बालपणीच्या मालिका..!!

Submitted by उदयन.. on 26 May, 2013 - 03:39

आज सकाळी फेसबुक वर चाळे करत असताना एक मालिकेचे पेज सापडले..त्या पेज चे नाव होते " GIANT ROBOT "

माझ्या लहानपणीचा पहिला सुपर हिरो.. जायंट रोबो..
Giant_robot_201203.jpg

त्यावेळेला ८८ -८९ च्या सुमारास ही मालिका लहान मुलांमधे प्रचंड गाजली. दर रविवारी सकाळी ९ / १० वाजता लागायची. फक्त त्याच्यासाठी मी सकाळी इतक्या लवकर उठायचो ते पण रविवारी..
सुरुवातीला दुरदर्शन सा सुप्रसिध्द लोगो त्याच्या साईंनिंग ट्युन सहित टिव्हीवर दिसायचा.
पॅ अ‍ॅअ‍ॅअ‍ॅआआ पेआ आ आआआआआअ
ट्न टनन टन्न टन्न ट न न Happy

नंतर ५ मिनिट जाहिराती त्यात "गोल्ड स्पॉट" , "लिम्का", लिज्जत पापड वाला ससा आणि लिरिल....(लिरिल च्या वेळी डोळे झाकले जायचे, घरच्यांचा दमच तसा होता...;)
हे सगळ झाल्यावर पडद्यावर अवतार घ्यायचा ..........जायंट रोबोट.. आणि त्याचा लहान मालक "जॉनी सोको"
जो घड्याळात बघुन रोबोट शी संवाद साधायचा..मला फार अप्रुप होते त्याचे घडाळ्यात कसे बोलले जाते. मग आजोबा ऑफिस मधुन घरी आले की त्यांचे "घड्याळ" घेउन घरभर "कॉलिंग जायंट रोबोट" करत फिरत असायचो.. जायंट रोबोट चे कवायती बघुन काहीही घरच्यांनी काम सांगितले की आधी दोन्ही हात कवायत करत उठायचो.. हात इकडे तिकडे करुन झाल्यावर मग कामाला लागायचो..घरचे सुध्दा "रोबोट उठला ना आता सगळी काम कर.रोबोट थकत नाही काही. न सांगता सगळे काम करतो" इत्यादी बोलुन मला हरभर्याच्या झाडावर चढवुन सगळी काम करुन घेत Sad ..:)

जायंट रॉबोट च्या चालु झाल्यावर अजुन एक मालिका काही महिन्यांनी चालु झाली " Fireball XL5 "

firball.jpg

ही मालिका मुख्यतः अंतराळवीरांवर होती.. लहान बाहुल्यांप्रमाणे दिसणारी माणसे.. त्यांची मान सारखी "कठपुतली" च्या बाहुलीप्रमाणे सतत हलणारी होती. जायंट रॉबोट पेक्षा ही मालिका जरा जास्त सुटसुटीत होती..
यात देखील एक लांब बल्ब प्रमाणे दिसणारा लहानसा रोबोट होता... "वांय्य्य्यव , व्वाय्य्यांव" सारखा सतत आवाज करायचा..... Happy बोलक्या बाहुल्यांसारखा प्रकार होता..पण तेव्हा हे पहायला मज्जा यायची
.
अजुन एक - दोन मालिका होत्या .. एक होती बाईक रेसर वर.. ती बहुदा अमेरिकन होती...नाव आता आठवत देखील नाही.. दुसरी मालिका होती.. चालत्याबोलत्या लहान गोळ्या ज्या परग्रहावरुन आलेल्या.. त्या गोळ्या वेफर्स आईस्क्रिम खायच्या..एकमेकांवर मनोरा रचुन काहीही करायच्या...
.
लहानपणी धम्माल मालिका होत्या....आजच्या मुलांना काय अप्रुप त्याचे....
.
आपल्याला सुध्दा काही आठवल्या तर नक्कीच लिहा.....:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे! रोबो आठवत नाही पण फायरबॉल थोडी लक्षात आहे. ती संपली तेव्हा मला असे वाटायचे की आता फायर बॉल एक्सेल-६ सुरू होणार.

http://www.maayboli.com/node/5372
उद्या ह्या बघ! आमच्या लहानपणीच्या काही मालिका आणि त्यांचे टायटल साँग्ज!
याशिवाय अजुन एक धागा आहे यावर! Happy

उदयन, बाईक वाली म्हणजे ' स्ट्रीट हॉक ' का? ' केपेबल ऑफ इन्क्रेडिबल स्पीड ऑफ थ्री हंड्रेड माईल्स अ‍ॅन अवर.......
द मॅन द मशीन स्ट्रीट हॉक' माझ्या लहान भावाची आवडती सिरियल.

मला ही जायंट रोबर्ट ही मालीका आवडायची.
मला ते झाडाला पाणी घालायचे आणि मग त्याचे मोठ झाड होऊन त्याला फळ यायची मग त्या झाडाभोवती माणसे नाचायची मग एक लाकुडतोड्या यायचा आणि लाकूड झाड तोडायला जायचा त्याला माणस आडवायची ते चलचित्र फार आवडायच.

त्यानंतर एक तितली अनेक तितलीया हे सुद्धा फार आवडायच.

' स्ट्रीट हॉक ' का? ' >>>>> बहुतेक तीच.
त्यानंतर फोर व्हीलरवर नाइट रायडर ही मालिका आलेली. ती पण आवडायची पण स्ट्रीट हॉक इतकी नाही.

