Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<< मस्त चाल्ल्लाय हा बाफ..>>
<< मस्त चाल्ल्लाय हा बाफ..>> -
नीधप, >> दिवे-पनवेल-रोहे
नीधप,
>> दिवे-पनवेल-रोहे म्हणजे कोकण रेल्वे. जी वेस्टर्नच्या अंडर येते ना?
दिवे-पनवेल-रोहे हा मार्ग मध्य रेल्वेचा (मुंबई विभाग) आहे. कोकण रेल्वे रोह्यापासून मंगळूरपर्यंत आहे.
आ.न.,
-गा.पै.
<< कोकण रेल्वे रोह्यापासून
<< कोकण रेल्वे रोह्यापासून मंगळूरपर्यंत आहे.>> असं असलं तरीही मुंबईच्या बाजूस को.रे पूर्णपणे मध्य रेल्वेवरच अवलंबून असल्याने ती म.रे.शीं संलग्न आहे असंच म्हणावं लागेल. आजही को.रे.च्या मार्गावर अप्रिल-मे हंगामासाठी ३८ जादा गाड्या सोडण्याचा निर्णयही मला वाटतं मध्य रेल्वेनेच जाहीर केलाय.
गजानन | 19 April, 2013 -
गजानन | 19 April, 2013 - 14:22
दिनेश, या छोट्या रुळांच्या माहितीबद्दल धन्यवाद!
चांदिवलीकडून साकीनाक्याला जाताना मध्येच एक असा बारकुळा ट्रॅक रस्त्याला तिरका छेद देत जातो. तो नेमका कुठून कुठे जातो हे आजवर कळले नाही. <<<
आहाहा आले हो आमच्या साकीनाका चं नाव.
गजानन, तो ट्रॅक घाटकोपर असल्फा (परेरावाडी मार्गे) पर्यंत मी पहिलंय, त्या ट्रॅक वरुन एक डबा गाडी (ट्रॉली) जात होती, साकीनाका पाईपलाईन लगत ती ट्रॅक होती, आता ती पाईपलाईन ही नाही आणि ते ट्रॅक ही नाही. त्या ट्रॉली मध्ये बहुधा टाटा पावर चे कामगार व पाईपलाईन दुरुस्ती चे कामगार असत, पाईपलाईन डोंगरावर पर्यंत होते, त्यांच्या साठी ते ट्रॉली चे सोय केले होते.
पाईपलाईन ब्रिटीश्कालीन होते एव्हढे मला ठाऊक आहे.
दक्षिण मुंबईच्या गल्लीबोळात,
दक्षिण मुंबईच्या गल्लीबोळात, वाड्या- वाड्यांत पूर्वी लहान-मोठे 'दादा' असत. त्यांच्या छोट्या गँग्सही असत. प्रत्यक्ष हाणामारीपेक्षां 'आवाज देणें' अधिक असे. अगदींच काठ्या -तलवारींवर प्रकरण येण्यापूर्वीं ' मांडवळ' करणारे स्पेश्यालीस्टही असत. 'ए', 'बी', 'सी' 'डी' इ.इ व्यावसायिक गँग्सच्या उदयामुळें आतां गल्लीबोळातले तसे हौशी कलाकार राहिले नाहीत व तो कांहीसा रोमँटीक टगेपणा तोंड वर काढायला सहसा धजतही नाही.
गौरीम, त्या काळातल्या लालबाग
गौरीम, त्या काळातल्या लालबाग मधल्या गणेशोत्सवाच्या आठवणी आहेत. त्या काळातही भव्य मूर्ती आणि हलते देखावे असत. मोठे फोटो विकायला असत आणि ते विकत घेतले कि रांग सोडून पुढे जाता येत असे.
००००००००००
ज्यावेळी भर मुंबईत कामगार वस्ती होती, त्यावेळी परळ आणि बॉम्बे सेंट्रलचा एस. टी. स्टँड गजबजलेला असे.
