आपल्या जोडीदारासह पहावा असा 'अनुमती' (चित्रपट)

Submitted by केदार जाधव on 14 June, 2013 - 15:16

सर्वात आधी मी चित्रपटाच्या प्रिमिअरला जाण्याची संधी दिल्याबद्दल मायबोलीचे
आभार मानतो . माझ्या ओळखीच तस कुणीच या क्षेत्रात नसल्याने अस काही घडेल असा मी
कधी विचारही केला नव्हता .त्यामुळे आधीच सगळीकडे मी "हवा" करून ठेवलेली होतीच .
पण सुखद धक्का बसला तो ह्या लोकांचा साधेपणा पाहून .
विक्रम गोखले काय किंवा दिलीप प्रभावळकर काय, आमच्यासारख्या सामान्य प्रेक्षकांच्या
मानाने कितीतरी मोठी माणसं . पण त्यांच्या वागण्यात , बोलण्यात त्याचा लवलेश
ही नव्हता .
नंतर झालेला छोटेखानी स्वागत समारंभ ही छान .
प्रिमिअर बद्द्ल अजून कितीतरी लिहिता येईल पण जस हॉटेल कितीही छान असेल ,
सेवा कितीही चांगली असेल , तरी जोवर अन्नपदार्थ चांगले नाहीत तोवर त्याला अर्थ
नसतो , तसेच इथेही .
आणी खर सांगायच तर इथला पदार्थ ५ स्टार होता .

तर चित्रपटाबद्दल,
त्याची बायको अत्यवस्थ आहे . तिच्या उपचारांचा खर्च अवाढव्य आहे . एक रिटायर्ड
शिक्षक असलेला तो हा खर्च पेलू शकत नाही . मुलगा मदत करू इच्छित नाही . उलट
त्याच म्हणण आहे की उपचार थांबवावेत आणी आईला मरू द्याव . त्यासाठी वडिलानी
सही करावी म्हणून मुलगा प्रयत्न करतोय . पण उपचार चालू राहिले तर ती वाचूही शकते
. त्याला हे मान्य नाही , तिच्या उपचारांसाठी काहीही करायची त्याची तयारी आहे
. पण काहीही म्हणजे काय ? तरीही तो जंग जंग पछाडतो .
याच वळणावर त्याला त्याची कॉलेज मधील मैत्रिण भेटते , ती त्याला जीवनाचा वेगळाच पैलू
दाखवते .
तो या पैशाची सोय करू शकतो का ? आपल्या बायकोला पुढे जायची "अनुमती" देऊ शकतो का ? हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा पाहायलाच हवा .

या चित्रपटाच सगळ्यात मोठ यश म्हणजे हा सिनेमा तुम्हाला पटतो , तुमच्यापर्यंत
पोचतो . तुम्हाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो .( "चिमणी पाखर" बघताना हसणार्या माझ्यासारख्याचेही २-३ दा माझेही डोळे ओले झाले ,कारण जे चाललय ते
तुमच्याआमच्या आयुष्यात घडू शकत ,त्यात काही अतिशयोक्ती नाही हे जाणवत होत ). सर्वात महत्वाच म्हणजे
कारूण्याची झालर असली तरी हा काही निराशावादी सिनेमा नाही . इथे कितीही हताश
झाला असला तरी विक्रम गोखले लढायच थांबलेला नाही .
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे कुणाला बळजबरीने खलनायक केलेल नाही . प्रत्येक जण आपल्या परिस्थितीमुळे तस वागतोय . तसा मुलगाही चुकत असला तरी प्रॅक्टीकल आहे (हा शब्द वापरला की तत्व , कर्तव्य सगऴ विसरल की चालत) अशी मुल आपण आसपासही पाहतो .

अभिनयाबद्दल बोलायच झाल तर हा चित्रपट विक्रम गोखलेंचा आहे . आपल्या बायकोवर
जिवापाड प्रेम करणारा , तिला वाचवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारा ,
आपण काहीही करू शकत नाही हे दिसताना हताश झालेला नवरा त्यानी समर्थपणे उभा
केलाय .
नीना कुलकर्णीना फारसा वाव नसला तरी त्यानी उत्तम काम केलय . मुलाच्या भूमिकेत
सुबोध भावेही ठिकठाक , किशोर कदम नेहमीप्रणाचे अव्वल . अरूण नलावडे छोट्या भूमिकेतही भाव खाऊन जातात . सई चा लूक आणी अभिनय दोन्ही सुखद . रीमा लागूची भूमिका तशी
छोटीशी असली तरी चित्रपटाला एक वेगळ वळण देणारी आणी त्यानी ती आपल्या उत्स्फूर्त अभिनयाने जिवंत केलीय .
तांत्रिक बाजूही अगदी व्यवस्थित सांभाळली गेली आहे . गजेंद्र अहिरेंच दिग्दर्शनही सुरेख .
फोटोग्राफीच विशेष कौतुक करायला हव . कोकण काय सुरेख टिपलय ! संगीतही अप्रतिम . गाणीही चित्रपटाला पुढे घेऊन जातात .

