निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणी त्या दुसर्‍या प्रचिंत ते उंचच्याउंच झाड?? ते तर खोडापासून सलग वरच्या टोकापर्यन्त पोकळ होतं..तरी वरच्या शेंड्याला पानंबिनं फुटलेली होती
उसका राज क्या है???

रोपवाटिकेत मिळेल की.. जंगलात मिळायला आधी ती ओळखायला तर यायला हवी आपल्याला. Happy रोपवाटीकेतल्या माणसाला माहित असते कोणाचे नाव काय ते.

अगं त्याच्या रुपावरुन मला तरी एका एका झाडावर वाढलेले दुसरे झाड वाटतेय.

म्हणजे असे की एक साधे सरळसोट उंच वाढणारे झाड जसे ऐन, अर्जुन असे झाड ब-यापैकी उंच वाढलेय. मग कावळेमहाराजांनी त्या झाडाच्या माथ्यावर किंवा तिथेच आजुबाजुला फांदीवर एखाद्या फायकस जातीच्या झाडाचे बी टाकले. मग ते बी तिथे वाढायला लागले, त्याची मुळे खाली झेपावायला लागली आणि मग तिथे हा चमत्कार तयार झाला. राणी बागेत बहुतेक नारळ किंवा तत्सम झाडावर पिंपळ आलाय.. (जिप्य्स्याने फोटोही टाकलाय इथे कुठेतरी.)

रोपवाटिकेत मिळेल की.. जंगलात मिळायला आधी ती ओळखायला तर यायला हवी आपल्याला. रोपवाटीकेतल्या माणसाला माहित असते कोणाचे नाव काय ते.
>> नेटवरच शतावरीचे फोटो पाहीले होते. मित्राला औषधासाठी ती पाहीजे होती. धन्यवाद !

साधना म्हणतेय त्याचप्रमाणे ती झाडे, गुंफलेली असतात.

वडाच्या जातीतली काही झाडे, पक्ष्यांच्या "वृक्षरोपण" मोहिमेमूळे दुसर्‍या झाडावर उगवतात. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.. असे करत त्यांना भरपूर प्रकाश मिळतो, त्यामूळे ती जोमाने वाढतात. आणि त्यांची मूळे झपाट्याने जमिनीकडे वाढतात. जमिनीपर्यंत पोहोचली कि ती चांगलीच मांसल होऊन त्यांचे खोड बनते. आणि
या काळात बहुदा यजमान झाडाचा बळी जातो.

अंगकोर मधल्या देवळांवर असेच तर आक्रमण झालेय. अजूनही ती झाडे नष्ट करणे जमलेले नाही. कदाचित तसा प्रयत्न केल्यास, देवळांचे जे अवशेष उरलेत तेही नष्ट होतील.

वर्षु,
झाड अगदी वंडरफुल आहे, छान फोटो.
झाड तस वाढवलं गेलं आहे कि नैसर्गिकपणे ते तस वाढलं आहे ?

साधना, मामी
छान माहिती आणि फोटो !

मानुषी,
अगदी हिरवेगार फोटो !
असेच फोटो या वर्षी लवकरात लवकर पाहायला, टिपायला मिळोत अशी आशा करुया.

Rut5373.jpgRut5374.jpg

हे काय आहे? आम्ही आंबोलीजवळच्या हिरण्यकेशिला गेलो होतो..तिथे जंगलात होतं..

भावाच्या घरातला पाऊस! हो हो माहेरचा पाऊस! आमच्या नगरातही अस्साच पाऊस पडावा.....................

घराबाहेरचा(माहेरचाच!) पाऊस.......

अबोली, काय वेगळाच प्रकार दिसतोय. फुले पण सुंदर असणार या झाडाची.>>>>>>>>मला तर हे फुग्यांच झाड वाटतयं. Wink

मानुषी, कधी एकदा 'तो' येतोय असं झालय. Proud

वर्षू, मोठा वृक्ष आहे तशांना कॉमनली स्ट्रँगलर फिग म्हणतात. मध्य अन दक्षिण अमेरिकेतल्या जंगलात एकदम कॉमन आहेत असे वृक्ष.

अबोली, ही फळं त्या वृक्षाची नसावीत. कारण एक राम-राखी ऊर्फ वाटोळी नावाची वेल असते तिची फळं अशी असतात. प्लीज जरा जमल्यास चेक करशील? त्या वेलीची पानं.....त्यांचाही फोटो टाकशील?