गुच्छे, व्योमकेश बक्शी, चंद्रकांता Proud (सुरूवातीची)

एक होती बाईक रेसर वर.. ती बहुदा अमेरिकन होती.>>> स्ट्रीट हॉक असणार///
मला तर अलिइइइइफ लैइइइइइइइला देखील आवडायचं. Happy

गोट्या, चाळ नावाची वाचाळ वस्ती, नुक्कड, मालगुडीडेज, असे पाहुणे येती, नसती आफत, झोपी गेलेला जागा झाला, स्पायडरम्यान; स्टार ट्रेक.

उदयन.. जायंट रोबो तेव्हा DD2 चॅनल वर पण सन्ध्याकाळी लागायची का? आमच्या घरी तेव्हा सेकंड चॅनल लागायचे नाही म्हणून ज्या मैत्रीणीकडे लागायचे तिच्या घरी सगळे खेळ सोडून जमायचो. स्पष्ट दिसायचे नाही तरी बघायचो. आता एवढी चॅनल्स आहेत पण तेव्हा तिच्याकडे DD2 लागायचे त्याचे खूप अप्रूप वाटायचे.

सामी, +१ Happy

अजुन काही, स्पायडरमॅन (त्याच्या सोबत "रसना" ची जाहिरात :-))

कुणाला स्टोन बॉय आठवतो का?
अजुन एक मालिका होती "आशिष" दर रविवारी संध्याकाळी लागायची. त्यात त्याच्याकडे एक जादूचा हिरा असायचा (असंच काहितरी नक्की आठवतं नाही)

अजुन एक Happy चार मित्रांची मालिका होती (बहुतेक हम चार असं काहिसं नाव होतं) Happy

आय ड्रीम ऑफ जिनी
बीविच्ड आणि स्मॉल वंडर माझ्या अतिआवडीच्या मालिका होत्या.

बीविच्डमधलं ते नाक हलवायची स्टाईल तेव्हा फार जोरात होते.

आय ड्रीम ऑफ जिनी
बीविच्ड
स्मॉल वंडर
मोगली
मालगुडीडेज,

आत अशा मलिका क नाही बनत
काय ते प्रत्येक मालिकेत कट करस्थान!!!!

Different Strokes आठ्वतेय का कोणाला? गॅरी आणि विली असे भाऊ होते ना. त्यातला छोटा खूप क्युट होता.
स्टार ट्रेक. त्यातील कॅप्टन आणि स्पॉक.
दादा दादी की कहानीया.
रविवारी बहुतेक सन्ध्याकाळी फेअरी टेल्स हिन्दी मधे डब करून दाखवायचे. मस्त वाटायचे बघायला.

अजुन एक स्मित चार मित्रांची मालिका होती (बहुतेक हम चार असं काहिसं नाव होतं) स्मित>>> ek do teen chaar , Charon milkar sath chale to karate hain chamatkaar " ase kahise title song hote ....mi pan tich lihayala aale hote.... kachchee dhoop pan

चार चतुर, ३ स्टुजेस, micky and donald on sunday, SIGMA, स्ट्रीट हॉक माझि पण आवडति. मुन्गेरि लाल के हसिन सपने..

अनेक मालिका आवडत होत्या. वेड्यासारखे बघत बसायचो. नावं कशी विसरेन? ही घे लिस्ट :
ऑन टॉप ऑफ दी लिस्ट : श्रीकृष्णा Happy स्वप्निल जोशी नेव्हर लूक्ड सच क्युट आफ्टर दॅट Wink
नंतर,
चाचा चौधरी
हातिमताई
चंद्रकांता
मोगली
सिम्बाची मालिका (नाव बहुतेक ''सिम्बा'' च)
स्मॉल वंडर, हॅरीएट अत्यंत आवडतं कॅरेक्टर Happy
सिकंदरची होती तिचे नाव काय माहित काय होते. चटईवर बसून उडायचा तो समुद्रावरून वगैरे.
अलीबाबा चाळीस चोर (हिंदी)
शक्तिमान , आठवा गंगाधर आणि त्याची शेक्रेटरी.
शाका लाका बूम बूम.
सोनपरी
इंग्लिशमधली अजून एक होती, निग्रो डान्सर्सची पण नाव आठवत नाहीये. Sad
अजून आठवल्या की अपडेट करते.
गोट्या, नुक्कड्,व्योमकेश बक्षी, श्रीमान श्रीमती, मि.& मिसेस वागळे,मालगुडी डेज, हम पाच.

गोट्या
नुक्कड
स्मॉल वंडर
एलिस अ‍ॅन्ड वंडरलँड
चार्ली चॅप्लिन
लॉरेल अ‍ॅन्ड हार्डी
जंगल बूक
टॉम अ‍ॅन्ड जेरी
चंद्रकांता
महाभारत
श्रीमान श्रीमती
सुपरहिट मुकाबला
हीमॅन
शक्तीमान
ऑल द बेस्ट
पोटली वाले बाबा
आलिफ लैला
देख भाई देख

ही- मॅन राहीलाच............ Happy
.
.ही मॅन नंतर अजुन एक कार्टुन लागायचे.... नाव आठवत नाही

आणि एक मिलिंद सोमणची पण अंतराळातली कोणतीतरी लागायची. नाव नाही आठवत आता... कुणाला आठवल तर प्लिज लिवा इथे

Pages