मला आठवतय, त्यावेळी रातराण्या नसत ( अनेक घाट रात्रीच्या प्रवासासाठी धोकादायक होते. धोका केवळ वळणांचाच नव्हता तर जंगली प्राणी, दरोडेखोर आणि भूताखेतांचा पण होता. शिवाय खाजगी बसगाड्या नसल्याने, आता असतो तसा रात्रीचा ट्राफिकही नसे. ) म्हणून पहाटेची गाडी पकडण्यासाठी आम्ही मालाडहून रात्रीच निघून, बॉम्बे सेंट्रलला रात्रभर थांबत असू.
त्या गाड्या दादर आणि सायन हॉस्पिटल ला थांबत असत. पुढे जसे कोकणी लोक उपनगरात गेले तसे अंधेरी, बोरिवलीहून गाड्या सुटू लागल्या. मग आमच्या शिवसृष्टीतच डेपो झाला. ( त्यामूळे आम्ही तर घराच्या दारातच एस. टी. पकडतो. )
पण अजूनही एस. टी. हाच लोकांचा आधार आहे. गावातल्या लोकांचे "साहेबांकडे काम" नेहमीच असते त्यामूळे काही गाड्या थेट मंत्रालयापर्यंत जातात. दादर-उरण, दादर-पनवेल या गाड्याही भरभरुन जातात.
दादर-पुणे एशियाड ( या १९८२ च्या एशियाड गेम्सच्या गाड्या ) शिवनेरी पण एस.टी. च चालवते.
संगणकीकृत रिझर्वेशन मूळे आता तो प्रवासही सुखकर झालाय. पुर्वी भरपूर लाईन असे.
<< दादर-पुणे एशियाड ( या १९८२
<< दादर-पुणे एशियाड ( या १९८२ च्या एशियाड गेम्सच्या गाड्या ) शिवनेरी पण एस.टी. च चालवते.>> थोडं विषयांतर. १९८२चं एशियाड बघायला अम्ही तीन मित्र दिल्लीला १५दिवस होतों. दिवसाचं रु. ५ चं तिकीट काढलं कीं या सतत फेर्या मारत असलेल्या एशियाड बसेसमधून दिवसभर वेगवेगळ्या स्टेडियम्सवर फिरतां येत असे. एशियाड हें भारतातलं The first & most well-organised mega sports event असावं ! आमच्या हस्ते उदघाटन झाल्याने वास्तविक आमची सवलतीच्या दरांत ने-आण करायला हवी होती या बसने मुंबई-पुणे मार्गावर !
अवांतर भाऊ, >> एशियाड हें
अवांतर
भाऊ,
>> एशियाड हें भारतातलं The first & most well-organised mega sports event असावं !
१९५१ की १९८२ चं म्हणताय?
आ.न.,
-गा.पै.
१९६७. चा आजुन एक
१९६७. चा आजुन एक video.
http://www.youtube.com/watch?v=UkOJlfEpoNQ
पारशी परंपरा आणि धर्म ह्यावर
पारशी परंपरा आणि धर्म ह्यावर चर्निरोड जवळ एक प्रदर्शन भरले आहे. आणि जुन्या बसेसच्या मॉडेल्स जुनी मुंबई संबंधित प्रदर्शन चर्चगेटला चालू आहे. बोटावर ठेवलेल्या जुन्या मॉडेलच्या बसचे चित्र आज संडे टाइम्स ला आहे.
.
.
<< १९५१ की १९८२ चं म्हणताय?>>
<< १९५१ की १९८२ चं म्हणताय?>> गा.पै.जी, १९५१चं एशियाड [ 'एशियन गेम्स' ]हे जरी पहिलं असलं, तरी खर्या अर्थाने 'मेगॅ इव्हेंट' १९८२चंच म्हणावं लागेल; १९५१ ला फक्त ११ राष्ट्र ५०० स्पर्धक तर १९८२ ला २३ राष्ट्रं व ३५०० स्पर्धक सहभागी झाले होते. मुख्य म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आवश्यक अशा अद्यावत सुविधा भव्य प्रमाणात सर्व खेळांकरतां १९८२साठीं निर्माण केल्या गेल्या. [ त्यावेळीं आपल्या गरीब देशाने खेळांवर इतका अवाढव्य खर्च करणं अयोग्य आहे अशी टीकाही खूप झाली व त्यांत तथ्यही होतं; पण आजही त्या सुविधा आंतराष्ट्रीय दर्जाच्या मानल्या जातात व त्याने दिल्लीची शानही वाढवली आहे, हेंही खरं.]
