Submitted by नितीन बाबा शेडगे on 22 April, 2013 - 05:41
नमस्कार मंडळी!
मे महिन्यामधे मी फॅमीली सोबत (मी, बायको आणि मुलगा वय ६ वर्श) देव दर्शन (महालक्ष्मी व जोतिबा) आणि कोल्हापुर दर्शन साठी येनार आहोत. २ ते ३ दिवसाचा प्लान आहे.
दर्शनाची कुठुन सुरुवात करायची? रहाण्यासाठी व जेवणासाठी योग्य हॉटेल (रिजनेबल) तसेच कोल्हापुर दर्शनासाठी कोणती ठीकाणे आहेत ते जाणकारांनी सुचवीणे माहीती देणे, ही विनंती.
धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शालिनी पॅलेस चांगले आहे. जुने
शालिनी पॅलेस चांगले आहे. जुने आहे पण चांगले आहे आणि रंकाळा पण समोर आहे.
बसस्टॉप वर देखील चांगली
बसस्टॉप वर देखील चांगली हॉटॅल्स आहेत
कोल्हापूर दर्शन रंकाळा, शाहू
कोल्हापूर दर्शन
रंकाळा, शाहू महाराजांचा राजवाडा, गगन बावडा, कण्हेरीचा आश्रम, पन्हाळा, शी क्षेत्र ज्योतिबा, महालक्ष्मी मंदीर, मंडप परीसर, शेतकरी बझार इ.
१२००-१५०० मध्ये बरीच हॉटेल्स
१२००-१५०० मध्ये बरीच हॉटेल्स आहेत, पण एप्रिल - मे हा प्रचंड सीझनचा महिना आहे त्यामुळे नेटवरून नंबर घेऊन बूकिंग केलेले बरे. प्रत्यक्ष मंदिराजवळ चॉईस कमी आहे. उदयन म्हणतात तसे जास्तकरुन हॉटेल्स मध्यवर्ती बस स्थानकाजवळ आहेत. तिथून अंबाबाईचे मंदिर चारेक कि.मी. आहे.
इथे खाली जी लिंक दिलीय त्यात
इथे खाली जी लिंक दिलीय त्यात वाचा.
http://www.maayboli.com/node/39380
कोल्हापूरला श्री अंबाबाईच्या मंदिरात/ जवळच धर्मशाळा आहे, त्यात सोय होते. पण सुरक्षीतता कितपत आहे हे माहीत नाही. रेल्वे स्टेशन शेजारीच अपोलो आहे ( बहुतेक ) हॉटेल चांगले आहे. स्टेशन व बसस्टॉपशेजारी( वर उदयन यांनी म्हंटल्याप्रमाणे ) चांगली हॉटेल्स आहेत.
खाण्यासाठी वामन गेस्ट हाऊस शाहुपुरी ambassador Lodge जवळ, कोल्हापूर,
मालवणी पद्धतीचे जेवण मिळते.
ओपेल - जुना पुणे बंगलोर मार्ग
तंदूर - जु.पु.बं मार्ग
अयोध्या - कावळा नाका
राजधानी - रुईकर कॉलनी
सायबा - राजाराम् पुरी, जनता बझारमागे
शेतकरी धाबा - फुगेवाडी
पद्मा गेस्ट हाऊस - धेर्यशील हॉलजवळ
घरी परततांना कोल्हापूरचा कांदालसुण मसाला / चटणी घेऊन जा.
कोल्हापूरला मंदिराजवळ म्हणजे
कोल्हापूरला मंदिराजवळ म्हणजे महाद्वार रस्त्याला महालक्ष्मी धर्मशाळा आहे, किंवा घाटी दरवाज्याजवळ माऊली लॉज. हे दोन्ही मंदिराच्या अत्यंत जवळ आहेत. स्टेशन किंवा स्टँड्ला राहिलात तर सर्व दूर पडेल. या दोन्ही पैकी कोणत्याही ठिकाणी उतरा, देवीचं दर्शन प्रथम (चालत जाऊन) घेऊ शकाल. त्यानंतर इथूनच भवानी मंड्प अत्यंत जवळ आहे, तिथे तुम्हाला कोल्हापूरातल्या इतर प्रेक्षणीय स्थळांकडे जाणार्या बसेस मिळतील, भवानी मंडपापर्यंत ही चालत जाऊ शकता. (लॉज पासून जवळ आहे.)
मी प्रयत्न करून पाहते, दोन्हीचे फोन नंबर्स मिळतायत का ते, आणि रेटस पण.
