मला रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी योग्य आहार काय हे जाणुन घ्यायचेय.
माझी मुलीचे हे वर्ष १२वीचे असल्याने तिने बहुतेक सगळा वेळ अभ्यासात म्हणजेच एका जागी बसुन घालवला. परिणामी वजन भरपुर वाढले. (गेल्या महिन्यात ७५ किलो होते आता ७३ वर आलेय, उंची १५९ सेमी).
परिक्षा संपल्यावर तिला माझ्याबरोबर सकाळी रपेट करायला घेऊन जायला लागल्यावर लक्षात आले की तिला थोडेसे चालल्यावर दम लागतोय. हातपाय दुखताहेत. बाहेर फिरुन आल्यावर थकवा येतोय. डॉक्टरांनी रक्तचाचणी करुन घेण्याचा सल्ला दिला. त्यात तिचे हिमोग्लोबिन ११ आले. डॉक्टरांच्या मते हिमोग्लोबिन कमी असल्याने तिला थकवा येणे, दम लागणे इ.इ. होतेय, तर एकदा का Hgb साधारण पातळीवर आले की हे सगळे त्रास दुर होतील.
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीट, नाचणी, खजुर इ. गोष्टी चांगल्या हे मी ऐकुन आहे. पण मला असा आहार हवाय जो हिमोग्लोबिन वाढवेल पण सोबत वजन वाढवणार नाही आणि महत्वाचे म्हणजे टिनेजरकडुन आवडीने खाल्ला जाईल.
खजुर किंवा बीट घालुन काही गोड बनवले तर ते मलाच खावे लागणार. बाजरीची भाकरीही चांगली असे ऐकुन आहे पण तीही मलाच खावी लागते. तेच बाजरीच्या नुडल्स मात्र लगेच खाल्ल्या जातात.
मंडळी असा आहार सुचवा - म्हणजे नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवण्यासाठी, संध्याकाळच्या खादाडीसाठी आणि रात्रीसाठीही. - जो टिनेजर आवडीने खाईल.
rakt / hemoglobin vadhavnyasathi upay in marathi
कशाला एवढा द्राविडीप्राणायाम
कशाला एवढा द्राविडीप्राणायाम करताय मग? लाड पुरवुन आरोग्या मिळणे दुरापास्त आहे.
आयर्नच्या गोळ्या दर दोन महीन्यात आठवडाभर द्या, नो झंझट.
पालक सूप / नाचणी डोसा /
पालक सूप / नाचणी डोसा / सोयाबीन (रोस्टेड) देता येईल.
खरं म्हणजे नाचणी बेस्ट - कारण लोह, कॅल्शियम आणि प्रथिने यांचा त्रिवेणी संगम सर्वच वयाच्या महिलांसाठी चांगला, नाही का?
आहारातून काय द्यायचे हा वेगळा मुद्दा पण जे मिळतंय ते अंगी लागणं ही तितकंच महत्वाचे.
खाण्यासोबत चहा/कॉफी घेतल्याने आहारातील लोहाचे पचन होण्यास अटकाव होतो.
त्याचबरोबर 'सी' विटामिन लोहाच्या पचनास मदतनीस म्हणून काम करते, त्याची कमतरता असेल तरी लोहाची कमी जाणवते.
पालक आणि सर्व हिरव्या
पालक आणि सर्व हिरव्या भाज्या.
आणि विटॅमिन सी साठी आवळे...
डाळींब आवडत असेल ना तिला.
डाळींब आवडत असेल ना तिला. डाळींबाचा ज्युसही देऊ शकतेस.
बिट, पालक पराठ्यात, पावभाजीत, कटलेट मध्ये टाकून देऊ शकतेस. मी तुला संध्याकाळी एक कोशिंबीर करुन रेसिपी टाकते. आज करायची आहे. वेळ मिळाल्यास करेन. ती आवडीने नक्की खाईल ती.
अहो हेलबॉय, माझी लेक हट्टी
अहो हेलबॉय, माझी लेक हट्टी नाहीये, आरोग्यासाठी चांगले असे म्हणत मी जे काही देते ते ती खाते पण ते तिचे मनापासुनचे खाणे होत नाही. मला असा आहार हवाय जो ती आवडीने खाईल आणि आरोग्यदायीही असेल. गोळ्या खाण्यापेक्षा आहारातुन आरोग्य जास्त चांगले ना..
अमित धन्यवाद. नाचणीचे डोसे वगैरे पाकृ माबोवर आहेत आधीच, त्या वापरायला लागते आता.