[ विषयांतराचं हें शेपूट वाढतच चाललंय; दोष अर्थात माझाच ]
आनगापै, प्रशासकीय दृष्टीने
आनगापै, प्रशासकीय दृष्टीने कोकण रेल्वे हा एक स्वतंत्र प्रभाग आहे. वेस्टर्न किंवा सेंट्रल रेल्वेच्या अखत्यारीत येत नाही.
हार्बर लाइन हा सेंट्रल रेल्वेच्या मुंबईतील लोकल सेवेतील एक भाग आहे. पनवेल स्थानक त्याच भागात येते.
भरत मयेकर, >> प्रशासकीय
भरत मयेकर,
>> प्रशासकीय दृष्टीने कोकण रेल्वे हा एक स्वतंत्र प्रभाग आहे. वेस्टर्न किंवा सेंट्रल रेल्वेच्या
>> अखत्यारीत येत नाही.
अगदी बरोबर. पण इथे चर्चा दिवे-पनवेल-रोहे मार्गाची चालली आहे. हा मार्ग कोकण रेल्वेचा नसून मध्य रेल्वेचा आहे.
आ.न.,
-गा.पै.
संजीव, अच्छा.
संजीव, अच्छा.
कोणे एके काळी मुंबईत आणखी एक
कोणे एके काळी मुंबईत आणखी एक छोटा रेल मार्ग होता आणि तो पूर्वपश्चिम-काटेकोरपणे सांगायचे तर- आग्नेय/वायव्य असा जात होता. तो वेवेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असे. साष्टी-ट्रॉम्बे ट्रॅम वे, सेंट्रल साष्टी ट्रॅम्वे, कुर्ला-साष्टी त्रम्वे ट्रॅम वे अशी ती नावे होती. लोक मात्र सी. एस. टी. रेल वे म्हणत. तुरुंबे(ट्रॉम्बे) हे एक बेटसदृश होते. अतिपूर्वेकडचा हा प्रदेश पश्चिमेला जोडला तर पुष्कळशी पडीक जागा वाढत्या मुंबईच्या विकासासाठी उपलब्ध होऊ शकेल अशी शिफारस बॉम्बे डेवलपमेंट कमिटीने केली होती. त्यानुसार हा मार्ग बांधण्यात आला खरा, पण त्याच वेळी विमानतळाच्या उभारणीचा विचारही पुढे आला आणि त्यासाठी सांताक्रुझ परिसरातली मोकळी जागा योग्य वाटली. अर्थात त्यासाठी जमीन संपादन करताना हा पुढे भविष्यात अत्यंत उपयोगी ठरू शकला असता असा मार्ग बंद करावा लागला. ह्या अल्पजीवी मार्गाची स्मृती आज सी.एस्.टी रोड च्या स्वरूपात जीवित आहे. हा मार्ग तुरुम्ब्याहून निघत असे. नंतर वडवली, माहुल रोड अशी स्टेशन्स घेत कुर्ल्यापर्यंत येई. तिथे मेन जी.आय.पी रेल ओलांडून जुन्या आग्रा रोडच्या खालून पश्चिमोत्तर वळे. इथे आग्रा रोड नावाचे स्टेशन होते. नंतर पुढे कोळीवाडी, कोळेकल्याण इथे स्टेशन्स होती. उत्तरेकडे वळल्यावर सहार,चकाला रोड वरून मार्ग अंधेरीला येई. या रेलवेने प्रवास केल्याच्या आठवणी माझे मामा सांगत असत. १९२८ ते १९३४ अशी जेमतेम सहा वर्षेच हा मार्ग अस्तित्वात राहू शकला. त्यामुळे मुंबईकरांच्या स्मृतीतून तो पुसला गेला आहे.
