म्हणून मला महाराष्ट्र सरकार आवडते !!

Submitted by केदार जाधव on 17 June, 2013 - 03:03

आज सकाळी इचलकरंजीहून पुण्याला येत असताना मला आपल्या सरकारने केलेल्या कितीतरी कल्याणकारी गोष्टींची माहिती मिळाली . ती सर्व लोकांपर्येंत पोचावी एवढाच उद्देश !

आज १ ऑगस्ट्ला परत येताना आणखी काही गोष्टी समजल्या , त्या अ‍ॅड करतोय .

१ . प्रामाणिकपणा : हा विशेषतः मला सातार्याच्या टोल नाक्याजवळ पहायला मिळाला . जनरली काय करतात की , टोल नाक्यच्या दोन्ही बाजूस २-३ किमीचा चांगला रस्ता करतात , त्यापुढे मग खड्डेच खड्डे .
हे लोक मात्र असे नाहीत , अगदी १० मी पासून खड्डे सुरू होतात , तुम्ही टोल भरत असताना तुम्हाला ते दिसताताही . बघा बुवा , असा रस्ता आहे , जायच असेल तर जा , नंतर क्म्प्लेन नाय पायजेल ... काय हा प्रामाणिक पणा !!
२ . समता : आधी सातारा पुणे रस्त्यावर खूप खड्डे होते आणी त्या मानाने कोल्हापूर सातारा रस्ता चांगला होता . हे त्या अधिकार्याना कळल्याव्र त्यांचे मन द्रवले आणी ताबडतोब अ‍ॅक्शन घेण्यास सांगितली , आता पूर्ण रस्त्यावर एक सारखेच मोठे खड्डे आहेत .
३ . हे खर तर दोन गुण आहेत , सुरूवातीला त्यानी तुमच्यातील लहान मूल जागे रहावे म्हणून १ रू च्या बद्दल एक्लेअर द्यायला सुरूवात केली . उपक्रम स्तुत्य होताच , पण मग त्यांच्या लक्षात आले की एक्लेअर विदेशी आहेत . म्हणून त्यानी Eclairo Crunch it नावाची स्वदेशी गोळी १रू ऐवजी द्यायला सुरूवात केली (कोण म्हणाल रे ती तिची क्वालीटी २५ पैशाची पण नाही , स्वदेशी साठी थोडा त्याग नको ? यांच्यामुळेच भारत माग आहे )

४. सातार्याजवळ एन एच ४ वर अक्षरश: फूटभर खोलीचे खड्डे पडले आहेत . किती हा सामाजिक ऐक्याचा अट्टाहास ! खेड्यातील रस्ते सुद्धा नॅशनल हायवे पे़क्षा चांगले असलेले राज्य तुम्हाला भारतात काय जगात तरी शोधून सापडेल काय ?

५ . सर्विस रोड हा प्रकारच बर्याच ठिकाणी नाही , असेल तर अगदी दुर्दशेत . अहो शेजारच्या गावातील असली , बैलगाडीत असली तरी माणसंच ना ती ? त्याना वेगळा रोड न देता समतेच किती छान उदाहरण घालून दिलय .

६ . उलट्या साईडने आता ट्रक ही येऊ लागलेत , त्याच्यावर नियंत्रण ठेवायला महामार्ग पोलीस (हे खरच अस्तित्वात आहेत की डेमेंटर्स प्रमाणे कविकल्पना आहे माहित नाही)वगैरे काही नाही . अहो , प्रवाहाविरूद्ध पोहणारे लोकच समाजाला पुढे नेतात म्हटल !

७ . वर अशा रस्त्याने येण्यासाठी ते तुमच्याकडून २४९ रू घेतात . "आपण फक्त देत जावे , परतफेडीची अपेक्षा करू नये " हा किती मोठा संदेश ते आपल्या मनात रूजवून देतायत .

८ . मी जेव्हा याबाबत तिथल्या लोकांशी बोलायला गेलो , तेव्हा त्यानी तुम्हाला करायची आहे तिकडे तक्रार करा , अस सांगण्यात आल . या विश्वात तुम्ही किती क्षुद्र आहात , कर्ता करविता वेगळाच आहे , याची जाणीव तुम्हाला ते करून देतात .

