साधारणपणे शिवरात्रीच्या आसपास बाजारात कवठं मिळायला लागतात. थोडासा आंबट तुरट चवीचा हा रानमेवा अत्यंत पाचक आहे. याची आणि चटणी सरबतही चविष्ट होते.
कवठाची बर्फ़ी नरसोबावाडीचा प्रसाद म्हणूनच ओळखला जातो. साहित्य:
२ कवठे, साखर, पाणी.
बाजारातून आणताना मधुर वासाचं कवठ बघून आणावं. म्हणजे ते पूर्ण पिकलेले असेल. आणि त्यामधे योग्य त्याप्रमाणात पेक्टिन तयार असेल....ज्याच्यामुळे जेली तयार होते. कच्च्या कवठात तुरटपणा खूप जास्त असतो.
कवठे फ़ोडून त्यातला गर काढून घ्या.
हा गर बुडेल इतकं पाणी घालून कुकरमधे शिजवा. १ शिट्टी झाल्यावर २ मिनिटांनी गॅस बंद करा.
प्रेशर गेल्यावर कुकर उघडून हा शिजलेला गर एका मलमलच्या कपड्यात टांगून ठेवा. व याच्या खाली एक भांडे ठेवा. म्हणजे जेली होण्यासाठी लागणारा रस खालच्या भांड्यात जमा होईल.
१ तासभर हे असंच टांगून ठेवा.
मग भांड्यातल्या रसापेक्षा थोडी जास्त साखर या रसात मिक्स करा. म्हणजे समजा एक वाटी रस निघाला तर एक वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घ्या. एकद साखर पूर्णपणे विरघळली की चव घेऊन बघू शकतो. गोडी कमी वाटली तर एखादा चमचा ऍड करायला हरकत नाही. गॅसवर ठेवल्यावर सतत ढवळत रहा ७ ते ८ मिनिटात हा रस आटायला लागेल. मोठे मोत्यासारखे बुडबुडे यायला लागतील. आणि डाव फ़िरवतानाही लक्षात येईल. थोडं जड यायला लागलं की गॅस बंद करा. आणि प्रचि. मधे दाखवल्याप्रमाणे रस खाली पडताना डावाला चिकटून राहायला लागेल.
मग या रसाचं थोडं टेम्परेचर कमी झालं की काचेच्या बरणीत ओता. नंतर तो इतका आळेल की त्याची जेली झालेली दिसेल. बऱ्यापैकी जेली जमल्याची एक खूण म्हणजे प्लेट हलवली तर ही जेली मुळापासून थरथरते.
आता ही जेली आंबट गोड चवीवी जेली ब्रेडला लावून, पोळीशी किंवा गोड खाण्याची कपॅसिटी असल्यास थोडी नुसतीही खाऊ शकता. फ़ळांच्या फोडींबरोबर या जेलीचे तुकडेही अप्रतीम लागतात.
बरणीत सेट झालेल्या जेलीच्या कडेकडेने सुरीचं टोक घालून आधी जेली मोकळी करून घ्या . सेट झालेली जेली अलगद निघून प्लेटमधे (थरथरत!!!!!!) स्थिरावेल.........हो ...... जी थरथरणार नाही, ती जेली कसली? मग धारदार सुरीने त्याचे तुकडे करा.
आणखी एक टीप..........जर जेली थरथरली नाही, म्हणजेच तिला जर जेलीचा जन्म मिळाला नाही तर हाच पदार्थ गेला बाजार "जाम" म्हणून सर्व्ह करायचा! हाकानाका....
(माझी सुरी धारदार नव्हती त्यामुळे तुकडे सुबक नाही झाले.)
दिसत्येय मस्त! पण कवठ हा
दिसत्येय मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण कवठ हा प्रकार कधीच आवडला नाही. आईला खुप आवडायचे. ती चटणी, मुरंबा वगैरे प्रकार करायची.
दिसतेय मस्तच. कधी खाल्ली
दिसतेय मस्तच. कधी खाल्ली नाहीये.
माझी आई करते. मस्त प्रकार
माझी आई करते. मस्त प्रकार असतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कवठ मला कधीच आवडलं
कवठ मला कधीच आवडलं नाही........ जेली बघु कशि लागते ती...दिसतेय तर भारी....
