Submitted by योडी on 3 June, 2009 - 01:41
खेळाशिवाय लहानपण?? कल्पनाच करवत नाही ना!! तर आपण लहानपणी जे खेळ खेळायचो ते इथे लिहा. शक्य असल्यास कसे खेळायचे ते लिहीलत तर उत्तमच..
आणखी एक नॉस्टॅल्जिया
http://www.maayboli.com/node/8242
गुलमोहर:
शेअर करा
'लोखंडपाणी'
'लोखंडपाणी' नावाने खेळतात बरंका हे टण्या- चक्क पुण्यात! अमूक एका वस्तूला फक्त लोखंडाच्या वस्तूंना स्पर्श करत हात लावायचा.
योगिता रंगांचा म्हणते तो 'टीपीटीपी टीप टॉप, व्हॉट कलर यू वाँट?' आणि मग काहीतरी भारी रंग सांगायचे- सोनेरी, चंदेरी वगैरे. त्या रंगाची वस्तू शोधायची. एकदा 'चांदी' म्हटल्यावर एका मुलाचा दात भरला होता, त्याला बोटं लावली होती सगळ्यांनी
आंधळी कोशींबीर सर्वात डेंजर. कोणाला पकडायला आलं की मुद्दाम 'धोका' ओरडायचं
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).
अरे नक्की
अरे नक्की कसा अस्तो हा खेळ? >>
आशु हा तसा शिवा-शिवी (पकडा-पकडी :)) चाच एक प्रकार आहे...यात ज्याच्यावर राज्य असते त्याने एखादे खुणेचे ठिकाण सांगायचे, आणि तिथे सगळ्यानी पळत सुटायचे...
आणि जर एखाद्याने लोखंडाच्या वस्तुला स्पर्श केला असेल, जसे पाइप, खिडकी तर त्याला राज्य असणारा बाद नाही करु शकत...म्हणुन लोखंडी वस्तु पकडत्-पकडत त्या ठिकाणी जायचे
पण त्याता आडमिट किडा का म्हणतात ते नाय माहित....बहुतेक त्याचे पण टँम्प्लिस सारखे ओरिजिनल वेगळे असावे.
०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/
हो बरोबर..
हो बरोबर.. पुण्यात ह्याला 'लोखंडपाणी' असे साजूक नाव आहे
एकदा
एकदा 'चांदी' म्हटल्यावर एका मुलाचा दात भरला होता, त्याला बोटं लावली होती सगळ्यांनी >> त्याचा जबडा दुखला असेल "आआआआआ" करुन. सगळ्यांची बोटं घातलीत ना त्याच्या तोंडात !
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |
काय भन्नाट
काय भन्नाट टॉपिक आहे हा ..
योगे धन्यवाद ग .. खुप दिवसांनी /वर्षांनी हे सगळे विसरलेले खेळ आठवले ..
चल्लस चल्लस ... हा खेळ मी पुण्यातच दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टित यायचे तेव्हा शिकले व खुप खेळायचो..
पाटाच्या उलट्या बाजुने खडुने किंवा कोळ्श्याने आखुन चिंचोक्याचे दोन भाग करुन खेळायचो.. जो कुणी हारेल त्याला घोड्याला पाणी द्यायला लावायचे .. म्हण्जे हातावर फटाफट प्रत्यकाने फटके द्यायचे त्याने ते वाचवायचे..
पत्ते ... NOT AT HOME हा गेम पण छान आहे .. कुणी खेळ्त होते का ? मला exact आठवत नाही आहे .. सांगा न प्लिझ..
बांगडि च्या तुक्ड्यांना एख्द्या वर्तुळात टाकायचे व एका बोटाने इतर तु़कड्यांना जरा देखिल ध़़क्का न देता बाहेर काढायचे.. नाव आठ्वत नाही ह्या गेम चा ..
खांब खांब खेळतांना दहि दुध द्या अस काहितरि पण म्हण्यायचो आम्ही .. तो देखिल आठ्वत नाहि निट्सा..
