Submitted by इस्रो on 21 April, 2013 - 06:10
नाही कुणीही राहिला निष्काम पहिल्यासारखा
कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा
चेतक असे घोडयास त्या बोलावले त्यांनी जरी
करता तया येईल का संग्राम पहिल्यासारखा
सारेच झटपट पाहिजे या माणसांना आयते
कोणा नको गाळावया रे घाम पहिल्यासारखा
च्याटींग अन मेसेजने ते बोलती वा भेटती
जाऊन भेटेना कुणी मुद्दाम पहिल्यासारखा
पाडून मस्जिद बांधती ते राममंदिर भक्तगण
भक्तीत त्या दिसला न तो श्रीराम पहिल्यासारखा
या माणसाने मोडले सृष्टी नियम अन कायदे
नुरला अता क्रमवार तो हंगाम पहिल्यासारखा
- नाहिद नालबंद [९९२१ १०४ ६३०]
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
याहीवेळी तुमचे सर्व शेर खूप
याहीवेळी तुमचे सर्व शेर खूप आवडले !!
राममंदीर हा विवादित मुद्दा !!!
........असे मनाला क्षणभर वाटले; की तुम्ही लिहिला नसतात तरी चालले असते का ?
(........म्हणजे एका नाहिद असे नाव असलेल्या व्यक्तीने )
...ज्यामुळे हिंदूधर्मप्रेमी जन दुखावले जाऊ शकतील !!!!
...........पण <<<भक्तीत त्या दिसला न तो श्रीराम पहिल्यासारखा>>> ही ओळ काहीतरी बोध घेण्या-शिकण्यासारखी खासच आहे
माझ्यासाठी राममंदीर हाच हासिले गझल !!
गझल आवडली
खूप खूप धन्यवाद नाहिद् भाई या शेरासाठी व गझलेसाठीही
(माझ्या वैयक्तिक मताबाबत प्लीज गैरसमज नसावा )
या माणसाने मोडले सृष्टी नियम
या माणसाने मोडले सृष्टी नियम अन कायदे
नुरला अता क्रमवार तो हंगाम पहिल्यासारखा<<< मस्त शेर. धन्यवाद.
जमीन बढिया आहे. शुभेच्छा.
जमीन बढिया आहे.
शुभेच्छा.
छान....आवडली
छान....आवडली
आपली गझल फुलत आहे. शुभेच्छा.
आपली गझल फुलत आहे.
शुभेच्छा.