मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी ठाणे येथे साधारण किती खर्च येईल?

Submitted by चिन्गु on 27 May, 2013 - 07:25

मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी ठाणे येथे साधारण किती खर्च येईल?
मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी ठाणे येथे साधारण किती खर्च येईल?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलुंड वेस्ट वासन आय केअरवाल्यांचा आम्हाला चांगला अनुभव नाही. माझ्या वडिलांच्या मोतिबिंदूच्या चेकपसाठी तिथे गेलो असता, त्यांनी डोळ्याच्या मागे रक्तस्त्राव होतोय सांगून त्यासाठी १२००० ईंजेक्शन आणि ५००० रक्तस्त्राव थांबवण्याची सर्जरी ईतका खर्च सांगितला. आणि सगळे त्वरीत केले पाहिजे असं म्हणून आम्हाला घाबरवून टाकले. वर मोतिबिंदूचा खर्च २५००० तो वेगळा. त्यावेळी फॅमिली डॉक्टरांच्या सूचनेनुसार मुलुंड ईस्टच्या गोमती आय सेंटर येथे पुन्हा चेकप केल्यास असे रक्तस्त्राव वगैरे काहीच नाही.. फक्त मोतिबिंदू आहे आणि त्याचा खर्च १० ते १५००० पर्यंत येईल असे सांगितले. आम्ही पुन्हा ठाण्याला डॉ.मोघेकर यांच्या कडेही सेकंड ओपिनियन साठी गेलो असता तिथे ही फक्त मोतिबिंदू आहे असच सांगितले.
म्हणजे केवळ पैसे काढण्यासाठी पेशंटला घाबरवून टाकायचे हा वासन आय केअरवाल्यांचा फंडा वाटला.

मला पण त्या डॉक्टराने तुम्ही कुठे राहता असे पॉइंटेडली विचारले पत्ता ऐकल्यावर जास्त चार्ज करायला हरकत नाही असे भाव त्याच्या चेहर्‍यावर आले. लक्षात ठेवेन.

Dr. Wavikar
Amber Arcade,
5th floor,
Majiwada
Thane west 400601

Tel: 022-39918399/25418545/25428545

ह्यांचा हि अनुभव चांगला आहे.
पुर्वी बहुतेक राजमाता वडापाव च्या समोर होते आत्ता दोन एक वर्ष माजिवड्यात आहेत. माजिवड्यात जेथुन पुलाखाली मुंब्रा - कल्याण ला जायला शेयर रिक्षा मिळ्तात तेथेच समोर आहेत.

.

डॉ. वावीकरांचा बाबांना अनुभव चांगला आला नाही. नेहेमीचे डॉक काही दिवस उपलब्ध नसल्याने बाबा नंबर चेक करायला यांच्याकडे गेले. तर त्यांनी एक ड्रॉप्स दिले आणि तीन महिन्यांनी मोतिबिंदूच्या ऑपरेशनसाठी यायला सांगितले. पण बाबांना काहीच त्रास नव्हता. शेवटी शंका येऊन फोनवरुन नेहेमीच्या डॉ. ना विचारलं कि हे औषध बरोबर आहे का. त्यांनी ते अजिबात वापरु नका असा सल्ला दिला. ( नेहेमीचे डॉ. पारितोष कामदार अतिशय उत्तम आहेत . पण ते खुप बिझी असतात. )

माझ्या काकांचं ऑपरेशन डॉ. वावीकरांनी केलं होतं ते चांगलं झालं होतं. बाबांची ऑपरेशन्स डॉ. आफळेंनी केली होती, ती पण चांगली झाली.

एकूण काय, मॉडर्न मेडिसीनवाल्याही एकाच डॉक्टरचे वेगवेगळे दोन टोकांचेही अनुभव येऊ शकतात. पेशंट्सनी करायचं तरी काय? निर्णय तरी कसा घ्यायचा?

मॉडर्न मेडिसीनवाल्याही एकाच डॉक्टरचे वेगवेगळे दोन टोकांचेही अनुभव येऊ शकतात.

पण ते उपचार एकाच प्रकारचा करतील.

स्वभावाविषयी म्हणाल तर ''पिंडे पिंडे मतिर्भिन्न''

अश्विनी के,
मला वाटते निर्णय घेताना विचार करुन घ्यायचा पण अपेक्शित result नाही आल तर नशीब वाईट असं समजायचं.
तेवढा allowance डॉक्टराना द्यायलाच हवा. नाही का?

अश्विनी के,
मला वाटते निर्णय घेताना विचार करुन घ्यायचा पण अपेक्शित result नाही आल तर नशीब वाईट असं समजायचं.
तेवढा allowance डॉक्टराना द्यायलाच हवा. नाही का?