त्याचबरोबर 'सी' विटामिन लोहाच्या पचनास मदतनीस म्हणून काम करते, त्याची कमतरता असेल तरी लोहाची कमी जाणवते
ओके.
मी तुला संध्याकाळी एक कोशिंबीर करुन रेसिपी टाकते. आज करायची आहे
नक्की टाक गं जागुडे.
गोळ्या खाण्यापेक्षा आहारातुन
गोळ्या खाण्यापेक्षा आहारातुन आरोग्य जास्त चांगले ना>>> तसही ११ म्हणजे फार कमी नाहिये नाहितर डॉ नी गोळ्या अथवा इन्जेक्शन्स साठी सल्ला दिला असता.
तसही ११ म्हणजे फार कमी नाहिये
तसही ११ म्हणजे फार कमी नाहिये नाहितर डॉ नी गोळ्या अथवा इन्जेक्शन्स साठी सल्ला दिला असता.>>> +१
साधना, तिला रेग्युलर वॉक घ्यायला सांग साधारण ३ किमी पर्यंत. हळूहळू स्टॅमिना वाढेल आणि दमणं बंद होईल. सुरुवातीला दमतेय असं वाटलं तरी तसंच कंटिन्यू कर. विचित्र प्रकारे दमत असेल तर मात्र MD ना दाखव. वाढलेलं वजन उतरलं की देखिल आपोआप दमणं कमी होईल.
बाकी आहारातून सगळं काही घेणं हे आयडिअल असलं तरी कधी कधी सप्लिमेंट्स द्यावेच लागतात.
साधना काळ्या मनुकांमध्ये पण
साधना काळ्या मनुकांमध्ये पण चांगलेच लोह असते. तिला त्या बीया काढुन खाऊ देत. त्याने पोट साफ होऊन रक्तातली उष्णता पण कमी होते. तुझे मूळ गाव आंबोली आहे असे वाचले, मग आजोळी जाऊन तिला भरपूर रानमेवा खाऊ दे. निसर्गाच्या सान्निध्यात, मोकळ्या हवेत तब्येत चांगली होईलच. ( फुकट सल्ल्याबद्दल रागवु नये, वाटलं ते लिहीले, कारण मला काय किंवा माझ्या मुलीला काय हे दुरापास्तच आहे).
करवंदे, जांभळे यात पण खूप लोह असतेच. नाचणीची खीर, खजूर घालुन केक, नाचणीचीच खिशी ( उकड काढुन त्यात तीळ, हिंग, मीठ घालुन वर थोडे कच्चे तेल घेउन खाणे )
राजगीरा लाडु, गुलकंद पण दे. गुलकंदाचे उपयोग तर माहीत आहेच.
वर करकरेंनी सांगीतल्याप्रमाणे चहा कॉफी बंद, कारण भूक मरते आणी लोह पण मिळत नाही.
साधना एक एबिसी ज्युस म्हणून
साधना एक एबिसी ज्युस म्हणून प्रसिद्ध असलेला ज्यूस रोज आवर्जुन दे. खूप म्हणजे खूप फरक पडेल. अॅपल, बीट आणि कॅरट ज्यूस.
लहान सफरचंद, कच्चं बीट, गाजर हे तिन्ही नीट धुवून सालासकट मिक्सरमधून बारीक पल्प करायचं, त्यात गार पाणी घालून ज्यूसच्या कन्सिस्टन्सीइतकं करायचं. पिताना त्यात लिंबाचा रस, मीठ घालायचं. लगेच करुन प्यायला हवा मात्र हा ज्यूस.
गुळ, फुटाणे एकदम मस्त असतात.
गुळ, फुटाणे एकदम मस्त असतात. तयार करायची गरज नाही. केव्हाही खा.
सोबत भाजलेले शेन्गदाणे देखील देता येईल.
साधना, वेगवेगळ्या कोशिंबीरी
साधना, वेगवेगळ्या कोशिंबीरी आणि फ्रूट्स भरपूर खाऊदेत. फ्रूट्स खाताना कॅलरीजचा विचार जास्त नको कारण त्यामधून इतर पोषणद्रव्येदेखील मिळतात.
रोज गुळाचा एक खडा खाणे पण चांगले. लोखंडी कढईत पालेभाजी अवश्य करत जा.