बघा .५ तासांच्या प्रवासात किती हे ज्ञान तेही सामाजिक , धार्मिक सर्वकाही . आणी हे तर ज्याचा मला माझ्या सुमार बुद्धीप्रमाणे उलगडा झालाय . स्वत: अनुभवून पहा , तुम्हाला वेगळच काही गवसेल !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार जाधव फार उशीरा पसंत पडला तुम्हाला महाराष्ट्र सरकार...... Proud
जरा महाराष्ट्राबाहेर डोकवा म्हणजे भारत सरकार देखील आवडायला लागेल Proud

टोल च्या महा मार्गावर खड्डे असतिल तर फोटो काढा ..आणि टोल देउ नका ..गाडी बाजूला घेउ नका ..
तिथले लोक बोलायला येतील , तेव्हा तुम्हाला करायची आहे तिकडे तक्रार करा , अस सांगा ..

कोणीही तुमच्याकडून जबरदस्ती पैसे वसूल करू शकत नाही ..

जे पैसे मागतील त्यांच्याकडे ओळखपत्र मागा .. टोल विषयक नियमांची यादी मागा ..
आपल्या हक्का साठी भांडायची तयारी ठेवा , जास्त अरेरावी दिसली तर पोलीसांना फोन करा ..

@सुशांत , वैभव , धन्यवाद .
आगपाखड वगैरे काही नाही हो .
सकाळी सकाळी झालेल्या प्रचंड मनस्तापातून लिहिलय हे .
आता निवळल्यावर वाटत की आपणच उगाच त्रागा करून घेतला . हजारो लोक रोज जातात तिथून . कुणालाच काही फरक पडत नाही तर आपल्याला का पडावा ?

@शाहिर ,
कोणीही तुमच्याकडून जबरदस्ती पैसे वसूल करू शकत नाही ..

>> ते इन थिअरी हो :), इथे त्यांच्याकडे गुंड असतात .
आणी मागचे "काय हा वेडा आहे" म्हणून जोर जोरात हॉर्न मारत असतात

तुम्ही एकदा अलिबाग पेण हा फक्त तीस कि मी चा प्रवास करा तुम्हाला महाराष्ट्र आणखीच आवडू लागेल. मी काही महिन्यांपूर्वी अलिबाग कोकणभवन हा सत्तर कि मी चा प्रवास फक्त पाच तासात पार पाडला होता. मायकेल शूमाकर ही इतक्या वेगात कारचालवू शकत नाही.

जाउ द्या हो. खरे तर जगात कितीतरी देश भारतातल्या अगदी अप्रगत देशापेक्षा सुद्धा वाईट आहेत निरनिराळ्या कारणांनी! अगदी अति प्रगत देशांत सुद्धा असे अनेक रस्ते, वाईट गोष्टी आहेत.

मी तर नेहेमी सांगतो - भारतातले वाईट लिहिण्यात काहीच अर्थ नाही. जगात बरेच काही काही वाईट आहे. जरा चांगले काय ते लिहावे.

मी तीसेक वर्षांनी भारतात परत गेलो तर मला कमालीच्या बाहेर सुधारणा केलेल्या दिसल्या.

आता लोक कसे आहेत ते सोडून द्या - विशेषतः ते परदेशात रहाणार्‍या भारतीयांशी कसे वागतात ते.

केदार आणि इतर तुमचा त्रागा समजतोय , कुणी सोलापुर ते गाणगापुर दुधनीमार्गे ड्राईव्ह केलयं का ? केलं असल्यास तुमचे अनुभव सांगा.

, कुणी सोलापुर ते गाणगापुर दुधनीमार्गे ड्राईव्ह केलयं का ? केलं असल्यास तुमचे अनुभव सांगा>>>

ते बॉर्डरवर असल्याने दोन्ही घरचा पाहुणा उपाशी असेल.. Happy

दुसरं म्हणजे त्यासाठी रग्गड टोल घेत नसतील.
शिवाय टोल नाक्यावरच्या २० मिनिटाच्या रांगाही नसतील तिकडे.