पण ते उपचार एकाच प्रकारचा करतील. >>> नाहिये ना तसं सावलीच्या बाबांच्या केसमध्ये. डॉ. वावीकर आणि डॉ. कामदारांची उपचाराची पद्धत अगदी विरुद्ध दिसली. डॉ. वावीकरांनी दिलेलं औषध डॉ. कामदारांनी ताबडतोब थांबवायला सांगितलं.

तसंच नीलूच्या वडिलांच्या केसमध्ये तर अतीच केलंय. रक्तस्त्राव झाला आहे किंवा नाही ह्या महत्वाच्या बाबतीतही मतभेद दिसले डॉक्टरांमध्ये. रक्तस्त्राव झाला नसतानाही इंजक्शन्स दिली गेली असती. पैश्यांपेक्षाही काळजीचं कारण म्हणजे चुकीचे उपचार केले गेले असते आणि डोळ्यासारख्या नाजुक भागाची हानी होऊ शकली असती.

आश्विनी अगदी गं... आणि तेव्हढातल्या तेव्हढ्या हे डॉक्टर विनाकारण घरातल्या ईतर जणांचे बीपी वाढ्वतत ते वेगळेच. माझ्या आजीच्या वेळेला मुलुंड ईस्टच्याच डॉ. देशपांडे (साईधन) कडे एका डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन केले त्या डोळ्यातून कायम पाणी येण्याचा त्रास व्हायचा तिला आणि नंतर दुसर्‍याच्या वे़ळेला वेस्ट्च्या म्युनिसपाल्टीच्या हास्पिटलात केले त्या डोळ्याला कधीच कसला त्रास झाला नाही.

मोतीबिंदूच्या उपचाराची पद्धती गेलाबाजार सगळीकडे सारखीच असते अश्विनीजी.... बाकी डिफरन्स ऑफ ओपिनियन आणि अचूक निदान व्हावे म्हणून सेकंड ओपिनियन घेणे किंवा आपल्या नेहमीच्या डॉक्टरला दाखवीणे कधिही चांगले.

डॉ.कैलासजी,
लेन्स चे प्रकार, त्यातल्या त्यात कुठली घ्यावी, incision ह्या बद्दल काही माहीती देऊ शकाल का?
आणखी महत्व्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय बनावटीच्या लेन्स खरंच एवढ्या खात्री लायक नाहीयेत का?
बहुतेक मी ३२००० रु. च्या अमेरीकन बनावटीच्या मोनोफोकल लेन्स करता जाईन असं दिसतंय.

.

चिंगु, तुम्ही सेव्ह करताना दोनदा बटण दाबत असाल. पोस्ट जात नाही असं वाटलं तरी जरा वाट पहा. किंवा पुन्हा रिफ्रेश करुन पहा.

चिंगूभाऊ,
तुम्हाला इन्सिजनबद्दल वर लिहिलेली पोस्ट मी उडवली कारण तुम्हाला बहुदा ती समजली नव्हती Proud तिथे 'निरुपयोगी' असे म्हणून उडवली होती. आता न राहवून परत लिहितो.
***
phacoemulsification = ३.५ मिमि इन्सिजन.
SICS = 5.5mm इन्सिजन.
(एक फूटपट्टी घ्या, अन ३.५ व ५.५ मिमि किती असतात ते पहा. मग दाढीचे ब्लेड घेऊन कागद कापून पहा. साडेतीनचे पाच थोडा हात हलला तर होऊन जातात. या मिमि सांगण्याच्या गोष्टी आहेत Happy )

हे झाले टीक / मोतिबिंदू (म्हणजे खराब झालेले डोळ्यातले नैसर्गिक लेन्स) डोळ्याबाहेर काढणेसाठी डोळ्याला पाडलेले भोक.

आता,
लेन्स डोळ्यात ढकलणे राहिले.
ही कृत्रीम लेन्स दोन प्रकारची. एक घडीची दुसरी बिन घडीची.
लेन्स किमान ५.५ मिमि व्यासाची लागते, कारण अंधारात आपली बाहुली तितकी विस्फारली जाते. ६ मिमि अधिक चांगली.

आता या कृत्रिम भिंगास डोळ्यात घालताना किमान तितके भोक पाडणे गरजेचे आहे. हा झाला विना घडीच्या लेन्सचा तोटा. इन्सिजन = ५.५ (साडे३ मिमि चे भोक पाडून फेको केले तरी विना घडीची लेन्स आत ढकलायला ते भोक ५.५ मिमि इतके मोठे करावेच लागते)

जर हेच भिंग फोल्डेबल असेल, तर निम्म्या आकाराची घडी घालून तुलनेने छोट्या जखमेतून आत ढकलता येते. इन्सिजन = ३.५ पण मग त्याचे ही तोटे आहेत. गूगला, सापडतील

SICS cataract extraction व phacoemulsification असे यूट्यूबवर शोधा व पहा. ऑपरेशन प्रत्यक्ष दिसतील.