अश्विनी,
अश्विनी, 'लंगडशाय दूधभात खाय...' असा खेळतात -
घरातल्या एका खांबाला / माचाच्या पायाला मिठीत घट्ट धरून जमिनीवर एकाने बसायचं. मग त्याच्या मागे त्याच्या पोटाला धरून दुसर्याने बसायचं. त्याच्या मागे तिसर्याने असं सगळ्यांनी बसायचं. एकावर राज्य असणार तो फक्त उभा. मग दुसर्या कोपर्यात राणीचा महाल असणार. ज्याच्यावर राज्य त्याने लंगडी घालत घालत 'लंगडशाय दूधभात खाय राजाच्या बायकोनं भोपळा मागितलाय' असं म्हणत महालापासून या एकामागे एक लागलेल्या भोपळ्यांकडे यायचं आणि सगळ्यात मागच्या भोपळ्याला वेगळं करायचं. त्या भोपळ्याने आपली पकड सैल सोडायची नाही. ती सुटली की त्याला फरपटत फरपटत राज्य असणाराने लंगडी घालत राणीकडे घेऊन जायच्रे. असे करत सगळे भोपळे राज्य असणाराने राणीकडे पोचवायचे. त्यानंतर राणीच्या महालात सगळ्यांनी पाय पसरून ओळीने बसायचं आणि राज्य असणाराला पायावर झोपवून गुदगुल्या करून जेरीस आणायचे. :p
उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुटीत आते आणि मामे भावन्डं आल्यावर सगळ्यांचा आवडता खेळ.
आणि तुमच्यातले कोणी पत्र्याच्या पैशाने / आंब्याच्या कोयांनी / बशीच्या काचांनी खेळायचात का?
याच्यात आधी कचायचे आणि आपली पाळी कोणत्या क्रमांकावर ते ठरवायचे. मातीत एक रिंगण आखायचे रिंगणापासून पाच-सहा फुटांवर एक खच्च्या (रेघ) काढायची. प्रत्येकाने ठरलेली रक्कम किंवा एक/दोन अशा ठरलेल्या कोया / काचा जमा करायच्या. आणि ठरलेल्या क्रमांकानुसार एकेकाने त्या खच्च्यावरून ते त्या रिंगणात टाकायचे. एकही कोय्/नाणं / काच रिंगणाच्या बाहेर गेले की आऊट! मग पुढचा क्रमांक खेळणार. सगळे रिंगणातच पडले की इतरांनी त्यातली एक कोय्/नाणे/काच निवडायची. मग आपण खच्च्यावरून तिच्यावर नेम धरून एकाच प्रयत्नात तिला रिंगणाबाहेर काढायचे. ती रिंगणाबाहेर निघाली तर सगळ्या कोया/पैसे/काचा आपल्या.
पत्र्याचे पैसे म्हणजे -
१. देशी दारूच्या चपट्या काचेच्या बाटल्याचे बूच दगडाने चेपून नाण्यासारखे करायचे. हे १० पैसे - अर्थात दसकी.
२. विजेचा गेलेला दिवा फोडून त्याचा अल्युमिनीअमचा भाग चेपून चपटा करायचा. हे वीस पैसे - अर्थात विसकी.
३. व्हिक्सच्या पत्र्याच्या गोल चपट्या डब्या असायच्या त्याची झाकणं / टायगर बामच्या काचेच्या डबीची झाकणं चेपून सपाट करायची. हे पन्नास पैसे - पन्नासकी.
४. विजेरीतले बाद झालेले विद्युतघट (बॅटरीचे सेल) फोडायचे हात काळे करून त्यातली घाण काढून टाकायची. उरलेल्या पत्र्याला दगडाने ठोकून ठोकून कडक नोट करायची - ही अर्थात शंभरची नोट!
गजा अगदी
गजा अगदी डोळ्यासमोर आलं रे ! काहिही खेळ खेळायचो ना आपण !
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |
वर
वर लिहिल्याप्रमाणे ते Not at Home आहे हे फार उशीराने समजले.. तोवर ते 'नॉटॅठोम' होते
बदाम, चौकट, इस्पिक न् किल्वर- चारही पानांच्या जोड्या जमवायच्या आणि लपवून ठेवायच्या. सर्वांच्या जोड्या झाल्या की एकाने सर्व जोड्या एकत्र करायचा प्रयत्न करायचा. माझे भाऊ फार चाणाक्ष होते त्या बाबतीत. कोणी कोणते पान कोणाकडे मागितले याकडे बरोब्बर लक्ष असायचे. जोड्याही पँटच्या खिश्यात, मोठ्या बहिणी ओढणीखाली वगैरे लपवून ठेवायच्या. 'चॅलेंज' खेळताना तर काय वाट्टेल ती चोरगिरी करायचे दादा-ताई लोक.
बांगडीच्या तुकड्यांसारखे आमच्याकडे मोठी पिशवी भरून चिंचोके होते. चिंचोक्यांचा डोंगर करायचा, फुंकर मारायची, जास्तीत जास्त चिंचोके एकमेकांचा स्पर्श होऊ न देता गोळा करायचे.
