फेसबुक वर My Horror Experience नावाचं एक पेज आहे. इथे भूत प्रेतांच्या अनेक कथा पोस्ट केलेल्या आहेत. ह्या पेजची बेसिक कंडीशनच अशी आहे कि इथे फक्त सत्यकथा पोस्ट होतात. कोणीही काल्पनिक कथा पोस्ट केल्याचं कळताच त्याला पेज वरून काढून टाकण्यात येतं. पेजचा मुख्य उद्देश अंधश्रद्धा पसरविणे असा नसून अमानवीय शक्तीही या जगात आहेत ह्याची जाणीव करून देणे इतकाच आहे. ह्यावर विश्वास ठेवावा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे. ह्या पेजवर Admin ने पोस्ट केलेली आणि प्रत्यक्षात घडलेली ही कथा ….
माझा एक जुना कलिग .. रोहित पाटील .. रोहितला ट्रेकिंग, हायकिंग ची खूप आवड!! इंजिनिअरिंगला असताना तो "सिद्धगड" किल्ल्यावर ट्रेकिंगला गेला होता. तेव्हाचा हा किस्सा ..
थोडा दुर्लक्षित असलेला हा किल्ला, भीमाशंकरच्या निबिड अरण्यात लपलेला आहे. रोहीत आणि अक्षय असे दोघे बाईकने निघाले. मजा मस्ती करत नारिवली (मुरबाड जवळ) खेड्यात पोचले तेव्हा दुपारचे ४ वाजले होते. दुपारी गावात पाणी वैगरे भरून घेतल, रस्त्याची चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं गावातून सिद्धगडवाडी नावाच्या वाडीपर्यंत जाव लागत. सिद्धगडवाडीतून किल्ल्यावर जायला २ तास लागतात. सिद्धगडवाडीला जाणारा रस्ता जवळपास निर्मनुष्य आहे आणि भीमाशंकर अभयारण्यातून वाट काढत जावे लागते.
एवढी माहिती कळल्यावर दोघे निघाले. गावातील एक दोन म्हाताऱ्या माणसांनी सांगितले, अंधार होईल, घाबरू नका. कुणी हाका मारल्या ओ देऊ नका. मागे वळून बघू नका. वाडीत पोचलात की आराम करा, रात्री वर जाऊ नका. तरुण रक्त आणि नाईट ट्रेकचा प्रचंड अनुभव गाठीशी असलेल्या दोघांनी हे सल्ले कानामागे टाकत चालायला सुरवात केली.
हिवाळ्याचे दिवस असल्याने, सूर्यास्त लवकर झाला. ते निम्म्या रस्त्यात पण पोचले नसतील, अंधार झाल्याने अक्षय्नी ट्रेकिंगसाठी खास करून घेतलेली battery सुरु केली. गप्पा मारत चालत होते. हळू हळू अंधार गडद झाला, झाडांचे चित्र विचित्र आकार अजून भयानक झाले. नाईट ट्रेक केलेल्या मित्रांना अंदाज आला असेलच किती भयानक दृश्य दिसतात. बराच वेळ चालल्याने दोघ एका झाडाखाली थांबले, पाणी पिऊन, तंबाखू मळून दाताखाली दाबला आणि निघाले. थोडे पुढे जातात तोच, मागून एक माणूस आला, त्यानी ह्यांच्याकडे तंबाखू मागितली, ह्यांनी दिली. वाडीला जाणारा माणुस भेटला म्हणून दोघे जाम खुष झाले. गप्पा रंगल्या. तो वाडीतल्या शाळेत शिकवणारा मास्तर होता, विशाल जावळे म्हणून.
