सोलर कूकर

Submitted by नंदिनी on 31 May, 2013 - 01:29

मला घरगुती वापरासाठी एक सोलर कूकर घ्यायचा आहे. आमच्याकडे सकाळी आठ ते संध्याकाळी चारपर्यंत कडक ऊन येतं. त्यामुळे उन्हाचा उपयोग करून घेण्यासाठी कूकर हवा आहे- एक हौस म्हणून शिवाय तितकाच गॅस आणि जळण वाचेल हा दुसरा दृष्टिकोन.. दोन माणसांचा भात-वरण किंवा बटाटे उकडणे वगैरे उपयोग झाला तरी पुष्कळ आहे. रोजच्या रोज नाहीतर किमान आठवड्यातून दोन तीनदा वापरता येतील. मला बाजारामधे सोलर कूकर कधी दिसले नाहीत. ऑनलाईन सर्चमधे पण काही ऑप्शन्स दिसत नाहीयेत.

कुणी याबद्दल अजून काही माहिती देईल का? मायबोलीकरांपैकी कुणी सोलर कूकर वापरले आहेत का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे सोलर कूकर आहे पण तो फारसा वापरला जात नाही. अर्थात ह्याचे कारण आमची आणि त्याची वेळ जमून येत नाही हे आहे. Happy सकाळचा डब्याची घाई असते त्यामुळे नेहमीच्या कूकरमधेच स्वयंपाक केला जातो.

पण दाणे, रवा इ. छान भाजले जातात. चिकन मस्त शिजते. वरण छान होते. भाताला मात्र थोडा वास येतो Sad

काशी, धन्यवाद. मी चेन्नईमधे आहे. तरी वेबसाईट बघून त्यांना मेल टाकलाय.

कर्व्यांचा काही संपर्क मिळाला तर सांग इथेच.

नताशा, मला वेळेचा प्रश्न नाही, त्यामुळेच घ्यावासा वाटत आहे, नुसतं दररोज "काय ऊन आहे" म्हणत बसण्यापेक्षा त्या उन्हाचा जरा सदुपयोग तरी करून घ्यावा Happy

सुदर्शन सौर आहेत औरंगाबाद, मी सोलर वॉटर हिटर घेतले पाणी खुपच गरम मिळते. सध्यातर चादरीने झाकुन सुध्दा पाणी गरम होते
सोलर कुकर मलाही घ्यायचा आहे. ३००० पासुन पुढे आहेत रेट बहुतेक

नुसतं दररोज "काय ऊन आहे" म्हणत बसण्यापेक्षा त्या उन्हाचा जरा सदुपयोग तरी करून घ्यावा >> ही एक नंबर विचारसरणी

मी पण गूगलबाबांनाच शरण गेलो आणि हे पहा,

http://www.justdial.com/Chennai/solar-cooker-dealers-%3Cnear%3E-ashok-nagar

नंदिनी, मी वापरते सोलर कुकर, अगदी रोज नाही, पण अधून मधून- दाणे, रवा, खोबरे, धने-जीरे, तीळ भाजण्यासाठी. खोबरे एकाच दिवसात, ते सुद्धा लक्ष ठेऊन भाजावे लागेल, जर कडक ऊन असेल तर.
डाळ, उसळी छान होतात, वेळेचे गणित मात्र उन्हाचे प्रमाण बघून ठरव. भात कायम फसलाय त्यात Sad
कणी रहाते, पीठूळ होतो... लाडुंसाठी कणीकही भाजलेय त्यात.

गाढियांच्या डिशा पुण्यामुंबईसारख्या शहरांमध्ये काम करू शकत नाहीत. बाल्कनीमध्ये तेवढी जागा नसते. त्यांचा लहानातला लहान डिशकूकर ८-१० माणसांचा स्वयंपाक करू शकतो. साधारण सव्वा चौ. मीची जागा हा कूकर व्यापतो.

त्यांचे छोटे पेटीकूकर हे घरगुती वापरासाठी अधिक योग्य आहेत.

मुंबईत ताडदेवला त्यांचं ऑफिस आहे.

सुदर्शन सौर >>> याचा अनुभव आहे- चांगला आहे. पण भात शिजवुन पाहिला नाहीये कधी.
उसळी मस्त शिजतात. पाणी मस्त गरम होते.

चिनूक्स
त्यांचे छोटे पेटीकूकर हे घरगुती वापरासाठी अधिक योग्य आहेत. >> तेव्हढ्याच जागेत मावतील असे छोटे चाकाचे मिरर्स बनवलेत. मधल्या जागेत भांडं मावतं. हे संयंत्र आता कुठेही मिळतं. पेटंट वगैरे ठेवलेलं नाही. कुठे नाही मिळालं तर नंतर मी वलसाडचा त्यांचा नंबर शोधून देईन.

वर दिलेल्या लिंकेत त्यांचा पत्ता आहे. ताडदेवला एसी मार्केटात हे कूकर मिळतात. अशीच यंत्रं तिलोनियातही तयार केली जातात.

.

क्सा, मला बाल्कनीचा प्रश्न नाही. चांगलं मोठं अंगण आहे. शिवाय ऊनदेखील भरपूर असतं, पण मला एकाचा अथवा दोघांसाठी वापरता येईल एवढा छोटाच कूकर हवाय. शिवाय तो कूकर चेन्नईमधे सहज उपलब्ध देखील व्हायला हवा.

मोठे ब्रँड्स अजून सोलर कूकरमधे उतरले नाहीत का?

