निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
जागू मस्तच फोटो पोळ्याचे,
जागू मस्तच फोटो पोळ्याचे, लहानपणीची आठवण झाली. माझे काका काढायचे पोळ्यांमधला मध. याच दिवसांत मिळतात अशी पोळी. पिळून झालेलं पोळं चघळायलाही मजा यायची.
दिनेशदा, शांकली धन्यवाद
दिनेशदा, शांकली धन्यवाद !
पावसाची बरेच जण अगदि आतुरतेने वाट पाहातायत ! नेहमीप्रमाणे जर पावसाने चकवा दिला नाही तर योग्य वेळी पाऊस नक्की येइल.
प्रज्ञा वाढदिवसाच्या हार्दिक
प्रज्ञा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रज्ञा, माझ्यातर्फेही
प्रज्ञा, माझ्यातर्फेही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!.. जीवेत शरद शतम .... ईशकृपेने समाधान प्राप्त होवो ....
प्रज्ञा, माझ्यातर्फेही
प्रज्ञा, माझ्यातर्फेही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!..
नेहमीप्रमाणे जर पावसाने चकवा
नेहमीप्रमाणे जर पावसाने चकवा दिला नाही तर योग्य वेळी पाऊस नक्की येइल.
आला आला, अंदमानात पोचला पण.. आपल्याकडेही येईल, छत्र्या उघडुन वाट पाहा....
जागू, शशांकजी, साधना धन्यवाद!
जागू, शशांकजी, साधना धन्यवाद!
या नवीन भागाबद्द्ल सगळ्यांचे
या नवीन भागाबद्द्ल सगळ्यांचे खुप खुप अभिनंदन....
खरचं सगंळ्यांनी मस्त मस्त फोटो आणि माहीती दिली आहे.
जागु, मधाच्या पोळ्याचे आणि मधाचे फोटो पण लई भारी.... ईतका शुध्द मध हल्ली बघायला पण मिळत नाही .
शोभा., तुझी पावसावरील कविता पण खुप छान आहे.
आज बरेच दिवसांनी वेळ काधुन नि.ग. वर आले आहे आणि ३ दिवसांचा स्टऑक वाचुन काढला. खुप छान वाटले.
नि.ग च्या नविन या भागात आम्ही
नि.ग च्या नविन या भागात आम्ही देखील नव्यानेच उमलतोय...
कंपनीजवळ असलेल्या कूंपणाला याचे ५ प्रकारचे रंग दिसले..पांढरा मात्र राहिला.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
हा बाल्कनीतला याचा पहिला फोटो ..
मस्तच हं अनिल!! बाय द वे,
मस्तच हं अनिल!!
बाय द वे, त्या हळदीच्या कंदाचं लक्षात आहे ना?..........:स्मित:
प्रज्ञा,वाढदिवसाच्या अनेकानेक
प्रज्ञा,वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..
अनिल.. सुंदर रंग आहेत रे बोगनविला चे.. एक्सलंट...
लोड शेडिंग......... गॉश!!!!!!!!!!!! आजादी के इतने साल बाद भी
हळदी चे कंद मलाही मिळणारेत... यिप्पी!!!!
हा पांढरा शिरीष आहे का? आणि
हा पांढरा शिरीष आहे का?
आणि सुकलेली हि वेल कसली आहे?
' मै चुप रहूँगी'
' मै चुप रहूँगी'
ती सुकलेली आयवी आहे
ती सुकलेली आयवी आहे
शांकली, धन्स ! घरी हळदीचे
शांकली,
धन्स !
घरी हळदीचे सध्या ८-१० कंद आहेत, फक्त द्यायचं कुठे-कसं हे बाकी आहे
वर्षु,
धन्स !
नक्की...
काही मोजकी शहरं सोडली तर सर्वत्र ६-८ तास रोज लोड शेडींग आहेच ..
जिप्सी,
हे झाड पाहिलयं पण नाव आठवत नाही..
हो जिप्सी, हा पांढरा शिरीषच
हो जिप्सी, हा पांढरा शिरीषच आहे.
एडेनियमच्या शेंगा माळ्याच्या
एडेनियमच्या शेंगा माळ्याच्या सांगण्यानुसार बीयांसाठी बांधून ठेवल्या होत्या. काल त्यातली एक दोर्याला न जुमानता फुटलेली दिसली. तर टु माय सर्प्राइज त्या उडण्यार्या म्हातार्या असतात (शेवरी ना?) तश्याच म्हातार्या आतून निघाल्या. फक्त एडेनियम आणि शेवरी यांच्या रचनेत एक मोठा फरक होता.
नेहेमीच्या उडणार्या म्हातार्यांचे केसर एकाच चॉकलेटी रंगाच्या टिंगूतून निघतात. म्हणजे सगळे केसर एक टोकाशी एका टिंगूने बांधलेले! दुसरी टोकं खुलीच. म्हणजे पुढे पंख्याचा आकार आलेला.
आणि एडेनियमच्या म्हातार्या "बो" च्या आकाराच्या. फ्रॉकला किंवा कोटाचा बो असतो तश्या. म्हणजे ते असंख्य केसर अगदी मध्यभागी एका टिंगूने बांधलेले असतात. आणि दोन्हीकडची टोके खुली.
