Submitted by प्रेमळ पारधी on 22 April, 2013 - 10:02
मित्र मंडळींचा अड्डा जमला होता. धम्माल गप्पा-टप्पा सुरु होत्या आणि अचानक कोणा तरी दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. जाऊ दे - सोडून दे करताना एक जण म्हणाला, "अरे यार हे तर होणारच! माझी श्वान योनी आहे आणि याची मार्जार.. आमची तू-तू , में -में व्ह्यायचीच." आणि मग सगळे जण अभावित पणे त्या विषयाकडे ओढले गेले. घशाशी आलेला आवंढा गिळायला सवड होतेय न होतेय तोच, पुढचा प्रश्न त्याच्या दिशेने उडत आला, "काय रे तू का गप्प ? सांग ना तू कोण होतास मागल्या जन्मी?"… पांढरा फटक पडलेला चेहरा आणि ओठांची थरथर कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्याने मान वळवली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला तोच…. कुठून तरी दूर अज्ञातातून एक आवाज ऐकू आला,
……"मुंगसा मुंगसा तोंड दाखव, तुला रामाची शप्पथ !"
(क्रमशः)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच सुरवात. आज माझी कुंडली
मस्तच सुरवात. आज माझी कुंडली काढुन बघीतली पाहिजे.........
एकदम वेगळा विषय
एकदम वेगळा विषय आहे.
मस्त!आवडली!
पुढचे भाग टाका पटापट.
मी व्याघ्र योनीची आहे आणि
मी व्याघ्र योनीची आहे आणि आमचे हे मुषक योनीचे.
आहे ना गंमत.