डिसिजन घेताना :
१. डोळा इंडियन. सर्जन इंडियन. लेन्स इंडियन असल्याने फरक पडत नाही. उलट बजेटमधे फायदा होतो.
२. लेन्स साठी लागणारा कच्चा माल भारतात बनत नाही. तो इम्पोर्टेड असतो. लेन्स बनविण्यासाठीची यंत्रे भारतात बनत नाहीत तीदेखिल इम्पोर्टेड असतात. तात्पर्य, इंडियन लेन्स, व इम्पोर्टेड लेन्स यांत फक्त इम्पोर्ट ड्यूटीचा भरमसाठ फरक असतो, व त्या प्रमाणात सगळ्या गोष्टी वाढून ऑपरेशन महाग होते.
जसे, ६० रुपयाचे चायना ड्रॉवर लॉक फिटिंग साठी ३०% वाला कारागीर १८ रुपये मजूरी घेईल. ६०० रुपयांच्या गोदरेज लॉकची मजूरी १८०. टोटल खर्चा बढा.
३. लेन्स कोणती? याबद्दलची सिमिली अशी : देण्याघेण्याची साडी दीडशे रुपयांत मिळते. पंधराशेंना चांगली. पंधरा हजाराचा शालू मिळतो. दीड लाखाची सोन्याचा जर असलेली पैठणी मिळेल. शेवटी साडी साडीचेच काम करणारे. अन आपल्याला रोज वापरायची आहे. बघा Wink

अल्टिमेटली.

जर मला मोतीबिंदू झाला तर मी काय करीन?

मला दिसत नाही. दिसायला हवे. मला आवडलेल्या डॉक्टरला सांगेन, की मला दिसायला हवे.
मग लेन्स कोणती, इन्सिजन कोणते, टाके घेणार की नाही, लेन्स टाकणार की नाही, हे सगळे ऑन टेबल ठरते. ऑपरेशन सुरू असताना काय वाट्टेल ते होऊ शकते. हजारात एकदा ऑन टेबल माझा डोळा जाऊ देखिल शकतो. लेन्स बसवताही येत नाही. हजार गोष्टी असतात. ... यांचा विचार करू नका. (जर चुकून वाईट झाले, तर जे होणार ते होण्यासाठी तुम्ही हलकी लेन्स घेतली किंवा कमी पैसे ओतले हे कारण कधीही नसते.)

बजेट ठरवा. डॉ.ना सांगा, सर हे माझे बजेट. डू द बेस्ट यू कॅन इन धिस. अन त्यांच्यावर विश्वास टाकून मोकळे व्हा. बिलिव्ह मी, ही विल डू इट. ही विल ऑल्वेज डू द बेस्ट ही कॅन. अँड रिमेंबर ही इज द बेस्ट डॉक यू हॅव चोझन. इन्डीयन लेन्स ने देखिल तुमच्या वडीलांना ६/६ + n6 दिसेल, इम्पोर्टेडनेही तेच.

गुडलक टू यू सर!

-डॉ. इब्लिस.

चिंगु माझ्या आईच्या दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदु शस्त्रक्रिया विक्रोळीच्या गोदरेज हॉस्पिटल मध्ये दोन महीने पुर्वी केले...डॉ दस्तूर यांनी, प्रत्येक शस्त्रक्रियेचा खर्च रुपये २३,०००.००. आता काही त्रास नाही..

डॉ. इब्लिस,
गुडलक साठी धन्यवाद.
तुमची अगोदरची पोस्ट मी वाचण्याअगोदरच आपण उडवलीत बहुदा. असो. अतिशय चांगली माहीती.
सविस्तर वाचेन. काही समजले नसेन तर नक्की विचारेन.
कसं असतं की भारतीय लेन्स वापरली तर मला प्रोब्लेम काहीच नाही पण मला असं वाटतं की माझा निर्णय पैशाभो व ती फिरु नये. आणि त्याच वेळेला अवास्तव पैसा पण खर्च होऊ नये.

, ६० रुपयाचे चायना ड्रॉवर लॉक फिटिंग साठी ३०% वाला कारागीर १८ रुपये मजूरी घेईल. ६०० रुपयांच्या गोदरेज लॉकची मजूरी १८०. टोटल खर्चा बढा>>> Lol
फर्निचरवाले डॉ Happy

पोस्ट उत्तम आहे.
माहिती नीट दिलीत अगदी. Happy

blood thinner (e.g clopivas) सुरु असतील तर operation आधी १/२ दिवस बंद करा आणि नंतर 10 दिवस तरी बंद ठेवा .bloood thinnerमुळे नसता डोळ्याला हात जरी लगला तरी bleeding सुरु होते सर्जरीनंतर.
अर्थात हे करताना आधी physician ला विचारा किती दिवस बंद केले तर चालेल?भारतीय lenses उत्तम दर्जाच्याआहेत.बिन्दिक्कत्पने वापरा.

Pages

Back to top