अंदाजे ३ -४ तास ते चालत होते, वाडीचा रस्ता २ -३ तासांचा चालत. निघाले होते साडेपाच ला, पण अजून वाडीच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या. जंगल संपायला तयार नव्हते. विशाल सारखा हे काय आलंच असा म्हणत होता. आता मात्र रोहितला थोडी भीती वाटायला लागली. म्हाताऱ्याचे बोलणे आठवले. हा आपल्या मागून आला, दिसतोय नॉर्मल पण भूत कुणी बघितलंय का? कुतूहल म्हणून रोहितने त्याचे पाय पण पाहून घेतले, ते पण सरळ होते. अजून अर्धा एक तास गेल्यावर रोहीत अजून घाबरला, त्यानी अक्षयला करंगळी वर करून इशारा केला, तेव्हा ते थांबले. विशालला न कळत इशारा केल्याने तो ४-५ पावले पुढे गेला. त्याने मागे वळून बघताच, रोहितने हात जोडून रामरक्षा म्हणायला सुरवात केली. अक्षयने पण त्याच्या सुरात सूर मिळवला. ते पाहून विशाल जोर जोरात हसायला लागला, म्हणाला याचा काही उपयोग नाही. तुम्हाला मारायचे असते तर कधीच मारले असते. पण तुम्ही मला तंबाखू दिली, माझ्याशी वार्ता केली. बऱ्याच वर्षांनी कोणीतरी बोललं माझ्याशी.. मला तुम्हाला मारायचे नाही. पण आता आल्या पावली परत जा. बोलता बोलता त्याच्या डोळ्यांची बुबुळे पांढरी झाली आणि तो जागेवर नाहीसा झाला. इकडे दोघांच्या पॅन्टीमात्र ओल्या झाल्या. ते उलटे पळत सुटले ते नारिवलीकडे, आणि अर्ध्या पावून तासात नारिवलीत पोचले पण!! म्हाताऱ्यानी सांगितलेल्या विश्वासच्या भोवऱ्यात ते अडकले होते, पण केवळ नशीब बलवत्तर म्हणून तंबाखूवर सुटले. त्यानंतर मात्र दोघांनी कोणताही नाईट ट्रेक केला नाही.
त्यांचा हा किस्सा ऐकल्यावर, मी काही मित्रांसोबत मुद्दामून सिद्धगड नाईट ट्रेक केला, पण आम्हाला असा कोणताही अनुभव आला नाही, हे आमचे दुर्दैव म्हणावे की सुदैव हे त्या रामरायाला ठाऊक !! आम्हाला कळलेली माहिती, वाडीतल्या मास्तरची जंगली प्राण्यांनी शिकार केली होती, त्याचे प्रेतही मिळाले नव्हते. तेव्हापासून तो कधी कधी दिसतो, पण कुणाला काही करत नाही...
तुम्हाला कोणत्या ट्रेकमध्ये असे अनुभव आले आहेत किंवा कोणाकडून ऐकले आहेत ??
छान झोप येतेय वाचून व्हेरी
छान झोप येतेय वाचून व्हेरी गुड
मी ह्या रोहित पाटीलला
मी ह्या रोहित पाटीलला फेसबुकवर शोधलं तर हा आपल्या यो रॉक्स च्या फ्रेंडलिस्ट मध्ये सापडला. ज्या मायबोलीकरांनी ऑफबीट बरोबर अलंग मदन ट्रेक केला त्यांच्याबरोबर हा रोहित पाटील होता. हा बहुतेक तोच असावा.
ओंकार... वर उल्लेख केलेला
ओंकार... वर उल्लेख केलेला रोहित पाटिल म्हणजे मायबोलीकर डेविल (रोहित पाटिल) नव्हे.
या आधी त्याने वरिल किस्सा कधी आम्हाला ऐकवला नव्हता... आणि त्याने अजुन एकदाही सिद्धगड केलेला नाही... फोन वरुन खात्री करुन घेतली.
इंद्रा… सारखे नाव… त्यात
इंद्रा… सारखे नाव… त्यात ट्रेकर आणि त्यात सिद्धगड नाईट ट्रेक म्हणून तसं वाटलं. असो. मुद्दा कंटिन्यू करूया. असे ट्रेकच्या दरम्यान आलेले अमानवीय अनुभव शेअर करा.
मला अजून तरी नाईट ट्रेक मधे
मला अजून तरी नाईट ट्रेक मधे अमानवीय अनुभव आलेला नाही. मात्र गोरखगडच्या नाईट ट्रेक मधिल सागाच्या झाडांचे चित्रविचित्र पांढरे आकार कायम लक्षात राहतील.
