kathaस्वप्नांच्या पलीकडले १

Submitted by shilpa mahajan on 1 June, 2013 - 08:49

स्वप्नांच्या पलीकडले १

लहानपणा पासून मला पुराण वस्तू संशोधना विषयी एक वेगळेच आकर्षण वाटत आले आहे . संधी मिळाली रे मिळाली की मी जुने किल्ले , गुंफा , मंदिरे अशा जागांना भेट देत असे . मी नजीबाबाद ला असतानाची गोष्ट , कुणाकडून तरी कण्व मुनींच्या आश्रमा बद्दल कळले . झाले ! माझी उत्सुकता जागी झाली . आम्ही तिघा चौघांनी त्या जागेला भेट देण्याचा कार्यक्रम ठरवला .
त्या वेळी मी नजीबाबादला होतो . एकटाच होतो . त्यामुळे सुटीचा दिवस म्हणजे शिक्षा वाटायची . माझी कर्मभूमी म्हणजे आकाशवाणी चा स्टुडीओ शहरापासून बराच दूर होता . त्या काळी शहरात एकुलता एक सिनेमा हाल होता . तिथे लागलेला सिनेमा तीन वेळा पाहून झाला होता . त्यामुळे सुटीत करण्याजोगे काहीच नव्हते . म्हणून महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवार मिळून कण्व आश्रमाला भेट देण्याचे ठरले .
सुट्टीचा दिवस असल्याने सर्वत्र शांतता होती . काही विद्यार्थी दिसले . त्यांनी सगळा आश्रम फिरून दाखवला . ते पाहून चित्तवृत्ती प्रसन्न झाल्या . .
प्रसन्न मनाने परत निघालो . आमची गाडी फाटकासमोरच उभी होती . तिच्या रोखाने निघालो . दुरूनच दिसले कि कुणीतरी एक व्यक्ती आम्हाला पाठमोरी उभी राहून ड्रायव्हरशी काहीतरी बोलत आहे . थोडे पुढे जाताच मला ती व्यक्ती नीट दिसली आणि मी एकदम दचकलोच
" हे तर पाठक गुरुजी !!" एकदम माझ्या तोंडून उद्गार निघाला. पण हे इथे कसे ?
छे छे ! ते पाठक गुरुजी असणे शक्यच नाही भास झाला असेल! . त्यंच्या सारखा दिसणारा दुसराच कोणी असेल ! मी माझ्या मनाशी विचार करत होतो . आणखी जवळ गेल्यावर माझे लक्ष गेले , त्यांचे बोट धरून एक तीन चार वर्षाचा मुलगा उभा होता . मी विचारात पडलो . पाठक गुरुजीना तर मूल बाळ नव्हते ! तेव्हढ्यात त्यांच्या विशिष्ट पद्धतीने नेसलेल्या धोतराकडेमाझे लक्ष गेले आणि मग मात्र माझी खात्रीच पटली, पाठक गुरुजीच ते !
" काय पाठक गुरुजी , इकडे कुणीकडे ? " मी उत्साहाच्या भरात जोराने हाळी दिली .
क्षणभर त्यांचं शरीर ताठरलेल मला जाणवलं . पण त्यांनी एकदम काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही . काही क्षण मध्ये जाऊ दिले . मग सावकाश मागे वळून माझ्याकडे अनोळखी नजरेने पहात म्हणाले ,
" आपने मुझसे कुछ कहा ?"
त्यांचा पवित्रा पाहून मी गांगरलोच !. मग क्षणभराने मीही सावरलो आणि म्हणालो ,
" क्षमा कीजिये , मी आपको कोई और हि समझ बैठा, वही ! हमारे पुराने मित्र पाठकजी !. शकल सूरत
" कोई बात नाही , होता है कभी कभी ऐसा ! मुझे विष्णू शर्मा कहते हैं ". "
मुझे आपसे थोडा काम था"""
" पंडितजींना आपल्याबरोबर कोट द्वाराला यायचे आहे . " ड्रायव्हर मला सांगू लागला ,