मस्तच दिसतेय ही जेली.....
मस्तच दिसतेय ही जेली..... पिकलेली कवठे मिळाली पाहिजेत.
रस पुर्ण गळल्यावर त्या टांगलेल्या गराचे काय करायचे? फेकुन द्यायचे जीवावर येईल माझ्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिसतेय अप्रतिम. मला ही कवठ
दिसतेय अप्रतिम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला ही कवठ आयुष्यात कधी आवडलं नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नृसिंहवाडी कोल्हापूरला जवळ, वडील नेहमी जायचे करदंट आणि कवठ बर्फी दोन्ही आणायचे. कवठ बर्फीला कुणी हात सुद्धा लावायचं नाही. करदंटवडी बघता बघता गुल व्हायची.
पण कवठ आवडीने खाणारे लोकही कमी नाहीत.
सर्व मुलींना धन्यवाद. साधना
सर्व मुलींना धन्यवाद.
साधना >>> फेकुन द्यायचे जीवावर येईल >>>>>>>>>
मला वाटलं हे फक्त आमच्या पिढीचं व्यवच्छेदक लक्षण आहे!
याची गूळ जिरे पावडर लाल तिखट मीठ घालून चटणी करायची. छान होते.
एकदम मस्त दिस्तेय!! करुन बघेन
एकदम मस्त दिस्तेय!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करुन बघेन
मस्तच लागणार. मी नुसते
मस्तच लागणार. मी नुसते कवठ-गुळ मिक्सरमधु फिरवले तरी मुलगा मिटक्या मारत खातो.. तो २-४ दिवसही भाजी एवजी या पदार्थावर राहु शकेल. जेली नक्की ट्राय केली जाईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो अवल अनिष्का दक्स सर्व
लाजो अवल अनिष्का दक्स सर्व मुलींनो कवठ आणून जेली करून पहा नक्की आवडेलच!
वर्षा म.......तू माझी
वर्षा म.......तू माझी समै(छो.)!
मानुषी ताई मस्त दिसतीय
मानुषी ताई मस्त दिसतीय जेली.
थोडस पिकायला आलेल कवठ फोडून त्यात गुळ,मिठ घालुन खायला खूप आवडत. पण गेल्या कित्येक वर्षात कवठ खायच लांबच बघितल सुद्धा नाहिये....![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
लाजो अवल अनिष्का दक्स सर्व
लाजो अवल अनिष्का दक्स सर्व मुलींनो कवठ आणून जेली करून पहा नक्की आवडेलच!>>>>>>>. नक्किच...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मानुषीताई, इथे कवठ मिळतच नाही
मानुषीताई, इथे कवठ मिळतच नाही![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हम.....लाजो साधारण अंदाज
हम.....लाजो साधारण अंदाज होताच.
परवाच माझ्या लेकीने तिच्या पाकिस्तानी मैत्रिणीला सांगलीचे फोटो दाखवले. त्यातला चिकूचा फोटो पाहून हे फळ कोणते असं विचारलं. तिनेही चिक्कूच कधी पाहिले नव्हते पाकिस्तानात.
मस्त दिसतयं.. पण कवठं मला
मस्त दिसतयं.. पण कवठं मला इतकं आवड्त नाही..घरी सगळे फक्त गुळ घालुन खातात
वॉव!! जेली सही दिसतेय.
वॉव!! जेली सही दिसतेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आतापर्यंत कवठाची चटणी हाच प्रकार माहित होता.
सहीच
सहीच
वॉव! एकदम तोंपासू दिसतेय. >>>
वॉव! एकदम तोंपासू दिसतेय.
>>> सेट झालेली जेली अलगद निघून प्लेटमधे (थरथरत!!!!!!) स्थिरावेल.........हो ...... जी थरथरणार नाही, ती जेली कसली? मग धारदार सुरीने त्याचे तुकडे करा.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
आणखी एक टीप..........जर जेली थरथरली नाही, म्हणजेच तिला जर जेलीचा जन्म मिळाला नाही तर हाच पदार्थ गेला बाजार "जाम" म्हणून सर्व्ह करायचा! हाकानाका....