मला पुणे -सातारा रस्त्यावर आलेला अनुभव-
खंबाटकीच्या बोगद्यात उलट्या बाजूने ट्रक येत होता, वाहतूक अडली होती. मी रस्त्यावर जो नेहमी वाहतूक पोलिसांचा नंबर असतो ९८२३४९८२३४...असा काहीतरी असावा, त्यावर फोन लावला. होत असलेला प्रकार सांगितला, तोवर आम्ही बोगद्यातून बाहेर आलो होतो. त्यानी मला गाडीचा नंबर विचारला, मी काही तो पाहिला नव्ह्ता. तर मलाच उलटे ऐकून घ्यावे लागले, "तुम्ही लोक अशी अर्धवट मदत करता...."
आता ऊलट्या दिशेने येणारा तो एकमेव ट्रक होता, एकेरी वाहतूक असलेला रस्ता बराच दूरपर्यंत आहे, मग तो ट्रक त्याना अडवता आला नसता का? पण ज्याना कामच करायचे नाहीए, ते अशा तांत्रिक अडचणी सांगतात.
आता पुढच्या वेळी परत अशी वेळ आली, तर आधी गाडीचा नंबर बघायचे लक्षात ठेवणार, तुम्हीही ठेवा!

झकासरावाना अनुमोदन .
श्रीकांत आणी श्री , रस्त्यांची हालत सगळीकडे तीच आहे .
पण इथे तुमच्याकडून अवाच्या सव्वा पैसे घून , त्या टोलच्या रांगेत कितीतरी वेळ थांबायला लावून वर परत मुजोरी केली जाते तेव्हा डोक फिरत .
त्यातल्या त्यात कधी बेळगाव -कोल्हापूर हाच मार्ग पहिला असेल तर अधिकच चीड येते
(ज्याना माहित नाही त्यांच्यासाठी हा NH4 चा भाग कर्नाटक हद्दीत येतो , इथे रस्त्यात एकही खड्डा नाही , सगळीकडे सर्व्हिस रोड आणी स्वच्च्छ्ताग्रहे आहेत आणी तरीही टोल निम्मा आहे )
म्हणून महाराष्ट्र सरकार लिहिले आहे

उलट्या ट्रक्सच्या, टोलकराच्या, खड्ड्यांच्या देशा-----

मस्त लेख आहे.

अनुमोदन. व्यवसायानिमित्त अनेक ठिकाणी फिरण्याची वेळ येते तेव्हा हा त्रास फारच जाणवतो. आपलीच चूक आहे. असल्याच लोकांना आपण निवडून देतो. Happy

नाशिक ते सिल्वासा -पेठ मार्गे
नाशिक ते पेंट- ४० कि मी -महाराष्ट्रात- १.५ तास
पेठ ते सिल्वासा: ११० कि मी : गुजरात मध्ये: हा देखील जंगलातील -आदिवासी भागातील वळणावळणाचा रस्ता: १.२५ ते १.५ तास

त्यातल्या त्यात कधी बेळगाव -कोल्हापूर हाच मार्ग पहिला असेल तर अधिकच चीड येते
(ज्याना माहित नाही त्यांच्यासाठी हा NH4 चा भाग कर्नाटक हद्दीत येतो , इथे रस्त्यात एकही खड्डा नाही , सगळीकडे सर्व्हिस रोड आणी स्वच्च्छ्ताग्रहे आहेत आणी तरीही टोल निम्मा आहे>>> ह्या विषयी फार ऐकलय.
एकदा खास रस्त्यासाठी ट्रीप मारेन. Happy

शिवाय टोल नाक्यावरच्या २० मिनिटाच्या रांगाही नसतील तिकडे.
इथे न्यू जर्सी ते न्यू यॉर्क सिटी ला जायला तीन प्रमुख टोलनाक्यामागे प्रत्येकी दररोज ३० ते ४५ मिनिटाच्या रांगा असतात. तरी इझिपास सारख्या अनेक सोयिस्कर गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे थांबायला नको.
आता भारतात जर अमेरिकेच्या तिप्पट लोक रहातात तर .......