" या भागात वाहन मिळणं कठिणच असतं . म्हणून आपल्यासारख्या आल्या गेल्या वाहनाला विनंती करूनच काम भागवावं लागतं . एरवी मी पायीच जातो , पण आज हा लहान मुलगा बरोबर आहे म्हणून …. " शर्माजी बोलले ,
" काहीच हरकत नाही, चला शर्माजी , आम्ही सोडतो तुम्हाला. आम्ही त्या दोघाना गाडीत घेतलं , . " मी . उत्तर दिलं . गाडी निघाली .
कोट द्वारातच नव्हे तर आम्ही त्यांच्या घरापर्यंत सोडलं . शर्माजी उतरले .
"एकाध कप चाय पीके जाते तो ख़ुशी होती !"
शर्माजी माझ्याकडे पाहून बोलले ,
त्यांच्या नजरेत मला एक वेगळाच आर्त भाव दिसला ,
" तुम्ही लोक पुढे व्हा , मी मागाहून येतो बस ने. ." मी माझ्या सहकारया ना उद्देशून बोललो आणि शर्माजींच्या बरोबर निघालो . .
काही वर्षांपूर्वी मी राजकोटला होतो ,पाठकजी माझे शेजारी होते . . पन्नाशीच्या घरातलं जोडपं होतं
मूल बाळ काही नव्हतं, . पण कसलीही खंत न बाळगता आनंदात जगत होतं. आमच्याशी खूप चांगले संबंध प्रस्थापित झाले होते त्यांचे ! घट्ट म्हणता येईल अशी मैत्री माझ्या बायकोत आणि भाभीजी (सौ, ) .यांच्यात झाली होती पूर्वी त्या मिड वाइफ़ च काम करायच्या, आता मात्र फक्त गृहिणी होत्या. . प्रत्येक छोट्या मोठ्या बाबतीत एकमेकांचे सल्ले दिले घेतले जात. . एक दिवस अचानक असा उगवला कि आम्ही सारे किंकर्तव्य मूढ झालो. ! अचानक एका सकाळी उठलो तर पाठकजींच्या घराला कुलूप! ! मी सौला विचारले कि ते कुठे जाणार असल्याचे बोलले होते का ? तिचे नकारार्थी उत्तर ऐकून मी चाटच पडलो . मग वाटले कि फारच इमार्जन्सी आली असेल , गेले असतील त्यांच्या गावी कदाचित ! दोन चार दिवस काही दिवस वाट पाहिली . मग मात्र राहावेनच ! त्याची चौकशी करावी म्हणून त्यांच्या ऑफिसात गेलो . त्याने आश्चर्य अधिकच वाढले . त्यांनी महिन्याची रजा घेतली होती . कारण मात्र कुणालाच माहिती नव्हते . तेव्हा पासून पाठकजी जे गेले ते कधी परत आलेच नाही या ऑफिसात सहकारी देखील बुचकळ्यात पडलेले होते . पुढे केव्हातरी कळले की त्यांनी नोकरी देखील सोडली !
त्यांचा कोणाशी हि भांडण तंटा असल्याचे ऐकिवात नव्हते , त्याना कसलेही व्यसन नव्हते , असे हसते खेळते जोडपे अचानक नोकरी सोडून गावही सोडून परागंदा होते हे काही केल्या आमच्या पचनी पडत नव्हते . पण असे झाले होते खरे ! काळ कुणासाठी थांबत नसतो ... हळू हळू आम्ही पण सावरलो एक सल मात्र उरात कायम सलत राहिला . पुढे माझी बदली दिल्लीला झाली . मी राजकोट सोडले आणि पाठक कुटुंब विस्मृतीत गेले .
सध्या मी देप्युटेशन वर नाजिबाबाद ला एकटा आलो होतो .
शर्माजीनी दारावरची घंटी वाजवली . दार उघडले त्यांच्या पत्नीनी . माझी शंका टक्के खरी होती! ! त्या सौ पाठकच होत्या . मला पाहून त्या चांगल्याच दचकल्या . मला ते स्पष्ट कळले .
" नमस्ते भाभी जी!! पहा कसं शोधून काढलं तुम्हाला ! तुमच्या हातचा स्पेशल चहा प्यायला आलोय . आणखी हि खूप हिशेब राहिलेत, तेही करणार आहे चुकते ! " मी बोललो .
त्या काहीच बोलल्या नाही . फक्त एक ओशाळे स्मित करून आत गेल्या .