शालिनी पॅलेस वगैरे एक तर लांब आहे शिवाय रिझनेबल नक्कीच नाहिये.
http://www.shrimahalaxmi.com/
http://www.shrimahalaxmi.com/yatri_nivas.html
प्रसाद, उदयन, किरण, अमेय,
प्रसाद, उदयन, किरण, अमेय, टुनटुन आणि दक्षिणा
प्रतिसाद दिल्याबद्द्ल खुप खुप आभारी आहे.
ज्योतिबाला जान्यासाठी
ज्योतिबाला जान्यासाठी कोल्हापूरातुन सतत वाहतुक असते ना? तसेच ज्योतिबा आणि पन्हाळा हे वेगवेगळ्या ठीकाणी आहेत का? तेथे सुधा राहण्याची व्यवस्था आहे का?
जोतिबाला जाण्यासाठी सतत
जोतिबाला जाण्यासाठी सतत वाहतुक आहे, टाऊन हॉल मधुन एस. टी आहेत,
तसेच ज्योतिबा आणि पन्हाळा हे वेगवेगळ्या ठीकाणी आहेत का?>> तसं जवळच म्हणायचे, एका फेरीत होऊ शकतात, तिकडे राहण्यापेक्षा कोल्हापुरातच राहा.
दिपडे पन्हाळ्यात राहू देत की
दिपडे पन्हाळ्यात राहू देत की एक रात्र. चांगलं ठिकाण आहे ते, आणि आत्ता थंड असेल मस्त.
जोतिबाला जाण्यासाठी सेन्ट्रल
जोतिबाला जाण्यासाठी सेन्ट्रल बस स्टॅन्ड वरुन एसटी असतात.
आता चैत्र महिन्यात मात्र पंचगंगा घाटावरुन एसटी असतात.
तुम्ही चैत्र पोर्णिमेला जात नाहियेत ना?
जात असाल तर तिथुन एसटी मिळेल.
खुप गर्दी असेल चैत्र पोर्णिमेला.
जोतिबाची यात्रा असते.
लाखांच्या संख्येत भाविक येतात.
बस स्टँड वर होटेल आशिश म्हणुन
बस स्टँड वर होटेल आशिश म्हणुन आहे ०२३१-२६५९६१८ हा नंबर आहे... १००० पर्यंत एसी रुम्स आहेत ..सर्विस छान आहे त्यांची
.
.मी दर वेळेला तिथेच जातो...
तुम्ही चैत्र पोर्णिमेला जात
तुम्ही चैत्र पोर्णिमेला जात नाहियेत ना?
नाही झकासराव.
आम्ही मे च्या दुसर्या किंवा तिसर्या आठवडयात जाणार आहोत.
दिपु, झकासराव, उदयन.. खुप खुप आभारी आहे.
नमस्कार्....
नमस्कार्....
धर्मशाळा ठीक आहे.
धर्मशाळा ठीक आहे. स्वच्छ्तेचे बाबतीत थोडे सामावून घ्यावे लागते. पण लोकं छान स्वभावाची आहेत.
चोरग्यांची मिसळ जरूर खाणे.
ज्योतिबासही स्वच्छ्तेचे बाबतीत मन खट्टू होतं. पण अर्थात गर्दीमुळे हे टाळता येणे अवघड आहे.
अश्या पावसाळी वातवरणात पन्हाळा इज मस्ट सी.
बाकी अंबाबाईस आमचा दंडवत कळ्वा! तिथे खरें दर्शनसूख आहे!
शुभेच्छा!
प्रथम मी मायबोलीकर प्रसाद,
प्रथम मी मायबोलीकर प्रसाद, उदयन, उद्दाम हसेन, किरण, अमेय, रश्मी, झकासराव, टुनटुन, यक्ष, दिपु आणि दक्षिणा यांचे आभारी आहे.
माफ करा लेट प्रतिसाद देत आहे.
मी गेल्या मे २०१३ मधे कोल्हापुरला गेलो होतो. (मी, मुलगा वय ६ व. आणि मिसेस) राहण्यासाठी Hotel Ashish Deluxe, Kolhapur मधे होतो. (उदयन Hotel आवडले, मध्यवरती ठीकाण)
hotel राहण्यासाठी मध्यम आणि रिजनेबल आहे. मला मे मधे एसी रुम घेण्याची गरज नाही वाटली. hotel एस.टी. स्टण्ड समोर आहे. प्राएव्हेट बस Luxary hotel च्या प्रिमायासेस मधुन सुटतात आणि रेल्वे स्टेशन hotel च्या मागे आहे. sightseeing साठी लोकल बस आणि रिक्शा चा वापर केला.
