You can not change your fate, NO MAN CAN
==========================================================
तो त्याच्या खोलीतून जवळपास ओरडतच बाहेर आला. खोली कसली, प्रयोगशाळाच होती ती. गेल्या ४ वर्षांपासून कसल्याश्या संशोधनात तो गुंतला होता. त्याची ती चार वर्षांची मेहनत आज फळाला आली होती. ते ओरडणंच सर्व काही सांगत होतं.
त्याने टाईम मशीनचा शोध लावला होता. अनेक शास्त्रज्ञांना भंडावून टाकणारा शोध त्याने आज पूर्णत्वास नेला होता. अणूच्या सर्वात छोट्या कानातून कालप्रवास करता येऊ शकतो या तत्वावर त्याने प्रयोग केला होता आणि अणूचे सर्वात कमी आकाराचे तुकडे करण्यातही तो यशस्वी झाला होता. जग जिंकल्याच्या अविर्भावात ( त्याहूनही मोठी गोष्ट होती ही ) तो पुन्हा ओरडला, " I can change my fate, I can change my future".
लहानपणापासून त्याला एका वाक्याने हैराण केलं होतं, " You can not change your fate, No man can. " कुठल्याश्या गेममध्येसुद्धा हे वाक्य बर्याचदा म्हणले जायचे. त्याच्या हैराण मनाने या वाक्याला शह दिला. आता तो भविष्यात जाणार होता. स्वतःच भविष्य बघणार होता, बदलणार होता. कारण त्याच्या नशिबाने सुद्धा त्याला बर्याच वेळेस शह दिला होता आणि आता वेळ आली होती नशिबाला काटशह देण्याची.
टाईम मशीन च्या धुंदीतच तो अंघोळीला निघाला. मागचा संपूर्ण आठवडा त्याने या शोधाच्या पायात अंघोळ केली नव्हती. आज अंघोळ करून स्वच्छ होऊन तो भविष्यसफरीवर निघणार होता.
पूर्ण दहा मिनिटे अंघोळ मनसोक्त करून तो आपल्या खोलीत परतला. सकाळच वातावरण शांत व प्रसन्न होते. त्या प्रसन्न वातावरणात त्याने खिडकी उघडून आणलेल्या सूर्यप्रकाशाने आणखी प्रसन्नता आणली. भिंतीवर लिहिलेली ती अक्षरे सूर्यप्रकाशात चमकत होती. " You can not change your fate, No man can. "
त्या अक्षरांकडे पाहून तो गालातच हसला. मशीनची सगळी बटणे चालू केली. मशीनचा बारीकसा आवाज सुरु झाला आणि त्याच बरोबर त्याच्या मनातील धडधडसुद्धा. त्या मशिनच्या पारदर्शक काचेच्या प्लाटफॉर्मवर तो उभा राहिला. मशीनवर त्याने वेळ नोंदवली.
वेळ : " ०९ : १५ : २१ : ०० ".
कालावधी : १ सेकंद
अंतर : २४ तास
वर्तमानकाळातल्या एका सेकंदात तो भविष्य काळात २० मिनिटे फिरून येणार होता. कळपटावरील " लॉंच (Launch)" असे लिहिलेले मोठे लाल बटन त्याने दाबले आणि मशिनच्या घरघर सोबत त्याची धडधड पण वाढत गेली. दुसर्याच क्षणाला - नाही नाही - त्याच क्षणाच्या १/१०,००,००० व्या हिस्स्याला अणूचा सर्वात छोटा तुकडा पडला........
.....आणि तो एका हिरव्यागार गवतावर उभा होता. त्याने सभोवार नजर टाकली. आजूबाजूला लहान मुले खेळत होती. झोका...घसरगुंडी..च्या बाजूला बाकड्यावर बसलेले त्या मुलांचे आजी आजोबा त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते. वाराही छान मंदपणे वाहत गवत आणि झाडांना गुदगुल्या करून जात होता. त्याने मनगटावरचे घड्याळ पहिले, ०९:१५:२०. आधी त्याला वाटले की त्याचे कालान्तरण न होता, स्थलांतरण झाले आहे. कारण ती बाग त्याच्या घराजवळचीच बाग होती. त्याने शेजारच्या आजोबांना तारीख विचारली अन आजोबा चक्राऊन त्याच्याकडे पाहू लागले.
तो वेड्यासारखा घराकडे पळत सुटला. तो दुसरा दिवस होता. त्याची भविष्य सफर यशस्वी ठरली होती. आता त्याला त्याच्या प्रयोगशाळेकडे जायचे होते. घराजवळचे चित्र पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या घराभोवती "Do not Enter" च्या पिवळ्या टेप्स लावल्या होत्या. परिसर सामसूम होता. तो दरवाजा उघडून आत गेला. त्याच्या खोलीतील दृश्य पाहून तर त्याला घेरीच आली. त्याच्या बसायच्या खुर्चीवर रक्त सांडले होते. भिंतीवर रक्त उडाले होते. कुणाचा तरी खून अथवा तत्सम घातपात झाला होता. पण नेमके काय झाले आहे हे त्याला कळेना. त्याच्या घरी येऊन कुणी खून केलं होता का काय ?
