निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
'यंदा चांगला पाऊस पडेल व
'यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.'' - आमेन!!!
१४ व्या भागानिमित्त आपल्या सर्वांचे अभिनंद>>>>>न!!!!!!!!!!!!!!!!!
नद्या अश्याच सदा पाण्याने
नद्या अश्याच सदा पाण्याने भरल्या राहोत..
वेण्णा नदी
वाह!!
वाह!!
सर्व निसर्गप्रेमींचे हार्दिक
सर्व निसर्गप्रेमींचे हार्दिक अभिनंदन ....
सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः
छान
छान
१३व्या
१३व्या भागावरून
http://www.flickr.com/photos/dinesh_valke/7203596284
याला वास पण असतो का.
अशी पुण्यात अनेक झाडं दिसतात पण काहींना सुवास असल्यासारख वाटत काहिना नाही.
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
नव्या भागाच्या
नव्या भागाच्या स्वागताप्रित्यर्थ माझ्या बिल्डिंगमधली आयव्ही :
वा मामी, मस्त आयवी... माझ्या
वा मामी, मस्त आयवी... माझ्या घरावरही अशी आयवी असावी हे एक जुने स्वप्न आहे
खुप वर्षांपुर्वी पेपरात एक फोटो पाहिलेला. मनाली किंवा तशाच ठिकाणचा. सोनिया गांधी खिडकीतुन डोकावुन पाहतेय आणि त्या खिडकीच्या आजुबाजुची पुर्ण भिंत आयवीने हिरवी झालीय.
जागु, मस्त फोटो.
अशी पुण्यात अनेक झाडं दिसतात पण काहींना सुवास असल्यासारख वाटत काहिना नाही.
रेन ट्री पण असेच दिसते. पण त्याला सुवास नसतो. गुगलवर रेन ट्री गुगलुन पाहा आणि पिंक सिरिस गुगलुन पाहा. सारखीच फुले, पाने असलेली झाडे आहेत पण सख्खी भावंडे नसावित.
यंदा पाऊस चांगलाच आहे. आताच
यंदा पाऊस चांगलाच आहे. आताच हवामान खात्याने खुशखबरी दिलीय की ३ जुनपर्यंत पाउस केरळात डेरेदाखल होईल. त्यामुळे महाराषट्रात टायमात गाडी पोचेल त्याची. शिवय या वर्षी सरासरीच्या ९८ % इतका पाऊस व्ह्यायचे चान्सेसही आहेत. हवामानखात्याच्या तोंडात श्रीखंड पडो इतकेच मी म्हणु शकते.
रच्याकने, वर गुलाबी रंगाच्या फुलांच्या झाडाला नेटवर मराठीत उदळ तर हिंदीत काला सिरिस म्हटलेय. मला काळा शिरीष म्हणजे फक्त काळसर पाने असलेला आणि नेहमीचा हिरवी पांढरी फुले असलेला शिरीष वाटलेला.
कोपरखैरणेला शेजारीशेजारी दोन शिरीष आहेत, एकाची पांढरट पाने तर एकाची काळसर पाने. मी त्यांनाच काळा नी नेहमीचा शिरीष म्हणुन ओळखत होते. आता त्यात ह्या गुलाबी फुले असलेल्या शिरीषाची भर पडली. विकीवर त्याला गुलाबी शिरीष म्हटलेय. तर फ्लिकरवर काला शिरीष.
मागच्या भागात मी हळदीबद्दल
मागच्या भागात मी हळदीबद्दल लिहिलेले. माझ्याकडे यावेळी जी हळद मी लावलीय ती ओली नव्हती तर हळदीचे सुकलेले मुळ होते.
कोकण सरसमध्ये कुटलेली हळद घेतली, त्या स्टॉलवर सुकवलेली हळद आणि इतर काही कंद पण होते. त्यातला हळदीचचा अगदी लहान साधारण अर्धा इंच आकाराचा एक तुकडा मी उचलला आणि तो कुंडीत रोवुन ठेवला. बहुतेक सुकलेला असल्याने त्याने रुजून यायला दोन महिने लावले. मी तर आशा सोडून दिली होती.
ओली हळद मात्र लगेच रुजून येते.
