अॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :
super security beta 1.23 ;- हा अँटीवायरस प्रोग्राम आहे... स्कॅन करतो..मेलवेअर, हायरिस्क app. कोणती आहेत हे सुध्दा सांगतो..तसेच त्यात एक स्ट्राँगबॉक्स म्हणुन आहे त्यात आपन पासवर्ड वापरुन आपले फोटो विडिओ एसएमएस साठवु शकतो..मुख्य म्हणजे जे काही आपण यात टाकले ते बाहेर गॅलरीत दिसत नाही..
आणि जो पासवर्ड असतो तो आपल्या इमेल वर मेल म्हणुन येतो..म्हणजे विसरलात तरी प्रोब्लेम नाही..
Android assistant :- app. अनइन्स्टोल करणे.. फोन मेमरी मोकळी करणे. cache cleaner Volume control इत्यादी यात सहज पणे करता येते file manager सुध्दा यात आहे जो आपल्याला फोन मधे उपलब्ध नसतो..
sms blocker :- हा अत्यंत उपयोगी app. आहे... आपल्याला नको असलेले नंबरांवरुन जे मेसेज येतात त्यांचा नंबर यात टाकला की आपल्याला त्यावरुन मेसेज येतच नाहीत हा app. ते ब्लॉक करुन टाकतो
m-indicator :- आपल्याला लोकल्स ट्रेन किती वाजता ची आहे हे कळण्यासाठी उपयोगी आहे..त्याच बरोबर यात बस चे नंबर सुध्दा आहे त्याचे रस्ते सुध्दा कळतात.. मेगा ब्लॉक्स ची माहीती मेसेज वरुन आपल्याला कळते..
camscanner :- कागद पत्रांचे पीडीफ मधे रुपांतर यात करु शकतात... जर आपल्या कडे स्कॅनर नाही तर आपण कागद समोर ठेउन त्याच्या या app. ने फोटो काढायचा आणि तो मस्त पैकी साफसुफ करुन हा पीडीफ स्वरुपात आपल्या समोर ठेवतो.. अतिशय स्पष्ट लिहिलेले दिसते यातुन..
flashlight :- आपल्या मोबाइल चा टोर्च म्हणुन उपयोग करण्यासाठी हा app. वापरात येतो.. लाइट कमी जास्त करन्याची सुध्दा सोय आहे यात.
Net Counter - नेट वापरताना किती डेटा वापर होतो याची नोंद मिळते.
Battery Doctor - कोणत्या अॅप साठी बॅटरी जास्त वापरली जाते हे कळते. त्यानुसार ते अॅप बंद करता येतात. पर्यायाने बॅटरी लाईफ वाढवता येते.
ES File Explorer - file/folder management साठी उत्तम.
Go Launcher - सुंदर UI Themes. ह्याच्या स्वतःच्या Themes छान आहेत. एक iPhone सारखी Theme पण आहे.
GPS Essentials - GPS Tracking साठी
Indian Rail - Online inquiry / train timings / seat availability साठी
Offline Dictionary - ह्यात Dictionary बरोबर language translation पण आहे - ते सुद्धा offline. पण मोठ्या-मोठ्या database files एकदा(च) download कराव्या लागतात.
LBE Privacy Guard - हा firewall चे काम करतो. [पण ह्यासाठी root access हवा.]
Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे
PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्या करामती...