उद्या, प्रज्ञाचा वाढदिवस..
माझ्यातर्फे आधीच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

साधनाताई धावती भेट होती..:)
दिनेशदा, शोभाताई त्यांना नेमकं फळ म्हणावं का कळतच नाही. दाबून बघितलं तर एकदम घट्ट होतं. सगळ्या घोसांचा रंग एकजात सारखा.
शांकलीताई, मला तर हे घोस डायरेक्ट खोडालाच लागले होते असं वाटलं. पण असूही शकेल घट्ट गुंडाळलेली वेल. आणि जिथे हे होते तिथे पानं नव्हती. जिथे पानं होती तिथे वेली आणि अन्य झाडांची अशी गर्दी, की त्याची वेगळी ओळखूच येईनात... Happy

अबोली, मग ही वेलच आहे. बोटॅनिकल नाव आहे Diplocletia glaucescens या नावाने गूगलवर सर्च कर. Happy ही वेल साधरणपणे सदाहरित जंगलातच दिसते. ताम्हिणी घाट, किंवा कोकणातल्या दाट जंगलांत ही नक्की सापडेल. हिची पानं बर्‍यापैकी गोलसर असल्याने हिला वाटोळी असंही नाव आहे. राम-राखी हे स्थानिक नाव आहे.

प्रज्ञा, माझ्यातर्फेही तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!............:स्मित:

पिशी अबोली फुग्यांचे झाड मस्तच.

मानुषी गार गार वाटल पाउस पाहून.

आमच्या आंब्याच्या झाडाला मधाचे पोळे होते. काल एका परीचीत व्यक्तीने पाहीले आणि काढले आणि माझ्याकडे आणून दिले. प्रथमच मी अशी मध हाताने काढली. माश्या वगैरे हाताने बाजूला सारून. ज्यांनी काढली त्यांनी सांगितले की माश्या काही करत नाहीत म्हणून बिनधास्त त्यांना बाजूला करत मध काढली.

१) हे पोळे मध तशी पोळ्यातली बरीचशी सुकलीच होती.

२) काय कलाकार असतात ना ह्या माश्या.

३)

४) ही माशी आहे बसलेली.

५)

६)

७)

८)

९)

१०)

जागु......................... अमेझिंग गं........ इतका शुद्ध मध ........ तू खरी भूतलावरच्या स्वर्गात राहत आहेस
सो लक्की!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

अरे वा पुढचा भाग आला Happy
जागु मस्त मध..

सगळेच फोटो छान.

मागे मला एक गिफ्ट मिळालेलं बोन्सायला आता नवीन पालवी येताना दिसतेय. जनरली बोन्सायची वेगळी काळजी कशी घेतात. झाडाबरोबर काही सूचना इ. नाहीत नाव पण नाही. देणार्या व्यक्तीने फक्त Water to keep the soil moist. हे सांगितलंय. मी फक्त ते करतेय. होपफुली मारणार नाही.

अवांतर - मला आजकाल झाडं गिफ्ट करणार्यांची भितीच वाटायला लागलीय. माझंबेसिक माहिती आणि ही लोकं मला पिएचडी करवणार बहुतेक Wink

जागू, मधाच्या पोळ्याचे फोटो विविध अँगलने अफलातून काढले आहेस. एकदम प्रोफेशनल असल्यासारखे. तू खरंच लकी आहेस, तुला निसर्गाचा ठेवा अनुभवायला मिळतोय.

दिनेशदा "तथास्तु" बद्दल धन्यवाद!
जयु ..............हो भावाचं घर पुरोहित कन्याशाळेला लागूनच! घराची आणि शाळेची मागची भिंत कॉमनच. मीही त्याच शाळेतली! तूही?
जागूले अगं काय मस्त फोटो टाकलेस पोळ्याचे! आणि मध आहे की सोनं!
तुला निसर्गाचा ठेवा अनुभवायला मिळतोय.>>>>>>>>>>.अश्विनी के+१००

मंडळी आज माझ्या दिवसाची सुरवात फार मस्तच झाली. पण म्हणूनच दिवसभर एक चुटपुटही लागून रहाणार आहे. पूछो क्यूं???????????????????????????????????????????

जागू, मस्त मध.
माझ्या माहेरिपण असायचा घरचा मध. पण आता वस्ती वाढल्याने प्रमाण कमी झालेय.

मानुषीताई, मी ज्यु. कऑलेजला होते पुरोहित्ला. Happy . ते मोठ्ठ बेलाचं झाड असलेल घर का तुमचं?

व्वा मधाचे पोळे खासच !
आमच्याकडेही सिसमच्या झाडाला चिकटले होते खुप मोठे झाले पण अचानक उडून गेले !

वा मधाचे आणि पोळ्याचे सुंदर प्रचि. तो.पा.सु.
तुला निसर्गाचा ठेवा अनुभवायला मिळतोय.>>>> अश्विनी के+१
मानुषी,पिशी अबोली सुंदर प्रचि. Happy

मंडळी आज माझ्या दिवसाची सुरवात फार मस्तच झाली. पण म्हणूनच दिवसभर एक चुटपुटही लागून रहाणार आहे. पूछो क्यूं???????????????????????????????????????????

बोलो तो चुटपुट क्यु? आज दिवसभर लोडशेडींग है क्या तुम्हारे यहा???? Happy

Pages