टुनटुन म्हणते तसं खरंच चारपाच दिवस गावी अथवा बाहेर कुठेतरी जाऊन यायला हरकत नाही
सुट्टी पण एंजॉय होईल आणि गावाकडे भ॑रपूर फिरल्याने स्टॅमिना पण वाढेलच 
अजय जवादे | 4 May, 2013 -
अजय जवादे | 4 May, 2013 - 10:33 नवीन
गुळ, फुटाणे एकदम मस्त असतात. तयार करायची गरज नाही. केव्हाही खा.<<<
हा सोप्पा वाटला उपाय. हा उपयुक्त असतो का हिमोग्लोबिनसाठी? माहीत नव्हते. धन्यवाद.
इतर सर्वांनीच सुचवलेले उपायही आवडले.
साधना - आपल्या लेकीला बरे वाटो.
(No subject)
रक्त तसे कमी
रक्त तसे कमी नाहीये.
आजकाल्च्या तरूण मुलींमध्ये तेच प्रमाण असते. पाय खूप थंड पडत नाहीत ना?
शरीराला जराही व्यायम नसल्याने कधी कधी अचानक व्यायम सूरु केला की थकवा येतो.
जरा हळूवर घ्या. थोडे स्ट्रेचेस वाढवा एकदम पळण्याआधी.
पालक सूप, टोमॅटो व बीट ज्युस वगैरे चांगले पर्याय आहेत. धावून आल्यावर बीट रसात सफरचंदाचा रस द्या. (१:४) प्रमाणात. बीट कमीच घ्या सुरुवातीला.
अॅपल मध्ये 'सी' असते ते मदत करेल.
दही, बीट, मूग, कोथींबीर अशी कोशींबीर द्या.
साधना रोज एक तरी अॅप्पल दे
साधना रोज एक तरी अॅप्पल दे तीला खायला.
जेवण करताना आवर्जुन लोखंडी भांड वापरत जा.
पालेभाज्यांचा वापर वाढव.
आता तीला पालक ची भाजी आवडत नसेल तर कॉर्न - पालक - चीज सँड्व्हीच ब्राउन ब्रेड मध्ये घालुन दे.
डाळींबाचा रस प्यायला दे.
नाचणीच सत्व, दुध, अंडी अस सगळ तीला दे.
शीवाय स्टॅमीना वाढवण्यासाठी एक्सरसाईझ वाढवायला सांग.
आवडत असेल तर सुट्टी मध्ये एखादा डान्स क्लास सुरू करु शकते.
काकवी ने झटपट परिणाम साधतो.
काकवी ने झटपट परिणाम साधतो. पण बाजारात खात्रीने कुठे उपलब्ध होते ते माहित नाही.
अकरा म्हणजे फार कमी नाही.
अकरा म्हणजे फार कमी नाही. वाढलेले वजन हीच बहुधा मुख्य समस्या असावी. पोटात कृमी झाले तरी लोहाचे प्रमाण कमी होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने(च) कुठलेही कृमिनाशक औषध घ्यावे.
आहारातून कुठलेही पोषक द्रव्य मिळवताना त्या त्या. द्रव्याचे त्या आहारघटकातले प्रमाण महत्त्वाचे असते. उदा. कोणी म्हणतात केळ्यात कॅल्शिअम असते, केळी खा. पण शरीराला किती कॅल्शिअमची गरज असते आणि ती भागवण्यासाठी किती केळी खावी लागतील किंवा दुसरे कुठले कॉम्बिनेशन किती प्रमाणात ( एक कप, दोन कप, शंभर ग्रॅम्...इ ) घ्यावे लागेल हे समजणे महत्त्वाचे. काही लोकांना पूर्ण जेवणानंतर दोन मोठी हिरव्या सालीची केळी कॅल्शिअमसाठी खाताना बघितले आहे .म्हणजे दोन केळ्यांची भूक शिल्लक राहील इतपतच जेवण ते जेवत असणार. अर्थात इतर आवश्यक अन्नघटक त्या प्रमाणात शरीराला कमी पोचणार.
योग्य व्यायाम हाच उपाय आहे,तोही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार.
बाकी हिरव्या पालेभाज्या, गडद रंगांची फळे/फळभाज्या हे सर्वांना माहीतच असते.
साधना, एकतर काळजी करणे सोड
साधना,
एकतर काळजी करणे सोड आणि दुसरे आहारतज्ञाला भेट.
नुसते आयर्न खाऊन तेवढे लगेच रक्तात जात नाही त्यामूळे चौरस आहार महत्वाचा. सोबतीला व्यायाम हवाच.