सुकलेली हळद म्हणजे हळकुंड मात्र नव्हे. स्टॉलवरच्या बाईने सांगितलेले की हळद काढल्यावर ती थोडीशी सुकवतात किंवा न सुकवताही तसेच त्यांना उकडतात. उकडल्यावर जवळजवळ महिनाभर वाळवतात. ही वाळलेली हळद म्हणजे हळकुंड. मग त्यांना कुटून आपण वापरतो ती हळद बनते. मला ही हळद रु. ४००/- किलो या भावाने मिळाली.
निसर्गाच्या गप्पांच्या १४
निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागाबद्दल सर्व नि.ग.प्रेमींचे हार्दिक अभिनंदन!
साधना, दे ट्टाळी, आयव्हीनं
साधना, दे ट्टाळी, आयव्हीनं भरून टाकलेल्या भिंती असलेल्या घराचं माझंही स्वप्न होतं. हे घे खास तुझ्याकरता :
खुप वर्षांपुर्वी पेपरात एक
खुप वर्षांपुर्वी पेपरात एक फोटो पाहिलेला. मनाली किंवा तशाच ठिकाणचा. सोनिया गांधी खिडकीतुन डोकावुन पाहतेय आणि त्या खिडकीच्या आजुबाजुची पुर्ण भिंत आयवीने हिरवी झालीय. >>>>>>>>>>>हेच का ते हॉटेल?
शोभा, अप्रतिम फोटो.
शोभा, अप्रतिम फोटो.
शोभा, अप्रतिम फोटो.
शोभा, अप्रतिम फोटो. स्मित>>>>>>>>धन्यवाद! पण नक्की कुठला? माडांचा की हॉटेलचा?
मामी, मस्तच फोटो गं... सपने
मामी, मस्तच फोटो गं... सपने सच होंगे एक दिन...
शोभा, तुझा दुसरा फोटो मस्त आहे पण मी जो फोटो पाहिलेला त्यातली आयवी भिंत मामीच्या फोटोसारखी होती.
या बीबी वर पावसाची गाणीच गाऊ
या बीबी वर पावसाची गाणीच गाऊ या, म्हणजे वेळेवर आणि पुरेसा पाऊस येईल..
आणि निदान यावर्षी तरी आपल्याला पावसाचे पाणी अडवण्याचे / जिरवण्याचे महत्व कळो.
अभिनंदन! मामी आयव्ही मस्तच!
अभिनंदन! मामी आयव्ही मस्तच!
अभिनंदन
अभिनंदन
ईनमिन तीन, मस्त फ़ुल. (इथे
ईनमिन तीन, मस्त फ़ुल. (इथे अजून एकही फ़ुलाचा फ़ोटो नव्हता.)
या बीबी वर पावसाची गाणीच गाऊ
या बीबी वर पावसाची गाणीच गाऊ या, म्हणजे वेळेवर आणि पुरेसा पाऊस येईल..>>>>>>>>>>ह्ये घ्या माझे गाणे.
कधी रिमझीम झरणारा
कधी रिमझीम झरणारा आला ऋतू आला
कधी टपोर्या थेंबांचा आला ऋतू आला
कधी पुलकित हर्षाचा हळव्या क्षण स्पर्शाचा
आला ऋतू आला
पानावर थिरकत नाचे पाणी
मनामध्ये झुलतात गाणी दिवाणी
साद गंधातुनी, ओल्या मातीतुनी, आला ऋतू आला
अंग अंग स्पर्षताती मोती रुपेरी
आठवे ती अनावर भेट अधुरी
मन चिंब ओले, शहारत बोले, आला ऋतू आला
हा पाऊस वागे तुझ्यासारखा
हा येतो नि जातो तुझ्यासारखा
ऊन-पावसाचा, खेळ श्रावणाचा, आला ऋतू आला
शोभे..कस्लं ग्वाड आहे गाणं..
शोभे..कस्लं ग्वाड आहे गाणं.. मस्त!!
मामे मस्तच आहे क्रीपर...
ईन मीन तीन.. फार सुंदर फूल..
दिनेशदा, दादरच्या शिवाजी
दिनेशदा, दादरच्या शिवाजी पार्कावर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवण्याचा विचार सुरू आहे. ही मटातली (१३ मे २०१३) बातमी :
शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे उगमस्थान , भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी उसळणाऱ्या भीमसागराला सामावून घेणारे श्रद्धास्थान आणि अनेक उदयोन्मुख खेळाडूंचे मैदान असलेल्या शिवाजी पार्कला ' रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प ' राबवणारे मुंबईतील पहिलेच सार्वजनिक मैदान अशी नवी ओळख मिळणार आहे .