आशुचॅम्प चा धागा आहे की
आशुचॅम्प चा धागा आहे की अमानवीयचा अजून कशाला पय्जेल?
तो मी नव्हेच आमचा सिद्धगड
तो मी नव्हेच
आमचा सिद्धगड अजुन बाकी आहे.
छ्या! या किश्शापेक्षा आशुचा
छ्या! या किश्शापेक्षा आशुचा किस्सा जास्त फाडतो..!
नाईटट्रेक्स भरपूर केलेत, पण असला अनुभव नाही..
राक्षसगण असल्याने असेल
आता वाचतांना मजा वाटतेय पण
आता वाचतांना मजा वाटतेय पण त्या दोघांची काय तंतरली असेल याची कल्पना येतेय .
हेम… आशुचा अनुभव तर शब्दश:
हेम…
आशुचा अनुभव तर शब्दश: फाडू आहे. पण तू एक बघितलंस का …इथे भुताचं नाव पण दिलं आहे. जी रेअरेस्ट केस आहे. आपल्यातलं कोणी येत्या काळात सिद्धगडला जाणार असेल तर स्थानिकांकडून अजून माहिती मिळेल.
रच्याकने आशुने अमानवीयचा भन्नाट धागा उघडला होता. सुरुवातीला प्रचंड मजा आली होती वाचताना. पण नंतर काही उत्साही वीरांनी एकमेकांची खिल्ली उडवण्यात आणि खेचाखेची करण्यातच प्रतिसादांचा आकार वाढवून ठेवला. अनेकदा सांगूनही मूळ मुद्द्यापासून विषय कुठच्या कुठे भरकटत गेला. आपण इथे हा प्रकार टाळूया. चालेल का ??
माझाही राक्षसगण. पण
माझाही राक्षसगण.
पण राक्षसवाल्यांना तर असे अनुभव हमखास येतात ना?
@ आनंदयात्री ज्यांचा
@ आनंदयात्री
ज्यांचा मनुष्यगण असतो त्यांना सगळ्यात जास्त अनुभव येतात. देव गण असलेल्यांना कधीही आत्मे दिसत नाहीत. राक्षसगण असलेल्यांनाही भूतांची भीती नसते.
रच्याकने ज्यांच्या पत्रिकेत चंद्र शत्रूस्थानात आहे किंवा तो पापग्रहांनी दुषित आहे असे लोक प्रेतात्म्यांच्या नुसत्या गोष्टींनीही थरथर कापू शकतात. त्यात मुलगी असेल तर झालंच … !!!!
राक्षसा समोर भुत कसा येईल...
राक्षसा समोर भुत कसा येईल... त्यासाठी फक्त माणुसगण हवा..
ज्यांचा मनुष्यगण असतो त्यांना
ज्यांचा मनुष्यगण असतो त्यांना सगळ्यात जास्त अनुभव येतात. देव गण असलेल्यांना कधीही आत्मे दिसत नाहीत. राक्षसगण असलेल्यांनाही भूतांची भीती नसते.
>> अच्छा! म्हणजे 'पछाडलेला' पिच्चरमध्ये उग्गाच दाखवलंय... भरतचा राक्षसगण असतो त्यात..
भरतचा राक्षसगण असतो
भरतचा राक्षसगण असतो त्यात..>>> मनुष्यगण दाखवालाय रे त्यात.
ओह्ह.. ओक्के...
ओह्ह.. ओक्के...
इंडो तिब्बेट बॉर्डरवरचा
इंडो तिब्बेट बॉर्डरवरचा व्यासगुहेच्या पुढचा स्वर्ग की सीढिया हा ट्रेक मी केला होता. त्या वेळी रात्रीचं तंबू ठोकून राहत असू. या रस्त्यावर अनेक मृत्यू झालेत. पांडव याच रस्त्याने स्वर्गाला गेले होते. भयाण वाटतं. पण कळवण्यास दु:ख होतं कि इच्च्छा असूनही एकही भूत भेटलं. नाही. भूतांनी मला (इथंही) इग्नोर केलं असावं
दुसरा ट्रेक जोशीमठपासून कल्पवृक्ष शोधायला गेलेलो तेव्हाचा. इथं हमखास भूत भेटणार होतं. पण नाहीच ! निष्कर्ष असा निघतो कि जी जी भूतं असतात ती माझ्यापासून चार हात लांब राहतात (इग्नोरास्त्र )
>>> निष्कर्ष असा निघतो कि जी
>>> निष्कर्ष असा निघतो कि जी जी भूतं असतात ती माझ्यापासून चार हात लांब राहतात (इग्नोरास्त्र )<<<<<
तर मग असे समजायला हरकत नाही की त्या भूतांन्ना वाडकर्यान्ची बाधा झाली असेल!