मस्त माहिती हीरा!
मस्त माहिती हीरा!
आ.न.,
-गा.पै.
हीरा, मस्त माहिती लिहिता
हीरा, मस्त माहिती लिहिता तुम्ही नेहमीच. तुमच्या पोस्ट्स वाचायला खूप आवडतात.
गजानन +1
गजानन +1
हीरा, तुम्ही तर मुंबईचा
हीरा, तुम्ही तर मुंबईचा एन्साय्क्लोपिडीयाच आहात. खूपच मस्त माहिती.
गा.पै., गजानन, मामी, जाई
गा.पै., गजानन, मामी, जाई सर्वांचे आभार.
एक छोटीशी सूचना करावीशी वाटते. या धाग्यावरसुद्धा मुंबईविषयी माहिती असणार्या पुस्तकांची यादी असावी. त्यात मराठीबरोबरच इंग्लिश्, गुजराती पुस्तके समाविष्ट असावी. गुजरातीमध्येसुद्धा मुंबईविषयी खूप माहिती नोंदलेली आहे.
नक्कीच.
नक्कीच.
मामी, खुप छान धागा आहे.
मामी, खुप छान धागा आहे. पाटील, तुमची चित्रे तर अप्रतिम!
माझे बाबा आमच्या समाजाच्या क्रिकेट टिममधुन खेळायचे. तेव्हा त्यांच्या मॅचेस क्रॉस मैदानावर व्ह्यायच्या तेव्हा बर्याचदा त्यांच्याबरोबर तिथे जात होते.
बाबांकडुन बर्याच गोष्टी जुन्या मुंबईच्या ऐकल्यात.... बाबांची मुंज जगन्नाथ शंकरशेटांच्या बंगल्यात झाली. त्यांची वरात शंकरशेटांच्या बग्गीतुन काढलेली. तेव्हा अगदी कमी लोकांकडे बग्या (घोडागाडी)
होत्या. बाबांचे ते लांबचे मामा लागतात.
नाथमाधव पितळे, यांच्याबाबतही बाबा सांगत... त्यांना शिकारीची कशी आवड होती. तेव्हा कसा अपघात होउन ते अधु झाले, त्यानंतर त्यांनी लिखाणाला सुरुवात केली.
हिरा, भारी माहिती
हिरा, भारी माहिती
इथे आग्रा रोड नावाचे स्टेशन
इथे आग्रा रोड नावाचे स्टेशन होते. नंतर पुढे कोळीवाडी, कोळेकल्याण इथे स्टेशन्स होती. >>>
ओह्हो!! तरीच बीकेसीचं नाव मनपाच्या नोंदीनुसार 'व्हिलेज कोलेकल्याण' असं आहे.
सही माहिती हिरा
मंजूडी, सध्याचे मुंबई
मंजूडी, सध्याचे मुंबई विद्यापीठाचे कलीना कँपस हे कोळेकल्याण गावातच वसले आहे. कलीना म्हणजे पूर्वीचे कलियाना (caliana) म्हणजेच कल्याण. हा नवीन कँपस होणार आहे अशा बातम्या देताना तेव्हाच्या बातमीदारांनी 'वान्दरे-सांताक्रुझ परिसरात कोळेकल्याण येथे युनिवर्सिटीचे नवीन कँपस उघडण्याचे जवळपास नक्की झाले आहे' अशा स्वरूपाच्या बातम्या दिल्या होत्या.
