मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी ठाणे येथे साधारण किती खर्च येईल?

Submitted by चिन्गु on 27 May, 2013 - 07:25

मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी ठाणे येथे साधारण किती खर्च येईल?
मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी ठाणे येथे साधारण किती खर्च येईल?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(जर चुकून वाईट झाले, तर जे होणार ते होण्यासाठी तुम्ही हलकी लेन्स घेतली किंवा कमी पैसे ओतले हे कारण कधीही नसते.)

बजेट ठरवा. डॉ.ना सांगा, सर हे माझे बजेट. डू द बेस्ट यू कॅन इन धिस. अन त्यांच्यावर विश्वास टाकून मोकळे व्हा. >>> इब्लिस सर, बाकी सगळ चांगल लिहिलत पण हे नाही पटले. डॉक्टरवर विश्वास असावा हे योग्य पण आपल्या आरोग्यासाठी उत्तम काय हे निर्णय करणे हे पेशंटचेच काम आहे. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्र 'Informed Consent' चा खटाटोप करते. डॉक्टर चुकला/ऑपरेशन फसले असे काही उलटसुलट झाले की मग ग्राहक मंच गाठण्यापेक्षा पेशंटनेच आधी उत्तम ग्राहक होण्याचा प्रयत्न करावा.
डॉक्टरने (फार बिझी डॉक्टर असतील तर त्यांच्या सहाय्यक डॉक्टरने) उपचाराचे उपलब्ध सर्व पर्याय व्यवस्थित समजवावे, त्यापैकी त्यांच्या क्लिनिक मध्ये कोणते होऊ शकतात ते सांगाव, येईल तो खर्च सांगावा, पेशंटच्या शाररीक आणि आर्थिक परिस्थितीनुसार योग्य उपचार कोणते हा सल्ला द्यावा. जर एखादा उपचार पेशंटने नाकारला तर त्याचे तोटे समजवावे. दीडशेची साडी घ्यायची तरी बायका चार दुकाने हिंडतात (तरी नाही आवडली तरी साडी इतर कोणाला देऊन टाकता येते, नाहीतर पडदे शिवता येतात. लेन्स घातली कि ती निदान १५ वर्ष वापरायची आहे, त्यामुळे माहिती गोळा करून निर्णय घ्यायला एकूण १५ तास तरी पेशंटहे द्यावे) ह्या सर्व गोष्टींसाठी फार कष्ट पडत नाहीत. लागते ती डॉक्टरला पेशंट बद्दल आस्था आणि पेशंटची जागरूकता. असो अवांतर झाले.
चिंगु, तुम्हाला शुभेच्छा. माहिती घेऊन मग उत्तम निर्णय घ्या.

बहुतेक मी ३२००० रु. च्या अमेरीकन बनावटीच्या मोनोफोकल लेन्स करता जाईन असं दिसतंय. >> http://navimumbaieyeclinic.com/cataract-surgery-cost
चिंगु, वरील लिंक बघा. ह्या माहितीचा काही फायदा होऊ शकेल का?

बजेट ठरवा. डॉ.ना सांगा, सर हे माझे बजेट. डू द बेस्ट यू कॅन इन धिस. अन त्यांच्यावर विश्वास टाकून मोकळे व्हा. >>> दुर्दैवाने असे डॉक्टर फार कमी उरलेत आता.

सिमन्तिनी यांनी मांडलेल्या मुद्द्याला अनुमोदन. उपचाराचे होणारे परिणाम (चांगले आणि वाईट दोन्ही) हे पेशंटलाच भोगायचे असतात तेंव्हा जागरुक रहावेच लगते.

इब्लिस, उरलेली पोस्ट खूप उपयुक्त आहे.

माधवजी, सिमन्तिनी ताई,

>>लागते ती डॉक्टरला पेशंट बद्दल आस्था आणि पेशंटची जागरूकता.<<

प्रत्येक डॉक्टरला पेशंटबद्दल आस्था आहे, व असतेच, हे गृहित धरूनच वरची पोस्ट लिहिली होती ब्वा. (शिवाय ठरवून खराब ऑपरेशन करणे इज बॅड मार्केटिंग नो?)