पाटामागे घर काढून खेळायचा 'पट'. तासनतास जातात हा खेळण्यात. हे 'लूडो'चं देसी व्हर्जन.
खांबखांबखांबोळी खेळताना मागायची 'शीरा-पुरी'. ज्याच्यावर राज्य त्याला अगदी दिनवाणा करायचं या खेळात.. 'जा पुढच्या घरी..' अगदी रूबाबात सांगून
वा! सर्व चित्र अगदी डोळ्यापुढे येताहेत हे लिहितानाही. धन्स योगिता या बाफबद्दल
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).
आम्हि
आम्हि मुंबई, दिल्ली , मद्रास , कलकत्ता असा पण एक खेळ खेळायचो. तसच फुली - गोळा, नाव्-गाव्-फळ-फुल , खो-खो, लन्गडी, पकडा-पकडी , खाम्ब खाम्ब खाम्बोळी, शिवाजी म्हणतो , पत्ते..पत्त्यांमधले बरेच खेळ झब्बु, बदाम सात , penalty, challenge , अजुन कीतीतरि... लगोरी, सोनसाखळि , डबा ऐसपैस, लपाछपी
प्राजु...
झब्बु,
झब्बु, बदाम सात , penalty, challenge .... हे सर्व खेळ सविस्तर लिहा न
बांगडि
बांगडि च्या तुक्ड्यांना एख्द्या वर्तुळात टाकायचे व एका बोटाने इतर तु़कड्यांना जरा देखिल ध़़क्का न देता बाहेर काढायचे.. नाव आठ्वत नाही ह्या गेम चा >>>> हे आम्ही पण खेळायचो. आम्ही काचकवड्या म्हणायचो..
योडे तुला साष्टांग या बाफ साठी...
योडे तुला
योडे तुला साष्टांग >> जीते रहो पिल्लु..
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235
बांगड्यां
बांगड्यांच्या काचेच्या खेळात प्रचंड एकाग्रता आणि बारकाई लागायची.
आणि बारकाई
आणि बारकाई लागायची>> आणि बांगड्या गोळा करायला चिकाटी पण. आम्ही तर आई, आज्जीसोबत जायचो त्या बांगड्या भरायला जाताना. तेव्हढ्याच बांगड्या गोळा होतील म्हणून.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235
आम्ही ह्या
आम्ही ह्या काचांच्या खेळाला काचापाणी म्हणायचो. बांगड्यांच्या काचा तर प्रचंड होत्या आमच्याकडे. आमच्या जवळ कासाराची एक टपरी होती तो सगळ्या फुटलेल्या बांगड्या टपरीखाली किंवा मागे टाकायचा. दुपारी त्याचं दुकान बंद झालं की लगेच घेऊन यायचो. काय मस्त रंगीबेरंगी दिसायच्या त्या काचा गोलात टाकल्यावर!
======================================
पाचूच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
मस्त विषय.
मस्त विषय. सगळ्यांचीच वर्णनं मस्त.
घर घर ....
घर घर .... ह्या खेळाशिवाय लहान्पण पुर्ण होउच शकत नाही..
घर बनवण्यासाठी चटइ साडी चा वापर ..
डॉक्टर डॉक्टर ... किती तरी खेळ
टिपी टिपी
टिपी टिपी टॉप टॉप खेळतांना माझ्यावर राज्य असताना मी एकदा 'किरमिजी' रंग सांगितला.. अन सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले..! एकदा तर मी सप्तरंगी खड्याचे कानातलेच घालुन गेले खेळायला अन कुठलाही कलर सांगितला की कानाला हात लावायचे....बाकी सगळ्यांना कळल्यावर सगळेच माझे कान धरण्यासाठी आटापिटा करायचे...! हि हि हि ...:P
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
एक्दम
एक्दम नॉस्टॅल्जिक
काचा कवड्या, टीपरी पाणी, लगोरी, विषअमृत, डब्बा ऐस्पैस, रस्सीखेच, सोंड्साखळी( ह्याबद्दल कुणी लिहिले नाहिये.. एकाने बाकिच्यांना पडकायला यायचे जो जो आउट त्यांनी साखळी करायची एक मेकांचे हात धरून आणि इतरांना पकडायचे), टिपी टिपी टीप टॉप, असे बरेच खेळ.... सुट्टी विशेष .. पत्त्यांचे वेगवेगळे.. लॅडिज.. वक्कखई.. ते लाडू कळ्या... नॉट अॅट होम, चॅलेंज, बदाम्सात...