मला रोज आरशात "भुत"
मला रोज आरशात "भुत" दिसते.............. .
.
.
.
एलटी ते वाक्य शब्द फिरवून
एलटी
ते वाक्य शब्द फिरवून लिहीतो. अजून अचूकता येईल त्यात.
जे जे मला इग्नोर करतात ते ते भूत, पिशाच्च, मुंजा, खवीस, झोटिंग, राक्षस, दानव, यक्ष, किंकर, इ. इ. पैकी असतात.
एकदा मात्र भीती वाटावी असं घडलं होतं. माझा एक मित्र देवदेवस्की वगैरे करायचा. खारदुंगला पार केल्यावर डिस्कीटच्या पुढे ह्युंडेर नावाचं गाव आहे. त्या गावात नदीच्या किनारी एका कॉटेजमधे उतरलो होतो. कॉटेज तसं एकांतात होतं. हा संपूर्ण इलाकाच जगापासून कट ऑफ असल्यासारखा आहे. रात्री छान पिठूर आकाशगंगा दिसते. हा मित्र नेमका माझा रूम पार्टनर म्हणून आला. रात्री बरोबर बारा वाजता त्याने मला उठवलं.
पैंजणाचा आवाज येतोय का ?
मी डोळे चोळत उठलो तर पैंजणाचा आवाज. खाडकन उठलो. थोड्या वेळाने लक्षात आलं पैंजणाचा आवाज एका लयीत येतोय. खोलीतूनच आल्यासारखा. दोघं असल्याने भीती अजूनही जाणवली नव्हती. पण प्रकार विचित्र होता. पण अचानक ट्यूबलाईट लागली आणि त्याच्यावर मी खेकसलो. झोप गुपचूप... फॅनचं बेअरिंग गेलंय
पहाटे पहाटे नाकात दर्प जाणवल्याने जाग आली तर काहीच दिसेना. आधी वाटलं धुकं असावं. मेणबत्ती लावली तर खोलीत धूर आणि खाली फरशीवर त्या दुराला मानवी आकार आलेला ! जाम घाबरलो. मी ओरडणार इतक्यात दिवे आले. पाहीलं तर हे साहेब उघडेबंब पूजेला बसलेले.. धूप, अत्तर आणि उदबत्त्या यांचा तो धूर आणि वास होता !
ओह्ह.. ओक्के... आया, पहिलं
ओह्ह.. ओक्के...
आया, पहिलं वर्ष असल्याने तुला सगळं माफ..!
वैभव वसंतराव कु... | 30 May,
वैभव वसंतराव कु... | 30 May, 2013 - 16:16 नवीन
आशुचॅम्प चा धागा आहे की अमानवीयचा अजून कशाला पय्जेल?
<<
बेफिंचे धागे असतात की गझलांचे. तुमी का नवे काढता?
या धाग्यावर इब्लिस! माबोवर
या धाग्यावर इब्लिस!
माबोवर एवढी भुते असताना, असल्या भुतांना कोण घाबरेल ?
फेसबुक वर My Horror
फेसबुक वर My Horror Experience नावाचं एक पेज आहे. इथे भूत प्रेतांच्या अनेक कथा पोस्ट केलेल्या आहेत. ह्या पेजची बेसिक कंडीशनच अशी आहे कि इथे फक्त सत्यकथा पोस्ट होतात. कोणीही काल्पनिक कथा पोस्ट केल्याचं कळताच त्याला पेज वरून काढून टाकण्यात येतं>>>>>>>>>>> क्या बात है!
काल्पनिक आहे की खरी हे कसे कळते हो ???
उदयन
उदयन