>>>>
वॉव, मला कवठाचे प्रकार आवडतात
वॉव, मला कवठाचे प्रकार आवडतात एकदम. वडी सुद्धा मस्त लागते.
दुसर्या टाईपचे कवठाची कालव्ण पण आवडते.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
एकदम तोंपासु रेसिपी मला एरवी
एकदम तोंपासु रेसिपी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला एरवी कवठ अज्जिबात आवडत नाही पण हा प्रकार फार आवडतो. कधी करून बघितला नाहीये पण आता करून
बघेन
अ प्र ति म
अ प्र ति म
मस्त प्रकार दिसतोय हा ... पण
मस्त प्रकार दिसतोय हा ...
)
पण रस पूर्ण गळल्यावर त्या टांगलेल्या गराचे काय करायचे? - त्यात असलेल्या बियाही चांगल्या असतात आपल्या पचन संस्थेला - इति माझ्या मातोश्री. (साधना पण एक अस्सल, सर्वगुणसंपन्न मातोश्रीच दिस्तेय ...
सर्व फळांची साले, बिया यातच सगळं सत्व असते असं सारखं बिंबवत असायची माझ्या लहानपणी - मग कंटाळून/ वैतागून मी विचारलं - तो गर वगैरे अगदीच निरुपयोगी दिसतोय - कशाला ही झाडे या निरर्थक गोष्टी निर्माण करतात देव जाणे....
मला आठवतेय तसे लहानपणापासून
मला आठवतेय तसे लहानपणापासून आई ही जेली दरवर्षी बनवायची! मस्त लागते पोळीबरोबर!
एक मात्र काळजी घ्यायची कवठ जरासे कच्चे घ्यायचे जास्त पिकलेले आत लाल झालेले नको!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कारण मग जेली जास्त गोड होते आणि रंगही खुप गडद येतो!
कच्चे कवठ घेतल्यास रंग खुप सुंदर दिसतो आणि आंबट्,तुरट गोड अशी जेली छान लगते!
मानुषी,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे माझ्या आईने सांगितलेले आहे! त्यामुळे लिहले!
काय सुंदर दिसतेय. हे फळच
काय सुंदर दिसतेय. हे फळच माझ्या खुप आवडीचे.
इंग्लिशमधे वूड अॅपल म्हणतात आणि या नावाने असाच प्रकार वूड अॅपल जॅम म्हणून मिळतो.
हि कवठं तूमच्याकडच्या नेवाश्याला फार छान मिळतात. पुणे, न. वाडी, बडोदा या भागातच झाडे आहे. कोकणात झाडेही नाहीत आणि फळेही माहीत नसतात.
अख्खे कवच कसे कादले? आम्ही
अख्खे कवच कसे कादले? आम्ही नारळासारखे फोदून दोन तुकदे करतो..
फायरफॉक्स ब्राउजरमुळे अक्षरे चुकत आहेत.
जेली मस्त दिसत्येय !
जेली मस्त दिसत्येय !
मामी ...........तुला हसायला
मामी ...........तुला हसायला काय जातंय(दिवे!)
माझ्या माहितीतले एक जण बायकोबद्दल नेहेमी म्हणायचे..........."पिठलं खाऊन खाऊन हुतात्मा झालोय आम्ही आत्ता कुठे तिला ढोकळा जमायला लागलाय"
तसंच जाम च्या जन्माला घालता घालता जेली जमायला लागलीये. म्हणून जामच आनंद झालाय!
झंपी वरदा विदिपा रावी धन्यवाद.
शशांक कृष्णा आपापल्या मातोश्रींची आठवण झाली ना!
दिनेशदा.............माझ्या एका मैत्रिणीकडे हे झाड होते. तिच्याकडूनच शिकले.
उद्दाम, कवच आख्खे नाही. कवचाचे २ तुकडे झालेच. पण गर आख्खा निघाला. निघतो तसा कधीकधी.
मस्त दिसतेय. माझी आई करायची
मस्त दिसतेय. माझी आई करायची अशी जेली. मात्र रस गाळून न घेता सगळा गर तसाच घेत असे.
कोकणात झाडेही नाहीत आणि फळेही
कोकणात झाडेही नाहीत आणि फळेही माहीत नसतात. >>> कोकणात काही ठिकाणी अंड्याला कवठ म्हणतात.
Pages