आज १ ऑगस्ट्ला परत येताना आणखी काही गोष्टी समजल्या , त्या अ‍ॅड करतोय .

१ . प्रामाणिकपणा : हा विशेषतः मला सातार्याच्या टोल नाक्याजवळ पहायला मिळाला . जनरली काय करतात की , टोल नाक्यच्या दोन्ही बाजूस २-३ किमीचा चांगला रस्ता करतात , त्यापुढे मग खड्डेच खड्डे .
हे लोक मात्र असे नाहीत , अगदी १० मी पासून खड्डे सुरू होतात , तुम्ही टोल भरत असताना तुम्हाला ते दिसताताही . बघा बुवा , असा रस्ता आहे , जायच असेल तर जा , नंतर क्म्प्लेन नाय पायजेल ... काय हा प्रामाणिक पणा !!
२ . समता : आधी सातारा पुणे रस्त्यावर खूप खड्डे होते आणी त्या मानाने कोल्हापूर सातारा रस्ता चांगला होता . हे त्या अधिकार्याना कळल्याव्र त्यांचे मन द्रवले आणी ताबडतोब अ‍ॅक्शन घेण्यास सांगितली , आता पूर्ण रस्त्यावर एक सारखेच मोठे खड्डे आहेत .
३ . हे खर तर दोन गुण आहेत , सुरूवातीला त्यानी तुमच्यातील लहान मूल जागे रहावे म्हणून १ रू च्या बद्दल एक्लेअर द्यायला सुरूवात केली . उपक्रम स्तुत्य होताच , पण मग त्यांच्या लक्षात आले की एक्लेअर विदेशी आहेत . म्हणून त्यानी Eclairo Crunch it नावाची स्वदेशी गोळी १रू ऐवजी द्यायला सुरूवात केली (कोण म्हणाल रे ती तिची क्वालीटी २५ पैशाची पण नाही , स्वदेशी साठी थोडा त्याग नको ? यांच्यामुळेच भारत माग आहे )

माझा खडत्र ऑफिस प्रवास (मुंबई महामार्गाला मिळालेल्या खड्ड्यांच्या आंदणामुळे)
बोरिवली ते गुंदवली (अंधेरी) - १५ कि.मी. (वेर्स्ट्न एक्स्प्रेस हायवे Wink Wink Wink )
लागणारा वेळ - १ तास ३० मि. (किमान) - २ तास ४५ (कमाल)

खरय केदार ... टोल म्हनजे काहि राजकारणी लोका साठी व्यवसाय च आहे ,,, खुप चिड येते खर तर प्रत्येक वेळि टोल देताना .. अगदी मनात ( काच लावलेली असताना मी गाडीत खरच शिव्या देत असतो ) ... पन काही करु शकत नाही आणी वेळ हि नसतो... आता पुणे मुबई रोड बघा ... express way laa pan toll dyaayachaa... tyaanantar ataa naveen panvel cross jhaalyavar naveen toll naka suru hotoy.. jo Panvel Sion saathi asel ...pan vashi bridge chaa aadhee pan ek toll deto jo mumbai ani perimeter madhil ratse maintain karayala deto... mhanaje @ 180 km jaanyaasaathi aapan tin vela toll deto.. parat raste quality bomb aahech

ata sarv raajakaaranee lokaana itakech vicharayache aahe ... TUMACHI BHUK SAMPANAR KADHEE

गडकरी साहेब म्हनाले होते कि टोल धोरन नव्याने बनवनार आहे ... कधी होतेय ते बघुयात.... सेटिन्ग सुरु आहे बहुतेक.... हिशोब झाले कि मग होइल कहितरी

यातही गौडबंगाल आहे . कोल्हापूर ते सातारा रस्ता बरा आहे . सातार्याच्या १ किमी अलिकडेपासून त्याची अक्षरशः दैना आहे. सातार्याजवळ डांबर चांगले मिळत नसेल काय ? Wink