कदाचित बाळबोध वाटेल , पण आजच्या "Make up and Brake Up" पिढीने (हे लोण आता
सांगली -कोल्हापुरातही पसरलय) सहजीवन म्हणजे काय याचा अर्थ समजावून सांगणारा
हा चित्रपट नक्की पाहिला पाहिजे अस मला वाटत.
उणीव काही असेल तर ती फक्त मार्केटींग आणी मार्केटींग . "मार्केटींग नाही
म्हणून प्रेक्षक नाही आणि प्रेक्षक नाही म्हणून मार्केटींग परवडत नाही " हे
दुष्टचक्र आहे हे मान्य आहे , पण यावर काही उपाय तर शोधायलाच हवा ना ? इतका
चांगला चित्रपट आला आहे हे लोकाना कळलच नाही तर काय उपयोग आहे ?

पण माऊथ पब्लिसिटी सुद्धा नक्की फरक पाडू शकते . मी माझ्या सगळया परिचिताना
आवर्जून पहायला सांगितलाय (मराठी आहे म्हणून नाही तर एक चांगली कलाक्रुती
म्हणून ) . मी स्वतःही कविताबरोबर परत बघणार आहे .
तुम्हीही (शक्य असल्यास ) आपल्या जोडीदारासह नक्की पहावा असा
चित्रपट ..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिमन्तिनीजी ,
तुम्ही "In Right Spirit" विचारताय अस ग्रुहित धरून उत्तर देतो .
हा मराठी सिनेमा इतका चान्गला असेल तर त्यावर 'विकिपिडिया पेज' का नाही? >> तो "इतका चांगला" आहे हे माझ वैयक्तिक मत आहे Happy .
पण तो कसाही असला तरी 'विकिपिडिया पेज' असणे हा Criterion कसा असू शकेल ? तरीही तुमच्या प्रश्नाच उत्तर "मार्केटींग कमी पडतय " एवढच देता येईल

सुंदर ओळख करून दिली आहेस केदार! आवडला लेख.

इथे कुणाला बळजबरीने खलनायक केलेल नाही>>> हे एक आवडले.

पण तो कसाही असला तरी 'विकिपिडिया पेज' असणे हा Criterion कसा असू शकेल ? >> केदारजी, अगदी चांगल्या स्पिरीट मध्ये विचारत होते. विकी पेज हे मला सिनेमा बघू कि नको हे ठरवायला मदत करते. विकी पेज असणे हे कुठल्याही 'क्रिटिक' किंवा 'रसिक' पेक्षा उपयोगी असते असे मला वाटते. उदा: रितुपर्णो घोष यांचे दोन सिनेमे - खेळा आणि सब चरीत्रो काल्पनिक एकाच वर्षी आले. त्यांचे लास्ट ३० डेज पेज हिट पाहिलेत तर एक सेकंदात कल्पना येते कि कोणता जास्त बरा असेल. त्या सिनेमांवरचे रिव्ह्यूज आता सापडणे कठीण असते. भाषेची मर्यादा ही आहेच कारण बंगाली रिव्ह्यू वाचणार कशी. 'सिनेमांचे विकी पेज' हा एक वेगळा विषय होईल, इथे चर्चा नको.

पण आपण योग्य उत्तर दिलेत - मार्केटिंग कमी पडते.

सिनेमा कालच रिलीज झाल्याने चार लोक बघून झाल्यावर मग विकी पेज बनते किंव बनवावे लागते. ना?
मोठ्या बजेटच्या सिनेमाची आधीच वेब साइट असते बहुतेक. प्रमोशनल साठी. ह्या सिनेमाचे फेसबुक पेज असेल कदाचित.

abt the movie, been there, done that but will do see the movie as I am curious whether vikram character and reema character build a life together.

sorry abt english as writing from chrome.

केदार, छान लिहिले आहेस. अजून सविस्तर वाचायला आवडले असते. प्रीमीअरचे फोटो नाही का काढले कुणी?

विकीपीडीया पेज असणे हा सिनेमा चांगला असण्याचा अथवा तो बघायचा की नाही ठरवण्याचा निष्कर्ष असू शकतो हे मला आज पहिल्यांदा समजले. सध्या प्रत्येक सिनेमाच्या प्रमोशनसाठी सोशल मीडीया मॅनेजर असतोच. त्यामुळे बहुतेक विकीपीडीया पेज हे ऑफिशीअली प्रोड्युसरतर्फे बनवलेले असते. तिथे सिनेमासंबंधी बरीचशी माहिती, फॅक्ट्स दिलेले असतात. "परीक्षण" लिहिलेले नसते असा माझा अनुभव. बर्‍याचदा ऑडियन्स रीव्ह्युज हे रॉटनटोमॅटो अथवा आयएमडीबी वर वाचायला मिळू शकतात, इंग्रजी व इतर सर्व भाषांमधील सिनेमाचे परीक्षण तिथे असते. मायबोलीने मराठी कलाकृतींचे माध्यम प्रायोजकत्व स्विकारणे हा अशाच सोशल मीडीया प्रमोशनचा भाग आहे. मराठी सिनेमाला मराठी संकेतस्थळांनी प्रमोट करायचे नाहीतर कुणी?