शिवाजी पार्कवर धो - धो पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते . त्याऐवजी आता ते रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून मैदानावरीलच विहिरी आणि बोरवेलमध्ये साठवले जाणार आहे . अंदाजे १४ कोटी लिटर पाणी साठविणारा हा प्रकल्प महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हाती घेण्यात आला असून यामुळे शिवाजी पार्कलगतच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होणार आहे .
या प्रकल्पासाठी खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन - तीन वर्षांपूर्वी पुढाकार घेतला होता . मात्र , तत्कालीन पालिका आयुक्त सुबोधकुमार यांच्या कार्यालयात या प्रकल्पाची फाईल अडकल्याने पुढे काही होऊ शकले नाही . सीताराम कुंटे यांनी पालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा या प्रकल्पाचे काम पुढे रेटले . शिवाजी पार्क परिसरातील मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी गेले आठ महिने जवळपास १८ विभागांमध्ये ही फाईल फिरवली . सीआरझेडच्या नावाखाली बऱ्याचदा ती रखडविण्यात आली खरी पण , आता या प्रकल्पाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळविण्यात आल्या आहेत . उद्या , सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता राज ठाकरे , आमदार नितीन सरदेसाई , किक्रेटचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच माधव गोठोस्कर तसेच शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या कामाचे उद्घाटन होणार असून महिन्याभरात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे .
कसे साठेल पाणी ?
मैदानाच्या सभोवताली एका फुटाचे चर खणून पावसाचे पाणी मैदानातील चार विहिरी आणि चार बोअरवेलमध्ये वळविण्यात येणार आहे . तत्पूर्वी त्या पाण्याचे नैसर्गिकरित्या शुद्धीकरणही केले जाईल . या प्रकल्पाद्वारे जवळपास १८ कोटी लिटर पाणी साठविण्यात येणार आहे . या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे १६ लाख रुपये खर्च येणार असून हा निधी खासगीरित्या उभारण्यात आला आहे , अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली .
वापर कसा ?
शिवाजी पार्क मैदानावरील नानी - नानी पार्क , जिमखाना , समर्थ व्यायामशाळा तसेच इतर ठिकाणी दिवसाकाठी जवळपास एक लाख लिटर पाणी लागते . याशिवाय क्रिकेटच्या मैदानांसाठीही पाणी लागते . ही सर्व गरज रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यातून भागवली जाईल . त्यामुळे पालिकेचे एक लाख लिटर पिण्याचे पाणी वाचणार आहे . याशिवाय मैदानाचा उर्वरित परिसर हिरवागार राखण्यासाठीही हे पाणी वापरता येईल . विशेष म्हणजे , या प्रकल्पात साठविण्यात येणाऱ्या एका लिटर पाण्यामागे केवळ सव्वा पैसे एवढाच खर्च आणि तोही एकदाच येणार आहे .
दादरच्या शिवाजी पार्कावर रेन
दादरच्या शिवाजी पार्कावर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवण्याचा विचार सुरू आहे.>>>>>>>>>>असं काही तरी करायला पाहिजे.
वर्षु,मामी,शोभा१२३,ईनमीनतीन न
वर्षु,मामी,शोभा१२३,ईनमीनतीन
नि.ग च्या नविन भागात ..तुमचे फोटो छान आलेत.
वर्षूतै, मामी, शोभा आणि
वर्षूतै, मामी, शोभा आणि नितीन...... तुम्ही सर्वांनी टाकलेले फोटोज मस्त आलेत!!
शोभा.. कविता छान आहे. कुणी लिहिलीये?
मामी, रेन वॉटर हार्वेस्टिंगची माहिती एकदम मस्त!
(No subject)
गजानन कोडं न घालता यावेळी
गजानन कोडं न घालता यावेळी उत्तर दे पटकन( कारण मला उ माहित नाहीये ) आणी सांग हे गोडुसं फूल कसलंये??
हे मी पाहिलंय. कैलाशपती आहे.
हे मी पाहिलंय. कैलाशपती आहे.
Pages