एकदम धडाकेबाज प्लानने वजन कमी करायला लावू नकोस. ते हळूहळूच कमी व्हायला हवे.
सगळ्यांचे अगदी मनापासुन
सगळ्यांचे अगदी मनापासुन आभार.
खरेतर ११ फार कमी नाही पण दम लागत होता त्यामुळे काळजी वाटायला लागली.
गेल्या महिनाभर केलेल्या योगा आणि व्यायामाचा फरक दिसुन येतोय. आधी १-१.५ किमी चालल्यावर पुढे चालवत नव्हते, पण हल्ली मोठ्या रपेटी शक्य होताहेत. काल ६ किमीची रपेट तासाभरात पुर्ण केली, अर्थात अधुन मधुन रमत गमत, रस्त्यावरची झाडे पाहात. अर्थात आता रस्त्यावरुनच चालतोय, आधी पारसिक हिलवर घेऊन जात होते, चढणीमुळे त्रास सुरू झाला.
हिमोग्लोबिनची काळजी मला दुस-या गोष्टीमुळे वाटायला लागली. ऑगस्टमध्ये लेहला जायचा प्लॅन केलाय. गेल्या वेळेला ती ट्रेकसाठी मनालीला गेली होती. तिथुन पुढे अजुन उंचावर जायचे होते. पण थोडे वर गेल्यावर तिला श्वसनाचा त्रास व्हायला लागला आणि मनालीला परतावे लागले. मी इएन्टी डॉक्टरांकडे नेले होते तेव्हा. त्यांच्या मते तिच्या नाकातले हाड थोडे वाकडे असल्याने असा त्रास होऊ शकतो पण त्यात फारसे सिरीयस काही नाही.
आता असे काही व्हायला नको म्हणुन आधीपासुनच वजन आणि तब्येतीची काळजी घेतेय.
सगळ्यांचे परत एकदा आभार. सुचवलेले प्रयोग अर्थातच करेन. एबीसी ज्युस तिला खुप आवडेल. अॅपल ज्युस खुप आवडीचा आहे.
साधना, उंची पाच फूट तीन आणि
साधना, उंची पाच फूट तीन आणि वजन ७५ किग्रॅ हाच खरा प्रश्न आहे. कळले काय?
७५ किलो वजन वागवायचे म्हणजे बहुतांश उर्जा आणि बॉडी इसेनन्शीएल्स तीथेच खर्च होत असावीत.
lungs capacity चेक करुन घे, health ,life expectancy आणि lungs capacity यांचा डायरेक्ट संबंध आहे. चांगली लंग्ज कपॅसिटी endurance वाढवते.
पहाडी वातावरणातील लोकांची लंग कपॅसिटी चांगली असते, त्यामुळेच ब्रिटीशांनी गुरखा रेजिमेंट सुरु केली होती....
बास आता जास्तच होतय.
नौन व्हेज खात असाल तर ५ दिवस
नौन व्हेज खात असाल तर ५ दिवस रोज कलेजी खायची हिमोग्लोबीन कितीही कमी असले तरी ५ दिवसात खात्रीने वाढ्णार. उसाचा रस ही उत्तम.
रोज उसाचा रस प्यायचा.
रोज उसाचा रस प्यायचा. स्वयंपाकात गुळाचा वापर करायचा. गुळपापडीच्या वड्या अधूनमधून खायला. ह्यामुळे वाढेल हिमोग्लोबिन.
लडाखला जाणार आहात तर जाताना
लडाखला जाणार आहात तर जाताना कापूर बरोबर ठेवा. श्वसनाच्या त्रासात उपयोगी पडतो. तसेच होमिओपाथीच्या कोका ३० गोळ्याही. अॅलोपथीच्या डायमाऑक्स या गोळ्या ही ठेवा. आणखी टिप्स आम्ही जून्-जुलॅ मध्ये जाउन आल्यावर देईन.
लडाखला जाणार आहात तर जाताना
लडाखला जाणार आहात तर जाताना कापूर बरोबर ठेवा. श्वसनाच्या त्रासात उपयोगी पडतो. तसेच होमिओपाथीच्या कोका ३० गोळ्याही. अॅलोपथीच्या डायमाऑक्स या गोळ्या ही ठेवा. आणखी टिप्स आम्ही जून्-जुलॅ मध्ये जाउन आल्यावर देईन.
हिमोग्लोबीन पालक बीट नाचणी मन
हिमोग्लोबीन
पालक
बीट
नाचणी
मनुका
अजुन ह्याशिवाय कशाकशातून मिळू शकते?