कोणती ट्रीटमेंट मोडॅलिटी निवडावी हे ठरवायला मदत करण्यासाठी बहुतेक ठिकाणी एकतर डॉक्टर स्वतः वेळ देतात, किंवा बिझी डॉक्टर्सकडे समुपदेशक/स्टाफ असतात. पण खुल्ला मार्केटिंग फंडा बहुतेक ठिकाणी असल्याने अप्पर लिमिट वा त्यापेक्षाही जास्त खर्च करायला लावण्याची टेन्डन्सी असते. महाग म्हणजे भारी अशी आपलीही टेन्डन्सी होत चाल्लीये...

वर झकोबा म्हटलेत ना? "फर्निचरवाले डॉक्टर" Wink तेच. सेम ऑप जनरल वॉर्डात केले, तर खर्च कमी अन स्पेशल रुमात खर्च तिप्पट येतो. अशा प्रकारची अंदरकी बात मी सांगत होतो. बाकी काही नाही.

शेवटी खर्चा अपना अपना, खयाल अपना अपना.

धन्यवाद.

डॉ. इब्लिस छान सविस्तर माहिती दिलीत.

चिंगु, मुंबई सुरत रोडवर बलसाड येथे एक नामवंत हॉस्पिटल आहे. http://www.rnceye.org/index.html
इथे सगळी ट्रीटमेंट फ्री होते असं ऐकलय.

श्री इब्लिस ह्यांना जे काही म्हणायचे आहे ते जास्त consolidated form मधे फदकेंनी त्याम्च्या लेखात लिहिले आहे. त्याची लिंक खाली देत आहे.
http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4790575338172144370&Se...सप्तरंग&NewsDate=20120617&NewsTitle=साबणासारखी विकली जातेय आरोग्यसेवा! (डॉ. अरुण गद्रे )

मी वर सांगितल्याप्रमाणे गेल्या आठवड्यातच मुलुंडच्या गोमती आय केअर मध्ये वडिलांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले आज चेकपला गेलो असता ऑपरेशन झालेल्या डोळ्याने अजून नीट दिसत नव्हते म्हणून डॉ. नी पुन्हा कसले कसले ड्रॉप्स टाकून आणि तपासून सांगितले की डोळ्याच्या मागे रक्त जमा झालय त्यामुळे दिसत नाहीय. आणि ते सुकण्यासाठी ईंजेक्शन... खर्च अंदाजे १० हजार. मोतिंबिंदूमुळे त्यांना आधी ते रक्त दिसलं नाही वगैरे.. एकूण जे वासन आय केअरवाल्यांनी पूर्वी सांगितले तेच. यावरुन वासन आय केअर बाबतीत अंदाज चुकला हे मान्य केलं पाहिजे. त्यांची साधन सामुग्री अद्यावत आहे त्यामुळे त्यांना हे आधी कळलं असावं. बाकी पैश्याबाबतीत ते अतिमहागच आहेत तो भाग वेगळाच. पण निदान अचूक झालेले. त्यानंतर एक सोडून दोन डॉ. चे सेकंड ओपिनियन घेतले ते अचूक आले नाही Sad

डॉ. ईब्लिस, तुम्ही काही याबाबत माहिती/सूचना देऊ शकाल का?

नीलू,
शास्त्रीय भाषेत नक्की काय डायग्नोसिस लिहिले आहे ते कागदावर वाचून इथे टंकलेत तर मी काही सेन्सिबल उत्तर सांगू शकेन. डोळ्यामागे रक्तस्त्राव म्हणजे नक्की कुठे ते कळायला मार्ग नाही.