पहील्या दिवशी सकाळी रिक्शा ने New palace (राजवाडा) ला गेलो. दुपारी रिक्शाने येताना शाहुपुरी १ ल्या गल्लीत होटेल वामन मधे जेवलो. होटेल वामन मालवणी जेवणाकरीता प्रस्सीद्द आहे. होटेल वर आराम केल्यानंतर संध्याकाळी CBS बस स्टॅण्ड ( कोल्हापुर ST स्टॅण्ड च्या बाजुला) जिथुन City Bus कोल्हापुर लोकल साठी सुटतात तिथुन रंकाळा बस पकडली.रंकाळा चोपाटी फिरलो. येताना रिक्शा केली आणि गंगावेश व भवानी मंडप पाहीला. रात्रीचे जेवण Hotel Ashish Deluxe च्या बाजुला कोल्हापुर ST स्टॅण्ड च्या समोर होटेल सह्याद्रीत घेतले. (होटेल सह्याद्री शाकाहारी आहे) सकाळी नाश्ता येथेच केला होता.
लग्नसराई मे महिना त्याच्या मुळे दुसर्या दिवशी सकाळी एशियाड चे मुंबई परतीचे रिजर्वशेन केले. बाकी बुकींग फुल्ल होते. पुढे रिक्शा ने महालक्षमी मंदिर गाठले. दरशन झाल्यानंतर १५ मि. अंतरावर फडतरे मिसळ मधे पेटपुजा केली. आणि जवळ्च्या ST स्टॅण्ड वरुन जोतिबा बस पकडली. जोतिबा दरशन साठी साडे तीन ते चार तास लागले. कारण मे महीना आणि लग्नसराई असल्यामुळे खुप गर्दीचा सामना करावा लागला. दुपारी खुप उन होते व भाविक गुलाल उधळत असल्याकारणाने आम्ही सर्व लाल लाल झालो होतो. दरशन झाल्यानंतर अचानक उन्हाळी पाउसाने ह्जेरी लावली. जोतिबा ST स्टॅण्ड वरती पावसाळया सारखे वातावरण झाले होते. समोरचे १५ फुटावरचे दिसत नव्हते. ढग आणि धुके पसरले होते. संपुर्ण आम्ही भिजलो. पाउस एन्जाय केला. दर्शनासाठी तीन ते चार तास लागले आणि पाउसामुळे २ तास उशीर झाला त्यामुळे पन्हाळा नाही करता आला. येताना Hotel वर ST नेच आलो. त्याच्या मुळे दुपारचे जेवण घेण्यासाठी ५ वाजले.
तिसरा दिवस आराम केला. थोडी खरेदी केली. आणि रात्री च्या गाडीने मुंबईला रवाना झालो.
१) Hotel-Ashish-Deluxe चे भाडे २५००/- च्या आत झाले असेल. (चहा, बिसलेरी, काफी वगैरे)
मुक्कामाचे होटेल आणि मा़झा रीव्हु दिला आहे. लिंक : http://www.holidayiq.com/Hotel-Ashish-Deluxe-Kolhapur-hotel-426668.html
२) जेवण एक दिवस होटेल वामन आणि दुसरर्या दिवशी होटेल परख, ST स्टॅण्ड पासुन पुणे बंगलुर हायवे कडे जाताना) जेवण घेतले ते होटेल लिंक : http://goodtimes.ndtv.com/video/videolist.aspx?vid=145964&CategoryKeywor...
>>>> आणि रात्री च्या गाडीने
>>>> आणि रात्री च्या गाडीने मुंबईला रवाना झालो. <<<< to aaja maayabolivara pohochalo
jokes apart, malaa kolhapur aavaDate. tithali maaNase madat karataat, pattaa vicaaralaa tar paara rastaa daakhavat soDaayalaa yetaat asaa svaanubhav aahe.
tumacha panhaaLaa jhaalaa astaa tar adhik bare, better next time.
paise vaachavaayache asatil tar yaatri nivas utkRuShTa
धन्यवाद लिंबुजी!
धन्यवाद लिंबुजी!
Hotel-Ashish-Deluxe चे भाडे
Hotel-Ashish-Deluxe चे भाडे प्रतिदिन २५०० आहे का?
नाही गमभन! ३ दिवसाचे.. लिन्क
नाही गमभन! ३ दिवसाचे..
लिन्क पहा: http://www.holidayiq.com/Hotel-Ashish-Deluxe-Kolhapur-hotel-426668.html
खुपच रिझनेबल आहे मग!!
खुपच रिझनेबल आहे मग!!