आम्ही सारे आंत गेलो. तो छोटा मुलगा भाभिजींचा पदर धरून त्यांच्या आडून पहात होता . मी त्याला जवळ घेतले . तो थोडा खुलला . माझ्या खिशात असलेले चौकलेत त्याला .
" भाभीजी , तुमच्या अचानक राजकोट सोडण्यामागचे कारण हेच का ?" मी मुलाकडे दृष्टीक्षेप टाकत विचारले . " पण त्यात गाव आणि नोकरी सोडून जाण्यासारखे काय होते ? खूप लोकाना होतात उशिरा मुलं !"
पाठकजीनचा चेहेरा कसनुसा झाला. . सागू कि नको याचा संभ्रम त्यांच्या चेहेऱ्यावर मला दिसला . मी गप्प बसलो.. चहा झाला , जेवायलाही थांबायचे ठरले . त्याना वेळ हवा होता.. .
. थोड्या वेळाने आम्हाला वर्दी द्यायला तो छोटा मुलगा आला .
" पापाजी , अम्मी कह रही है कि खाना लग गया है ."
खूप वर्षानंतर मांडी घालून जेवायचा योग आला होता, . त्यातून भाभिजींच्या हाताचे स्वादिष्ट जेवण मग ! काय विचारता ? मन लावून मी जेवत होतो . जेवत जेवता सहज लक्ष गेले , भिंतीशी लांबच्या प्रवासाला जायचा बेत असावा असे सामान लावून ठेवलेले होते .
ते पाहून मी गोंधळात पडलो .
" पाठक जी , पुन्हा कुठे तरी पलायन करायचा विचार आहे कि काय ? सामानाकडे संकेत करत मी विचारले. आणि हे काय ? हे मेडिकल किट , औषधं ,जंतुनाशक साबण , कापूस हे सारं , भाभिजीनी पुन्हा त्यांचा व्यवसाय सुरु केला का ? "
पाठकजी काही बोलले नाहीत . पेंगुळलेल्या मुलाला ते थोपटत होते.. डोळ्यांनीच त्यांनी "नंतर बोलूया " असा इशारा केला
मुलगा झोपल्यावर आम्ही अंगणात येउन बसलो . अंगणात खाटा टाकल्या होत्या . चांदणे पडले होते , रातराणीचा गंध दरवळत होता पण माझ्या मनात विचारांचे जे काहूर माजले होते ते मला त्या सुगंधी वातावरणाचा आस्वाद घेऊ देत नव्हते . कधी एकदा पाठकजी माझ्या साऱ्या शंकांचे निरसन करतात त्याची मी आतुरतेने वाट पहात होतो .
अखेर ती वेळ आली एकदाची ! मुलगा झोपल्यावर दोघे पती पत्नी बाहेर आले .
" तुमच्या मनात कोणकोणत्या प्रश्नांचे काहूर माजले असेल , त्याची मी कल्पना करू शकतो . पाठकजीनि बोलायला सुरुवात केली.
खूप मोठी कहाणी आहे ती सगळी. . कुठून सांगायला सुरुवात करावी तेच समजत नाहीय मला .
" तुम्ही अचानक कोणाला न सांगता राजकोट का सोडलेत ते सांगा पाहू ! "
मी उतावीळ पणाने म्हणालो .
" सांगतो , पण एक विनंती आहे , मी जे तुम्हाला सांगेन ते आपल्या दोघातच राहू दे !"
" त्याबद्दल तुम्ही निश्चित असा . " मी त्यांना भरवसा दिला . तेव्हा ते पुढे बोलू लागले ,
क्रमशह

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपूर्ण लेखन चुकून प्रकाशित झालेले दिसतेय

असो शिल्पा जी अनेक दिवसांनी तुम्हाला मायबोलीवर पाहिले आनंद झाला Happy

.

vaibhav ku

dhanyavaad , kathecha pahilaa bhaag taakalaa aahe. kaal dekheel taakalaa hota parantu to aaj ughadlyaavar disalaa naahi .kaay zaale kunaas thaauk !
pratisaadaabaddal dhanyavaad .