'चावलचेंडू' - (देशी Arancini)

Submitted by लाजो on 22 April, 2013 - 10:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चावलचेंडू

भात म्हणजे जीव की प्राण, त्यामुळे तो कुठल्याही स्वरूपात आवडतो आणि त्यामुळे भाताचे निरनिराळे प्रयोग करायलाही आवडतात Happy

काल वर्षूताईने फोडणीच्या भाताचे प्रकार सुचवायला सांगितले आणि मला मी पूर्वी केलेल्या भाताच्या या प्रयोगाची आठवण झाली Happy याच नामकरण मात्र आजच झालं Wink

Arancini हा एक इटालिअन पदार्थ - तळलेले स्टफ्ड (मीट सॉस) भाताचे गोळे. Arancini चा शब्दशः अर्थ - छोटी संत्री कारण हे गोळे तळल्यावर म्हणे संत्र्यासारखे दिसतात.

मुळ रेसिपी मधे आर्बोरिओ (रिसोटो राईस), मिन्स्ड बीफ, टॉमेटो सॉस आणि मोझरेला चीज वापरतात. अंडे व ब्रेडक्रम्ब्ज मधे घोळवुन हे गोळे तळतात.

माझे प्रयोगः

बाहेरील आवरणः
उरलेला भात,
मीठ,
कोथिंबीर,
आवडीचा मसाला - मी उरलेली रेडिमेड टिक्का पेस्ट वापरली होती.

आतिल सारणः
पनीर
थोडे किसलेले चीझ
मीठ
कोथिंबीर
थोडा चाट मसाला

इतर जिन्नसः
मैदा,
फेटलेले अंडे
ब्रेडक्रम्ब्ज

क्रमवार पाककृती: 

१. ओव्हन १८० डिग्री सेंटीग्रेड ला तापत ठेवा. बेकिंग ट्रे वर अ‍ॅल्युमिनियम फॉईल लावुन तयार ठेवा,

२. एका मोठ्या बोलमधे उरलेला भात + मसाला + कोथिंबीर + मीठ कालवुन घ्या. चव बघा.

३. दुसर्‍या बोल मधे पनीर + किसलेले चिझ + कोथिंबीर + मीठ + चाटमसाला एकत्र कालवुन त्याचे छोटे गोळे बनवा.

४. तीन छोटे पसरट बोल्स घेऊन एकात मैदा, दुसर्‍यात फेटलेले अंडे आणि तिसर्‍यात ब्रेडक्रम्ब्ज ठेवा.

५. आता कालवलेल्या भाताचा एक गोळा घेऊन त्यात खड्डा करा. या खड्ड्यात एक पनीरचा गोळा ठेवा आणि भाताच्या गोळ्याने पनीरचा गोळा कव्हर करा. कालवलेला भात मो़कळा झाला असेल तर गोळा तयार होणार नाही. त्यासाठी त्यात किंचित पाणी घाला.

६. असे भात+पनीर चे गोळे तयार करा.

७. आता एक एक गोळा पहिल्यांदा मैद्यात मग अंड्यात आणि शेवटी ब्रेडक्र्म्ब्ज मधे घोळवा आणि बेकिंग ट्रे वर ठेवा.

८. या गोळ्यांवर थोडे कुकिंग ऑइल स्प्रे करा आणि ट्रे मधल्या रॅकवर ओव्हन मधे ठेवा. लक्ष असु देत. मधे एक दोन वेळा टाँग्जने (चिमटा) गोळे हलकेच फिरवा.

९. बाहेरुन सोनेरी-तपकिरी रंग आला की बाहेर काढा.

१०. गरम गरम 'चावलचेंडू' टोमेटो केचप / चिली सॉस बरोबर गट्टम करा Happy

वाढणी/प्रमाण: 
भाताच्या प्रमाणात जेव्हढे होतिल तेव्हढे
अधिक टिपा: 

- याला प्रमाण असे काहिही नाही. जेव्हढे आहे तेव्हढे संपवा Happy
- तुमच्या मर्जीने जो हवा तो मसाला भातात घाला.
- तुमच्या मर्जीने पनीर + चीज, नुसते चीज, घट्ट मीट सॉस / खीमा काहिही सारण म्हणुन घाला.
- मी बेक केले आहेत, आप्पे पात्रात करुन बघायला हरकत नाही Wink
- अंड्याऐवजी बाईंडिंग साठी काय वापरायचे हे तुम्हीच प्लिज सुचवा Happy

माहितीचा स्रोत: 
Arancini ची पाककृती आणि माझे प्रयोग
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच भात्प्रेमी दिसतेस लाजो Happy
फोटोज मस्त आहेत.
भात फार आवडत नाही भाताऐवजी काय वापरु(असा प्रश्न विचाराय्चा मोह टाळत आहे हे लक्षात घे ) Proud