हे काय चालू आहे माझ्या घरात ! 'मला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चौकशी करायला पाहिजे', असे म्हणून तो घराबाहेर पडला.जाताना रस्त्यावर त्याला ती मगाची बाग लागली. ते आजोबा अजूनही त्याच्याकडे चमत्कारिकपणे पाहत होते. त्या आजोबांना पाहून त्याला वेळेची आठवण झाली. त्याने घड्याळात पाहिले आणि पुन्हा एकदा तो वेड्यासारखा घराकडे पळत सुटला.
त्याची वीस मिनिटे संपत आली होती. शेवटचे ३० सेकंद राहिले होते. कारण वर्तमानकाळात परतण्यासाठी मूळ ठिकाणी परतणे आवश्यक होते. जर असे झाले नाही तर कालपरिवर्तनात चुका झाल्या असत्या. त्यामुळे त्याने पोलीस स्टेशनचा रस्ता सोडला नि परत घराकडे वळला होता.
शेवटचे २० सेकंद....१५ सेकंद....१० सेकंद....
तो पळतच होता. त्या खुनाच्या विचारात तो बराच दूर आला होता घरापासून. तरीही त्याच्या मनात ते विचार अजून घोळत होते. कुणाचा खून झाला असेल बरे ! का मीच कुणाचा खून केलाय ? त्याच्या मनातल्या विचारांनी अचानक वेगळे वळण घेतले होते.
शेवटचे ५ सेकंद.... समोर घर आणि "डू नॉट डिस्टर्ब"च्या पट्ट्या दिसत होत्या. आता फक्त एक रस्ता पार करायचा अवकाश होता. तो आणि घर यांच्यातील अंतर कमी होत होते. त्याने पुन्हा घड्याळात पहिले. शेवटचे ३ सेकंद होते अजून. समोरच घर दिसल्याने त्याची गती मंदावली. पण मनातल्या वेगळे वळण घेतलेल्या विचारांनी डोक्यात हलकल्लोळ माजवला होता.
...इतक्यात डाव्या कानात ट्रकच्या हॉर्नचा आवाज घुमला. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले आणि काही कळायच्या आतच तो दहा फुट उंच वर उडाला....
...आणि मरणप्राय वेदनेने कळवळत रक्तबंबाळ स्थितीत तो त्याच्या खुर्चीवर आदळला. त्याच बरोबर अंगातून निघालेल्या रक्ताच्या चिळकांड्यांनी भिंत न्हाऊन निघाली.
शेवटचे सेकंद संपवून तो आता शेवटचे श्वास मोजत होता. मरताना त्याला त्याच्या मनात चाललेल्या हलकल्लोळाला पूर्णविराम मिळाला होता. आणि त्याच्या आयुष्यालाही.
भिंतीवरची ती अक्षरे आता ओल्या लाल रंगात चमकत होती-
"You can not change your fate, No Man Can"
-यःकश्चित
मस्त कथा. आवडली.
मस्त कथा. आवडली.
कल्पना छान आहे. कथा आवडली.
कल्पना छान आहे. कथा आवडली.
धन्स नंदिनीजी, धन्स मामी
धन्स नंदिनीजी,
धन्स मामी
छान कथा आवडली.
छान कथा आवडली.
छान
छान
Chhan jamli...changla
Chhan jamli...changla Vishay...pan ajun vistarit lihita aal asat...
कथा आवडली.
कथा आवडली.
मस्त कथा.
मस्त कथा.
कथा खूप आवडलि.
कथा खूप आवडलि.
कथा मस्तच जमलीय ....... आवडली
कथा मस्तच जमलीय ....... आवडली !!
थोडक्यात जबरदस्त
थोडक्यात जबरदस्त
सर्वांना खूप
सर्वांना खूप धन्यवाद.....
स्वप्नील एस बी : तुमचे बरोबर आहे...हि अजून खूप विस्तारित होईल पण मग तेवढी इफेक्टिव वाटली नसती...आणि कुठेतरी वाहवत गेली असती..म्हणून थोडक्यात आटोपली,,,
सर्वांना पुनःश्च धन्यवाद
छान आहे.
छान आहे.
चांगली जमली आहे, बहुधा जयंत
चांगली जमली आहे, बहुधा जयंत नारळीकरांच्या एका कथेत पण अशीच थीम वापरली आहे. मला वाटते ती Asimov च्या कथेवर आधारीत होती.
प्रणव, छानच रे खुप दिवसातुन
प्रणव, छानच रे
खुप दिवसातुन माबोवर
सर्वान्ना धन्यवाद आबासाहेब :
सर्वान्ना धन्यवाद
आबासाहेब : होय....परीक्षा होती ...आणि पुन्हा शेवटची सेमिस्टर होती...मग प्रोजेक्ट वगैरे च्या गडबडीत काही लिखाण जमलेच नाही....आता पूर्णतः निवांत झालोय...
अजून एक fantacy कथा लिहितोय....लवकरच टाकेन इथे.:
कथा आवडली
कथा आवडली
मस्त कथा!
मस्त कथा!
छान आवडली
छान आवडली
मस्त !!!
मस्त !!!
आवडली
आवडली
मस्त...
मस्त...
छान
छान
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
छान
छान