App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते
Photo Art - Color Effects = मस्त आहे हे.....अॅप्लिकेशन...एक विशिष्ट रंग कायम ठेवुन बाकीचे रंग रंगविरहित करता येतात फोटो मधले
पॉवरलाईन : २ (चकटफू व्हर्जन) किंवा अधिक (१.५ $ला) गोष्टी आडवी रेघ वापरून दाखवते. जसे की बॅटरी, सीपीयू वर्कलोड वगैरे. साधे, अवाजवी जागा न व्यापणारे असे अॅप आहे.
fm radio india :- नावाचे एक छान अॅप आहे ऑनलाइन रेडिओ ऐकण्यासाठी. भरपूर चॅनेल्स आहेत रेडिओची त्यावर. एक मराठी गाण्यांचेही चॅनेल आहे. मला आवडलं अॅप. ट्राय करून पहा
Stuck on Earth :- भटक्यांसाठी बेस्ट अॅप....यात तूम्हि तूमची ट्रीप प्लॅन करु शकतात....तिठल्या ठिकाणांचे लोकांनी काढलेले फोटो पाहू शकतात आणि बरच काही....
TripAdvisor :-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फ्लईट्स, Things to do in city...
AppLock :- हे लॉक अॅप्लिकेशन आहे......यात तुम्ही हवे ते अॅप्लिकेशन, मेस्सेज, जीमेल व्हॉट्सप्प आणि इतर अॅप्लिकेशन लॉक करु शकतात... यात पासवर्ड ची सुविधा आहे..... अॅप्लिकेशन ओपन करताना पासवर्ड ची गरज लागते .
Distance calculator:- आपण किती चाललो याचा हिशोब ठेवणारे अॅप्लिकेशन
फोनची मेमरी संपली असती तर मग
फोनची मेमरी संपली असती तर मग '१ मोबाईल मार्केट' मधुनही अॅप्स डाऊनलोड नाही व्ह्यायला पाहिजे ना? जे अॅप्स मी प्लेस्टो मधुन घेत होती तेच मी इथुन डाऊन्लोड केलेत, विदाऊट एरर. पण सगळेच अॅप्स १मोमा मध्ये नाहीत. शिवाय आधी मी जे अॅप्स डा. केलेत ते आता अपडेट ही होत नाही(प्लेस्टो मधुन केलेले.)
फोन मेमरी बरीच आहे (२GB), आणि अनवॉण्टेड मेमरी मी क्लीन केलीय. माझ्या फोनला सुटेबल असेच अॅप्स ट्राय करतेय.
गुगल साईटवरुन लॉगिन करुनही पाहिलं, तिथुनही होत नाहीयेत डाऊनलोड. डाऊनलोड स्टार्ट दाखवत पण मग बराच वेळाने एरर ही दाखवतं.
मोबाईल साफ करा....... कॅच
मोबाईल साफ करा....... कॅच क्लिअर करुन बघा...... आणि फोन थोडावेळ बंद करुन बॅटरी आणि मेमरी कार्ड बाहेर काढुन बघा.......... तरीही नाही झाले तर सॅम्संग गॅलरी मधे दाखवा...आणि त्यांचा कडुन आपला डाटा बॅकअप घेउन फोन रिइन्स्टॉल करा
मोबाईल साफ करा....... कॅच
मोबाईल साफ करा....... कॅच क्लिअर करुन बघा...... आणि फोन थोडावेळ बंद करुन बॅटरी आणि मेमरी कार्ड बाहेर काढुन बघा.......... तरीही नाही झाले तर सॅम्संग गॅलरी मधे दाखवा>>> हे सगळं झालंय करुन आता
डाटा बॅकअप घेउन फोन रिइन्स्टॉल करा>>> हेच राहलंय करायचं, ते ही करते. धन्स.
बॅकअप घ्या .......अन्यथा फोन
बॅकअप घ्या .......अन्यथा फोन मधले सगळे गायब होईल.......आणि रिइन्स्टॉल सॅमसंग गॅलरी मधे विचारा..त्याना वाटले करावे तरच करा.....नाहीतर सगळा डाटा गायब
ओके, म्हणजे प्लेस्टो चा
ओके, म्हणजे प्लेस्टो चा प्रॉब्लेम नाहीय का? कारण सॅ.गॅलरीमध्ये नेलेला फोन तेव्हा तिथल्या एकाचा सॅ टॅब होता, तो बोलला की त्यालाही सेम प्रॉब्लेम येतोय. त्यानेच मग '१मोमा' दिलं आणि इथुन डाऊनलोड करायला सांगितलं.