द्यायचे म्हणताहेत, तर द्यावे लागेल बहुतेक, पण सेकंड ओपिनियन कुठे घ्यायचे ते सुचवू शकतो. सध्या ते रक्त सुकल्यावर नजर किती येईल (किती दिसेल) ते प्रोग्नोसिस विचारा. इंजेक्शन नाहीच दिले तर काय होईल तेही विचारा. आजकाल देवळात गेलं की हातावर तीर्थ ठेवतातच तसं ते एक "रक्त सुकवायचं इंजेक्शन" टोचायची फ्याशन आली आहे. अवास्टिन नावाचं इंजेक्शन आहे ते. किंवा अजूनही बरेच काही असू शकते.

अवांतरः वासनवाले तपासणीची सीडी देतात म्हणे. नुसता चष्म्याचा नंबर काढला तरी सीडी. तिचे पैसे वेगळे. त्या सीडीत काय असते ते एकदा पहायची उत्सुकता आहे Wink

जामोप्या,
मोतिबिंदू तितका पिकवत नाहीत आजकाल. बहुतेकदा सरळ सगळं फंडास दिसत असतं ऑपरेशनच्या आधी देखिल.

डॉ. ईब्लिस, त्यांनी लिहून काही दिलं नाही. सगळं काही तोंडी सांगितले. डोळ्याच्या आकृतीत समजावून सांगितले त्यात रेटिनावर रक्तवाहिन्या चढून तिथे रक्त जमा झालं आहे आणि ते वयोमानापरत्वे होतं ( वडिलांचे वय ७१) असं सांगितले. "रक्त सुकवायचं इंजेक्शन" देऊन रक्त सुकवता येईल पण या ईंजेक्शनचा ईफेक्ट फक्त ४ ते ५ आठवडेच रहातो, त्यामुळे पुन्हा रक्त जमा झाले तर पुन्हा ते ईंजेक्शन घेत राहिले पाहिजे असं बोलले. बरं ईंजेक्शन देऊन नीट दिसेलच याची गॅरेंटी ते देत अज्जिबात नाहीत. कदाचित दिसेल. आणि ईंजेक्शन नाही घेतलं तर अजून काही नुकसान होणार नाही. आहे तीच परिस्थिती राहिल. त्यामुळे ईंजेक्शन घ्यायचं की नाही ते तुम्हीच ठरवा असं म्हणून त्यांनी आम्हाला गोंधळात टाकलय. काही माबोकरांनी डॉ. लहानें ना कन्सल्ट करायला सांगितले आहे.

मिरा पाटील म्हणतात त्याप्रमाणे..पडद्यावर रक्तस्त्राव असेल, तर मोतीबिंदु असल्यास तो आधी कळत नाही... तर मग वासनवाल्यांना कसं कळलं असेल. कारण हे असं आमच्या फॅमिली डॉ. ही बोललेल्या.

लहाने सर सध्या जेजेचे डीन आहेत. ते स्वतः रेटिना तज्ज्ञ नाहीत. सर स्वतः तपासतील असे कठीण आहे. कदाचित तिथल्या पोस्टेरिअर सेगमेंट स्पेशालिस्टांचे मत (सरकारी असल्याने पैसा निरपेक्ष व म्हणून कदाचित बरे असावे) घेतले जाईल.

तुमच्या वडिलांना एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे ज्याला पूर्वी 'वेट' सेनाइल मॅक्यूलर डीजनरेशन असे म्हणत तो आजार असावा. इंजेक्शन दिले न दिल्याने फार फरक नजरेत पडणार नाही असे मला वाटते. या बेसिसवर पुढील उपचाराबद्दल निर्णय घ्या.