मस्त दिसतंय प्रकरण. ह्याकरता जास्मिन राईस वगैरे चिकट असल्यामुळे योग्य असावा बहुतेक.
आमच्याकडे पनीर कुणाला आवडत नाही तेव्हा त्याऐवजी बटाटे वापरु का वगैरे प्रश्न आता येतीलच. Wink

छान दिसतंय आणि लागेलही छान. जर इतालियन राईस आणि हर्ब्ज वापरले तर अंड्याची गरज भासणार नाही कारण तो भात तसाही चिकटच असतो.
आपले तांदूळ वापरून भात केला असेल तर थोडासा तेलाचा हात लावला किंवा बेसनाच्या पातळ घोळात गोळे बुडवले तरी चालतील.

अस्पारागस, बेबी कॉर्न, बेबी कॅरट वगैरे वापरले तर लांबट सॉसेज सारखा शेपही देता येईल. मग हव्या तर स्लाईसेस करता येतील.

अरे वा मस्त प्रकार दिसतोय..नाव सुद्धा अगदी क्युट!
भात फार आवडत नाही भाताऐवजी काय वापरु(असा प्रश्न विचाराय्चा मोह टाळत आहे हे लक्षात घे ) >>> शूम्पी कुसकुस वापरुन बघ. मस्त प्रकार होईल आणि हेल्दि सुद्धा.

अगं काय मस्त रेसिपी सांगितलीस.. सोप्पी आणी यम्मी ..
लौकरच करून पाहीनच्च..

( हे वाचताना ,पाहताना नवर्‍याच्या पोटात धसकलंय कि ही आता किती किलोनी भात करून ठेवणारे म्हणून !! Wink

Proud )

अरे वा बेक्ड केलेत सही...फोटोवरून हा फ्राइड आय्टम वाटला होता Wink

जुनं नाव क्र.१० ला अजून दिसतंय टुकटुक Proud

लै भारी, लाजो! विशेषतः आवनमध्ये करून टेस्ट भी हेल्थ भी जमवल्याबद्दल धन्यवाद.

चावलचेंडु नाव मात्र भारीच चवचाल वाटतंय हां. पुन्हा बदल आता. Happy

धन्यवाद मंडळी Happy

सायो, पनीर ऐवजी कुठलीही भाजी भरु शकतेस.

थोडे चीझ किसुन घातले की मेल्ट झाल्यावर छान मिळून येते आतले सारण. पण चीझ नाही घातले तरी चालेल.

>>चावलचेंडु नाव मात्र भारीच चवचाल वाटतंय हां. पुन्हा बदल आता<< ए मामी, आता तुच सुचव....

भात बॉल (बॅट बॉल सारखं),
भात बाँब
भात ग्रेनेड
भात का गोला (आग का गोला सारखं)
चावल गेंदा फुल्ल

अजुन काहि अ‍ॅप्ट नाव कुणाला सुचत असेल तर सांगा आणि सर्वमताने आपण या पाकृ चे बारसे करु Happy

अर्र्र्र्र्र्र्र!! अजून बारसं व्हायच्चचे????????

चावलचेंडु नाव मात्र भारीच चवचाल....... Biggrin
मिन्स्ड बीफ,
अंडे व ब्रेडक्रम्ब्ज मधे घोळवुन तळलेल्या गोळ्यांना इथे अरेबिक रेस्ट्राँ मधे ' किब्बे' म्हणतात..

राईस किब्बे कसं वाटतं..

मस्तच!! फोटो पण भारी.
आप्पे पात्राची कल्पनाही सही आहे. एकदा भात मुद्दाम उरवून करून बघायला पाहिजे.

मी बेक केले आहेत, आप्पे पात्रात करुन बघायला हरकत नाही >>++११ हे बरे झाले आता कधितरि करण्यात येइल

मस्त रेसिपी...

रईस राईस (पनीर घातल की मला उगाच सगळ शाही वाटत...)
लांब विकेंडला करेन. पनीर ऐवजी चीज पूर्ण घातल तर कितीवेळ बेक करावे लागेल ? (अंदाज??)

जाउ दे ... फारच टिंगल करायला लागलेत सगळे Sad

काहितरी साध सरळ नांव ठेवाव झालं...

अगो, ते राईस क्रोके इटालिअनच आहेत की.. आर्बोरिओचे ....

हाफ राईस दाल मारके वरुन का ... बsरं ! Light 1

मला आधीही मायबोलीवरच कुणीतरी क्रोके उच्चार आहे असं सांगितलं होतं पण मी उच्चार चेक करुन लिहिला आहे Happy

फारच टिंगल करायला लागलेत.... नक्को नक्को निळी होऊस गं

अय्यो.. पुन्हा बारसं झालं.. लाजो जी ये फैनल है क्या?? Wink

Pages

Back to top