असेल ही..... तरी त्यांना
असेल ही..... तरी त्यांना विचारा आणि कस्टमर केअर ला फोन करुन सुद्धा विचारा सॅम्संग च्या
किती तो आटापिटा...!
किती तो आटापिटा...!
मोग्यांबो, ज्याचे जळते त्याला
मोग्यांबो, ज्याचे जळते त्याला कळते
आमी आपले सरळ सोपे साधे अॅपल
आमी आपले सरळ सोपे साधे अॅपल वाले
छे अॅपल साधे सरळ सोपे
छे अॅपल साधे सरळ सोपे नाहीये. मला तरी कधी नाही वाटले.
अरे वा.... मस्त धागा.. आता एक
अरे वा.... मस्त धागा..
आता एक एक download करेन.
Try "Evernote" and "Gesture
Try "Evernote" and "Gesture Search" App.
Evernote syncs with your gmail ID. So anytime you get new android, you just have to log-in Evernote App, and all your note are there on new Phone.
Gesture Search: Makes your all "search" easy. You just have to draw letters one after other to shorten your search.
Zedge: for Ringtones, noification Tones, etc. It has @650,000 of those. right now, I am using James Bond Goldeneye for msg and Seinfeld Intro for Emails.
मलाही सेम साक्षीमी सारखा
मलाही सेम साक्षीमी सारखा प्रॉब्लेम येतोय...
सुरुवातीला गुगुल प्ले मधून अॅप्स डाऊनलोड झाले...पण आता डाऊनलोडींग सुरु झाले की एरर दाखवतो..इतकेच काय तो सिंक्रोनाईज पण करत नाही गुगल प्ले ला..बाकी दोन जीमेल्स, फेसबुक आणि सगळे व्यवस्थित सुरु आहे..
सँमसंग अँप्सपण डाऊनलोड होतात...
आणि एरर नक्कीच आयडीयाची आहे कारण एका मित्राकडे गेलो असताना वाय फाय वर तेच अँप्स डाऊनलोड झाले होते.
आता मी काय करू
आशुचँप, जर वायफायवर अडचण येत
आशुचँप,
जर वायफायवर अडचण येत नसेल तर तुम्ही फोनला मुखवटा घालून गंडवू शकता. इथे पहा :
http://www.ehow.com/how_12175977_make-android-think-its-wifi-3g.html
मात्र वरील उतारा कृपया स्वत:च्या जबाबदारीवर राबवणे!
आ.न.,
-गा.पै.
व्हायरस अथवा मेलवेअर मुळे
व्हायरस अथवा मेलवेअर मुळे सुध्दा होत असेल
गामा_पैलवान फारच कॉप्लीकेटेड
गामा_पैलवान
फारच कॉप्लीकेटेड वाटत आहे...मी इतका पण टेकसॅव्ही नाहीये...
उदयन - पण मग बाकी ठिकाणी पण प्रॉब्लेम यायला पाहिजे...बाकी सगळी अॅप्लिकेशनस व्यवस्थित सुरु आहेत.
कधी कधी होतो... मला पण
कधी कधी होतो... मला पण आलेला...मी स्कॅन केला
मी पण केला...क्वीक हिल
मी पण केला...क्वीक हिल वापवरून..काही प्रॉब्लेम दाखवत नाहीये
सॅमसंग मधेच का होतोय ?
सॅमसंग मधेच का होतोय ?
सौ. चा सॅमसंग गॅलेक्सी Yduos
सौ. चा सॅमसंग गॅलेक्सी Yduos S6102 आहे. पहिल्यांदाचा अँन्ड्रोईड फोन घेत असल्याने घेताना internal memory कमी असल्यास काय त्रास होतो याची कल्पना नव्हती.