कदाचित दिसेल. आणि ईंजेक्शन नाही घेतलं तर अजून काही नुकसान होणार नाही. आहे तीच परिस्थिती राहिल. त्यामुळे ईंजेक्शन घ्यायचं की नाही ते तुम्हीच ठरवा असं म्हणून त्यांनी आम्हाला गोंधळात टाकलय.
<<
यात गोंधळण्यासारखे काहीच नाही. नको इंजेक्शन असे म्हणा Happy सरळ च सांगताहेत तुम्हाला ते.
बेसिकली निरुपयोगी औषध आहे. पण लोक म्हणतात म्हणून करून पहायचे तर पहा. अन मला पैसे द्या, असा सरळ सीधा अर्थ आहे. तुम्हाला प्रयत्न केल्याचे समाधान. बाकी काही नाही.

कदाचित दिसेल. आणि ईंजेक्शन नाही घेतलं तर अजून काही नुकसान होणार नाही. आहे तीच परिस्थिती राहिल. त्यामुळे ईंजेक्शन घ्यायचं की नाही ते तुम्हीच ठरवा असं म्हणून त्यांनी आम्हाला गोंधळात टाकलय.
<<
यात गोंधळण्यासारखे काहीच नाही. नको इंजेक्शन असे म्हणा Happy सरळ च सांगताहेत तुम्हाला ते.
बेसिकली निरुपयोगी औषध आहे. पण लोक म्हणतात म्हणून करून पहायचे तर पहा. अन मला पैसे द्या, असा सरळ सीधा अर्थ आहे. तुम्हाला प्रयत्न केल्याचे समाधान. बाकी काही नाही.

(वासनवाल्यांनी ओसीटी केली असेल. ही महागडी तपासणी : ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी : प्रत्येक मोतिबिंदूवाल्याला करायची गरज नाही असे टेक्स्टबुकांत लिहिलेलेल आहे. वासनवाले करतात. जस्टिफिकेशन-वी कॅच वन इन १०००० अ‍ॅबनॉर्मल्स. त्यांनी ऑपरेशन केले असते तरी आऊटकम तेच राहिले असते. त्यानादेखिल एएमडिला इंजेक्शनशिवाय दुसरे औषध नाही. इतर दोघांचे सेकंड ओपिनिअन बरोबर आले नाहि म्हटलात, तेव्हा त्यांना ते काळ्यावर हिरवेपिवळे ठिपकेवाले फोटो दाखवले नव्हते का? की वासनवाले रिपोर्ट तुमच्या हाती देत नाहीत?)

डॉ. इब्लिस खरच खूप खूप धन्यवाद. नेमकी आणि सविस्तर माहिती दिलीत.
वासनवाल्यांनी रिपोर्ट आम्हाला दिले नाहीत. त्यांच्याकडेच ठेवलेत.
बरं मग प्रश्न असा की याला ईंजेक्शन सोडून काहीच ईतर उपचार नाही का?

नीलू,
एज रिलेटेड किंवा सेनाईल मॅक्युलर डिजनरेशन असे त्या आजाराचे नाव आहे. थोडक्यात म्हातारपणामुळे झालेला. हाच आजार असेल, तर वयोमानानुसार तो अवयव कमकुवत होणे असे त्या आजाराचे स्वरूप आहे. अशा आजारांना फारसा उपचार उपलब्ध नसतो.. (मला वाटते कॅल्शिअम डोबेसिलेटच्या गोळ्या उपयुक्त ठराव्यात. पण ते तुमच्या डॉ.ना ठरवू द्या, मी अंदाजे अंधारात तीर मारतो आहे. )

वडिलांना जर हाच आजार असेल तर फक्त सेंट्रल व्हिजन कमी होते, म्हणजे, समोरच्याचा चेहरा नीट दिसत नाही, (जिथे पहातो, तो सेंटरचा भाग खराब दिसतो) तसेच बारिक अक्षर वाचणे कठिण होते. अशा वेळी 'लो व्हिजुअल एड्स' अर्थात हातात एक मोठे भिंग धरून वाचन करणे शक्य होते. नुसत्या या आजाराने त्यांना पूर्ण अंधत्व येणार नाही हा धीर त्यांना द्या.

मी लिहिलेली माहिती उपयुक्त वाटली याचा आनंद आहे.

Pages