मायबोलीकर वैभव जोशीं आणि सौमित्र यांची कविता बी.एम.एम.च्या व्यासपीठावर"

Submitted by अजय on 5 February, 2013 - 12:17

मराठी कविताविश्वातले नामवंत सौमित्र (किशोर कदम) आणि मायबोलीकर वैभव जोशी आपली कविता बी.एम.एम. (बृहन्महाराष्ट्र मंडळ)च्या आगामी अधिवेशनात सादर करणार आहेत. जुलै २०१३ मधे प्रॉव्हिडन्स, र्‍होड आयलंड इथं होणार्‍या बी.एम.एम.च्या १६ व्या अधिवेशनात त्यांचा 'एक मी आणि एक तो' हा कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिध्द गझलगायक दत्तप्रसाद रानडे या दोघांच्याही कविता सादर करतील तर (संगीतकार/ संगीतसंयोजक) कमलेश भडकमकर यांचा वाद्यवृंद त्यांच्या साथीला असेल.
Ek-me-un-ek-to-FB.jpg

संवेदनशील कलावंत म्हणून कवी सौमित्र यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेले आहे तर ताज्या दमाचे कवी-गीतकार म्हणून वैभव जोशी प्रसिध्द आहेत. या दोन कवींचे, त्यांच्या कवितेचे एकमेकांशी असलेले नाते 'एक मी आणि एक तो' या कार्यक्रमातून उलगडले जाते. एकमेकांच्या कवितांना पूरक आणि त्यांचे अर्थ पुढे नेणार्‍या तसेच अस्सल जीवनानुभव व्यक्त करणार्‍या कवितांची ही मैफल महाराष्ट्रात अनेक वेळा रंगली आहे. आता अमेरिकेतल्या रसिकांना बी.एम.एम.च्या व्यासपीठावर पहिल्यांदाच या मैफिलीचा आनंद लुटता येणार आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

क्या बात है... कार्यक्रमाची डिव्हिडी वगैरे आली तर नक्की घेणार.
वैभव किती आदर्श अन गरीब दिसतोय ह्या फोटोत... कसा काय काढला असेल नै हा फोटो? Happy

Pages