फक्त १६०mb internal memory असल्यामुळे सतत लो मेमरी चा मेसेज येत राहतो. external memory 4GB चं कार्ड आहे. फोनमधे inbuilt applications सोडून फेबु, जीमेल आणि व्हॉट्सअप आहे. Aps2SD download करायला पण जागा नाही. कॅशे साफ करुन फोन restart करुन पाहिला. गुगल, फेबु, व्हॉट्सअप चे sync सुद्धा काढून टाकले. व्हॉट्सअप चे जुने सगळे मेसेज, फोटो, व्हिडिओ काढून टाकले, स म स पण काढून टाकले.... कशाचाच काही फायदा नाही
नवीन फोन घेणे याशिवाय दुसरा काही उपाय आहे का ???
android assistant नावाचे
android assistant नावाचे अॅप्लिकेशन घ्या.......त्या मधुन तुम्ही कॅचेस वगैरे साफ करा या अॅप्लिकेशन च्या टुल्स मधे जाउन कॅचेस क्लिअर करा..
.
.
.
व्हॉटसअप ला जास्त मेमरी लागते आणि जस जसे तुम्ही चॅट करतात आणि नविन लोकांना जोडतात त्या प्रमाने मेमरी वाढत जाते.......
फेसबुक चे अॅप्लिकेशन काढुन टाका ..फेसबुक चालवायचाच असेल तर ओपेरा ब्राउझर वरुन चालवा..
.
.
अनवॉन्टेड अॅप्लिकेशन काढुन टाका......
आशु, सिम खूप जुनं आहे का?
आशु, सिम खूप जुनं आहे का? असल्यास नविन घेऊन बघ.
मित, रूट करून external memory कार्ड internal memory म्हणून वापरता येते. नेटवर प्रत्येक मॉडेलकरता सुचना उपलब्ध आहेत. पण जरा सांभाळून करा किंवा जाणकाराकडून करून घ्या. रूट केलेल्या फोनला वॉरंटी लागू होत नाही हे पण लक्षात ठेवा.
मित, फोन रूट करा. माधव बरोबर
मित,
फोन रूट करा. माधव बरोबर सांगत आहेत.
वॉरंटी संपून वर्षे लोटली असतील त्याला आता..
अजून एक. त्या आधी, सगळे गेम्स डिलिट करा. फाल्तू डालो केलेली सगळी अॅप्स उडवा.
तरीही जमले नाही तर xda forums वर (गूगल सर्च करा, सापडेल) जाऊन तुमच्या फोनची रूटींग इन्स्ट्रक्शन्स वाचून रूट करा. त्यानंतर सगळे ब्लोटवेअर उडवा. अगदी गूगल मॅप्स देखिल. नॅव्हिगेशन वापरत नसाल तर उडवा. इत्यादि..
रच्याकने. आज माझा गॅलॅक्सी
रच्याकने. आज माझा गॅलॅक्सी टॅब हँग झाला. ब्याटरी संपेस्तोवर बघेन परत चालू झाला नाही तर अनरूट करून सर्विस सेंटरला नेऊन देईन.
रिसेंटली सॅमसंगचे फोन त्रास देण्याच्या पोस्टी वाचल्या म्हणून हे लिहिले. सॅम्संग स्पेसिफिक व्हायरसेस आलेत की काय? >> iPhon व्र्सेस सॅम्संग लॉसूट्स?
धन्यवाद मंडळी... सगळे गेम्स
धन्यवाद मंडळी...
सगळे गेम्स डिलिट करा. फाल्तू डालो केलेली सगळी अॅप्स उडवा >>>काहीच नाहीये ह्यातलं..
मी आधीच म्हणालो की....>>>फोनमधे inbuilt applications सोडून फेबु, जीमेल आणि व्हॉट्सअप आहे
त्यानंतर सगळे ब्लोटवेअर उडवा. अगदी गूगल मॅप्स देखिल. नॅव्हिगेशन वापरत नसाल तर उडवा. इत्यादि..>>> मॅप्स आणि नॅव्हिगेशन उडवायचा प्रयत्न करुन पाहतो..