मुंबईतील आयकॉनिक वृत्तपत्त्रे
मुंबईतील आयकॉनिक वृत्तपत्त्रे याबद्दलही लिहीले पाहिजे, मिड्डे, आफ्टरनून डिस्पॅच आणि कुरीअर,
बाँबे नावाचे मासिक, टाइम आउट मुंबई हे सध्याचे मासीक, मुंबई मिरर, डीएन ए, प्रत्येकाची खास स्टाइल आहे. पूर्वी ह्यांचे इंग्रजी खरेच मस्त असायचे. अॅड एजन्सीत व्हाउचर कॉपी यायच्या जुन्या तर आम्ही जमवून जमवून वाचून काढायचो. जाहिरात जगा बद्द्ल, नाट्यक्षेत्र, संगीत, चित्रकला क्षेत्रा बद्दल लिहीले पाहिजे प्रत्येक क्षेत्रात शहराचे योगदान अमुल्य आहे. ह्या शहरात एक हायरार्की पाळली जाते. सेठ व त्याच्या खाली काम करणारे. वैतागून का होईना वेळेवर हजर होणारे. आपले व फक्त आपलेच काम बरोब्बर करणारे इथे भेट्तात. जितके तुम्ही लोअर डाउन द हायरार्की तितके लवकर उठावे लागते. साडेतीन , चार पासून जाग तर अस्तेच पण लोक्स कामालाही लागलेले असतात. जितके तुम्ही वरच्या पातळीवरचे, आरामाच्या लाइफ स्टाइलचे तितके तुम्ही उशीरा उठू शकता. हपिसात उशीरा पोहोचू शकता. पहाटे काम करणारे व रात्रीतून काम करणार्या लोकांच्या वेगवेगळ्या फळ्या असतात. एन सीपीए, बी एन एच एस, आर्ट गॅलरीज वगैरे कितेतरी गोष्टी, संस्थांबद्दल लिहीता येइल.
बाँबेवाला. ऑर्ग ही नव्याने सुरू झालेली वेबसाइट जरूर बघा. एक बाई जुन्या मुंबईवर पीएच डी करत आहे तिने उघडली आहे.
जितके तुम्ही वरच्या
जितके तुम्ही वरच्या पातळीवरचे, आरामाच्या लाइफ स्टाइलचे तितके तुम्ही उशीरा उठू शकता. हपिसात उशीरा पोहोचू शकता. >>>>> हे सरकारी ऑफिसातच असू शकतं, अ.मामी. बाकीच्या ऑफिसात सगळ्यांनाच कामच काम आणि बॉसला सगळ्यात जास्ती काम!
<< मुंबईतील आयकॉनिक
<< मुंबईतील आयकॉनिक वृत्तपत्त्रे याबद्दलही लिहीले पाहिजे >> खरंच आजचा जागतिक पुस्तक दिनाचा मुहूर्त साधून याबाबत व मुंबईतील लायब्ररीजबद्दल लिहायला चालना मिळावी. मीं स्वतः फाऊंटनच्या पेटिट लायब्ररीचा खूप वर्षं साभासद होतो. तिथली 'रिडींग रूम' इतकी शांत, हवेशीर होती ! वैशिष्ठ्यपूर्ण पारशी कर्मचारी, वाचक व तिथं ठेवलेलीं कांही टिपीकल पारशी मॅगेझिन्स व वर्तमानपत्रं यामुळें एक घरेलु, लोभस वातावरण असायचं तिथं. अगदीं तशीच माझ्या मित्रांची आवडती ' डेव्हिड ससून लायब्ररी' [ जहांगीर आर्ट गॅलरीच्या समोरची ]. तिथं तर मागें छोटीशी बागही होती -आहे- पुस्तकांतून डोकं काढून मधेंच जावून ताजं तवानं व्हायला. पारशी समाजानं मुंबईला खरंच खूप कांहीं दिलंय !
डेव्हिड ससून लायब्ररी >>>
डेव्हिड ससून लायब्ररी >>> स्वतः डेव्हिड ससून हा ज्यु होता.
डेव्हिड ससून लायब्ररीची माहिती त्या लायब्ररीच्या वेबसाईट खूप छान दिली आहे.
मुंबईचं सुप्रसिध्द ससून डॉक्स हे या डेव्हिड ससूनचा मुलगा - अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून - यानं बांधलंय हे आताच विकीवर वाचलं. कसलं चमत्कारिक नाव आहे. पण इथे सकाळी अतिशय स्वस्त्यात ताजे ताजे मासे मिळतात.
Pages