हा रचनेतला फरक बघून मला निसर्गाच्या करामतींची गंमत वाटली.
ही गोष्ट कालची. काल पूर्ण फुटून त्याला लटकलेल्या म्हातार्या दिसल्या.
आणि आज तर एका शेंगेचे फक्त टरफल निघालेले. आणि त्या शेंगेभोवती गुंडाळलेला दोराही जागेवरच! आणि शेंगेत सर्व चमकदार केसर दाटीवाटीने लेन्ग्थवाईज आटोपशीर बसवलेले. मी दोरा सोडला तर लक्षात आलं की हे सगळे आतले केसरांचे बो एका विशिष्ठ रचनेत बसवलेले आहेत. कारण दोरा सोडल्यावरोबर सगळे बो शेंगेतून फुलून वर आले. हा फुलोरा शेंगेच्या आकाराच्या जवळजवळ ८ ते १० पट मोठा होता.
शेंगेचा दोरा काढल्याबरोबर शेंगेत जी काही सुंदर हालचाल झाली आणि एक चमकणारा फुलोरा फुलून आला.... ती अगदी चित्तचक्षुचमत्कारिक आणि मनोहर!
--------------
ही कालची शेंग. याला गुंडाळलेला दोराही दिसतोय.
ही आजची......... ही फुटण्याआधीच मिळाली.
शेंग उघडल्यानंतर
केसरांचा "बो" सारखा आकार स्पष्ट दिसतोय.
मानुषी, . याच बिया आहेत का?
मानुषी, :).
याच बिया आहेत का?
मानुषी, अमेझिंग!!! केवळ
मानुषी, अमेझिंग!!! केवळ अप्रतिम. हे असं बघायला मिळणं कठीणच. तुझ्यामुळे दिसलं.
अद्भुत! निव्वळ अद्भुत! कळीचे
अद्भुत! निव्वळ अद्भुत!
कळीचे फूल होणे, शेंग फुटून त्यातून बी बाहेर पडणे या क्रिया इतक्या अलवार आणि कळतनकळतश्या असतात की त्या टिपायला भरपूर धीर आणि नेमका क्षण पकडण्याचे कौशल्य आणि त्वरा-तत्परता हवी. सहसा धीर आणि त्वरा एकत्र नांदत नाहीत पण ही चित्रे घेताना मात्र या सर्वांचे व्यvaस्थित काँबिनेशन साधले आहे. धन्यवाद मानुषी!
मानुषी, खुप सुंदर निरिक्षण
मानुषी, खुप सुंदर निरिक्षण आणि छान फोटो.
आपल्या बिया दूरवर जाऊन रुजाव्यात यासाठी झाडे बरीच व्यवस्था करतात आणि पॅकिंग करावे तर झाडांनीच.
गुलमोहर, नारळ, सीता अशोक अशा अनेक झाडांची कोवळी पाने कशी सुंदर पॅक केलेली असतात.
काळ्या कुड्याच्या शेंगांचा बिया पण अश्याच असतात. या शेंगा म्हणजे जोडशेंगा असतात. दोन शेंगा वेगवेगळ्या वाढून परत टोकाशी एकत्र जूळतात. मुंबईला एलिफंटा बेटावर आणि रामटेकला बरीच झाडे बघितली होती.
सर्वांना धन्यवाद! एक
सर्वांना धन्यवाद! एक शंका...............जी गजाननला आली............याच बीया आहेत का? पेरायच्या का? रुजतील का? शांकली...............कुठे आहेस?
जवळ जवळ २०-२२ दिवसांनी आले.
जवळ जवळ २०-२२ दिवसांनी आले. १३ वा भाग संपवून १४ वा सुरु झाला.... सगळ्यांचे अभिनंदन!! सगळा बॅकलॉग भरून काढेपर्यंत दमछाक होणार बहुदा....
पावसाची वाट पहात आहे.
Manushi, remove the silk
Manushi, remove the silk from both sides and sow the seed. While sowing sow vertically.
मानुषी......... किती सुंदर...
मानुषी......... किती सुंदर... शब्दच नाहीत... निसर्गाची किमया तू नेमकी टिपलीयेस..
तुझ्यामुळे हे अद्भुत पाहायला मिळालं... ऑस्स्स्सम!!!!!!!!!!!
Ashvini...........
Ashvini...........
साधना ठांकू गं. आजच बीया
साधना ठांकू गं. आजच बीया रोपीन! किती अचूक शब्दात सांगितलंस!
>>>>>>>> निसर्गाची किमया तू
>>>>>>>> निसर्गाची किमया तू नेमकी टिपलीयेस..>>>>>>
वर्षू ... तुझं माझं शोभीचं(कुठाय ती?) ठरलं होतं ना सग्गळीकडे कॅमेरा कॅरी करायचा....हाकानाका!
तरी ते हॉर्नबिल काही आज आले नाहीत. मलाही उठायला अंमळ उशीरच झाला व्हता!
असो...........
मानु
मानु
मानुषी, अमेझिंग!!! केवळ
मानुषी, अमेझिंग!!! केवळ अप्रतिम. हे असं बघायला मिळणं कठीणच. तुझ्यामुळे दिसलं>>>>> +१००
Pages