Submitted by UlhasBhide on 3 May, 2013 - 06:04
देव - आस्तिकाचा
सात्विकांच्या आर्जवांपेक्षा
भ्रष्ट पाखंड्यांच्या
भंपकगिरीचीच
तुला भुरळ पडते
असं वाटण्याइतकी
मुजोर झाल्येत पापं हल्ली
वाटतं....
आस्तिकतेला तिलांजली देऊन
मुक्त व्हावं कायमचं
पाप-पुण्याच्या भोंगळ कल्पनेतून.
-----------------------------------------------------------------------
देव - नास्तिकाचा
आजकाल बेगडी भक्तीने
पापं झाकता येत असतील
तर वाटायला लागलंय....
आपणही दांभिकपणे मिरवावा टेंभा
नसलेल्या आस्तिकतेचा
नि करून घ्यावीत
पापं ‘नियमित’
नैवेद्य, फुलांच्या भाराखाली.
.... उल्हास भिडे (३-५-२०१३)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! दोन्ही मस्त!
वाह!
दोन्ही मस्त!
रिया यांच्या मताशी सहमत
रिया यांच्या मताशी सहमत
मस्त!! आवडल्या दोन्ही.
मस्त!! आवडल्या दोन्ही.
<< नि करून घ्यावीत पापं
<< नि करून घ्यावीत
पापं ‘नियमित’
नैवेद्य, फुलांच्या भाराखाली. >> सुंदर
कविता आवडल्या.
वा वा मस्त!
वा वा मस्त!
सुरेख.. आस्तिक नास्तिक असा
सुरेख..
आस्तिक नास्तिक असा भेद मुळी नसतोच.. असतात ती चांगली माणसे आणि वाईट माणसे... असा साधा सोपा विचार सांगून जाते आपली रचना... सुंदर शब्दरचना..
शब्दरचना सुरेख जमली आहे.
शब्दरचना सुरेख जमली आहे. दोघांची मनस्थिती एकच जाणवते... वस्तुस्थितीला कंटाळुन दोघेही एकाच ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्नात आहेत.
व्वा. सुंदर मांडणी
व्वा. सुंदर मांडणी केलीय.
आवडली.
छान मांडलंय आजचं
छान मांडलंय आजचं वास्तव.
अस्सल 'आस्तिक' व 'नास्तिक' दोघेही वंदनीय पण या भेसळीच्या युगात दोघेही दुर्मिळच !
मस्त झटके आहेत दोन्ही
मस्त झटके आहेत दोन्ही उल्हासराव.
आवडले.
वाह नाही आह् झालं काळजात फार
वाह नाही आह् झालं काळजात
फार म्हणजे फार छान काका
कधी विसरताच येणार नाही असे काही मिळाले आहे या कवितेतून
धन्यवाद उकाका या कवितेसाठी !!!
वा!मस्तच!
वा!मस्तच!
मस्त कविता! पण अज्ञेयवादी
मस्त कविता!
पण अज्ञेयवादी दोन्हीकडचा फायदा घेतात ब्वॉ!
अज्ञेयवादी<<<<<<<<< म्हण्जे
अज्ञेयवादी<<<<<<<<<
म्हण्जे काय ?
अज्ञेयवादी म्हंजे
अज्ञेयवादी म्हंजे अॅग्नोस्टिक
http://en.wikipedia.org/wiki/Agnosticism
धन्यवाद घाटपांडे जी मी लिंक
धन्यवाद घाटपांडे जी
मी लिंक लक्षपूर्वक वाचली पण इंग्रजीत मी कमजोर असल्याने कच्चीपक्की समजली
पण वचून होताहोता मला माझा एक शेर आठवला ...त्यालाच अज्ञेयवाद म्हणतात का ते वाचून अवश्य कळवावे ही विनंती
असेच काहीसे आहे पण नक्की माहित नाही
आहे आणिक नाही 'मधले' काही विठ्ठल आहे
तीव्र प्रतिक्षेत........................
आपला नम्र , कृपाभिलाषी
वैवकु !!
(No subject)
छानच....
छानच....
कविता आवडली.
कविता आवडली.
आवडली कविता
आवडली कविता
कविता आवडली आणि पटलीही
कविता आवडली आणि पटलीही
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
उल्हासजी कविता आवडली..
उल्हासजी कविता आवडली..