झालच तर मुलांसोबत गोट्या..
आई.. काकू ला संक्रन्तीचे हळदी कुंकवाला वाण मिळालेली भांडी कुंडी घेउन त्यांच्याच ह्या मोठ्ठाला साड्या गुंडाळून भातुकली
औषधाच्या बॉक्क्सेस च्या डबल डेकर बस.. गाड्या .. घरं बनवणे...
उन्हाळयात नदिचे पाणी आटले.. की शहरातून आलेल्या पाहूणे भावंडाना घेउन नदिच्या रेतित.. शंख शिंपले गोळा करून खेळणे...
खुप मोठी यादी होइल...
आपले सगळे खेळ छान होते... आता मुलांसाठी खेळणी घेताना मला नेहमीच ह्या आपल्या जुन्या खेळांची आठवण येते.
कुणी
कुणी रस्त्यावर अशा प्रकारे आखुन टिपरी पाणी खेळले आहे का?? तुम्ही काय म्हणायचे याला??
०------------------------------------------०
आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका!!!
अगं
अगं पिल्ले, हे तर सगळेच खेळले असतील. आम्ही याला ठिक्कर पाणी म्हणायचो.
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |
यावर उद्या
यावर उद्या किंवा सुट्टीच्या दिवशी लिहीणार. खूप आहे. आज नकोच.
येस्स
येस्स ...पहिल्या चित्राप्रमाणे आखुन...! आणि बशिचा / फरशीचा/ खापराचा तुकडा घेउन त्याला थुंकी लावुन या रकान्यात फेकायचा आणि एका बाजुने लंगडी खेळत जाउन तो पायानेच सरकावुन चौकटीच्या बाहेर जाईल अशा रितीने फेकायचा...रेषेवर पडला तर आउट!
वाळुचेच काय.. पावसाळ्यातील ओलसर माती टोकदार दगडाने उकरुन उकरुन पायावर ठेउन खोपे करायचे आणि त्याच्यापुढे आंगण, तुळस, कंपाउंड करुन पांढ-या छोट्या दगडाने सजवायचे..! आहाहा ..कित्ती मज्जा यायची ! आणी आता आमच्या मुलांना हे खेळ माहितीच नाही... ( माहित झाले तरी आवडेल की नाही ही शंकाच)
खरच मी पुन्हा लहान झाले तर...!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
आश्वीनी
आश्वीनी आम्हीही याला ठिक्कर पाणी म्हणायचो, खुपदा खेळायचो हा खेळ , आईचा ओरडाही खाल्लाय कितीकदा . एक्दम नॉस्टॅल्जिक झाले ,धन्स योगीता
****************************************
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटि समप्रभ|| निविघ्नंकुरूमोदेव सर्वकार्येषुसर्वदा||||
टिपरीला
टिपरीला कोल्हापूरात जिभली म्हणतात...
अच्छा तर
अच्छा तर जिभली होय. मी विचार करत होतो, यात टिपरीला थुंकी लावून कशी फेकायची? :p
काचा-कवड्य
काचा-कवड्या कोणी खेळले आहे काय? ल्युडो सारखाच असतो आहे खेळ्..माझा आवडता!
पाटाच्या मागे खडुने आखुन आणि चिंचोक्याचे दोन तुकडे करुन त्याचा क्युब सारखा वापर करायचो!
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
जिभली
जिभली म्हणजे फुटक्या फरशीचा तुकडा... थुंकी? याक्क
कुणी
कुणी रस्त्यावर अशा प्रकारे आखुन टिपरी पाणी खेळले आहे का??
तुम्ही काय म्हणायचे याला?? >>>>
पिल्लू, आम्ही याला आट्यापाट्या म्हणायचो. नावं वेगळी असली तरी सगळेच हा खेळ खेळले असतील.
पाटाच्या
पाटाच्या मागे खडुने आखुन आणि चिंचोक्याचे दोन तुकडे करुन त्याचा क्युब सारखा वापर करायचो! ....
मोकाट .. चल्लस चल्ल्स
(पाटाच्या उलट्या बाजुने खडुने किंवा कोळ्श्याने आखुन चिंचोक्याचे दोन भाग करुन खेळायचो.. जो कुणी हारेल त्याला घोड्याला पाणी द्यायला लावायचे .. म्हण्जे हातावर फटाफट प्रत्यकाने फटके द्यायचे त्याने ते वाचवायचे..)
Pages