अनुमतीसाठी विक्रम गोखले यांना सर्वोच्च अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, आणि याचे छायाचित्रण गोविंद निहलाणी या सर्वोत्तम छायाचित्रकार (आणि दिग्दर्शक) यांनी केलेले आहे. सिनेमा का बघावा यासाठी माझ्या दृष्टीने तरी दोन महत्त्वाचे पॉइंट्स.

केदार छान लिहिलय, पहावासा वाटेल असं.

पण तो कसाही असला तरी 'विकिपिडिया पेज' असणे हा Criterion कसा असू शकेल ? तरीही तुमच्या प्रश्नाच उत्तर "मार्केटींग कमी पडतय " एवढच देता येईल>>>> हे उत्तरही चांगलं आहे.

पण एकूण सर्वच मराठी निर्माते व मार्केटिंग करणार्‍या कंपन्यांनी नवीन चित्रपटाचे विकी पेज लौकर बनवणे गरजेचे आहे. "सर्च" मधे विकी चे पान लगेच वर दिसते. त्यामुळे "आम्ही अमुक साईटवर फुकट पाहिला, तुम्ही वेळ व पैसा वाया घालवू नका" छाप कॉमेंट्स च्या आधी त्यांनी स्वतः तयार केलेले पान आधी दिसेल Happy

मराठी सिनेमाला मराठी संकेतस्थळांनी प्रमोट करायचे नाहीतर कुणी?>> मराठी सिनेमाला फक्त मराठी संकेतस्थळानी प्रमोट करावे का असा प्रश्न मला पडला आहे? विकी पेज वर परीक्षणे नसतात पण तिथे सगळ्या परीक्षणांच्या लिंकस असतात. विहीर, बालगंधर्व हे चांगले मराठी चित्रपट होते. त्यांचे विकी पेज आहेत. म्हणून विचारल. जाऊ द्या.

विक्रम गोखले यांना सर्वोच्च अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार >> पूर्वीच मिळायला हवा होता. इथे पुरस्कार मिळाला म्हणजे त्यांचा अभिनय अधिक उच्च असेल असे वाटत नाही. आता फक्त पुरस्कार देणारे जागे झाले एवढेच. 'आघात' किंवा 'हम दिल दे चुके' दोन्ही अतिशय सुंदर भूमिका होत्या. ('हम दिल दे..' बद्दल सगळेच मला इथे फाडून खातील, पण अगदी राजस वाटले आहेत त्यात! त्यांच्या एका 'तुम्हारे सूर मे सच्चाई है' डायलोग मुळे अक्खा सिनेमा आवडला मला)

मराठी सिनेमाला फक्त मराठी संकेतस्थळानी प्रमोट करावे का असा प्रश्न मला पडला आहे? >> माझ्या वाक्यात "फक्त" हा शब्द नाही. इतर सोशल मीडीयापेक्षा मराठी संकेतस्थळे अधिक नॅरोपणे मराठी सिने ऑडियन्सला टारगेट करू शकतात. विकीपेज बनवणे हा सिनेमाच्या प्रमोशनचा एक भाग नक्कीच असू शकतो, ते करायलाच हवे, त्यात वादच नाही. पण "इतका चांगला" आहे आणि त्याचे विकीपेज का नाही हा तुमचा पहिला प्रश्न पटला नाही. सिनेमाचा दर्जा आणि विकीपेज यांचा संबंध कसा असू शकतो? असो. बीबीचा हा विषय नाही. गरज भासल्यास आपण एक वेगळा बीबी चालू करून तिथे चर्चा करू.

छान परीक्षण.. मी बघणार आहेच.. पण एकच शो आहे प्रत्येक थिएटर मधे ,सिटी प्राईड कोथरुडला तर पोस्टर्स आधीपासुन होते तरीपण एकच शो तो ही रात्री ८ चा Sad

चनस,
जास्त प्रेक्षक चित्रपट बघायला गेले, तर शो आपोआप वाढतील. Happy

सिमन्तिनी,

या चित्रपटाची माहिती मायबोलीवर आहे. आपण या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहोत. मुलाखती, ट्रेलर मायबोलीवर आहेत, शिवाय आता परीक्षणंही येतील. त्यामुळे वेगळ्या विकीपानाची गरज भासू नये. Happy

सगळ्यांना मनापासून धन्यवाद Happy
हे जे लिहिल आहे त्याला परि़क्षण म्हणाव की नाही हे मला माहित नाही .
काल रात्री चित्रपट बघून आल्याआल्या लिहायला बसलो आणी जे काही मनात आल ते लिहिल एवढच Happy

Pages