधना, आणि तो कट तुला फारच मस्त दिसतोय.

मला फार आवडला तुझा तो लूक
उगाच नाही पण एक पिढी आर्धी मागे आल्यासार्खी वाटतेयेस
रच्याकने, वाशीच्या रघुलिला
रच्याकने, वाशीच्या रघुलिला मधले कपिल्स हे सलुन खुप छान आहे. तिथल्या बाब्याने मला प्रोटीन ट्रिटमेंट, रंग वगैरे खुप गळ्यात घालायचा प्रयत्न केला पण मी निक्षुन मला ह्यातले काहीही करायचे नाहीय, केस कापायला आलेय तेव्हा गुपचुप केस काप म्हणुन दटावल्यावर मात्र त्याने आनंदाने, मन लावुन अतिशय छान केस कापुन दिले. << same to same with me
तुम्हा बायकांनी बॉबकट आणि
तुम्हा बायकांनी बॉबकट आणि बॉयकट ठेवायला लागल्या पासून गंगावनाला बाप....... हे...... आईच उरली नाही..
------ धनंजय माने उवाच
Pages