देशात एवढी सौरऊर्जा वाया चाललीय ......मग सोलर कुकर एवढे प्रचलित का नाही झाले ?
का बाकीचे इंधनस्त्रोत संपायची वाट पहातोय आपण Sad

नुसतं दररोज "काय ऊन आहे" म्हणत बसण्यापेक्षा त्या उन्हाचा जरा सदुपयोग तरी करून घ्यावा >>>>> मलाही इथल्या उन्हाळ्यात असेच वाटत असते. इथेच झालेल्या एका चर्चेनंतर (बहुदा दिनेशदांनी) सांगितलेल्या इंदोरच्या एका कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे काहीच उत्तर आले नाही. त्या कंपनीचे संपर्क तपशिल शोधून इथे लिहीते.
माझ्या एका मैत्रिणीने पुण्याहून सो कु आणला होता. पण प्रवासात एक काच फुटली! Sad या कारणामुळे मी नंतर सो कु चा नाद सोडून दिला.

नंदिनी
माझ्या माहेरी आहे सोलर कुकर. चार ड्बे बसतात त्यात. आई नेहेमीच वापरते. बरेचदा आई-बाबा दोघेच असतात.
आई त्यामधे वरण्-भात तर नेहेमीच करते. सकाळी लावला की जेवायच्या वेळेपर्यन्त, १२:३० - १, पर्यन्त छान होतो. तसेच बटाटे उकडणे, दाणे-रवा भाजणे, उसळी शिजवणे इ. छान होते. आई थालिपिठाची भाजणीही नेहेमी सोलर कुकरमधे भाजते आणि खारे दाणेही करते. एकदा उन्हाच्या अँगलचा अंदाज आला की सगळे जमू शकते.
४ वर्षांपासून सोलर कुकर वापरात आहे. काही मेंटेनन्स नाही. घेताना डिलरने एव्हढेच सांगितले होते की काळे कोटींग खराब झाले (डबे धुणे, पुसणे इ.मुळे) तर पुन्हा देऊन घ्या. पण अजूनपर्यंत वेळ आलेली नाही.

अरे वा. सोलर कुकरची साधारण किंमत काय असते?

आम्ही ट्रायल म्हणुन घरी एक बॉक्स वापरुन करुन पाहिला पण त्यात पाणी गरम होण्याशिवाय काही झाले नाही.

सकाळी आठ ते ११ इतक्याच वेळ बाल्कनीमधे ऊन येते, तर सो.कु. वापरता येईल का?

अरे वा. सोलर कुकरची साधारण किंमत काय असते?
>> आम्ही बहुतेक १५०० की १८०० रु ला घेतला होता. ४-४.५ वर्षांपूर्वी.

माधवी, कुठून घेतला होता त्या डीलरचे डीटेल्स देशील का? मी ऑनलाईन बघते आहे ते सर्व ५०००च्या पुढे आहेत.

देशात एवढी सौरऊर्जा वाया चाललीय ......मग सोलर कुकर एवढे प्रचलित का नाही झाले ?
>>> हाच प्रश्न मला पडलाय. मुंबईपुणेमधे जिथे अपार्टमेंट आहेत तिथे ऊन पूर्ण वेळ मिळेल याची खात्री नाही, पण बाकी गावांमधून, खेड्यांमधून सोलर कूकरला आरामात मार्केट मिळू शकेल.

नंदिनी
जस्ट डायल वरूनच मिळाले हे डिटेल्स. बहूतेक आम्ही इथूनच घेतला होता. घरी नक्की डिटेल्स कोणाला आठवत नाहियेत आता. Sad

साहिल सोलर शॉपी
खरबंदा पार्क, द्वारका, नाशिक- ४२२०११
९८९०९२५७३४
(०२५३) ६५३५७३३

सोलर पॅनलचे छत हा प्रकार अजून भारतात सुरु झाला नाही का?? म्हणजे मोठमोठ्या अपार्टमेण्ट हाऊसिंग मधे सो पॉवर वर पाणी गरम करणे, आणि त्याहून पुढे जाऊन वीज निर्मिती करणे का करत नाहीत. हिवाळ्यात सुद्धा ७-८ तास चांगले ऊन असते तिथे. कशाला वाया घालवायची ही शक्ती? Sad
इथे अमेरिकेत मागल्या वर्षी ओबामा सायबांनी टॅक्स बेनिफिट दिला होता सोलर रुफ करणार्‍यांसाठी.

>>देशात एवढी सौरऊर्जा वाया चाललीय ......मग सोलर कुकर एवढे प्रचलित का नाही झाले ?

काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्सपण आहेत. उंचं बिल्डिंगीचं, त्यातल्या गॅलर्‍यांचं माहिती नाही, पण नागपुरात घराच्या गच्चीवर, अंगणात काही वर्षं सोलर कुकर वापरला होता. माकडांचा उच्छाद फार व्हायचा. आरसा फोड, काच फोड हे उद्योग झाले. त्यांनी, चटके बसले तरी, भांडी बाहेर काढ, झाकणं उचकट हे प्रकारही केले. ओळखीच्यांनी काही कुकर्स गावात नेले होते. तिथे बकर्‍या आणि इतर जनावरांचे त्रास झाल्याचं कळलं. 'कुकरची रखवाली करायला म्हातारीला बसवायचो. ती गेली तेव्हापासून कुकरमधे कपडे ठेवतो.' असं सांगितलं.

..

Pages