रच्याकने... फोनला येत्या ऑगस्टमधे १ वर्ष होईल... बघू एक्स्चेंज मधे चांगली किंमत मिळत असेल तर S Duos घ्यावा म्हणतो..
बघू एक्स्चेंज मधे चांगली
बघू एक्स्चेंज मधे चांगली किंमत मिळत असेल तर S Duos घ्यावा म्हणतो..>>>>>>>>>> बजेट थोडे जास्त असेल तर फोन घेताना त्याची इंटर्नल मेमरी बघुनच घ्या...किमान २ जीबी पेक्षा जास्त असावी आणि रॅम १ जीबी असावी....... आणि अँड्रोईड ४.० या त्यापेक्षा जास्त असावे....... कारण आताच्या व्हर्जन मधे तुम्ही जास्त अॅप्लिकेशन तुमच्या मेमरीकार्ड मधे ट्रान्स्फर करु शकतात.
तरच तुम्हाला अॅप्लिकेशन जास्तीत्जास्त वापरता येईल...
.
.
.
माझा व्हाटसप चा डाटा ८७एमबी दाखवत आहे....
मंडळी माझा गुगल प्ले चा गुंता
मंडळी माझा गुगल प्ले चा गुंता सुटला...
मी ते अॅप अनइन्स्टॉल करून पुन्हा टाकायाच्या प्रयत्नात होतो पण तेच बोललं की पहिले अपडेट अनइन्स्टॉल करून पहा...
तसे केले आणि फॅक्टरी सेटींगवर ठेवले तर सुरु झाले....
गुगल प्लेचा काहीतरी अपडेटचा लोचाच आहे...कित्येत अॅपवर लोकांनी तक्रार केल्या आहेत की हे अॅप अपडेटपूर्वी चांगले चालत होते आणि हँग व्हायला लागले म्हणून...काय गंमत आहे
सुपर सेक्युरिटी स्टॅन्डर्ड
सुपर सेक्युरिटी स्टॅन्डर्ड नावाच एक अॅप आहे.
त्यात स्ट्रोन्ग रुम आहे.
पासवर्ड सेट करुन त्यात फोटो व्हिडिओ ठेवु शकतो.
सुरवातीला तरी मस्त चाललं.
आता बोम्बाबोम्ब सुरु.
प्रत्येक वेळी स्ट्रोन्ग बॉक्स मध्ये क्लिक केलं की आधी एसडी कार्ड स्कॅन चा मेसेज येतो आणि मग अॅप फोर्सफुल्ली क्लोज.
त्यात घातलेले फोटु गेल्यात जमा. तसे फक्त ५-६ च फोटो होते म्हणा.
उगा ट्रायल म्हनून ठेवलेले.
काय उपाय माहितीये का???
नसेल तर हे अॅप उडवेन..
माझ्याकडे देखील
माझ्याकडे देखील आहे......परंतु अजुन काही प्रोब्लेम नाही आला.....
मोबाईल मधल्या कुकीज उडवुन मग बघ.....नाहीतर मग एस डी कार्ड कंम्प्युटर मधुन स्कॅन करा ..त्यात बहुतेक व्हायरस आला असेल म्हणुन तो सारखा स्कॅन करायला सांगत आहे
म्हणुन तो सारखा स्कॅन करायला
म्हणुन तो सारखा स्कॅन करायला सांगत आहे>> नाही रे.
we changed the encryption strategy for private stuff in strong box.
to make sure that there is a security enviornment, we need to do an one time scan in your SD card.
clik OK to process.
आणि स्कॅन सुरु केलं की फुस्स...
सेम प्रोम्ब्लेम गुगल प्ले स्टोअर मध्ये ह्या अॅप्सच्या रिव्ह्यु मध्ये लोकानी दिला आहे.
तिकडेही बघ.
Pages